शुचि यांची क्षमा मागून
http://www.misalpav.com/node/12985
एखाद्या मन्द पहाटे ,पाठ सामानाने वाकली असताना
कंडक्टर माणकासारख्या गर्द लाल डोळ्यांसहीत तारवटलेला असताना,
एका पायाने दुसरा पाय खाजवत, तो लाल डबा
डेपोतून येताना पहायचाय.
एखाद्या तेलकट , कळकट कढईत,
कालचा पिवळट वडा आपले पोट उघडून,
नव्यानेच वर्तुळे गिरवीत असेल , त्याला ताजा समजून खायचाय.
जमलं तर कधी केबिनीत
रात्री बदली डायवरच्या जागेवर झोपयचय.
सुसाट हायवेवर वाजवून घ्यायचं आहे हाड न् हाड
खरं सांगायचं तर जिवंत पोहोचू असं वाटतच नाही ,
एवढ्याश्या केबिनीत माण्सं , फण्सं, पोती , डायवर मावतच नाही.
तू दिसतेस , भासतेस , मृतवत , भंगार
पण पळतेस तराट चौखूर बेफाम
अन माझी स्थिती नेहमी "वाट पाहीन पण एष्टीनेच जाईन"
प्रतिक्रिया
1 Jul 2010 - 6:35 am | क्रेमर
एकदम फ्रेश.
(वड्याप्रमाणेच शिळ्या, दारुबाज, प्रेयसी-प्रियकर विडंबनांना कंटाळलेला) क्रेमर
1 Jul 2010 - 7:02 am | राजेश घासकडवी
असंच म्हणतो...
1 Jul 2010 - 6:58 am | सहज
कडक!
1 Jul 2010 - 7:04 am | चतुरंग
सही जा रे ले मामू!
एकदम क आणि ड आणि क! =D>
चतुरंग
1 Jul 2010 - 8:40 am | शिल्पा ब
भयंकर आवडलं...
(यष्टीप्रेमी ) पडवळ
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
1 Jul 2010 - 10:30 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
झ का स!
1 Jul 2010 - 1:03 pm | गणपा
हा हा हा
हे ही मस्त जमलय.