"ए कटली रे कटली "
"ए मध्या .......... पकड पकड "
"मांजा पकड ... मी पतंग घेउन आलो "
"च्यायला ... टार्या लै गुतुडा झाला लका .. मांजा काय कामाचा नाय "
" आण रं इकडं .... गुतुडा आसला मुन काय आख्खा मांजा वाया घालितो का ? "
काही नात्यांचही असंच असतं , बरिच गुंतागुंत असते आणि आपण तो गुंता सोडवण्याबाबद बर्याचदा पॅसिव्ह किंवा निगेटिव्ह असतो. गोष्ट मनाला बोचत असते कुठे तरी. पण कधी इगो आडवा येतो, मी कमीपणा का घेऊ ? मी का गैरसमज दुर करावेत ? नाती नेहमी रक्ताचीच असावीत असंही नाही. इनफॅक्ट आपला नातेवाईकांशी हल्ली संबंध तरी कितीसा येतो हो ? कधी सुख-दु:खाच्या प्रसंगात तोंडदेखली चार हाय-बाय-कसंकाय ? म्हंटलं की तोंड फिरवुन नावं ठेवणार असे हे रक्ताचे नाते. आय डोण्ड गिव्ह अ डॅम् !!!
जेंव्हा मी माझ्या पहिल्या-वहिल्या जॉबला जॉइन झालो होतो , तेंव्हा एकटाच सिलेक्ट झालो होतो. सगळं कसं नविन नविन होतं. एसीचं थंडगार वातावरण , कायम रफ्रेशनरचा घुमणारा सुगंध. सगळे टाय वगैरे घालुन सोफॅक्स्टिकेटेड लोकं त्यात मी आपला साध्या फॉर्मल्स मधे. ते वेल ऑर्गनाइझ्ड क्युबिकल्स , टिम वाईज विभागणी, एखाद्या कॉन्फरंस्न हॉल मधे चाललेली मिटींग, कोणत्या ट्रेणिंग रुम मधे कुठल्याश्या टिमचं चाललेलं ट्रेणिंग.. आपल्या अॅक्सेस कार्ड मुळे ऑटोअनलॉक होणारे दरवाजे, कँटिन मधे सगळे कसे गृपने येणार ... मला सगळंच नविन, कुतुहल होतं ह्या गोष्टींचं ... माझ्या साठी सगळेच चेहरे नविन! बरं अशी डायरेक्ट ओळख तरी कशी काढणार ? खुप बोर व्हायचं ! मग जीमेल ला लॉगिन करुन कंपनीतल्या गमतीजमती मित्रांबरोबर शेयर करायच्या. तो त्याच्या कंपनीतलं आणि आपण आपल्या कंपनीतलं वातावरण एकमेकांना सांगुन काय मिळायचं ते माहित नाही, पण फ्रेशरची जेंव्हा इंडस्ट्रित एंट्री होते तेंव्हा त्याला ह्या गोष्टींच कुतूहल असतं तसं मलाही होतं .
थोड्या कालावधीत मी थोडा रुळलो. त्यावेळी माझे केस मानेपर्यंत लांब होते. आणि हाईट पर्सनॅलिटीमुळे मला लोकं टरकून होती, माझ्याशी बोलायला थोडी नर्व्हसायची, हे नंतर मला समजलं आणि मी ओशाळलो. लगेच केस कापुन माणसात आलो. :) नोकरी लागेपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारच्या मैत्रिणी नव्हत्या , मुलींशी बोलायला आमची अंमळ फाटायची हो. मी जॉइन केल्यावर माझ्या टिम मधे अजुन एक मुलगा- मुलगी जॉइन झाले. साहजिकच आमचा गृप झाला. मी तीन महिणे बेंचवर बसुन जे काही शिकलो ते त्या दोघांना शिकवण्याचं काम मला असाईन केलं गेलं. काही दिवसांनी त्या नव्या मित्राला दुसर्या प्रोजेक्ट वर लटकवलं , आणि मग ती आणि मी दोघंच उरलो .. तिच्याशी बोलताना मी नेहमी नर्व्हस असायचो. ती सुद्धा असावी. पण हळुहळु हे फॉर्मल वागणं संपलं , मैत्री बरीच घट्ट होत गेली. तिला कधी काही आडलं तर मी लगेच मदत करायचो. ती फार फार प्रश्न विचारयची.अगदी स्वतःच्या डोक्यात तो मॉनिटर मारुन घ्यावा असं वाटावं इतकं. आमची कंपनी प्रॉडक्ट बेस्ड होती. ते प्रॉडक्ट बँकेसाठी कार्ड मॅनेजमेंट , एटिएम्/पॉस मॅनेजमेंट चं काम करतं शिवाय कोर बँकिंगहोस्ट ला कनेक्टेड असतं. तसं पाहिलं तर कोर बँकिंग च्या तुलनेत प्रोडक्ट छोटं असलं तरी, प्रॉडक्ट भयंकर मोठा आहे. तर ह्या बाई म्हणत आपण लोक बँकिंग होस्ट का नाही बनवत ? (इथे मी डोक्याची केसं उपटली होती) ...
तिला मी तिच्या नावाच्या टाईपचा कबाब असल्यानं "कबाब" असंच नाव पाडलं होतं , च्येष्टा मस्करीत दिवस कसा आरामात कटायचा. ती णॉनमहाराष्ट्रीयन होती, एम्टिआय मुळे तिचं बर्याच शब्दांचे उच्चार कॉमेडी असायचे.जसं कॉपी चं कोपी व्हायचं , रॅम चं रेम व्हायचं. मी तिची मुद्दाम मिमिक्रि करायचो.
माझ्यासाठी हे सगळं मैत्रीपर्यंतंच होतं, पण तिच्या मनात माझ्या हेतुंविषयी शंका असावी. एका दिवशी अचानक तिने तिरकस बोलायला सुरुवात केली, "स्टे अवे फ्रॉम मी" असं काहीसं फिलिंग आलं! थोडंसं वाईट वाटलं आणि मी डायरेक्ट बोलणंच बंद केलंन! तिनेही काही रिस्पॉन्स दाखवला नव्हता.. कामापुरतं फक्त काय ते बोलणं व्हायचं. थोड्या दिवसांनी मी अफ्रिकेला जाणार असं कळल्यावर ती स्वत:हुन बोलायला आली , मी देखील कसला ही संकोच न बाळगता नॉर्मल रिस्पॉन्स दिला. लंच मधे म्हणाली , " तु जाणार तर बोर होईल मला खुप :) "
"हो , पण मला थोडी शांती मिळेल =)) " ख्या ख्या हसत मी.
त्यावर तिला पुन्हा राग आला होता. नंतर मी तिकडे असतांना तिलाही दुसर्या देशात ऑनसाईट पाठवलं होतं. तिकडुन चॅट वर पिंग करायची. इम्प्लिमेंटशन चा काही इश्यु असला की विचारायची. मी हातचं काम सोडुन तिचे इश्यु सिम्युलेट करुन सोडवण्याच्या मागे लागायचो. कधी छोट्या मोठ्या गोष्टी सांगायची. मी देखील हिरारीने समुपदेशन करायचो. थोडक्यात आय वाज अ लिसनर कम अॅडव्हायझर कम मेट फॉर हर. अलिकडच्या काळात काहीतरी कारणांवरुन सारखं काही बिनसायचं. ती माझ्याशी बोलणं सोडायची , पण मी मुद्दाम तिच्या आवाजाची नक्कल करुन जोक क्रॅक करायचो. कधीतरी तीला हसु फुटत असे आणि न लागणार्या गोष्टी .. जसं तिचा हात किंवा नोटबुक .. ह्याने माला बडवले जायचे. मी पण "थांब आता पोलिस कंप्लेंटंच करतो, मला हिने मारलं म्हणुन .. ए पोरांनो तुम्ही साक्षीला आहात ना रे " म्हणुन तिला अजुन चिडवायचो. बर्याचदा तिला कंपनीतुन बसस्टॉप पर्यंत लिफ्ट द्यायचो तेंव्हा तिचे पर्सनल प्रॉब्लेम्स , ऑफिसातले प्रॉब्लेम्स ती मला सांगायची ... "आमुक आमुक बॉस काही निट बोलत नाही रे हल्ली " , "सरांनी मला परफॉर्मन्स खराब आहे म्हणुन सगळ्यांसमोर पॉईंट आउट केलं आज " पासुन ते "तो सोम्यागोम्या हल्ली ट्राय करतोय माझ्यावर " असल्या गोष्टी सांगायची, त्यावर मी "मला त्याची किव येतो .. देव त्याला शक्ति देवो" म्हणुन तिला आनखीच चिडवायचो.
एकदा काय झालं , लंच ब्रेक मधे आम्ही प्लेटा घेउन जेवण आणायला गेलो तेंव्हा एक दुसर्या टिम मधला नविन पोरगा हिच्याशी बोलण्याचा ट्राय करत होता, हिने त्याला तेंव्हा काही भाव दिला नाही. संध्याकाळी स्नॅक्स च्या सुमारास मी दुसर्या क्युबिकल मधे जाईन हिला फोन लावला आणि आवाज बदलुन बोलायला सुरुवात केली. , "हॅलो.. मे आय स्पिक विथ ... "
"येस स्पिकींग ... "
"हाय , धिस इज विनीत, वे मेट इन कँटिन अॅट लंच , यु रेमेंबर ?"
"येस.... येस.... "
"अॅक्चुली ... आय वांट टू टॉक समथिंग , कॅन वी मिट इन कॅफेटेरिया ?"
" या ... व्हाय नॉट ... आय वॉज अबाऊट टू लिव्ह टू कँटिन ओन्ली "
"ओके देन ... सी यु देयर इन अ मिनीट" फोन ठेऊन पटकन माझ्या क्युबिकल मधे येऊन साळसुदासारखा येऊन बसलो.
ती पटकन वॉशरुम मधे जाऊन तोंड वगरे धुवुन आली ... आपले स्पेक्स आणि ड्रेस ठिक करत निघणार इतक्यात मी तिला टोकलं " किधर जा रही है रे ??? इतना नट के ? "
"ए टार्या ... तुझे क्या करना है ? मे किधर भी जाऊं .... तु तेरा काम कर "
" अबे ए .... कोई विनीत बिनीत नही आने वाला ... मैनेही फोन किया था ... चली नट थट के.. बैठ ... "
त्यावर तिचे एक्स्प्रेशन क्लिक करण्यासारखे होते. तिने रागाच्या भरात इतका जोरात टोचला की मी चार दिवस केकलत होतो.
तिच्या रुममेट नं एकदा रुम साफ करण्यावरुन कशी भांडणं केली , कशी जेवण बनवण्यावरुन पेटली इत्यादी गोष्टींचे गार्हाणे ऐकण्याचं कामंही माझ्याकडे न विचारता आलं होतं. तसा मी तिच्याशी काही शेयर करायचो नाही , पण तिला सल्ले द्यायला , तिचं ऐकुन घ्यायला मला नाही म्हंटलं तरी बरं वाटायचं (चला कोणी तरी पोरगी तेवढा तरी भाव देतेय राव)
नंतर मी जॉब सोडुन नविन जॉब पकडला. जॉब सोडला तेंव्हा काही कारणांवरुन बिनसलंच होतं. नंतर कधीतरी तिचा फोन आला. भेटलोही, गंधर्व मधे मस्त मसाला उत्तप्पा वगैरे खाल्ल्यावर जंगलीमहाराज रोडावर चालता चालता तिनं तिचे पर्सनल प्रॉब्लेम सांगायला सुरुवात केली , मी आपला नेहमीप्रमाणे ऐकत होतो. नंतर कधीतरी तिनं मला काही कारणांसाठी बोलावलं होतं , मी जायचा कंटाळा केल्यावर तिला त्याचा राग आला आणि आमचं बोलणं पुन्हा बंद झालं . हे सगळं नेहमीच अलिखीत घडायचं. त्यानंतर बराच काळ मी बोललो नाही. ती चॅट लिस्ट मधे ऑनलाईन दिसे पण कधी पिंग करावसं वाटायचं नाही. कधी वाटलंच तर चॅट विंडो ओपन करुन मेसेजही टाईप करायचो ... पण एंटर ऐवजी एस्केप वर बोटं टेकायची ... का ते माहित नाही पण मी कधीच तिला अॅप्रोच केलं नाही ना तिने मला ... कधी काळी तिचा "हाय" आला तर माझा इगो जागा होईन मी रिप्लाय केला नाही .... एखाद दिवशी मी चुकुन "कशी आहेस गं" विचारलं तर समोरुन बर्याच वेळानं "बिझि" एवढाच रिप्लाय यायचा... जवळपास ७-८ महिने लोटले. दरम्यानच्या काळात बोलु की नको बोलु की नको वर गाडी अटकायची .. आणि मी काही बोलायचो नाही.
आज एक कुल जोक वाचला आणि लिस्ट मधल्या मित्रांना फॉरवर्ड करता करता तिला ही पाठवला . चटकन तिने रिप्लाय केला .. हाय हॅलो नंतर विचारपुस केल्यावर (तसेही एकमेकांचे अपडेट्स ह्याच्यात्याच्या मार्फत आपल्याला मिळतातंच, तेंव्हा त्यांना अपडेट्स म्हणावं का ? ) तिनं विचारलं " तुझी इच्छा असेल तर काही पेस्ट करु ? " , हो म्हणताच तिने काहीतरी शायरी पेस्ट केली ... नंतर एक छोटीशी कविता.... ओळींचा अर्थ चटकन लक्षात आला आणि हळवा झालो . भरभर जुण्या आठवणी काढल्या ... कितीकिती पेंडिंग गोष्टी होत्या.. आज बरं वाटलं बोलुन.
कधी कधी आपण समोरच्या विषयी किती एकांगी विचार करतो , नाही ? बर्याचदा परिस्थिती काही वेगळीच असते. गैरसमज, स्वाभिमान, अहं, समोरच्याला गृहित धरणं ह्या मुळे जो "गुत्तुडा" होतो ना , तो एखाद्या वेळेस सोडवुन पहा ... फार बरं वाटतं !!
प्रतिक्रिया
25 Jun 2010 - 12:00 am | राजेश घासकडवी
कथा चांगली रंगवली आहे. शेवट थोडा लवकर आवरला आसं वाटलं. गुंत्याच्या आणखीन गाठी उलगडून दाखवल्या असत्या तर.. असं वाटत राहिलं.
keep it up
25 Jun 2010 - 12:04 am | टारझन
जास्त खाजगी उलगडण्याची गरज वाटली नाही , थोडक्यात सांगण्यात कमी पडलो असेन.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.
25 Jun 2010 - 12:15 am | कशिद
keep it up
25 Jun 2010 - 12:20 am | घाटावरचे भट
छान प्रकटन. आवडेश.
25 Jun 2010 - 12:25 am | नंदन
आहे.
--- अगदी, अगदी.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
25 Jun 2010 - 12:27 am | श्रावण मोडक
नंदनशी सहमत!
25 Jun 2010 - 12:31 am | मस्त कलंदर
आणि मी मोडकांशी!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
25 Jun 2010 - 12:31 am | मस्त कलंदर
आणि मी मोडकांशी!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
25 Jun 2010 - 12:36 am | चतुरंग
ईगो आणि गृहित धरणं हे मोठे शत्रू!
(टार्या, खूप दिवसांनी विचार करायला लावणारं ललित लिहिलंस. मस्त. खूप बरं वाटलं वाचून.)
(मांज्याच्या गुंत्यानं हात कापलेला)चतुरंग
25 Jun 2010 - 12:21 am | स्वप्निल..
:)
25 Jun 2010 - 12:30 am | प्रभो
अंमळ आमच्या गुत्तड्याच्या आठवणीने हळवा झालो... :(
परतल्यावर सोडवावा लागेल गुंता... :)
25 Jun 2010 - 4:26 am | चिन्मना
असंच काहीसं झालं :|
टार्या लेकाच्या जुन्या आठवणींमध्ये लोटलंस तू... गुत्ताड काही केल्या सुटत नाही कित्येक वर्षं झाली तरी... :<
_______________________________
जुनी वाईन, जुनी मैत्री, आणि जुन्या आठवणींचे मूल्य करता येत नाही
25 Jun 2010 - 12:30 am | बिपिन कार्यकर्ते
पर्फेक्ट टार्या धागा. जास्त खाजगी न लिहिताही अजून लिहिता आलं असतं असं वाटलं. पण थेट मनातून आलेलं असं जे जाणवतं ते तुझ्या लेखनाच वैशिष्ट्य. कीप इट अप असेच म्हणतो.
बिपिन कार्यकर्ते
25 Jun 2010 - 12:39 am | शुचि
+१
थेट मनातून आलेलं असं जे जाणवतं ते तुझ्या लेखनाच वैशिष्ट्य
टारगट बेअर्स हिज सोल इन हिज रायटींग. काही मुलामा नसतो. मला आवडतं.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
25 Jun 2010 - 12:32 am | यशोधरा
चांगलं लिहिलस टारू.
25 Jun 2010 - 1:50 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
जुना टारू पुन्हा जागा झालेला दिसतो आहे ... उत्तम लिखाण टारू.
अदिती
25 Jun 2010 - 12:33 am | शुचि
छान लेख आहे रे टारझन.
पण मला वाटतं काही मुली इतरांना फार "ग्रांटेड" घेतात. अशांना फार भाव नको देत जाऊस : (
व्हाय द हेल वॉज शी सो मूडी? हे लोक इतरांना काय मूड सांभाळणारे समजतात काय? मला खूप राग आला तिचा.
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
25 Jun 2010 - 12:40 am | टारझन
हा हा हा , बर्याच जणांचा असा स्वभाव असतो ... आय वॉज ओक्के विथ ईट ...
आई-बापा पासुन लांब एकटं राहाणं , जास्त कोणात मिसळण्याची सवय नसनं आणि एखाद्याच्या सहवासात जास्त काळ राहिलं की चुकुन असं होत असावं :)
" गर्ल्स अल्वेज नीड अ लिसणर " क असं कोणीतरी ख्यातणाम माणुस म्हणुन गेलाय म्हणे :)
-(ख्यातनाम) टारझन
25 Jun 2010 - 2:07 pm | llपुण्याचे पेशवेll
एखाद्याच्या सहवासात जास्त काळ राहिलं की चुकुन असं होत असावं
खरंय बघ. कधी कधी अति सहवासामुळे तसं होत असावं.
टारू लेख बाकी मस्तं.
(असा-तसा)
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix
25 Jun 2010 - 12:56 am | रेवती
एवढं चांगलं लिहिता येतं तर उगीच चटोर धागे का काढतोस रे टार्या?
मनात बरच साठून आल्यावर सप्पाट्यात लिहून मोकळा हा बुवा!
चांगलं लिहिलयस.
रेवती
25 Jun 2010 - 1:00 am | घाटावरचे भट
प्रकाटाआ
25 Jun 2010 - 1:00 am | घाटावरचे भट
>>मनात बरच साठून आल्यावर सप्पाट्यात लिहून मोकळा हा बुवा!
हम्म्म्म.... यालाच 'मणाच्या कपातले'चे अजून एक (जास्त चांगले) व्हर्जन मानावे काय?? :-?
25 Jun 2010 - 12:48 pm | स्वाती दिनेश
एवढं चांगलं लिहिता येतं तर उगीच चटोर धागे का काढतोस रे टार्या?
मनात बरच साठून आल्यावर सप्पाट्यात लिहून मोकळा हा बुवा!
चांगलं लिहिलयस.
रेवतीसारखेच आले माझ्याही मनात..
स्वाती
25 Jun 2010 - 2:11 am | शिल्पा ब
मस्त लिहिलय...
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
25 Jun 2010 - 3:10 am | इंटरनेटस्नेही
छान लिहिलंय टारझन, मी तुमच्या भावना समजू शकतो. कधी कधी काय होत, आपण एखाद्या व्यक्तीला प्रेम, मैत्री भावनेने मदत करतो.. मात्र अशा व्यक्ती समोरच्या व्यक्तीचा पुरेपूर वापर करून घेत असतात. मात्र आपण हे सर्व प्रेमापोटीच करत असल्याने आपल्याला त्याची जाणीव होत नाही.
काही व्यक्ती पक्क्या मुरलेल्या लोभी, स्वार्थी आणि ढोंगी असतात. मला अशा अनेक मित्र आणि मैत्रीणींचा अनुभव आहे. अशांपासून सावध राहणेच श्रेयस्कर.
[विशेष नोंद: मला माझ्या प्रतिसादातून कुठेही तुमच्या भावना दुखवायच्या नाहीत अथवा तुमच्या मैत्रीणीबद्दल कोणतेही विधान करायचे नाही, हा प्रतिसाद म्हणजे माझे एक सामान्य मत (general opinion) आहे.]
--
(अनुभवी)इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
25 Jun 2010 - 3:40 am | धनंजय
असा संबंध म्हणजे आनंद की छळवाद म्हणावा, असे वाटू लागते.
प्रकटन आवडले.
25 Jun 2010 - 4:50 am | अडगळ
आवडलं
25 Jun 2010 - 5:51 am | सहज
गुत्तडा.
असेच मोठे व्हा! :-)
25 Jun 2010 - 8:54 am | रामदास
मण किती कोमळ असतं हे बर्याच जणांना उमजत नाही.
वा बुवा !!! किती तरी दिवसानी ण कसा कोमल लागलाय.
25 Jun 2010 - 10:16 am | jaypal
" आण रं इकडं .... गुतुडा आसला मुन काय आख्खा मांजा वाया घालितो का ? " एकदम पटेश =D> =D> =D>
***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/
25 Jun 2010 - 10:21 am | छोटा डॉन
टार्या, एक नंबर लिहले आहेस रे.
भाड्या एवढे चांगले जमत असताना हा प्रकार वारंवार का ट्राय करत नाहीस ?
लेख एकदम मस्त, आवडला !
बाकी 'रिलेशन्स' म्हणजे 'गुत्तुडा' हा आलाच, कधी सहज एका झटक्यात सुटतो तर सोडवण्याच्या प्रयत्न करत असताना जास्तच 'गुत्तुन' बसतो.
काहीही करा पण सावधगिरी ही बाळगावीच लागते, कारण हा 'गुत्तुडा' मांजासारखाच तेज असतो व कधी 'जखम देईल' ते सांगता येत नाही, म्हणुन हे मांजासारखे रिलेशन्स जरा जपुनच हाताळावेत.
त्यात रिलेशन्स जर नाजुक वळणावर असतील तर जास्तच सावधगिरी पाळणे आवश्यक असते कारण " कधी कधी चांगले रिलेशन्स असलेल्या एक मित्राने आपल्या दिलेली खणखणीत शिवी गोड वाटते तर तेच रिलेशन्स इघडले की एखादा साधा शब्दही काही वेळा खुप ठेच पोहचवतो ..."
------
छोटा डॉन
25 Jun 2010 - 2:00 pm | आनंदयात्री
चांगला लेखक आहे रे टारु
त्याला दगडं नका मारु !!
25 Jun 2010 - 11:01 am | sandeepn
छान. लेख आवडला.
25 Jun 2010 - 11:31 am | विसोबा खेचर
छान प्रकटन रे टार्या..
अवांतर - तूर्तास माझ्या आयुष्यात अश्या काही घटना घडत आहेत, घडल्या आहेत की त्यामुळे सगळा गुतडा सुटला आहे.. मित्रांचा, नात्यागोत्याचा, सगळाच गुतडा सुटला आहे, स्वच्छ झाला आहे. आपलं कोण, परकं कोण हे स्पष्ट झालं आहे..
ज्यांना आपलं मानत होतो त्यानी पार परकं केलं आणि काही परके वाटत होते, ते खूप आपले निघाले, माझे निघाले! :)
असो,
लेख वाचून बरं वाटलं रे..
(फिनिक्सची उमेद असलेला) तात्या.
25 Jun 2010 - 12:59 pm | प्रमोद देव
आवडला बरं का तुमचा गुत्तुडा!
25 Jun 2010 - 1:24 pm | स्मिता चावरे
तुम्ही 'असंही' छान लिहिता की! आवडलं.
25 Jun 2010 - 1:43 pm | वेताळ
पण टार्याने खुपच चांगले लिहले आहे.बाकी एक ईचारु का?
वेताळ
25 Jun 2010 - 2:13 pm | निखिल देशपांडे
टारझन भौ उत्तम लेख
टार्या अॅट हिस बेस्ट..
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
25 Jun 2010 - 2:16 pm | satish kulkarni
मण किती कोमळ असतं हे बर्याच जणांना उमजत नाही.
वा बुवा !!! किती तरी दिवसानी ण कसा कोमल लागलाय.
असेच म्हणतो.....
25 Jun 2010 - 2:24 pm | परिकथेतील राजकुमार
सुंदर !!
टार्या मस्तच लिहिले आहेस रे, एकदम आवडून गेले :)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
25 Jun 2010 - 2:40 pm | स्पंदना
अतिशय सुन्दर!! "गुत्तुडा झाला म्हणुन टाकुन द्यायचा का?" सुन्दर विचार.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
25 Jun 2010 - 3:23 pm | प्रमोद्_पुणे
छान..आवडले..
25 Jun 2010 - 3:35 pm | मस्त कलंदर
टारू.. खूप छान लिहिलंयस.. डॉनच्या प्रतिसादासही सहमत!!!
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
25 Jun 2010 - 6:53 pm | उपास
टारबा एकदम झक्कासच..
more personal you write, more universal it is..
[हळवा] उपास
उपास मार आणि उपासमार
25 Jun 2010 - 7:44 pm | मी-सौरभ
लै भा हा री ही.....
-----
सौरभ :)
26 Jun 2010 - 2:56 pm | समंजस
छान! सहमत!!
:)
26 Jun 2010 - 4:31 pm | लवंगी
लोकांची आयुष्य जातात मनातले गुत्ताडे जपताना.. सोडवण किती सोप्प असत, कळतच नाही कित्येकांना!!!
26 Jun 2010 - 8:40 pm | टारझन
धन्यवाद रे माझ्या मित्रमैत्रिणींनो :) माझे दोन शब्द शांत चित्ताने वाचल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे ,
जैहिन्जैम्हाराष्ट्र !!
27 Jun 2010 - 6:40 pm | शानबा५१२
आम्हास असले विषय वज्र आहेत.
.........खुप पुर्वीपासुन!
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
27 Jun 2010 - 6:50 pm | वेताळ
तु संन्यासी आहेस काय?
वेताळ
27 Jun 2010 - 11:27 pm | शानबा५१२
आम्ही आयुष्यात इतक्या वेळ(वर्ष) वाया घालवणा-या,प्रतिमा खराब करणा-या कामात खुप वाटोळ करुन घेतल आहे,आता हे त्यात भर नको व ज्ञानसाधनेत व्यतय नको म्हणुन अशा गोष्टींना लांबुनच रामराम करतो!
~X( पुरे पुरे शान्बा!!
__________________________________________________
see what Google thinks about me!
इथे
27 Jun 2010 - 6:41 pm | शानबा५१२
विबआ
___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे