<चूळ>

शुचि's picture
शुचि in जे न देखे रवी...
24 Jun 2010 - 8:40 pm

हातात दातून
घेवुन आम्ही दात घासायचो
ती एक चूळ भरायची अन्
मी दुसरी चूळ भरायचो

दात घासत
चूळा भरत असताना,
चुंबनाआधी माउथफ्रेशनरची शिस्त पाळायची
एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो

माउथफ्रेशनर वापरता वापरता
कधी तिची बत्तीशी पडली कळलच नाही
मी मात्र भरत आहे त्याच चूळा
माऊथफ्रेशनर वापरत... डे टु नाईट.

शृंगारप्रेमकाव्य

प्रतिक्रिया

रेवती's picture

24 Jun 2010 - 8:43 pm | रेवती

खि खि खि!
आता कोणीतरी 'चूळ' भरेलच असे वाटत असताना हे विडंबन आले.
आज (चूळ) भरून पावले.;)

रेवती

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

24 Jun 2010 - 8:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

=)) =))
भडकमकर मास्तरांकरांकडून जालिंदरबाबांचा अंगारा आणा!

अदिती

चतुरंग's picture

24 Jun 2010 - 8:50 pm | चतुरंग

आज काही खरं नाही! =)) =))
अरे केसूशेठ कुठे गेले? शोधा शोधा....

चतुरंग

टारझन's picture

24 Jun 2010 - 10:01 pm | टारझन

वा सुचि वा !! मस्त मस्त मस्त :)

ए कुठाय रे माऊथगफ्रेशणर ... घेऊन या पोतंभर ;)

- कवळ्या

शिल्पा ब's picture

24 Jun 2010 - 10:04 pm | शिल्पा ब

नुसतं चुंबन काय आलिंगन काय आणि मौथ फ्रेशनर वापरून चुंबन काय !!! एवढी चुम्बाचुम्बी !!! बर्याच रोम्यांटिक मुडात दिसतेय...

छान विडंबन.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

प्रभो's picture

24 Jun 2010 - 10:06 pm | प्रभो

हाहाहा....लै भारी....

(चुळचुळा)प्रभो

विसोबा खेचर's picture

24 Jun 2010 - 10:11 pm | विसोबा खेचर

चालू द्या.. :)

निरन्जन वहालेकर's picture

25 Jun 2010 - 11:11 am | निरन्जन वहालेकर

'रूळा' वरून धाडधाड करीत विडंबन एक्सप्रेस "गूळ" काढायचे "खूळ" काढून थेट चुम्बा चुंबी पर्यंत ! अन तेही फ्रेशनर ने "चूळ" भरून ! वा !
लगे रहो ! ! !
आवडले ! ! !

छोटा डॉन's picture

25 Jun 2010 - 11:26 am | छोटा डॉन

अशक्य विडंबन आणि त्याची थीम ...

चुंबनाआधी माउथफ्रेशनरची शिस्त पाळायची
एकमेकांना हलकेच बजावुन सांगायचो

_/\_
अत्यंत जबरा ( आणि वास्तविकतेच्या जवळ जाणारे ;) )!!!
लै जबरा ...

------
(शिग्रेटी फुकुन माऊथ फ्रेशनर वापरणारा) छोटा डॉन

अवलिया's picture

25 Jun 2010 - 5:19 pm | अवलिया

विडंबनातुन समुपदेशन... लगे रहो

--अवलिया

बिपिन कार्यकर्ते's picture

25 Jun 2010 - 5:22 pm | बिपिन कार्यकर्ते

दणका विडंबन !!!

(चूळप्रेमी) बिपिन कार्यकर्ते