सॉफ़्ट्वेअर क्षेत्र – मी पाहिले तसे.

sandeepn's picture
sandeepn in जनातलं, मनातलं
22 Jun 2010 - 5:33 pm

भारताने खुले अर्थिक धोरण अवलंबले आणि बोलता बोलता जागतिकीकरणाचे वारे भारतात वाहू लागले आणि यात सगळा भारत वाहत गेला. नारायण मुर्ती,अझिझ प्रेमजी यासारख्या वल्लींनी सॉफ़्ट्वेअर उद्योगामधे उल्लेखनिय कामगिरी करून दाखवली.आणि पाश्चात्य देशांना कमी किमतीत सॉफ़्ट्वेअर बनवुन देणारी खाण सापडली. बोलता बोलता सॉफ़्ट्वेअर सेवा क्षेत्रामधे भारत अग्रगण्य बनला.सुरवातीला लोकांची कामे कॉम्पुटर करील व लोकांच्या नोकय्रा धोक्यात येतील असे भाकीत वर्तवण्यात आले. पण त्याच कॉम्पुटरमुळे खूप सारय्रा नोकरय्रा उपलब्ध झाल्या.आणि मागणी तसा पुरवठा या मार्गाने सॉफ़्ट्वेअर इजिंनियर लोकांची एक फ़ळीच तयार झाली. लोक करीयर म्हणुन या क्षेत्राचा विचार करु लागली. हे लोक कमी पडायला लागले मग वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना पण प्रशिक्षण देवुन इकडे वळवण्यात आले. येथे मिळणाय्रा आकर्षक पगारा मुळे बरेच लोक इकडे वळाले. बरेच जण आपल्या मुलाला सॉफ़्ट्वेअर इजिंनियर बनवायचे स्वप्न बघायला लागले.
तसे या सॉफ़्ट्वेअर मुळे फ़ायदे पण फ़ार झाले. त्यामुळे आपल्या भारताच्या अर्थकारणाला गती आली. परकीय चलनाचा ओघ वाधला. मधमवर्गीयांची मुले पण चांगली पॅकेजेस घेवु लागले आणि त्यांचा राहनीमानाचा दर्जा पण वाढला.पुर्वी क्वचित घडणारी परदेशवारी काहींच्या नित्याची बाब झाली.आता परदेशात जाण्याचे काही अप्रुप राहिले नाही.इतर उद्योग जसे बांधकाम,हॉटेल्स,वाहन इ. उद्योगांना पण चालना मिळाली.
             आता तोटे म्हणाल तर महत्वाचे म्हणजे महागाई वाढली.सुरवातीला यांच्या मोठ्या पॅकेजेस मुळे या लोकांनी घरे घेण्याचा धडाकाच लावला. मग सदनिकांचे दर गगनाला भिडले.कॉलेजेसच्या कँपस इंटरव्यु मधे सगळ्या ब्रॅंचेस चे टॉपर्स सॉफ़्ट्वेअर मधे ओढले गेले आणि इतर क्षेत्रातील क्रीम टॅलेंट सॉफ़्ट्वेअरला गेल्यामुळे मला तरी वाटते की त्या क्षेत्रांचे थोडेफ़ार का होइना नुकसान झाले.
अशा या सॉफ़्ट्वेअर कंपनीमधील लोकांविषयी बय्राच लोकांना फ़ार कुतुहल असते. महत्वाचे म्हणजे हे लोक नक्की काय काम करतात ? तसे हे मलाही तसे सांगणे कठीण आहे. याचे उत्तर मी समोरच्या माणसाला बघुन देत असतो. अशाच एका माणसाला मी सांगितले होते की इतर लोकांचे काम सोपे व्हावे म्हणुन आम्ही काम करतो. जसे बॅंकेत हिशोब ठेवणारय़ा लोकांचे काम सोपे व्हावे यासाठी आम्ही काम करतो. ते त्याला पटलेही कारण त्याला कॉम्पुटर हे बॅंकेत वापरतात हे माहीत होते. आता बहुदा तशी वेळ येत नाही कारण आजकाल लोक सॉफ़्ट्वेअर मधे काम करतोस तर कशात(प्लॅट्फ़ॉर्म) काम करतोस असे विचारुन मोकळे होतात. म्हणजे आता लोकांना पण खुप सारी माहीती झाली आहे.
यावर एक विनोदही प्रचलीत आहे.-
           “ जेव्हा २ सॉफ़्ट्वेअर इंजिनियर आणि २ भिकारी एकत्र येतात तेव्हा एकच प्रश्न विचारतात – तु कोणत्या प्लॅट्फ़ॉर्म वर काम   करतोस ? “
           आता मुळत: सॉफ़्ट्वेअर म्हणजे काय ? तर कॉम्पुटरला कळेल अशा भाषेत त्याला सुचना देण्याची सुचि (इंस्ट्रक्शन लिस्ट) म्हणजेच सॉफ़्ट्वेअर. आता या भाषा पण खुप आहेत. त्यात विशेषत: जावा,डॉट नेट,ओरॅकल,कोबोल अशा काही भाषा विशेष प्रसिध्ध आहेत. यांनाच प्लॅट्फ़ॉर्म असे संबोधतात.
थोड्क्यात काय तर –
                                  “ सॉफ़्ट्वेअर सॉफ़्ट्वेअर म्हणजे काय असत ?
                                     जावा, डॉट नेट कशातही लिहले तरी आऊटपुट मात्र सेम असत ! ”
            अशा या इंडस्ट्रीला रिसेशने चांगलाच फ़टका बसला होता. इन्क्रीमेंट थांबल्या. काहीजणांच्या नोकरया गेल्या. ऑनसाईट मधले परत पाठवले गेले. अशातच सत्यम घोटाळ्याने तर अजुनच घोळ घातला . मुलींनी पण सॉफ़्ट्वेअर मधील नवरा नको असे त्यांच्या बायोडाटा मधे लिहायला सुरवात केली :)
आता परिस्थिती परत सुरळीत होत आहे. त्यामुळे मला वाटते कि आता ही ईंडस्ट्री आता परिपुर्ण बनलीय कारण,बरीच स्थित्यंतरे या ईंडस्ट्रीने फ़ारच कमी वेळात पाहिलेत.
            भारतातल्या या ईंडस्ट्रीने या सगळ्या गोष्टींपासून काही तरी धडा घ्यावा असे मला वाटते. आता आपल्या कंपन्यांनी(भारतीय) सर्वीस देण्यापेक्षा प्रोडक्ट वर जास्त भर द्यावा. त्यामुळे आपल्याला इतर देशांवर अवलंबुन रहावे लागणार नाही. सर्वीस आणि प्रोडक्ट मधील मुळ फ़रक म्हणजे सर्वीस मधे क्लायंटच्या गरजेनुसार सॉफ़्ट्वेअर बनवुन देतात व प्रोडक्ट मधे आधि सॉफ़्ट्वेअर बनवतात व मग ते विकतात(माथी मारतात). भारतातील सॉफ़्ट्वेअर इजिंनियर्सने जगभर नाव मिळवले. पण गूगल , फ़ेसबुक सारखी एखादी कंपनी अजुनही भारतात बनली नाही ही तशी खेदाची बाब आहे. लवकरच ही परिस्थिति बदलेल अशी अपेक्षा आहे. लेट्स होप फ़ॉर द बेस्ट :)

            आता खुप ज्ञान पाजळुन झाले. आता यातील थोड्याश्या गमतीदार भागाकडे वळुया :) इथे काम करणारया इंजिनियर्सचे जे मि निरिक्षन केले आहे त्यातुन मि त्यांचे खालील प्रमाने वर्गीकरण करील.
पहिला प्रकार :
या लोकांना आपण सॉफ़्ट्वेअर इंजिनियर असल्याचा अनाठायी अभिमान असतो. हे लोक पु.ल. च्या भाषेत पुणेकर होण्यास पात्र आहेत :). कारण त्यांनी एकदा म्हटले होते – “ जर तुम्हाला पुणेकर व्हायचे असेल तर तुम्हाला कोणत्यातरी गोष्टीचा अनाठायी अभिमान असावा. “ कोणी जर सॉफ़्ट्वेअर विषयी वाईट बोलले तर हे पेटलेच म्हणुन समजा. त्यामुळे या लोकांशी न बोललेच बरे :)
दुसरा प्रकार :
हे लोक नेहमी आपले वेगळेपण जपन्याचा प्रयत्न करत असतात. जसे हे फ़क्त नामांकीत ब्रॅंडच्याच वस्तु वापरतात. पिझ्झा, बर्गर या गोष्टी जास्त खात असतात. पब डिस्को मधे वारंवार जातात. थोडक्यात काय तर पाश्चात्य असल्यासारखे वर्तन करत असतात.
तिसरा प्रकार :
हे लोक नेहमी काम करत असतात.अगदी निष्काम कर्मयोग्यासारखे. यांना काही घेणेदेणे नसते. आपण बरे आणि आपले काम बरे. पण ही लोक फ़ार बोर असतात राव. यांना कसलीही आवड नसते. विकएन्ड ला ही एकतर कुठेतरी अज्ञात ठिकाणी असतात नाहीतर काम तरी करत असतात. इंजॉयमेंट वगैरे तर यांच्या गावीही नसतं.
चौथा प्रकार :
हे लोक सॉफ़्ट्वेअर ची स्तुति करण्यातच धन्यता मानतात. या लोकांना कुठेही न्या,हे सॉफ़्ट्वेअरचाच विषय काढणार.आणि मि खुप बिझी आहे असे सतत भासवनार.मि कसले भारी काम करतो हे सतत सांगणार. वीकाएन्ड ला असा कोणी भेटला आणि त्याला कळाले की तुम्ही पण सॉफ़्ट्वेअर मधलेच आहात तर संपले तुम्हाला फ़क्त देव वाचवु शकतो. पण का ? तर , ते तुम्हाला तुमची कंपनी कोणती ? तुमचा प्रोफ़ाइल काय वगैरे प्रश्नांनी हैरान करतील. आणि मग त्यांच्या कंपनीचे गोडवे गायला सुरु करतील , मग हळुहळु पगार,इन्क्रिमेंट वगैरे गोष्टी सुरु करुन तुमच्या गप्पांना सॉफ़्ट्वेअरमय करतील. आता आठवडाभर त्याच गोष्टी ऎकुन या लोकांना कंटाळा कसा येत नाही देव जाणे. यातील काही लोक उगाचच इंग्लिश झाडत असतात, समोर कोणिही असो मग अगदी अशिक्षित ड्रायवर पण ! पण या लोकांचे इंम्प्रेशन बाकी इतर लोकांवर चांगलेच पडते. यांच्यामुळे आमच्यासारख्यांची मात्र पंचाइत होते. मि तर असे ऐकले आहे के हे लोक घरी पण कसलेसे प्रॉजेक्ट डॉक्युमेंट वाचत बसतात. आपण तर अशांपासुन चार हात लांबच राहतो.
पाचवा प्रकार : हे लोक चुकुन इथे आलेले असतात. हे खरे तर एकुणच या वातावरणाल कंटाळलेले असतात. पण हे सोडुन ते दुसरे काम पण करु शकत नसतात, आणि केले तरी त्याचा मोबदला इथल्या तुलनेत कमी मिळेल हे माहीत असल्यामुळे गप आपले काम करतात. काही लोक सोडुन जातात पण ते खुप हिंमतीचे काम आहे.
सहावा प्रकार : या प्रकारातील लोक हे आदर्श प्रकारचे असतात. म्हणजे बॅलन्स्ड लाइफ़ जगतात. हे काम पण करतात आणि जिवन पण जगतात. थोडक्यात काय तर वर्क लाइफ़ समतोल राखतात. पण दुर्दवाने अशा लोकांची संख्या फ़ार कमी असते.

या सर्व लोकांमधे मला दिसलेले काही कॉमन मुद्दे असे पण आहेत. हे सगळ्यांनाच लागु होते असे नाही . पण मलातरी वाटते की यातल्या बरयाचशा मुद्यांशी बरेच लोक सहमत होतील.

१. बरेचसे सॉफ़्ट्वेअर इंजिनियर हे सकाळी आल्या आल्या मेल चेक कर, फ़ॉरवर्ड कर , ऑर्कुट, फ़ेसबुक चेक कर इ. उद्योग करतात.मगच कामाल सुरवात करतात.
२. कामाला लागणारा वेळ उगाचच वाढवुन सांगतात.
३. नेहमी पगार कमी आहे वाढला पाहिजे असे बोलत असतात.
४. कंपनीमधे लंच ब्रेक मधे स्वत:चीच कंपनी कशी वाईट आहे याची चर्चा करत असतात.
५. बरेच जण आपल्या वाढणारया पोटामुळे चिंतेत असतात.
६. कंटाळा आला की मित्राला पिंग करुन चहाला घेवुन जातात व तिथे मस्त ३०-४० मिनिट वेळ घालवतात.
७. “ मला मॅनेजर बनु दे रे मग बघतो “ अशा गप्पा रंगवतात.
८. अरे तुझा मित्र किंवा नातेवाईक त्या कंपनीमधे आहे ना त्याला आपला बायोडेटा पाठव ना अशी विनवणी आपल्या मित्राला करत असतात.
९. एच. आर. लोकांविषयी क्वचितच चांगले बोलतात. मात्र एच. आर. मधेच कशा चांगल्या मुली येतात यावर चर्चा सत्रही घेतात. काही तर मुद्दाम काही तरी काम काढुन त्या डिपार्टमेंटला चक्कर मारून येतात.

धन्यवाद.

मांडणीलेख

प्रतिक्रिया

चिरोटा's picture

22 Jun 2010 - 5:49 pm | चिरोटा

चांगला आढावा घेतलाय.

आता आपल्या कंपन्यांनी(भारतीय) सर्वीस देण्यापेक्षा प्रोडक्ट वर जास्त भर द्यावा. त्यामुळे आपल्याला इतर देशांवर अवलंबुन रहावे लागणार नाही

हेतु चांगला आहे.गेल्या काही वर्षात काही मोठ्या कंपन्यांनी तसे प्रयत्न करुनही पाहिले.पण त्यात मर्यादितच यश आले.मोठ्या कंपन्यांमध्ये Persistent,iFlex वगैरे काही अपवाद असु शकतील.प्रॉडक्ट बनवणार्‍या लहान कंपन्या बर्‍याच आहेत्.
P = NP

II विकास II's picture

22 Jun 2010 - 5:53 pm | II विकास II

हा प्रतिसादखेचक धागा आहे.

शुचि's picture

22 Jun 2010 - 6:08 pm | शुचि

कॉमन मुद्दे पटले :D

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

सॉफ़्ट्वेअर सॉफ़्ट्वेअर म्हणजे काय असत ?
जावा, डॉट नेट कशातही लिहले तरी आऊटपुट मात्र सेम असत..!

हे मात्र खरे आहे...!

दीपक साकुरे's picture

24 Jun 2010 - 10:05 am | दीपक साकुरे

हे बाकी खर आहे.. पन जावा, डॉट नेट कशातही लिहा, आऊटपुटच्या आधी बग्स तर येनारच...

योगी९००'s picture

22 Jun 2010 - 7:41 pm | योगी९००

लेख आवडला..

पण कॉमन मुद्दे मात्र थोडे खटकले. मुद्दे बरोबर आहेत. पण ते मुद्दे सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना लागू होतात. मी NON-IT आणि IT या दोन्ही क्षेत्रात काम केले असल्याने सगळीकडे हा प्रकार पाहीला आहे.

सॉफ़्ट्वेअर म्हणजे काय ? तर कॉम्पुटरला कळेल अशा भाषेत त्याला सुचना देण्याची सुचि (इंस्ट्रक्शन लिस्ट) म्हणजेच सॉफ़्ट्वेअर.
फक्त कॉम्पुटरला कळेल अशा..??

खादाडमाऊ

मिसळभोक्ता's picture

22 Jun 2010 - 10:23 pm | मिसळभोक्ता

जरा शुद्धलेखनाकडे लक्ष द्यावे.

जेव्हा २ सॉफ़्ट्वेअर इंजिनियर आणि २ भिकारी एकत्र येतात तेव्हा एकच प्रश्न विचारतात – तु कोणत्या प्लॅट्फ़ॉर्म वर काम करतोस ?

हे खूप आवडले.

आता आम्हीही खरे तर स्वतःला सॉफ्टवेअर इंजिनियर समजतो. पण आमच्या आगगाड्या थांबाव्यात यासाठी सगळे प्लॅटफॉर्म बनतात.

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

टारझन's picture

23 Jun 2010 - 1:01 am | टारझन

रिफाईन कर लेका , भारी लिहीलंय !

बाकी आम्ही कायम आमच्या म्याणेजर ला शिव्या घालत असतो . ;) ऑनसाईट असलो की क्लायंट च्या शिव्या खायच्या न त्या म्यानेजर ला पास करायच्या . डेली स्टेटस रिपोर्ट उर्फ डेलि सफरिंग रिपोर्ट भरताना बळेच भांडे घासण्यात चमचे , वाट्या,गल्लासं होती असं दाखवायचं !
असो , कॉमन गोष्टी तर कॉमनंच असणार.

अजुन एक फॅक्ट, जी सॉफ्टवेयर इंडस्ट्रि मधेच नाही, तर जनरल लाईफ मधे सुद्धा फॅक्ट्च आहे. प्रत्येक जण स्वतःला शहाणा, आणि बाकी सर्वांना ** समजत असतो . आणि प्रत्येकाशी बोलताना , "हा ** आहे ... " "तो ** आहे ... " असं चाललेलंच असतं :)

चतुरंग's picture

23 Jun 2010 - 1:15 am | चतुरंग

आमच्याकडे एखादे सॉफ्टवेअर चालले नाही की पहिल्यांदा हार्डवेअर खराब आहे असा ठपका ठेवतात! मग आम्ही हार्डवेअर मध्ये काही दोष नाही हे सिद्ध करुन देत असताना ते सॉफ्टवेअर डीबग करुन ठेवतात आणि मग मूग गिळून गप्प बसतात! ;)
हार्डवेअर परत देऊनही त्यांच्याकडून काही मेसेज आला नाही की समजायचे 'आल इज वेल'!! ;)

(फुन्सुक वांगडू)चतुरंग

मदनबाण's picture

23 Jun 2010 - 5:45 am | मदनबाण

या इंडस्ट्रीला रिसेशने चांगलाच फ़टका बसला होता. इन्क्रीमेंट थांबल्या. काहीजणांच्या नोकरया गेल्या. ऑनसाईट मधले परत पाठवले गेले.
यातली प्रत्येक गोष्ट अगदी जवळुन अनुभवली आहे.... :(

भारतातल्या या ईंडस्ट्रीने या सगळ्या गोष्टींपासून काही तरी धडा घ्यावा असे मला वाटते. आता आपल्या कंपन्यांनी(भारतीय) सर्वीस देण्यापेक्षा प्रोडक्ट वर जास्त भर द्यावा. त्यामुळे आपल्याला इतर देशांवर अवलंबुन रहावे लागणार नाही.
१००% सहमत... :)

लेख आवडला... :)

मदनबाण.....

"Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once."
Lillian Dickson

सुनील's picture

23 Jun 2010 - 6:55 am | सुनील

चांगलं लिहिलय!

१९९८-९९ दरम्यान Y2K ची तेजी होती, तेव्हा मेनफ्रेमवाल्यांनी स्वतःचे उखळ पांढरे करून घेतले (कॉपी-पेस्ट्चे काम करून!)

पुढे २००१ मध्ये डॉट कॉमचा फुगा उत्तर कॅलिफोर्नियात फटकन फुटला आणि त्याचा आवाज भारतात ऐकू आला!

त्याच सुमारास युरोपमध्ये युरो कन्वर्झनचे काम जोरात सुरू होते. त्यामुळे जे फक्त अमेरिकेवर अवलंबून होते ते मेले!

हल्लीच्या रिसेशनचा आढावा लेखात घेतलेलाच आहे.

पुलेशु.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रदीप's picture

23 Jun 2010 - 7:55 pm | प्रदीप

त्याच सुमारास युरोपमध्ये युरो कन्वर्झनचे काम जोरात सुरू होते. त्यामुळे जे फक्त अमेरिकेवर अवलंबून होते ते मेले!

एकाद-दोन वर्षांनंतर जर्मनीचे मार्क कन्वर्शन करण्याचे काम निर्माण होण्याची दाट शक्यता दिसत आहे, तेव्हा ह्या क्षेत्रातील स्ट्रॅटेजिस्टांनी तिथे लक्ष द्यावे!

sandeepn's picture

23 Jun 2010 - 9:44 am | sandeepn

शुद्ध लेखनाबद्दल क्षमा असावी. आता १० वर्षांनंतर मराठी लिहतो आहे म्हणुन प्रॉब्लेम होतो आहे. नकीच सुधारण्याचा प्रयत्न करील.
धन्यवाद.

जे.पी.मॉर्गन's picture

23 Jun 2010 - 4:15 pm | जे.पी.मॉर्गन

चांगला आढावा... पण मला तो कुठेतरी अपूर्ण वाटला. नुसत्या "ओव्हरव्ह्यू" पेक्षा थोडा जास्त सखोल, अभ्यासपूर्ण असता तर खूप खूप छान झाला असता. सॉफ्टवेअरनी भारतातल्या जीवनमानात (अर्थातच जास्तीकरून शहरी) आमूलाग्र बदल घडवलाय. शिवाय world's back-office पासून ते skills development पर्यंतचं स्थित्यंतर हा खूप महत्त्वाचा मुद्दा मांडता आला असता असं माझं वैयक्तिक मत. पण संदीप तुझा हा पहिलाच लेख वाचतोय म्हणून थोडं आगावपणे टंकलंय. खूप चांगला प्रयत्न आहे. पुढच्या लेखनासाठी शुभेच्छा !

जे पी

sandeepn's picture

23 Jun 2010 - 5:20 pm | sandeepn

जे. पी.-
सॉफ़्ट्वेअर ने शहरीच नाही तर ग्रामीण भागातही क्रांती आणली आहे. आमच्या गावात येवुन बघा लोक कसे घरी बीएसएनएल चे कनेक्शन घेवुन इंटरनेट चा वापर करतात. माझ्या सारख्या गावाकडच्या मुलाला इकडे शहरात चांगली संधी मिळाली. आमच्या गावातील घरा घरातील मुले सॉफ़्ट्वेअर मधे आली आणि घराला अधार देवु लागली आहेत.
मला सखोल लेख लिहता आला असता हे मान्य आहे. पुढच्या वेळेस असा माहितीपर लेख लिहताना या सुचनेचा जरूर विचार करील.
धन्यवाद.

नितिन थत्ते's picture

23 Jun 2010 - 4:44 pm | नितिन थत्ते

पूर्वी ऐकलेला ही आणि हि ज्योक.

(दीवारमधील प्रसिद्ध संवादाच्या धर्तीवर)

सॉफ्टवेअर इंजिनिअर (मजुरास): माझ्याकडे काय नाही? पैसा आहे, गाडी आहे, बंगला/घर आहे, स्टॉक ऑप्शन आहेत. काय आहे तुझ्याकडे?

मजूर (शांतपणे): माझ्याकडे काम आहे.

नितिन थत्ते

sandeepn's picture

23 Jun 2010 - 5:08 pm | sandeepn

हा हा.

रामदास's picture

23 Jun 2010 - 7:47 pm | रामदास

लेख वाचल्याचे समाधान मिळाले.सॉफ्टवेअर मध्ये काहीही काम करीत नसल्यामुळे वर्गवारी कळली नाही.कॉमन अजेंडा म्हणल तर सगळ्याच हापीसात दिसतो.लिहीत रहावे.

sandeepn's picture

24 Jun 2010 - 9:56 am | sandeepn

मि फ़क्त आयटी मधे काम केल्याने मला बाकीच्या ठिकाणचे सांगता येत नाही.
माझा हा दुसराच लेख असुन ,तुम्हाला तो आवडला याचा मला आनंद आहे.
-धन्यवाद.