तुम्हाला कोण व्ह्यायचय,मिपाकर की..............?

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
21 Jun 2010 - 10:19 am

आपण फक्त मराठी संस्थळांबद्दल बोलत आहोत.मिपावरचे मिपाकर तसेच इतर संस्थळांवरचे इतर 'कर आहेत.तुम्हाला कुठला 'कर व्हावस वाटत व ज्यांना 'मी आहेच .....कर पहील्यापासुन' अस वाटत,अस त्यांना का वाटत्?कींवा का म्हणावस वाटत?

मला मिपाकरच रहावस वाटत्,कारण.........
१.मला इथली रंगसंगत(साईटसाठी वापरलेले रंग) आवडते.
२.इथल्या प्रतिक्रीया आवडतात.
३.इथले सभासद व त्यांचे विचार आवडतात(फारच थोडे लोक आहेत त्यात) व त्यामुळे आपल्या माणसांमधे आल्यासारख वाटत इथे आल्यावर!(खुप काही पानावल्,जड झाल!)
४.विशेषता: 'स्वाक्षरी' ही कल्पना आवडते व एखाद्याला प्रतिक्रीयेत दीलेला reply लगेच वाचता येतो ते आवडते.
५.एकुनच साईटची मांडणी आवडते.

आपण मिपाकर व्हायला न व्ह्यायला (म्हणजेच इतरही तोडीस तोड आहेत अस वाटणे) काय कारण आहेत??

धोरणविचार

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

21 Jun 2010 - 10:40 am | शिल्पा ब

तुम्ही काय हल्ली सुट्टीवर आहात कि काय...धाग्यावर धागे काढताय म्हणून म्हंटल..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शानबा५१२'s picture

21 Jun 2010 - 11:58 am | शानबा५१२

मी कामात असलो तरी मला कोणी 'हे काय करतोयस?' अस नाही विचारत!
कारण ह्यावेळी मी माझ्या साइड बिजनेस असलेल्या व्यवसायात गुंतलोय.

नोकरीच्या ठीकाणी परीस्थीती वेगळी असते.ते आता थोड्याच दीवसांत सुरु होइल. तेव्हा आताच सर्व भडास पुर्ण करतोय.
for your information................I am waiting for my result.
Thank you.

II विकास II's picture

21 Jun 2010 - 1:38 pm | II विकास II

>>तेव्हा आताच सर्व भडास पुर्ण करतोय.
मी हे 'तेव्हा आताच सर्व संडास पुर्ण करतोय.' असे वाचले ;)

शानबा५१२'s picture

21 Jun 2010 - 1:52 pm | शानबा५१२

हे बघा ज्वलंत उदाहरण!!

ह्याला 'घाण' प्रतिक्रीया म्हणतात.

विकास म्हणे,कसला डोंबलाचा विकास!!

शिल्पा ब's picture

21 Jun 2010 - 10:19 pm | शिल्पा ब

result साठी शुभेच्छा!!!

<<<मी कामात असलो तरी मला कोणी 'हे काय करतोयस?' अस नाही विचारत!
खुलाशासाठी धन्यवाद.

अवांतर : "साईड बिजनेस असलेला व्यवसाय" हे मात्र फार्फार आवडून गेले.

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

शानबा५१२'s picture

22 Jun 2010 - 9:27 am | शानबा५१२

म्हणजे आता जो व्यवसाय मी करतो तो माझा साइड बिजनेस आहे,अस.
काय असत माहीतेय्,माणसाला चुका काढायची एवढी सवय होते की नंतर त्याला स्वःताला चुक काय बरोबर काय हे समजत नाही,मग सर्वच चुक दीसायला लागत.

you are never too late तेव्हा बघा चुक सुधरता आली तर!

jaypal's picture

21 Jun 2010 - 11:10 am | jaypal

श्यानबा५१२ चे कट्टर फॅन. मिपा वर येतो ते त्याच्या ओढीनेच.

***************************************************
दुरितांचे तिमीर जावो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वांछील तो तें लाहो/प्राणिजात/

II विकास II's picture

21 Jun 2010 - 11:27 am | II विकास II

वेळ घालवण्याचे साधन
खवचट बोलणे, कंपुबाजी, आंतरजालिय राजकारण इत्यादींचे प्रात्याक्षिक
मनावरील ताण कमी करायचे साधन

तिमा's picture

21 Jun 2010 - 6:06 pm | तिमा

मी इतर संस्थळेही बघतो पण मिपासारखे जिवंत स्थळ कुठलेच नाही असे मला मनापासून वाटते.(टाळ्या मिळवण्यासाठी नाही) इथे प्रतिसादही भरभरुन मिळतात, मग भले ते विरोधी वा खिल्ली उडवणारे असले तरी वाचनीय असतात. सभासद अतिशय चाणाक्ष आहेत. बाकी सर्व प्रकारच्या प्रवृत्ती आहेत. पण त्या आहेत म्हणूनतर मिसळ टेसदार होते ना !!
म्हणून मी मिपाकरच.

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|

विसोबा खेचर's picture

21 Jun 2010 - 10:20 pm | विसोबा खेचर

मी सर्वप्रथम मनोगतकार आहे..त्यानंतर माबोकर, उपक्रमकर, मीमकर आणि महत्वाचे म्हणजे अर्थातच मिपाकर आहे..

तात्या.

टारझन's picture

21 Jun 2010 - 10:36 pm | टारझन

खुलाश्याबद्दल धन्यवाद :)

आपलाच,
:)

मी टार्‍या मिपांकर
मराठीसंस्थळ हिण हिडिस
प्रतिसादच
मुचा सदस्य आहे
पंगा's picture

22 Jun 2010 - 12:21 am | पंगा

मी सर्वप्रथम मनोगतकार आहे.

वेलणकर नावाचे एक गृहस्थ मनोगतकार आहेत असे ऐकले होते.

आपले आडनाव वेलणकर आहे काय?

- पंडित गागाभट्ट.

विसोबा खेचर's picture

22 Jun 2010 - 5:03 pm | विसोबा खेचर

वेलणकर नावाचे एक गृहस्थ मनोगतकार आहेत असे ऐकले होते.
आपले आडनाव वेलणकर आहे काय?

नाही.. माझं आडनांव अभ्यंकर असून वेलणकर हे माझे मित्र आहेत.. ;)

तात्या.

पंगा's picture

22 Jun 2010 - 7:27 pm | पंगा

श्री. वेलणकर हे आपले मित्र आहेत किंवा नाहीत या बाबीचा प्रस्तुत मुद्द्याशी काहीही संबंध नाही.

प्रश्न एवढाच आहे, की मनोगत जेव्हा निर्माण केले गेले, तेव्हा त्या निर्मितीस आपण जबाबदार होतात काय?

'मनोगतकार' या आपल्या शब्दातून तसे सूचित झाले, म्हणून विचारले.

मनोगताच्या निर्मितीस आपण जबाबदार असल्यास किंवा मनोगताच्या निर्मितीत आपला हात ('हात'. केवळ 'हातभार' नव्हे. फरक आहे.) असल्यास प्रश्न नाही.

ही टंकनाची किंवा शब्दनिवडीची चूक असल्यास (आणि आपणास 'मनोगतकार'ऐवजी 'मनोगतर' किंवा 'मनोगती' असे म्हणावयाचे असल्यास), त्याही परिस्थितीत आक्षेप नाही. मात्र तसे स्पष्टीकरण आवश्यक आहे.

अन्यथा, 'मनोगत आपणच उभारले' असा अर्थ यातून सूचित होत आहे, हे दाखवून द्यावेसे वाटते.

कृपया योग्य तो खुलासा व्हावा.

- पंडित गागाभट्ट.

विसोबा खेचर's picture

22 Jun 2010 - 7:29 pm | विसोबा खेचर

ही टंकनाची किंवा शब्दनिवडीची चूक असल्यास (आणि आपणास 'मनोगतकार'ऐवजी 'मनोगतकर' किंवा 'मनोगती' असे म्हणावयाचे असल्यास), त्याही परिस्थितीत आक्षेप नाही. मात्र तसे स्पष्टीकरण आवश्यक आहे.

कबूल..

आपला,
(मनोगती) तात्या.

अवलिया's picture

22 Jun 2010 - 5:26 pm | अवलिया

>>>मी सर्वप्रथम मनोगतकार आहे..

मनोगतकार की मनोगतकर?

मनोगतकार म्हणजे मनोगत ज्याने निर्मिले तो असा होतो का हा मराठीच्या प्राध्यापकांनी खुलासा करावा. (काही धाग्यांवरचे मैथुन वाचुन ते उडवावे की पुन्हा पुन्हा वाचावे अशा द्विधा अवस्थेतुन मोकळे झाल्यावर खुलासा केल्यास हरकत नाही)

--अवलिया

llपुण्याचे पेशवेll's picture

22 Jun 2010 - 6:20 pm | llपुण्याचे पेशवेll

वाह शानबा हळू हळू एक पोक्त संस्थळ सदस्यासारखे वागू लागले आहेत. :)
लवकरच संपादकांच्या गुड बुकात याल आता.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली विडंबनं करणे बंद केले आहे
Phoenix

शानबा५१२'s picture

22 Jun 2010 - 6:55 pm | शानबा५१२

तुम्हाला कळल म्हणून कोणाला सांगु नका हा!
४-५ लेख तयार ठेवलेत्,गुड बुकात इन्ट्री झाली की लेख उडायचा चान्सच नसतो अस एकलय.मग लिहा काय पण............ फुल्ली गोळ्यांशिवाय बर का!
त्याच आशेवर आहे! @)
जास्त बोंबबोंब नका करु......लेख छापुन येउ देत मग बघु.

___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे

शानबा५१२'s picture

22 Jun 2010 - 6:57 pm | शानबा५१२

'काढुन टाका' कोणीतरी काढुन टाकलय म्हणुन हा प्रतिसाद राहीला आहे.

___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे

शुचि's picture

22 Jun 2010 - 6:57 pm | शुचि

"वन्स टीचर ऑलवेज अ टीचर"
त्या धर्तीवर
"वन्स मिपाकर ऑलवेज अ मिपाकर"

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||