ब्राझील फुटबॉल जत्रा

केशवसुमार's picture
केशवसुमार in कलादालन
22 Jun 2010 - 12:00 am

मागच्या आठवड्यात ब्राझील मधल्या फुटबॉल वेडा बद्दल मी दिलेला प्रतिसाद ..
काल झालेला ब्राझील विरुद्ध आयव्हरीकोस्ट सामना, ब्राझीलीयन जनते बरोबर बघण्याचा योग आला त्याची ही क्षणचित्रे.. आयुष्यभर लक्षात राहिल असा हा अनुभव होता...

सामना पाहण्यासाठी रस्त्या रस्त्यावर केलेली जय्यत तयारी

DSCN0666
DSCN0640

सामना पाहण्यासाठी कोपाकबाना या जगप्रसिद्ध समुद्रकिनारी फिफा ने दोन महाकाय पडदे लावले आहेत..

DSCN0649
DSCN0655
DSCN0652

चला सामना सुरु होण्यासाठी १ तास बाकी आहे लवकर जाउन मोक्याची जागा धरूया..

DSCN0636
DSCN0643
DSCN0649

DSCN0645
DSCN0644

काल ह्या ठीकाणी ९८,००० च्या आसपास लोक सामना पाहण्यास आले होते..(साखळी सामन्याला इतके तर बाद फेरीला किती.... :W )

DSCN0651
DSCN0656
DSCN0654

सामन्या दरम्यान कोकाकोलाचा लुफ्त घेणारे अस्मादिक... <:P

DSCN0664

३ गोल झाल्यावर सुरु झालेला जल्लोश पाहून आस्मादिकांनी तेथून पळ काढला.. ;)
पुढचा ब्राझीलचा सामना कोपाकबानाला जाऊनच पाहायचा हा निर्धार केला आहे हे. वे. सा. न. ल.

देशांतरक्रीडास्थिरचित्र

प्रतिक्रिया

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jun 2010 - 1:39 am | बिपिन कार्यकर्ते

धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड धत्तड तत्तड !!!

एकदाची केसुंची एंट्री आली!!!!!!!!!!!!!!!!!!!!! लै भारी फोटो... पण अजून काही तरी लिहायचं ना राव... थोडक्यात आटोपलंय. पण लिहिलं त्याबद्दल धन्यवाद. :)

बाकी नायजेरिया, जर्मनी वगैरेमधल्या लोकांनी घ्या मनावर...

बिपिन कार्यकर्ते

टारझन's picture

22 Jun 2010 - 1:53 am | टारझन

जबरा फोटुज :) शेवटचा फोटु तर लै बाळसेदार आलाय हो ;)

ब्राझिल च्या स्त्रीयांची आजची प्रतिमा कुठे न दिसल्यामुळे हिरमुसलो आहे :(

-(ब्राझिल प्रेमी) टारझन

मस्त कलंदर's picture

22 Jun 2010 - 1:55 am | मस्त कलंदर

व्वा: चांगलाच फुटबॉल फिव्हर चढलाय जनतेला... अगदी कुत्र्यांपर्यंत पोचलाय.. :)

संपादक, कुणीतरी हा धागा फिफाच्या भागात ट्रान्सफर करा ना!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jun 2010 - 2:06 am | बिपिन कार्यकर्ते

संपादक, कुणीतरी हा धागा फिफाच्या भागात ट्रान्सफर करा ना!!!

तेच बघत होतो... बहुधा नीलकांतलाच जमेल.

बिपिन कार्यकर्ते

प्रभो's picture

22 Jun 2010 - 2:03 am | प्रभो

मस्तच केसुशेठ!!!!!!

ऋषिकेश's picture

22 Jun 2010 - 1:58 pm | ऋषिकेश

वा!
मिपाच्या फिफा सेक्शनचं वार्तांकन थेट ब्राझिलमधून
मजा आली!!

बिका म्हणतात तसं इतर देशांतील मिपाकरांनो.. बघता काय? सामिल व्हा! ;)

ऋषिकेश
------------------
कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे.
या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन

जे.पी.मॉर्गन's picture

22 Jun 2010 - 2:18 pm | जे.पी.मॉर्गन

जबर्‍या वर्णन अन फोटू... ब्राझीलियन पोरींविषयी टार्‍याशी सहमत.

जे पी

मदनबाण's picture

22 Jun 2010 - 3:53 pm | मदनबाण

तुमचा अनुभव तुम्ही अगदी योग्य प्रकारे टिपला आहे... :)

मदनबाण.....

"Life is like a coin. You can spend it any way you choose, but you can only spend it once."
Lillian Dickson

शानबा५१२'s picture

22 Jun 2010 - 4:04 pm | शानबा५१२

फोटो धुसर क आलेत???

___________________________________________________
see what Google thinks about me!
इथे

ब्राझीलSSSSSSSSS ला ला ला ला ला ला लाSSSSSSSSS
जबराच की हो केसुशेठ. शॉल्लेट मज्जा आली असणार.
साक्षात फुटबॉलच्या आळंदीत ब्रंहानंदी टाळी नाही लागली तरच नवल.
बाकी हे झाल धावतं समालोचन, पुढच्या सामन्याला विषेश पुरवणी येउंद्यात.

(जर्मन सपोर्टर )गणपा.

मुक्तसुनीत's picture

22 Jun 2010 - 9:06 pm | मुक्तसुनीत

मजा आली फोटो पाहाताना ! लगे रहो !

चतुरंग's picture

22 Jun 2010 - 9:19 pm | चतुरंग

लै भारी फोटू!
धावते समालोचन येऊदेत जरा पुढल्या राऊंडातले! :)

(सांबा)चतुरंग

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Jun 2010 - 9:59 pm | बिपिन कार्यकर्ते

केसुंना धावायला नका सांगू ब्वॉ... ;)

(खंबा) बिपिन कार्यकर्ते