पुन्हा एकदा पाऊस
आजही ती तशीच उभी आडोशाला
पुन्हा सारं तसच घडलं
तिला घरापर्यंत सोडायला मिळालं
आज तिच्या वागण्यात संकोच नव्हता
तरीही माझा हात कापत होता
तिच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती
निरोप देण्याची कोणालाच घाई नव्हती
पावसाने फारच मेहरबानी केली
आज चक्क मला ती घरात या म्हणाली
तेव्हापासून पावसाने कधीच साथ नाही सोडली
अन् आमच्या प्रेमाची नौका अजून तरी नाही बुडाली
प्रतिक्रिया
20 Jun 2010 - 8:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लगे रहो.....! तुमचा पाऊस आवडला.
-दिलीप बिरुटे