कॅलिडोस्कोप...

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in जनातलं, मनातलं
24 Apr 2008 - 2:20 pm

विजभाऊंनी धमालच्या लग्नाची तयारी सुरू केली. त्यातील एक एक पात्रे डोळ्यासमोरून तरळून गेली.
इथे मिसळपाव वर काही सदस्यच एकमेकांना प्रत्यक्ष ओळखतात. पण काही नुसतीच कल्पना करतात.
कोण कसा असेल? त्याच्या लिखाणावरून, दिलेल्या प्रतिक्रीयेवरून आपण त्याची प्रतिमा डोळ्यासमोर आणतो.
त्यातील एक गंमत म्हणजे त्यांची मि.पा. वर असलेली नावे. काय एक-एक भन्नाट आहेत.
त्यावरून सुद्धा मनात एक त्याची छबी उमटते...कि हा असा असेल, ही अशी असेल....
तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला असेल ना? मग लिहा ना?
कृपया, कुणालाही दुखवण्याचा हेतु नाही. पण सर्वांनी ह.घ्या.
मी सुरवात करते.

प्राजु,: ही अशी एक मुलगी कि जी नावाप्रमाने, प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे नाजुक, जरा धक्का दिला कि कोमेजून जाईल असे वाटते, तिककेच कविसारखे नाजुक,हळूवार मन....

धमाल मुलगा: मुलींच्या गप्पा भरपूर, पण समोर आली कि त त प प होते.:))))
थोडक्यात काय?....लढाईच्यावेळी तोफेत पाणी.

विकि: असा कि मुलीशी बोलेल, धमाल मुलाच्या कांदे पोहे कार्यक्रमापर्यंत त्याला मदत करेल.
मुलीच्या बापाने नाही म्हटले तर हा पठ्या काही पळून जाऊन लग्न करायच्या भागगडीत मदत करणार नाही.
मुलीच्या बापाचा, भावाचा मार खाण्याच्या भितीने.
थोडक्यात काय?.....तुम लढो हम कपडे संभालते है!

पुण्याचे पेशवे: डोक्यावर पगडी, घारे डोळे, पक्के सदाशिव पेठी.....

तात्या: डोक्यावर काळी टोपी, कोट, पांढरे धोतर्....कोटाच्या खिशात एक तपकीर ची डबी. ती सारखी ओढून, शिंक आली कि, म्हणतात्,अरे शिंच्या.............(अगदी चार दिवस सासूचे सिरीयल मधील कोकणातील मामा सारखे)

स्वाती दिनेशः हॅपी गो लकी. मस्त आपल्याच धुंदीत्..कोणी काही म्हणा आपल्यात काही फरक पडणार नाही. मला जसे वाटते तसे मी जगणार..

वरदा: नुकतेच लग्न झालेली मुलगी. जी संसाराला सुरवात करत आहे.

पेठकरः: उंच, काटकुळे सोनेरी काडीचा चष्मा आणि भारदस्त आवाज, पण या आवाजाला कोणी घाबरत नाही.:)))
बाकीचे नंतर...
वरच्या लोकांची क्षमा मागते.

जीवनमानमाहिती

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2008 - 2:40 pm | प्रभाकर पेठकर

पेठकरः: उंच, काटकुळे सोनेरी काडीचा चष्मा आणि भारदस्त आवाज
अहाहा.... असे होणे मला किती आवडेल्..... ह्या विचारांनी झुरून झुरून मी जाड होत चाललो आहे.

धमाल मुलगा's picture

24 Apr 2008 - 3:00 pm | धमाल मुलगा

मस्तच.....

प्राजुताई:......कविसारखे नाजुक,हळूवार मन....?

अहो, कवि'ण' च आहे की ती. आणि एक राहिलं...बडबडी :-)) मस्त गप्पा मारते...नॉनस्टॉप!!! एकदम आमच्यासारखीच आहे!

विकि: .........थोडक्यात काय?.....तुम लढो हम कपडे संभालते है!

हा: हा: हा: विवेकपंत...जबरान् टोला...न बघता स्वातीताईनं कसं काय ओळखलं बॉ तुम्हाला?

तात्या: डोक्यावर काळी टोपी, कोट, पांढरे धोतर्....कोटाच्या खिशात एक तपकीर ची डबी. ती सारखी ओढून, शिंक आली कि, म्हणतात्,अरे शिंच्या...

हे असं जर तात्या शिंगल माल्ट घ्यायला गेले तर देणाराच झीट येऊन पडेल. :-))))

वरदा: नुकतेच लग्न झालेली मुलगी. जी संसाराला सुरवात करत आहे.

:-) आणि ऑफिसमध्ये टाईमपास कसा करावा ह्या विचारात सतत गर्क :-))))))

पेठकरः: उंच, काटकुळे सोनेरी काडीचा चष्मा आणि भारदस्त आवाज, पण या आवाजाला कोणी घाबरत नाही.:)))

चूक...चूक...चूक !!!! स्वातीताई नापास!
पेठकर काका उंच, पण नो काटकुळे...
भारदस्त आवाज, पण बोलणं गंमतीशीर,
पण तरीही...त्यांच्याबद्दल थोडी भितीच वाटते बॉ!!! का ते नाही ठाऊक.

धमाल मुलगा: मुलींच्या गप्पा भरपूर, पण समोर आली कि त त प प होते.:))))
थोडक्यात काय?....लढाईच्यावेळी तोफेत पाणी.

स्वातीताईईईईईईईईईईईईईईईईईईईईईई SSSSSSSSSSS
बघून घेइन...बघून घेइन !

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2008 - 3:08 pm | प्रभाकर पेठकर

एऽऽऽ ..! साल्या, बास काय? आपुनभी भौत टपोरीगिरी किएला है बाप! अभी थोडा उमरके हिसाबसे नदीका पानी थोडा संथ हो गएला है।

धमाल मुलगा's picture

24 Apr 2008 - 3:20 pm | धमाल मुलगा

मी घाबरतो ना तुम्हाला...
असं काय करताय...त...त...प..प...(गेलं तिच्याआयला तोफेत पाणी!)
मी काय लिहिलंय वाचा ना आधी...मी लिहिलंय ना की भिती वाटते म्हणून...ती..ती स्वातीताईच म्हणते तिला नाही वाटत म्हणून..
तिलापण सांगा ना तुम्ही एके काळी भौत टपोरीगिरी केलेली...मग तीसुध्दा घाबरेल.

बाकी..

अभी थोडा उमरके हिसाबसे नदीका पानी थोडा संथ हो गएला है।

हे लै भारी :-)))))

विसोबा खेचर's picture

24 Apr 2008 - 3:19 pm | विसोबा खेचर

सगळ्यांची वर्णनं मस्त! :)

प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे नाजुक, जरा धक्का दिला कि कोमेजून जाईल असे वाटते, तिककेच कविसारखे नाजुक,हळूवार मन....

अहो कसली आल्ये नाजूक? अहो तिने जरा घक्का दिला तर बिच्चारे आमचे काटकुळे जगदिशभावजीच कोलमडतात! :)

धमाल मुलगा: मुलींच्या गप्पा भरपूर, पण समोर आली कि त त प प होते.:))))
थोडक्यात काय?....लढाईच्यावेळी तोफेत पाणी.

अहो पण माझ्या माहितीप्रमाणे धमूने लढाई जिंकली आहे. मिपाच्या भावी सुनबाईशी मी अलिकडेच फोनवर बोललो आहे! ;)

तात्या: डोक्यावर काळी टोपी, कोट, पांढरे धोतर्....कोटाच्या खिशात एक तपकीर ची डबी. ती सारखी ओढून, शिंक आली कि, म्हणतात्,अरे शिंच्या.............(अगदी चार दिवस सासूचे सिरीयल मधील कोकणातील मामा सारखे)

आम्ही प्रत्यक्ष घालत नसलो तरी आमची मूळ वृत्ती ही धोतर-कोट-टोपीचीच आहे! :)

स्वाती दिनेशः हॅपी गो लकी. मस्त आपल्याच धुंदीत्..कोणी काही म्हणा आपल्यात काही फरक पडणार नाही. मला जसे वाटते तसे मी जगणार..

अरे बाबा, शेवटी ती आमची शालेय मैत्रिण आहे म्हटलं! :)

वरदा: नुकतेच लग्न झालेली मुलगी. जी संसाराला सुरवात करत आहे.

हम्म! परंतु स्वयंपाकाच्या नावाने अजून बोंब आहे! आमचे जावई कसाबसा दोन टाईम डाळभात खाऊन दिवस ढकलताहेत असे अलिकडेच कळले! बाय द वे, वरदा थालिपिठं मात्र छान करते हो! :)

पेठकरः: उंच, काटकुळे सोनेरी काडीचा चष्मा आणि भारदस्त आवाज, पण या आवाजाला कोणी घाबरत नाही.:)))

चूक चूक चूक! अहो आमचा प्रभाकर हा एक नंबरचा डांबिस माणूस असून अंमळ सुदृढच आहे! :)

असो....

मीही वरील सगळ्यांची क्षमा मागतो... :)

आपला,
(धोतर कोट टोपीतला सुदृढ!) तात्या.

प्राजु's picture

24 Apr 2008 - 7:22 pm | प्राजु

अहो कसली आल्ये नाजूक? अहो तिने जरा घक्का दिला तर बिच्चारे आमचे काटकुळे जगदिशभावजीच कोलमडतात! :)

परमेश्वरा, या तात्याना क्षमा कर.. त्यांना बिचार्‍याना समजत नाहिये ते काय बोलताहेत... :))))

प्राजक्ताच्या फुलाप्रमाणे नाजुक, जरा धक्का दिला कि कोमेजून जाईल असे वाटते, तिककेच कविसारखे नाजुक,हळूवार मन....

थँक्यू थँकू स्वाती .. बघ मी चक्क लाजले... :)))))
जोक्स अपार्ट... हा धागा मात्र मस्त आहे... मी ही सवडिने लिहिन्..आज जरा घाईत आहे.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Apr 2008 - 8:29 pm | llपुण्याचे पेशवेll

माझ्या मते पिवळा डांबिस काकाना चष्मा असावा.....
पुण्याचे पेशवे

स्वाती दिनेश's picture

24 Apr 2008 - 3:32 pm | स्वाती दिनेश

स्वाती दिनेशः हॅपी गो लकी. मस्त आपल्याच धुंदीत्..कोणी काही म्हणा आपल्यात काही फरक पडणार नाही. मला जसे वाटते तसे मी जगणार..
:-)

नारदाचार्य's picture

24 Apr 2008 - 3:43 pm | नारदाचार्य

स्मायली येत नाहीयेत. अक्षरं अकारण ठळक होताहेत. काही गडबड आहे. नारायण... नारायण...
सरपंच जरा बघा इकडं. त्यातून भलते गैरसमज इतरत्र व्हायचे.

स्वाती राजेश's picture

24 Apr 2008 - 3:48 pm | स्वाती राजेश

मस्त प्रतिक्रीया....:)

या झाल्या माझ्या मनातील प्रतिमा..:)
पण तुमच्या मनातील सुद्धा लिहा...
कदाचित वेगळ्या असू शकतील्.....व्यक्ती एकच पण वेगवेळ्या प्रतिमा असु शकतात.:)
बाकीच्या सुद्धा व्यक्ती आहेत्...उदा. विजुभाऊ, विसुनाना, नाना चेंगट, छोटी टींगी, सगळे डॉन....इत्यादी.
मि.पा.वर ऑन लाईन असलेल्या व्यक्ती....
वाट पाहात आहे यांच्या प्रतिमांची.....

प्रभाकर पेठकर's picture

24 Apr 2008 - 3:50 pm | प्रभाकर पेठकर

ह्याला कॅलिडोस्कोप नांव द्यायला हवे. व्यक्ती त्याच पण प्रत्येकाला त्यांची प्रतिमा वेगवेगळी दिसते.

स्वाती राजेश's picture

24 Apr 2008 - 3:55 pm | स्वाती राजेश

यांना विनंती, जर टायटल बदलता आले तर बदला...
कॅलिडोस्कोप.

धन्यवाद, पेठकर.

धमाल मुलगा's picture

24 Apr 2008 - 4:54 pm | धमाल मुलगा

छोटा डॉनः उंच, किरकोळ शरीरयष्टी, लांब केस, बोलताना सतत हसायची सवय...किंवा हसत हसत बोलायची म्हणा हवं तर!
एकाच वेळी निरनिराळ्या प्रकारचे उपद्व्याप करण्याची खोड आणि कौशल्य देखील. माणसं जमवायचं वेड. जाईल तिथे भोवती गराडा पडलेला...बहुधा हा प्राणी मिथुन राशीचा असावा!

आनंदयात्री: दिलखुलास माणूस. एक मर्यादा पाळून आचरट विनोद करण्याची सवय. 'आपून एकदम बिन्धास है भिडू' असं म्हणतानाही हा गडी आतून कुठेतरी थोडासा हळवा असावा असं वाटतं.

मनस्वी: अजुनही कॉलेजमधले रंगीबेरंगी दिवस विसरु न शकलेली नव-गृहिणी जशी असेल तशीच ही सुध्दा. गमतीदार बोलणं, मित्र-मैत्रिणींची मापं काढणं, खाजगीत चेष्टा करेल, पण चारचौघात मात्र बाजू घेऊन लढेल अशी असावी.
बाकी, तिच्या नवरोबांचं कसं होत असेल देव जाणे.
हीच्या बाबतीत बोलायचं झालं तर 'क्षणात अवखळ, क्षणात गंभीर, क्षणात लहानगी तर क्षणात वयस्कर' अशी झरझर रुपं बदलणारी एखादी लहान मुलांच्या गोष्टीत असते तशी एखादी व्यक्तिरेखा वाटते मला.

चतुरंगः अर्धगोलाकार फ्रेमचा चष्मा नाकाच्या मध्यावर, त्याच्यावरुन डोकावणारी मिश्किल नजर...हा माणूस नजरेसमोर आणायचा ठरवला तर मला फक्त एकच दृश्य दिसतं...अभ्यासिकेत बरीच पुस्तकं आहेत...तिथेच ठेवलेल्या रॉकिंग चेअरवर शुभ्र पांढरा कुडता-पायजमा चढवून हातात एखादं जाडजूड पुस्तक घेऊन बसलेला, आणि चेहर्‍यावर अस्फुटसं हसु असलेला एक मध्यमवयीन गृहस्थ आपल्याकडे पाह्तो आहे.

पिवळा डांबिसः चेक्सचा कोट, त्याच्या खांद्या-कोपरावर लेदरचे पॅचेस, एखादा दांडगा कुत्रा पायाशी घुटमळत असलेला, वय साधारण ४५-५०...चेहर्‍यावर करारी भाव, आपण होऊन बोलणार नाही...पण एकदा का बोलायला सुरुवात केली की समोरच्याला वेडं करुन सोडायची हातोटी. शक्यतो विषय आपण सुरु करायचा नाही...पण त्यावर प्रतिक्रिया मात्र एकदम जबरदस्त टाकायच्या असं काहीसं हे व्यक्तिमत्व.
========================================

उरलेले जमतील तसे लिहिनच...ज्यांना भेटलो आहे त्यांच्याबाबत लिहिण्यात काही हशील नाही...ते ह्या धाग्याशी सुसंगत ठरणार नाही!

छोटा डॉन's picture

24 Apr 2008 - 5:18 pm | छोटा डॉन

"उंच, किरकोळ शरीरयष्टी, लांब केस, बोलताना सतत हसायची सवय...किंवा हसत हसत बोलायची म्हणा हवं तर!"
हा उंच आहेच, चांगला ६ फूट. केस आता पुर्वीएवढे वाढले आहेत [ मधी बोंबाबोंब झाली होती ]
बाकी हासण्याशेवाय आपल्याला जमतच नाही ...

"जाईल तिथे भोवती गराडा पडलेला...बहुधा हा प्राणी मिथुन राशीचा असावा!"
हा ना राव, जिकड जावा तिकडं लोक सोडतच नाहीत. पुण्यात घरवाले, मैतर, जिवाभावाच्या व्यक्ती इकडे बॉस, कलीग्स, रूममेट्स [ ऑफीसातला पोरी कंसात ]
पण बॉस माझी रास "कुंभ" आहे ....

च्यायला एवढा कसा बरोबर अंदाज बे ?
मनकवडा की काय तु ?

"आनंदयात्री: दिलखुलास माणूस. एक मर्यादा पाळून आचरट विनोद करण्याची सवय. 'आपून एकदम बिन्धास है भिडू' असं म्हणतानाही हा गडी आतून कुठेतरी थोडासा हळवा असावा असं वाटतं""
एकदम करेक्ट. आपण कुणाच्या बापाला भित नाही हा आपल्याला त्याच आवडणारा ऍटीट्युड ...

"मनस्वी: अजुनही कॉलेजमधले रंगीबेरंगी दिवस विसरु न शकलेली नव-गृहिणी जशी असेल तशीच ही सुध्दा. गमतीदार बोलणं, मित्र-मैत्रिणींची मापं काढणं, खाजगीत चेष्टा करेल, पण चारचौघात मात्र बाजू घेऊन लढेल अशी असावी.
बाकी, तिच्या नवरोबांचं कसं होत असेल देव जाणे""

जिजू नशिबवान असतील ...

"पिवळा डांबिसः चेक्सचा कोट, त्याच्या खांद्या-कोपरावर लेदरचे पॅचेस, एखादा दांडगा कुत्रा पायाशी घुटमळत असलेला, वय साधारण ४५-५०...चेहर्‍यावर करारी भाव, आपण होऊन बोलणार नाही...पण एकदा का बोलायला सुरुवात केली की समोरच्याला वेडं करुन सोडायची हातोटी.""
माझी गॅरेंटी आहे, १०० % टक्के असेच असतील ...
एकदम दिलखूलास ...

बाकेच्यांचा समाचार नंतर ....

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

धमाल मुलगा's picture

24 Apr 2008 - 5:23 pm | धमाल मुलगा

रूममेट्स [ ऑफीसातला पोरी कंसात ]
काय हे? हापिसातल्या पोरी तुझ्या रूममेट आहेत?
काकूंना सांगू का रे?

छोटा डॉन's picture

24 Apr 2008 - 5:35 pm | छोटा डॉन

मला रूममेट्स आणि ऑफीसातल्या पोरी सुध्दा असे म्हणायचे आहे ...

तुला साला, अर्थाचा अनर्थ करतोस

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मनस्वी's picture

24 Apr 2008 - 5:44 pm | मनस्वी

हापिसातल्या पोरी तुझ्या रूममेट आहेत?

ही हा हा.. सांग रे सांगच तू काकूंना.

जिजू नशिबवान असतील ...

अय्याऽऽ कौतुक कौतुक म्हणून तरी किती करावं..
फु ट ले
लाजून चुरा झाला.. आपलं.. लाजून चूर
धन्य झाले
आणि अजून धन्य धन्य वाटल्यावर काय काय म्हणतात ते..

(स्वगत : नशिब. तुमचे जिजू इथले सदस्य नाहीयेत.. नाहीतर आश्चर्ययुक्त धक्क्यातून नॉनस्टॉप हसतच सुटले असते.)

llपुण्याचे पेशवेll's picture

24 Apr 2008 - 8:34 pm | llपुण्याचे पेशवेll

लाजून चुरा झाला.. आपलं.. लाजून चूर
म्हणजे मनस्वीताई लाजून चूर झाल्या आणि ह्यांचा मात्र त्यामुळे चुरा झाला असे म्हणायचे आहे का तुम्हाला? (ह्.घ्या. हे. वे. सां. न. ल.)

पुण्याचे पेशवे

आनंदयात्री's picture

24 Apr 2008 - 8:45 pm | आनंदयात्री

इथुन तिथुन मिथुन !!

वरदा's picture

25 Apr 2008 - 12:23 am | वरदा

वरदा: नुकतेच लग्न झालेली मुलगी. जी संसाराला सुरवात करत आहे.


लाजले बरं का मी.......
हम्म! परंतु स्वयंपाकाच्या नावाने अजून बोंब आहे! आमचे जावई कसाबसा दोन टाईम डाळभात खाऊन दिवस ढकलताहेत असे अलिकडेच कळले! बाय द वे, वरदा थालिपिठं मात्र छान करते हो! :)


ओ तात्या अख्खा पंचपक्वांन्नाचा स्वयपाक तोही ८ माणसांचा ४ तासात केला होता मी....अजुनही स्वयपाक म्हणाल ना तर एकदम फटाफट, मराठी वेजीटेरिअन कुठचीही डीश सांगा .. फक्त नवीन पदार्थ येत नाहीत मला म्हणून विचारत असते. ..एकदा याच जेवायला बोटं चाटत रहाल. ...इथे वैताग येतो कारण सवयीच्या गोष्टी मिळत नाहीत लहान पणापासुन विळी वापरली इथे येऊन त्या सुर्‍या वापरायला कंटाळा येतो. पण काय करणार केली सवय. ...

स्वगतः तात्या खरच येतील की काय..आधीच स्वाती, प्राजु, पेठकर काकांना फोन करुन नीट रेसिपी विचारुन ठेवेन..:))))

विसोबा खेचर's picture

25 Apr 2008 - 11:23 am | विसोबा खेचर

ओ तात्या अख्खा पंचपक्वांन्नाचा स्वयपाक तोही ८ माणसांचा ४ तासात केला होता मी....अजुनही स्वयपाक म्हणाल ना तर एकदम फटाफट, मराठी वेजीटेरिअन कुठचीही डीश सांगा ..

अरे वा वा!

स्वगतः तात्या खरच येतील की काय..आधीच स्वाती, प्राजु, पेठकर काकांना फोन करुन नीट रेसिपी विचारुन ठेवेन..:))))

खरंच येणार आहे, तयारीत राहा! :)

तात्या.

केशवसुमार's picture

25 Apr 2008 - 12:46 am | केशवसुमार

स्वातीताई राजेश...
(स्वाती राजेश ताई जरा चुकल्या गत वाटतं )
कॅलिडोस्कोप...उत्तम..
एक एक प्रतिसाद वाचून ह. ह. पू. वा..
पिवळ्या डांबीस हा प्राणी कोण आहे हे बघायलाच पाहिजे..
केशवसुमार
(स्वगतः- जालावर आधीच आपल प्रकाशचित्र चिटकल होतं म्हणून बर नाहीतर ह्या लोकांनी आपल काय माकड केलं असत...)

वरदा's picture

25 Apr 2008 - 1:00 am | वरदा

:-) आणि ऑफिसमध्ये टाईमपास कसा करावा ह्या विचारात सतत गर्क :-))))))


परफेक्ट! पण हल्ली कमी करते विचार...मि. पा. कशाला आहे...प्रत्येक लेखाला प्रतिक्रिया दिली की वेळ नक्की संपतो.......

पिवळा डांबिस's picture

25 Apr 2008 - 7:34 am | पिवळा डांबिस

अरे तुम्हा मुलांना काय शाळा, अभ्यास, होमवर्क काही नसतं कारे!...
या कार्ट्या पण तसल्याच! घरात आईला जरा काही मदत करतील तर शपथ!!
:))))

चेक्सचा कोट, त्याच्या खांद्या-कोपरावर लेदरचे पॅचेस, एखादा दांडगा कुत्रा पायाशी घुटमळत असलेला, वय साधारण ४५-५०...चेहर्‍यावर करारी भाव, आपण होऊन बोलणार नाही...पण एकदा का बोलायला सुरुवात केली की समोरच्याला वेडं करुन सोडायची हातोटी. शक्यतो विषय आपण सुरु करायचा नाही...पण त्यावर प्रतिक्रिया मात्र एकदम जबरदस्त टाकायच्या असं काहीसं हे व्यक्तिमत्व.
हा, हा, हा!!!:))
कसं ओळखलंत हो?

माझ्या मते पिवळा डांबिस काकाना चष्मा असावा.....
फक्त वाचायचा बरं का! आता चाळिशी उलटल्यावर चाळिशी लागणारच ना!!:))

मलाही काही व्यक्तिरेखा रंगवायला आवडतील पण सध्या काही चांगलं सुचत नाहिये...

धमाल मुलगा's picture

25 Apr 2008 - 10:52 am | धमाल मुलगा

मंडळी, तसा काही जणांचा कॅलिडोस्कोपिक लूक मी वर मांडलाच. पण मुद्दामच एका व्यक्तिला त्यातून वगळले होते...
कोण असेल ? ओळखा!

प्रमोदकाका देव : आडनावात देवत्व, आणि नावात 'प्रमोद', काय बोलायचं ह्यांच्याविषयी आम्ही पामरांनी?
एकदम शांत, धीरगंभीर ऋषीतुल्य व्यक्तिमत्व असावं हे!एखाद्या प्रचंड वैतागलेल्या, चिडलेल्या माणसाला ह्यांच्या शेजारी बसवावं...पाच मिनिटात तो बर्फाच्या लादीवर बसवल्यासारखा गारेगार होऊन जाईल.
आवाज खर्जातला असावा, चेहर्‍यावर प्रेमळ भाव, नजरेत आश्वासकता, फ्रेन्च किंवा बुल्गानिन कटची दाढी असावी, आणि चेहर्‍यावर मंद स्मितहास्य!

असेच आहेत का हो आमचे हे गुरुदेव, प्रमोद्रोणाचार्य?

प्रमोद देव's picture

25 Apr 2008 - 11:19 am | प्रमोद देव

काय पण एकेकाची कल्पनाशक्ती आहे!
धमु अरे हे अर्धसत्य आहे. खरा स्वभाव कळायला "संगतीला आणि पंगतीला" असावं लागतं!
एकच म्हणतो..... काय भुललासी वरलिया रंगा!
आता दाढीचं म्हणशील... तर ते आमचे तसे छायाचित्र जालावर चढवलेले आहे... त्यामुळे तो अंदाज(आहे? की कॉपी करतो आहेस?) बरोबर आहे.
बाकी सगळा आनंदी आनंद(नावातही आहे म्हणा) आहे.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

धमाल मुलगा's picture

25 Apr 2008 - 11:43 am | धमाल मुलगा

आता दाढीचं म्हणशील... तर ते आमचे तसे छायाचित्र जालावर चढवलेले आहे... त्यामुळे तो अंदाज(आहे? की कॉपी करतो आहेस?)
खरं तर मला ते आठवलं नव्हतं. एक अंदाज बांधला...बाकी खांद्याला शबनम आणि तिच्यात चार-दोन पुस्तकं असंही लिहायला विसरलो!

खरा स्वभाव कळायला "संगतीला आणि पंगतीला" असावं लागतं!

हम्म्म.... पण आमच्या संगतीनं तुम्ही बदनाम व्हाल आणि पंगतीला आम्ही शुध्द मांसाहारी तुम्हाला चालणार नाही...
मग काय करावं बरं?

विजुभाऊ : रुबाबदार ,देखणा लूक, देव आनन्द सारखे केस. सन्जय दत्त सारखी तब्येत, अमिताभ सारखा घनगंभीर आवाज्,अमिर खान सारखे खट्याळ डोळे ,पु लं सारखा हजरजबाबीपणा , कुशाग्र बुद्धीमत्ता , हातात चिरुट किंवा पाईप ,जीन्स , ब्लेझर( झोपताना सुद्धा)
हे सगळे मला माझ्या व्यक्तीमत्वात हवं आहे. ( आयला एवढ्यात आमचे व्यक्ती चित्र संपले सुद्धा? आपल्यास्वतःबद्दलसुद्धा यापेक्षा जास्त कल्पना करता येत नाही ....करा लेको चैन. खा शिकरण रोज)
खरी परिस्थिती:पण सांगा विजुभाऊ या नावाला हे सगळे शोभतं का?
स्वगतः आमच्या हातात पाईप आला तर तोही फुटका नळ दुरुस्त केल्यावर घरातुन गंजका पाईप बाहेर टाकुन या असे सांगितल्यावरच येतो.
असो..... आपल्यास्वतःचे काल्पनीक आरश्यात चित्र पहाणारा विजुभाऊ

स्वाती राजेश's picture

25 Apr 2008 - 1:46 pm | स्वाती राजेश

देवानंदचे आत्ता केस आहेत तसे का?
मग तर :))))))))))))
विजुभाऊ:आता तर मला वेगळीच कल्पना करावी लागेल.
मी समजत होते, साधारण दिलीप प्रभावळकर स्टाईल, उंच , बोलण्यात मिक्शिलपणा, हळूवारपणा....एखद्याला मुद्दा कसा समजावयाचा हे यांच्याकडून शिकावे असे.
पण त्यांनी तर स्वतःचे भलतेच चित्र रंगवले आहे.
छे.... आमचेच कुठेतरी चुकले म्हणायचे.

लबाड मुलगा's picture

11 Aug 2008 - 12:10 pm | लबाड मुलगा

वा मस्त वर्णन आहे
प्रतिमा अगदी डोळ्यासमोर येतात व जणु ख-याच आहेत असे वाटते

सुंदर कल्पना विलास

मस्तच
अजुन येवु द्या