तिकडे केवळ सुकामेवा विकणारी अनेक दुकाने आहेत,(पण पिस्ते सोडुन ईतर सुकामेवा मध्यपूर्वेच्या ईतर देशात चांगला मिळतो असा माझा वैयक्तिक अनुभव आहे.) त्यातले एक दस्तचिन् (दस्त -हात, चिन् - निवडलेले) हे खुप प्रसिद्ध आहे (अस त्यांनीच सांगितले, मला काय माहीती हास्य ) त्या दुकानात पिस्ते खरेदी करायला गेलो, (कारण तेवढेच परवडणारे होते, तेल आणि गालिचे, "मला" विकले तरी परवडणार नाही) :''( , माझ्या सहकार्याने हिन्दुस्थान, आमीताब वगैरे नेहेमीचा पाढा वाचल्यावर गडी खुशीत आला. मला चीक्कार प्रकार दाखवल्यावर मला सगळ्यात आवडलेला (चव नव्हे किंमत) निवडला. एक अत्यंत सुंदर लाकडात कोरलेले ईराणी सौदर्यवतीचे चित्र पण खरेदी केल (दुधाची तहान ताकावर..) छायाचित्रक सापडला तर छायाचित्र टाकेन इथेच.
शेवटचे २ दिवस सगळ्यांच्याकडुन जेवणाची आमंत्रणे येत होती, पण मी कुठेच जाउ नाही शकलो. काही स्थानीक पक्वान्नं मात्र खायला मिळाली :D . त्यातला एक "अॅश" (ह्यातला 'अॅ' म्हणताना हे लोक ईतक्या लडिवाळपणे जिभ आत घेउन उच्चारतात की, तो उच्चार आणि तो पदार्थ यात अधिक मोहक काय हे सांगणे कठिणच) हा पदार्थ विशेष आवडला, थोडिशी चकोल्यांसारखी (वरणफळं पण म्हणतात ह्याला, म्हणजे चकोल्यांना, अॅश ला नव्हे) चव लागते. बाकीपण पदार्थ ठिकच. लॅट्युस चा वापर जास्त करतात, फ्रेंचांचा प्रभाव जेवणावरही जास्त दिसतो.
आतापर्यंत माझ्या हॉटेलवाल्याकडुन हवा तो पदार्थ करुन घ्यायची युक्ती माहीत झाली होती, त्याला 'वीजाय' अशी हाक मारली कि तो काय वाट्टेल ते करुन द्यायचा. (अमिताभचे नाव कुठल्यातरी चित्रपटात विजय होतं म्हणे :? ) त्यामुळे चरत होतो आणि फिरत होतो
पर्शियन संगीत ह्याविषयी बरेच काही लिहिले जाऊ शकते, पण दुर्दैवाने मी तितका जाणकार नाही, हे संगीत क्षणार्धात आपल्याला वेगळ्याच जगात घेउन जाते, ते संथ पण कमालीचे स्फुर्तीप्रद सुर ऐकुन मला क्षणभर कुमारजींची निर्गुणी भजने आठवली. एका रेस्त्राँमधे बसलो असताना, वाढदिवसाला वाजवायची पारंपारीक ईराणी धुन ऐकली, पियानोवर बसलेला पांढरर्या केसाचा बाबा असे काही सुर आळवत तल्लीन झाला होता की मी कितीतरी वेळ चक्कचक्क पुढ्यातले ताट विसरुन डोळे मिटुन बसलो होतो. (मला समोरचे जेवण विसरायला लावणारे संगीत स्वर्गीयच असले पाहिजे) या 'तावलोदेत मोबारक' गाण्याचे अगदी यथार्थ वर्णन पर्शियन लोक करतात "मोस्ट ब्युटीफुल बर्थडे साँग ऑन धिस अर्थ" ईकडे ऐका हवेतर आणी स्व्रतःच ठरवा.
आताशा त्या पारंपारीक संगीतामधे काही नवीन प्रवाह येउन मिसळतायत, पण मूळ लहेजा आणि डौल कायम आहे. त्यांच्या जुन्या संगीतकारापैकी एक "अनोशिर्वान रोहानी" ह्यांच्या काही रचना अप्रतीमच आहेत (त्यांचेही 'तावलोदेत मोबारक' ऐकुन बघा याडच लागेल). गेल्या निवडणुकीनंतर झालेल्या आंदोलनात काही लोकप्रिय संगीतकार, गायकांनी खास गाणी रचून, गाउन ते आंदोलन आपल्यापरीने पेटते ठेवले होते. मला सतत सकाळसंध्याकाळ गाडीमधे नवनव्या पर्शियन रचना ऐकण्याची मेजवानी मिळत होती.
पर्शियातला मुक्काम संपत आला होता, मी ह्या सुंदर देशातली प्रत्येक गोष्ट मनात साठऊन घेत होतो, पाय खरच निघत नव्हता, आपला मुक्कम अजुन काही दिवस असायला हवा होता असं सारखे वाटत होते, जाउद्या.. कुणाच उष्ट, कुठे, आणि किती दिवस सांडावे ह्याची काहीतरी नियतीयोजनाच असावी. (अशावेळी गदिमांच्या कडे उधारउसनवार नाही करणार तर कुणाकडे.. दोन ओंडक्यांची होते अकस्मात भेट.. एक लाट तोडी दोघा.. पुन्हा नाही गाठ) शेवटी सामान व मन आवरुन विमानतळावर येउन थांबलो.
परतीच्या प्रवासात ईराण एअरचे विमान होते. बसल्यानंतर काही वेळातच त्या विमानाने मला जमिनीवर आणले. ~X( (त्या कालच्या चित्रविक्रेत्त्याने कुठली फ्लाईट आहे? असे विचारले.. मला वाटले सहज विचारले असेल. पण मी ईराण एअर सांगितल्यावर आधिचे पॅकिंग फोडुन दुप्पट जाड पॅकिंग केले तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती). ईराणी विमानकंपनी ही ईतर कुठेही नोकरी न मिळाल्यावर शेवटचा पर्याय म्हणुन त्या कर्मचार्यांनी निवडली असावी. ईराणी आकाशातल्या बाया बाहेरच्या ईराणी स्त्रियांच्या मानाने अगदीच सुमार होत्या. प्रत्येक गोष्ट अन्नछत्रात वाढल्यासारख्या वाढत होत्या. ~X( नविन विमानखरेदी बहुदा खोमेनीच्या काळातच थांबवली असावी. त्या विमानकंपनीत आपल्याकड्च्या काही चित्रपट समीक्षकानीही शिरकाव करुन घेतला असावा बहुतेक. ईतके सुरेख पर्शियन चित्रपट सोडून, तद्दन रटाळ चित्रपट संपला की अतीरद्दड गाणी कि परत अती फड्तूस चित्रपट अशे शोधुन लावत होते.
त्या प्रवासात काही भैय्ये (राजसाहेबांच्या ठसक्यात म्हणुन पहा बरं)पण होते, त्यांच्या बायका नखशिखांत ईराणी पोशाखात होत्या (अर्थात विमान मुंबईत उतरेपर्यंतच, हे लेकाचे बाकी सगळ्या देशात जाउन तिकडचे निर्बंध गपचुप पाळतात, ईकडे आले की दात येतात साल्याना.)
असो.. तर असा हा माझा पर्शियन अनुभव, तोडक्यामोडक्या शब्दात जसा जमेल तसा लिहीला आहे. आपल्याला आवडेल अशी आशा आहे. (उम्मीद पे दुनिया कायम है )
आवडला तर नक्की कळवा. (म्हणजे त्या बालवॉशींग्टनच्या कुर्हाडीसारखी दिसेल त्या विषयावर लेखणी चालवायला हुरुप येइल.)
" alt="" />
" alt="" />
" alt="" />
" alt="" />
समाप्त.
प्रतिक्रिया
14 Jun 2010 - 10:01 am | आंबोळी
आपल्याला आवडेल अशी आशा आहे. (उम्मीद पे दुनिया कायम है )
बा अर्धवटरावा तुम्ही लैच बेष्ट लिवलय.....
आपल्याला तर बाबा लै आवडेश.....
आजुन येऊ द्या.....
( ™ )आंबोळी
14 Jun 2010 - 10:38 am | संजय अभ्यंकर
आयुष्यात संधी मिळलीतर ईराणला जायला नक्की आवडेल.
लहानपणा पासुन मुंबईतल्या ईराणी हॉटेलातले पदार्थ आवडतात.
बेकरी पदार्थांमध्ये ईराणी पदार्थ खासच.
पुण्यात गुडलक मध्ये मोजकेच ईराणी पदार्थ मिळतात, परंतु ते चविष्ट असतात.
(कासमखाना , ईराणी फ्राइड चिकन व ईराणी पद्धतीचे सुप त्यातल्या त्यात खास)
आताशा ईराणी रेस्टॉरेंट्स, हैदराबाद सोडल्यास इतरत्र फारशी नाहीत.
भारतातला ईराणी समाज इतरांपासुन अलिप्त रहातो, त्या मुळे त्यांच्या बद्दल आपल्याल फारशी माहीती नाही.
संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/
14 Jun 2010 - 10:50 am | बिपिन कार्यकर्ते
मिष्टर अर्धवटराव... उत्तम लेखमाला. इराणी जीवनाचे धावते आणि थोडक्यात पण जवळून दर्शन घडवलेत. अजून लिहा हो... अजून बरेच विषय सापडतील तुम्हाला लिहायला.
बिपिन कार्यकर्ते
14 Jun 2010 - 3:09 pm | इरसाल
बसल्यानंतर काही वेळातच त्या विमानाने मला जमिनीवर आणले. (त्या कालच्या चित्रविक्रेत्त्याने कुठली फ्लाईट आहे? असे विचारले.. मला वाटले सहज विचारले असेल. पण मी ईराण एअर सांगितल्यावर आधिचे पॅकिंग फोडुन दुप्पट जाड पॅकिंग केले तेव्हाच शंकेची पाल चुकचुकली होती)
14 Jun 2010 - 6:51 pm | अनिल हटेला
उत्तम लेखमाला !!
(मोहिनी च्या फूटूची वाट बघण्यात आमची वाट लागली) :(
अजुनही लिहा अशी विणंती...
:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
14 Jun 2010 - 7:25 pm | कापूसकोन्ड्या
ईराणी आकाशातल्या बाया बाहेरच्या ईराणी स्त्रियांच्या मानाने अगदीच सुमार होत्या. प्रत्येक गोष्ट अन्नछत्रात वाढल्यासारख्या वाढत होत्या.
लै भारी
16 Jun 2010 - 7:27 am | शिल्पा ब
छान अनुभवकथन केले आहे.
***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/
16 Jun 2010 - 7:36 am | सहज
इराणलेखमाला आवडली हो विजय दिनानाथ! :-)
16 Jun 2010 - 8:59 am | रामदास
दिलखुश !!!!
16 Jun 2010 - 12:44 pm | जागु
लिखाण आवडले.
16 Jun 2010 - 2:13 pm | गणपा
आजच सगळे भाग वाचुन काढले.
एक नितांत सुंदर मालिका झाली आहे.
(लिहिते रहा.)
16 Jun 2010 - 4:16 pm | भडकमकर मास्तर
चांगली लेखमाला.. मजा आली..
आता कुर्हाड जोरात चालूदे...