आले ...
ते आले आहेत ...
फुटबॉल विश्वचषकाच्या महासंग्रामासाठी दक्षिण आफ्रिकेच्या कुरुक्षेत्री ते डेरेदाखल झाले आहेत... ते आले आहेत एका विजेत्याच्या उन्मादात ...
ते आले आहेत आपल्या लाखो पाठिराख्यांच्या मुखातुन निघणार्या विजयी गर्जना आणि लाखो पावलांनी केलेल्या विजयी नृत्याच्या पदन्यासासह ...
ते आले आहेत ते आपल्या देशाचा राष्ट्रध्वज घेऊन, जो त्यांनी संपुर्ण पात्रता फेरीत निर्विवाद विजयाच्या दिमाखाने आणि अभिमानाने फडकत ठेवला होता व आता तोच राष्ट्रध्वज घेऊन ते सज्ज झाले आहेत ह्या विश्वचषकाचे मैदान मारण्यासाठी ...
ते आले आहेत आपल्या समोर येणार्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला चिरडण्यासाठी, मैदानावर त्यांना चारीमुंड्या चीत करुन आपल्या लाखो पाठीराख्यांना आणि आपल्या राष्ट्राला एका अतुलनीय विजयश्रीची भेट देण्यासाठी ...
पात्रता फेरीतल्या १० सामन्यांमध्ये चक्क १० विजयांचे झळाळत्या सोन्यासारखे चोख यश घेऊन त्यांना आपला राष्ट्रध्वज दिखामात फडकत ठेवला. एकुण १० सामन्यांमध्ये त्यांनी तब्बल २८ गोलांची बरसात करुन व केवळ ५ गोल खाऊन त्यांनी आपला अश्वमेध १० सामन्यांमध्ये ३० गुणांसह दिमाखात पुर्ण केला.
"१० सामने - १० विजय - ० बरोबरी - ० पराभव" अशी दृष्ट लागेल अशी आकडेवारी घेऊन ते कुरुक्षेत्री दाखल झाले आहेत.
त्यांच्या स्ट्रायकर्सनी प्रतिस्पर्धी संघाच्या बचावफळीच्या भिंती पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळवल्या, त्यांच्या आक्रमणाच्या धडकांसमोर समोर बचावाचे काम करणारे मिडफिल्डर्स पाल्यापाचोळ्यासारखे उडुन गेले, त्यांच्या विद्युल्लतेची चपळाई घेऊन आणि वार्याचा वेग घेऊन मारलेल्या फटक्यांसमोर प्रतिस्पर्ध्यांचे सारे गोलरक्षक हतबद्ध होऊन चारीमुंड्या चीत झाले.
ह्यांच्या मिडफिल्डर्ससमोर प्रतिस्पर्धी प्रशिक्षक आणि मिडफिल्डर्स ह्यांनी रचलेले 'व्युव' चक्रीवादळात उडणार्या पालापाचोळ्यासारखे उडुन गेले, महाभारताच्या कुरुक्षेत्री संपुर्ण युद्धभुमीवर अनिर्बंध आणि बेधडक धुमाकुळ घालणार्या भीम-अर्जुनासारखा ह्यांच्या मिडफिल्डर्सनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रात धुमाकुळ घातला व संपुर्ण वर्चस्व मिळवले. ह्यांच्या मिडफिल्डर्सनी रचलेल्या चाली पहाताना प्रतिस्पर्ध्यांची गत महाभारतासारखे चक्रव्युव भेदुन बेधडक आत घुसणार्या अभिमन्युकडे कौरवसेना जशी आश्चर्याने पहात बसली होती तशी झाली होती.
धारदार आक्रमणाइतकाच ह्यांचा बचावही अभेद्य, ह्यांच्या बचावपटुंनी आपल्या गोलक्षेत्रात बचावाच्या अशा कणखर भिंती उभारल्या की प्रतिपक्षी स्टायकर्स त्यावर डोके आपटुन दमले पण हा बचाव काही त्यांना भेदता आला नाही. प्रतिपक्षाची एक से एक धारदार आक्रमणे ह्या बचावफळीसमोर निष्प्रभ ठरली व त्यांना हात हालवत निघुन जावे लागले.शोलेमधला "हमारें इजाजत के बिना यहाँ परिंदाभी पर नहीं मार सकता" हा डायलॉक ह्यांच्या बचावफळीने व गोलरक्षकाने शब्दशः खरा करुन दाखवला.
आता ते आले आहेत दक्षिण आफ्रिकेतल्या मुख रणभुमीत, ते सध्या आहेत भयंकर फॉर्मात आणि जोशात, त्यांना पाठिंबा आहे तो अंगावर राष्ट्रध्वज नाचवत आरोळ्यांनी त्यांना प्रोत्साहन देणार्या त्यांचा लाखो देशवासियांचा आणि इतर करोडो पाठिराख्यांचा ...
ते आले आहेत मैदान मारण्याच्या इर्शेनेच, समोरच्या टीमला चिरडुन त्यांची विजयश्री मिळवण्याच्या हेतुनेच ...
ते आहेत "दी रेड फ्युरीज ... "
ते आहेत " स्पेन : दी स्पॅनिश फ्युरी , दी रेड फ्युरी ... "
स्पेन :
रियाल माद्रिदसारख्या जायंट क्लबच्या मिडफिल्डचा कणा असलेला आणि त्यांचे प्रमुख अॅटॅकिंग टॅलेंट तसेच 'प्लेमेकर' अशा विविध भुमिका बजावणार्या अनुभवी "झॅबी ओलेन्सो" च्या नेतॄत्वाखाली ह्यावेळी स्पेन विश्वचषकाला सामोरे जात आहेत. रियाल माद्रिद, बार्सिलोना, सेव्हिली, लिव्हरपुल , व्हॅलेंसिया अशा एकाहुन एक दादा क्लबमधुन खेळणार्या व त्या त्या संघाचे "सुपरस्टार" असणार्या खेडाळुंचा भरणा असलेला हा "टीम ऑफ चॅम्पियन्स" ह्यावेळी खरोखर विश्वचषकाची "चॅम्पियन टीम" ह्या पदासाठी आपला दावा मजबुतीने पेश करत आहेत.
१९७८ नंतर सातत्याने विश्वचषकाला पात्र ठरुनही त्यांनी मजल कधीही 'उपांत्यपुर्व सामन्याच्या पुढे" गेली नाही.
२००२ सालच्या कोरियन विश्वचषकात त्यांना काही वादग्रस्त निर्णयांमुळे कोरियाकडुन पनल्टी शुट आउटमध्ये मात खाऊन बाहेर पडावे लागले, त्यानंतर त्यांनी टीमची संपुर्ण फेररचना केली व आज त्यांनी त्यांच्या टीमला चॅम्पियन्सच्या क्षमतेला आणुन ठेवले.
२००८ सालचे युरोकप विजेते आणि २००९ च्या फिफा कॉन्फिडरेशन कपमध्ये तिसरा क्रमांक असे दिमाखदार रेकॉर्ड घेऊन ते ह्या विश्वचषकाला सामोरे जात आहेत.
मध्यंतरीच्या काळात त्यांच्या अनेक खेडाळुंनी 'इंग्लिश प्रिमियर लीग, इटालियन लीग, स्पॅनिश लीग आणि चॅम्पियन्स लीग' अशा अनेक स्पर्धा आपल्या खतरनाक आणि नैपुण्यवान खेळाने गाजवल्या व आपापल्या क्लबच्या गळ्यातले ते ताईत आहेत.
आता ते खेळणार आहेत ते मायदेशासाठी, आपल्या राष्ट्रध्वजाच्या सन्मानासाठी व आपल्या करोडो पाठिराखांच्या आशा-अपेक्षांना योग्य न्याय देऊन त्यांना ह्या "विश्वचषकाची भेट" देण्यासाठी. संघ :
(प्रत्येक खेडाळुच्या पुढे कंसात दिलेले त्याच्या सध्याच्या क्लबचे नाव त्या खेडाळुचा लौकिक सांगण्यास पुरेसे आहे.)
गोलरक्षक : इकर कॅसिलास (रियाल माद्रिद), पेपे रैना (लिव्हरपुल), व्हिक्टर वाल्देस (बार्सिलोना)
बचावफळी : चार्लस पुयॉल (बार्सिलोना), जेरार्ड पिके (बार्सिलोना), राऊल अल्बालियो (रियाल माद्रिद), सॅकियो रॅमॉस (रियाल माद्रिद), कार्लोस मार्चेना (व्हॅलेंसिया), अल्वॅरो अर्बिलोआ (रियाल माद्रिद), योहान कॅप्डिविला (विल्लेरियाल)
मिडफिल्डर्स : आन्द्रेयस इनियेस्टा (बार्सिलोना), शॅबी हर्नाडेझ (बार्सिलोना), चेक फॅब्रिगास (आर्सनेल), झॅबी ओलेन्सो (रियाल माद्रिद), सर्जियो बिस्किट्स (बार्सिलोना), डेव्हिड सिल्वा (व्हॅलेंसिया), झिझस नवास ( व्हिली ), झॅवी मार्टिनेझ (अॅथलेटिक बिल्बायो), जोआन मॅन्युअ माटा (व्हॅलेंसिया)
स्ट्रायकर्स : डेव्हिड व्हिला (बार्सिलोना), फर्नांडो टोरेस (लिव्हरपुल), पेड्रो ऱोड्रिगेझ (बार्सिलोना), फर्नांडो लॉरेन्ट (अॅथलेटिक बिल्बायो)
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------
ज्यांनी स्पॅनिश लीग पाहिली असेल त्यांना टिपीकल बलदंड आणि अवाढव्य अशा स्पॅनिश बचावपटुंमधुन तुरुतुरु धावत चपळाईने गोल करुन गोलांचा अक्षरशः रतिब घालणारा एक छोट्या चणीचा 'व्हॅलेंसिया'चा स्ट्रायकर आठवत असेल, तोच हा "डेव्हिड व्हिला". ह्या सिझनमधला सर्वात जास्त चर्चेत असणारा खेळाडु. नुकतेच त्याला बार्सिलोना ह्या जायंटने तब्बल ४० दशलक्ष युरो एवढी किंमत मोजुन आपल्या संघात सामिल करुन घेतले. लियोनेल मेस्सी, पेड्रो, झ्लाटान इब्राहिमोविच अशी बलदंड आघाडीची फळी असणार्या बार्सिलोनाला पुढच्या सिझनला 'चॅम्पियन्स लीग' जिंकण्यासाठी आपल्या टीममध्ये 'डेव्हिड व्हिला' हवा असे वाटते ह्यातच सर्व काही आले. आजच्या घडीला जगात एक अत्यंत भरवश्याचा स्ट्रायकर अशी व्हिलाची ओळख.
गोल करण्याच्या १० संधींपैकी ९ वेळा हमखास गोल करणार अशी त्याची ख्याती, एक सुप्रिम फिनिशर. अप्रतिम पदन्यासाचे ड्रिब्लिंग कौशल्य, बॉलवर अचुक नजर व त्याचा अचुक अंदाज, दुरवरुन शॉट मारताना लागणार्या ताकदीची करेक्ट कॅल्क्युलेशन व अप्रतिम शारिरीक समतोल ह्या त्याच्या खास बाबी.
स्ट्रायकर असुनही आपल्या सहकार्यांना योग्य पासेस देण्याचा नावलौकिक व त्यामुळे कदाचित ह्याचा नावावर 'गोल असिस्ट'चेही दमदार रेकॉर्ड.
ब्रिटिश क्लब लिव्हरपुलच्या लालेलाल जर्सीमध्ये त्याहुन लालबुंद होऊन जोरदार धावणारा हा त्यांचा प्रमुख स्ट्रायकर 'फर्नांडो टोरेस', त्यांच्या व सध्या स्पेनच्या आघाडीचा प्रमुख महारथी. संघाची पणाला लागलेली इज्जत संभाळण्यासाठी नेहमीच अत्युच्च पर्फॉर्मन्स देण्याचा ह्याचा लौकिक. २००८ च्या युरो कपच्या वेळी ह्याचा साथिदार व्हिला जखमी असताना ह्याने गोल करुन आपल्या संघासाठी विजयश्री खेचुन आणली व देशाचा तब्बल ४४ वर्षांचा आंतरराष्ट्रीय चषकाचा दुष्काळ संपवला, असा हा "यदा यदा ही संघस्य, ग्लानिर्भवती मैदान ..." साठी धावुन येणारा आमचा लाडका "फर्नांडो टोरेस".
हवेतला खेळ करणार्यांमध्ये सर्वोत्कृष्ट, वेगवान आणि चापल्ययुक्त खेळाचा बादशहा, लाँग पासेस करेक्ट रीड करुन ते गोलमध्ये बदलण्याचे कौशल्य, काही खास ड्रिब्लिंग आणि स्प्रिंट स्कीलची खासियत, पेनल्टी स्पेशालिस्ट आणि परफेक्ट टीम प्लेयर असे टोरेसचे वर्णन करता येईल.
पण आमचा हा टोरेस शरिराने इतरांच्या जरासा नाजुक असल्याने बलदंड आणि धसमुसळा खेळ करणार्या बचावपटुंसमोर जरा बिचकतो, ह्याच बाबींमुळे ह्याच्या दुखापतींची संख्याही बरीच आहे, एवढीच एक चिंतेची बाब.
रेमंड त्यांच्या जाहिरातीत म्हणते ना "दी कंम्पिट मॅन ..." तसेच 'आन्द्रेयस इनियेस्टा'च्या बाबतीत म्हणतात " दी कंम्पिट फुटबॉलर ...".
फुटबॉल बॉलवर त्याचे प्रेम, त्याचा कंट्रोल वादातीत आहे. बासिलोना आणि स्पेनचा आघाडीचा फिडफिल्डर आणि "प्लेमेकर" अशी इनियेस्टाची थोडक्यात ओळख. कुठल्याही पोझिशनला खेळु शकणारा आणि संघाच्या कुठल्याही अपेक्षा पुर्ण करणारा हा त्या संघाचा मुख्य आधारस्तंभ. आघाडीच्या स्ट्रायकर्सना गोल करण्यासाठी बॉल देतादेता हा पठ्ठ्या स्वतः बॉल कधी जाळ्यात धाडतो हे प्रतिस्पर्धी संघाला कळतही नाही, पासिंगचा आव आणत क्षणार्धात पलटी मारुन लांबुन जोरदार फटक्याने बॉल जाळ्यात धाडणारा हा इनियेस्टा, पेनल्टी कॉर्नर घेणारा आणि बॉल करेक्त गोलपोस्टसमोर हळुवारपणे आणुन सोडण्याचे कौशल्य. फ्री-किकसाठी सर्वात भरोश्याचा खेळाडु.
एकदम लै भारी ड्रिब्लिंग कौशक्य, चपळता, बॉलचा अचुक अंदाज व त्यावर नजर, लहान-मोठ्ठे असे सर्वच पासेस अचुक देण्याचे व आघाडीशी योग्य समन्वय साधण्याचे कौशल्य.
अडचणीचे मुद्दे म्हणजे त्याचा फिटनेस, जरी त्याचा स्टॅमिना भयंकर असला तरी मध्यम चणीच्या शारिरयष्टीमुळे जखमी होण्याचा संभव जास्त असतो व त्याचा बिनधास्त भिडण्याचा स्वभाव ह्याची रिस्क जास्त वाढवतो. मॅन टु मॅन मार्किंगमध्ये ह्याला पॅक केल्यास हा मनाजोगता खेळ खेळु शकत नाही हा एक कच्चा दुवा.
झॅबी ओलेन्सो हा जगातल्या सर्वोत्तम मिडफिल्डर्सपैकी एक, झॅबी ओलेन्सो हा जगातल्या सर्वोत्तम 'प्ले मेकर्स'पैकी एक.
रियाल माद्रिदसारखा जायंट क्लबचा कप्तान, आघाडीचा मिडफिल्डर आणि प्लेमेकर असलेला झॅबी सध्या स्पेनच्या कप्तानीची धुरा संभाळत आहे. मिडफिल्डच्या केंद्रात खेळणारा झॅबी हा ४०-५० यार्डचे अचुक पासेस देण्यात माहिर आहे, तसेच बचावपटुंच्या गर्दीतुन योग्य वेळी आणि योग्य वेगातुन बॉल काढुन तो स्ट्रायकर्सकडे ढकलणे ही झॅबीची खासियस. इनियेस्टाप्रमाणे हा ही पेनल्टी स्पेशालिस्ट.
झॅबीच्या नावावर जास्त गोल नसले तरी त्याने असिस्ट केलेल्या आणि त्याने रचलेल्या चालीवर झालेल्या गोलांची संख्या ढीगाने आहे.
चेक / झेक फेब्रिगास ...
ज्याच्यासाठी आर्सनेल आणि बार्सिलोना ह्या २ दादा क्लबच्या सामान्य खेळाडुपासुन ते पार कॅप्टन आणि थेट मालकापर्यंत सगळ्यांनाच बोली लावायला लागली, असा हा महान योद्धा फॅब्रिगास.
अगदी लहान वयापासुन बार्सिलोनाच्या अॅकॅडमीमध्ये ट्रेनिंग घेऊन खेळाचे बारकावे शिकलेला व स्पॅनिश फुटबॉल अगदी कट टु कट आत्मसात केलेला फॅब्रिगास हा प्रत्येक क्लबचा व खुद्द स्पेनचा आवडता खेळाडु झाला ह्यात नवल ते काय ?
अप्रतिम पासिंग कौशल्य, प्रतिस्पर्ध्याच्या गोलक्षेत्रात बेधडक घुसण्याकडेचा आणि दणकेबाज शॉट्स मारण्याकडेचा कल ह्या त्याला एक उत्तम मिडफिल्डर बनवतात पण त्याबरोबर त्याचा बॉलचा अचुक अंदाज, सहकार्यांशी योग्य ताळमेळ, प्रत्येकाच्या स्टाईलनुसार त्याच्याशी जुळवुन घेऊन त्याला सपोर्टिंग खेळ करण्याचे कौशल्य ह्यामुळे फॅब्रिगास हा एक उत्तम 'प्ले मेकर' म्हणुन ओळखला जातो. २५-३० यार्डावरुन मारलेली फ्री-किक सर्वांना चुकवुन अचुक जाळ्यात धाडण्यात ह्याचा हातखंड.
अजुन एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे फुटबॉलमधला सर्वात सभ्य खेळाडु असा त्याचा लौकिक, सर्वात कमी बुकिंग्स आणि फाऊल त्याच्या नाववर आहेत.
जेव्हा प्रतिस्पर्ध्यांचे मिडफिल्डर्स किंवा स्ट्रायकर्स सर्वांना चुकवुन बॉल घेऊन स्पेनच्या गोलपोस्टपुढे धावत येतात त्यांना समोर दिसतो तो एक अवाढव्य शरिरयष्टी असलेला, अस्ताव्यस्त केस वाढलेला आणि दात-ओठ खाउन त्यांच्याकडे बेगुमान धावत येणारा एक राक्षस. झाले, त्यांचे निम्मे अवसान इथेच संपले व तो राक्षक त्यांच्याकडुन बॉल कधी काढुन घेतो किंवा त्याला घाबरुन हे त्याला बॉल कधी बहाल करतात हे त्यांनाही कळत नाही. तो राक्षस असतो ... पुयॉल.
पुयॉल म्हणजे स्पेनचा ( आणि बार्सिलोनाचाही ) सेंटर बॅक ह्या गोलचे रक्षण करणार्या बचावफळीचा मुख्य कणा.
पेनल्टीच्यावेळी आणि स्वतःच्या गोलच्या बचावावेळी हवेतला अप्रतिम खेळ हे पुयॉलचे वैशिष्ठ्य. प्रतिस्पर्ध्यांच्या मॅन टु मॅन मार्किंगमधला तज्ज्ञ. बेधडक टॅकल्स ( ज्यामुळे बहुतेकवेळा यलो / रेड कार्डाचा धनी ) , अप्रतिम क्लियरन्सेस, अगदी सहजतेने ६०-६० यार्डाच्या फ्री-किक्स आदी गोष्टी पुयॉलला जगातल्या सर्वश्रेष्ठ डिफेंडरमधला एक महत्वाचा असामी बनवतात.
ह्या सर्वांहुन अधिक म्हणजे पुयॉलचे नेतॄत्वगुण, सध्या तो बार्सिलोना ह्या क्लबचा सर्वात लोकप्रिय कर्णधार आहे.
स्वतःच्या संघासाठी "मिस्टर रिलायबल" असणारा पुयॉल हा प्रतिस्पर्ध्यांसाठी मात्र खुप धोकादायक आहे, त्याच्या एखाद्या खतरनाक टॅकलमुळे त्यांचा एखादा महत्वाचा खेळाडु जायबंदी होऊ शकतो ही शक्यता लक्षात घेऊनच त्यांना पुयॉलला सामोरे जावे लागते व त्यांचा निम्मा जोश तिथेच संपते हे पुयॉलचे यश.
जगातला सर्वात श्रेष्ठ फुल बॅक कोण ही चर्चा "सॅकिओ रॅमॉस'चे नाव त्या यादीत घेतल्याशिवाय पुर्ण होऊच शकत नाही. आधी होल्डिंग मिडफिल्ड किंवा सेंटर बॅकला खेळणारा रॅमॉस हळुहळु कधी साईडहुन खेळायला लागला, कधी आपल्या पोझिशनपासुन ते पार प्रतिस्पर्ध्यांच्या गोलक्षेत्रापर्यंत धुमाकुळ घालु लागला व स्ट्रायकर्सना क्रॉस देऊ लागला व स्वतः डिफेंडर असुनही गोलांची बरसात करु लागला हे सगळे आश्चर्यच आहे. आजही तो कोणत्याही पोझिशनला आरामात खेळु शकतो.
आज तो रियाल माद्रिदसारख्या दादा क्लबचा प्रमुख साइडबॅक म्हणुन अभिमानाने आपले बिरुद मिरवतो.
छोट्या चणीची शरिरयष्टी असलेला रॅमॉस अत्यंत चपळाईने हालचाली व ड्र्ब्लिंगसाठी प्रसिद्ध आहे. अक्षरशः १०-१० फुट घसरत मारलेल्या त्याच्या स्लायडिंग टॅकल्स आणि त्यानंतर चपळाईने घेतलेला बॉलचा ताबा हे सगळेच पाहण्यालायक.
रॅमॉस म्हणजे चपळाई, रॅमॉस म्हणजे अॅथलिट्ससारखे कौशल्य व हवेत उड्या. ह्यामुळेच रॅमॉसला आवरायला प्रतिस्पर्ध्यांना एखाद्या पेनल्टीच्या वेळी ३-३ लोक त्याच्यामागे लावायला लागतात.
ह्याशिवाय त्याचा अप्रतिम स्टॅमिना व फिटनेस ह्या गोष्टी संघाच्या प्रशिक्षकासाठी 'आपल्या टीमचा साईड बॅक कोण?' हा प्रश्न एका फटक्यात सोडवतात.
मात्र पुयॉलप्रमाणेच अत्यंत दांडगाई व धसमुसळा खेळ करणारा रॅमॉस कधीही कार्ड घेऊन मैदानाबाहेर जाऊन आपल्या संघाची डोकेदुखी वाढवु शकतो.
_______
______
इकर कॅसिलास, व्हिक्टर वाल्देस आणि पेपे रैना .... गोलसमोरच्या अभेद्य तटबंद्या !
'देवाला मागतो एक डोळा व देव देतो ३ डोळे' अशी गत स्पेनबाबत 'गोलकिपर' ह्या पोझिशनसाठी आहे. अंतिम ११ मध्ये केवळ १ गोलकिपर हवा असताना ह्यांच्याकडे ह्याचे ३ मजबुत दावेदार आहेत.
तिघेच्या तिघे सर्वोत्तम आहेत. त्यातल्या त्यात कॅसिलास व वाल्देस हे तर पहिल्या ३ मध्ये येतात.
ह्यांच्याबद्दल अधिक काही लिहण्याची गरज नाही, प्रतिस्पर्ध्यांनी त्यांच्या त्यांच्या क्लबविरुद्ध अथवा फ्रान्सविरुद्ध मारलेल्या गोलांची "बोटावर मोजण्याइतकी संख्या" हाच त्यांच्या कामगिरीचा एक उत्तम दाखला आहे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
स्पेनची ताकद :
स्पेनचा संघ हा जगातल्या सर्वोत्तम स्ट्रायकर्स, सर्वोत्तम मिडफिल्डर्स, सर्वोत्तम डिफेंडर्स आणि सर्वोत्तम गोलरक्षक ह्यांनी बनलेला आहेत ह्यात वाद नाही.
त्यामुळे ह्या प्लेयिंग ११ मधल्या कोणाही ३-४ जणांची जादु चालली तरी विजयश्री कठिण नाही.
स्पेनच्या टीममध्ये आपापल्या दादा क्लबचे नेतॄत्व करणारे पुयॉल, फॅब्रिगास, कॅसिलास, ओलेन्सो सारखे भरपुर अनुभव असलेले दिग्गज खेळत असल्याने अनुभवाची कमी नाही.
बहुतेक सर्व खेळाडुंपैकी बरेच जण सध्या एकाच क्लबमधुन खेळत असल्याने ताळमेळाची समस्या जास्त भेडसावणार नाही.
सध्या प्रचंड फॉर्मात असलेले टोरेस आणि व्हिलासारख्या खेळाडुंनी इथेही आपला जलवा दाखवला तर त्यांना रोखणे ही प्रत्येक टीमची डोकेदुखी असु शकते.
डिफेंडर्स लाईनमध्ये पिके-पुयॉल आणि अल्बालियो-रॅमॉस सारख्या जोड्या एकाच क्लबखाली खेळल्या असल्याने त्यांच्याच उत्तम समन्वय आहे व त्यामुळे ही बचावफळी भेदणे हे खरेच जिकरीचे काम आहे.
स्पेनचे कच्चे दुवे :
सध्या त्यांच्यासमोर असलेला सर्वात मोठ्ठा प्रोब्लेम म्हणजे खेळाडुंची तंदुरुस्ती.
मेन प्लेमेकर इनियेस्टा अजुनही १००% फिट नाही, टोरेस आत्ता कुठे दुखापतीतुन सावरला आहे व त्यामुळे सुरवातीला जरा जपुनच खेळेल असा अंदाज आहे.
सर्वात मोठ्ठे चॅलेंज म्हणजे इथे "टीम ऑफ चॅम्पियन्स" ला एकसंध अशा "चॅम्पियन टीम" म्हणुन खेळावे लागेल.
अपेक्षांचे ओझे, स्पेनची टीम आत्तापर्यंत सर्वोत्तम असल्याने अपेक्षांचे प्रचंड ओझे आहे, ह्या टीमवर भरपुर पैसाही लागला आहे.
विश्वचषकाच्या परंपरेनुसार "काही टॉप कन्टेडर्स सुरवातीलाच बाहेर पडतात" हे सत्य असल्याने आपल्या अति-आत्मविश्वासात हे स्पेनबाबत घडु न देण्याची काळजी ह्यांना घ्यावी लागेल.
बाकी सर्व उत्तम ... !!!
आमचा अंदाज :
सर्वच घोडे विनमध्ये आले आणि चाली बरोबर रचल्या गेल्या तर ह्यावेळचा विश्वविजेता नक्कीच "स्पेन" असेल. ह्यांच्यासाठी ड्रॉ ही तसा फार कठिण नाही.
तरीही वर्स्ट केसमध्ये अंतिम फेरी किंवा उपांत्य सामना नक्कीच अवघड नाही, ते आरामात इथपर्यंत जातील.
प्रतिक्रिया
15 Jun 2010 - 8:50 pm | गणपा
मस्त ओळख परेड रे डॉन्या. :)
15 Jun 2010 - 8:55 pm | चतुरंग
रांगडे खेळाडू आणि तितकाच रांगडा पण डोळ्याचे पारणे फेडणारा खेळ! मस्तच ओळख रे डॉन्या! :)
चतुरंग
15 Jun 2010 - 8:55 pm | मेघवेडा
वाक्यावाक्याशी सहमत रे डान्या! लेखाकरिता वाट पाहायला लावलीस, पण पण वर्थ इट! सुरेख ओळख! खंदा जर्मन सपोर्टर असूनही सेमीफायनलला कुणाला सपोर्ट करू असा प्रश्न माझ्या मनात उभा राहिलाय! (अर्थात जर्मनी-स्पेन अशीच सेमीफायनल होणार हे माझं मत आहे. कुणाला आक्षेप असल्यास व्यनि करावा. खासकरून प्रभ्या! ;) ) बाकी व्हिया आणि टोरेस खासच!
>> तरीही वर्स्ट केसमध्ये अंतिम फेरी किंवा उपांत्य सामना नक्कीच अवघड नाही, ते आरामात इथपर्यंत जातील.
उपांत्य फेरी नक्की! ;)
15 Jun 2010 - 9:10 pm | प्रभो
इथे लिहील्या प्रमाणे माझा मेन सपोर्ट स्पेनलाच आहे... :)
मग इंग्लंड (जेरार्ड कप्तान आहे म्हणून)....
आमच्या आवडत्या टोरेसने म्ह्टल्याप्रमाणे प्रमाणे स्पेन-इंग्लंड अशी सेमीफायनल -फायनल झाली तर प्रत्येकाला एक एक इक्लेयर वाटेन(तूम भी क्या याद करोगे... :) ).
मन इंग्लंड म्हणत असलं तरी डोकं म्हणतंय..अर्जेंटीना....अर्जेंटीना....अर्जेंटीना
15 Jun 2010 - 9:15 pm | मेघवेडा
मेल्या सगळाच गोंधळ आहे ल्येका तुझा.. स्पेन की इंग्लंड की अर्जेंटीना नक्की एक काय ते ठरव! :W
आणि झालीच तर स्पेन-इंग्लंड सेमीफायनल होईल पण त्याकरिता त्यांना राऊंड ऑफ १६ क्वालीफाय झालेच तर! ;) मध्ये जर्मनीला हरवावं लागेल! म्हणजे खरं तर इंग्लंड L) ब्लेम रॉब ग्रीन!!
15 Jun 2010 - 9:18 pm | प्रभो
आपला सगळ्यांना सपोर्ट आहे...जपानला पण... इंग्लंडच्या धाग्यावर म्हटल्याप्रमाणे सगळेच दावेदार हायेत हो.. ;)
जो चांगलं खेळून जिंकेल आपला त्याला सपोर्ट....बास....
15 Jun 2010 - 9:22 pm | छोटा डॉन
घातलं का शेपुट प्रभ्या ?
असा कसा लेका तु इंग्लंडचा सपोर्टर बे ?
म्हण की लेका छातीठोकपणे इंग्लंडच जाईल फायनलला आणि मारेल कप, होईल न होईल तो भाग वेगळा, निदान तुला बिनधास्त बोलायला काय हरकत आहे ?
------
(स्पेन सपोर्टर)छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
15 Jun 2010 - 9:28 pm | प्रभो
डाण्राव, मी सुंदर फुटबॉल सपोर्ट करतो....मग तिथे मेव्याची चारकोप युनायटेड ची टीक जिंकली तरी बेहत्तर.....
15 Jun 2010 - 9:35 pm | मेघवेडा
चारकोप युनायटेड जिंदाबाद! फायनलची एक बर्थ ऑलरेडी बुक्ड आहे राव!!
=)) =)) =))
साला प्रभ्या वस्ताद आहे! अभ्यास जोरात चाल्लाय मेल्याचा! ;)
15 Jun 2010 - 9:38 pm | छोटा डॉन
हे पहा उगाच ते हुंबपणा करुन "युनायटेड" वगैरे भुक्कड टीम्सची नावे मधी आणु नका.
आम्हाला शेवटी ह्यात "चेल्सी"ला उतरवावे लागेल व ते एकेकाला लै महागात पडेल ;)
------
(चेल्सीप्रेमी)छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
15 Jun 2010 - 9:44 pm | मेघवेडा
डॉन्या जबान संभालके.. च्याम्मायला ह्ये काय 'त्ये' युनायटेड नाय.. 'चारकोप युनायटेड' तुला म्हायत नाय.. ;)
बाकी चेल्सीवर तुझ्याइतकाच माझाही जीव आहे हे ठाऊक नाही वाट्टं तुला! आँ? :?
15 Jun 2010 - 9:48 pm | प्रभो
ए गपा रे.....तो गोष्टीतला बेडूक जसा डबक्यातून कधीच बाहेर येत नाय तसं नका करू....
विश्वचषक चालूय ...अन क्लबांच्या गोष्टी काय करता...... :P
16 Jun 2010 - 8:16 pm | निखिल देशपांडे
अरे काय लावलयं..
त्या ईटली काही चॅन्स्च नाही का???
निखिल
================================
करा चर्चा दुज्यांच्या पातकांची, स्वतःला तेवढे गाळून बोला!!!!
15 Jun 2010 - 9:23 pm | गणपा
आमच्या जर्मणीला हरवणार :W वाट पहा.
उपांत्य सामणा : जर्मणी विरुद्ध स्पेन
15 Jun 2010 - 9:25 pm | प्रभो
मालक, तुमच्या त्या सुक्कं मटणच्या हँगओव्हर मधून आधी बाहेर या....वरंचं वाचा की...आणी सपोर्ट करून काय करता लेकहो...सेमीफायनल...आआक्कथू ...पच्च्चअच्याक....फायनल पर्यंत करा की सपोर्ट...
जो चांगलं खेळून जिंकेल आपला त्याला सपोर्ट मग ती तुमची जर्मनी असो नाय तर तुमचाच नायजेरिया...
15 Jun 2010 - 9:28 pm | गणपा
दलबदलु
15 Jun 2010 - 9:38 pm | मेघवेडा
ए भाव सपोर्ट आहेच फायनलपर्यंत.. त्यात काय वादच नाय.. पण 'जर्मनी वि स्पेन असा उपांत्य फेरीचा सामना होणार' म्हणण्यामागचं कारण असं की इंग्लंड इज L)
हो की नाही रे गणपाभौ? आणि अरे ग्रुप स्टेजलाच 'हरि हरि' होणारेय त्यांचं!! =))
15 Jun 2010 - 9:53 pm | गणपा
आक्षी, तुझ नाव बदलुन मनकवडा कर रे तु.
या प्रभ्याला सगळ चमच्याने फिडिंग कराव लाग्त या.
15 Jun 2010 - 10:14 pm | मेघवेडा
>> या प्रभ्याला सगळ चमच्याने फिडिंग कराव लाग्त या.
'इंग्लंड'चा सपोर्टर आहे नं तो.. म्हणून :P
15 Jun 2010 - 10:04 pm | टारझन
च्यायला , हा डाण्या प्रभ्या आणि मेव्या अगदी एकेका क्लबाचे ओनर्स भांडावेत तसे भांडत असतात , आत्ता पर्यंत फुटबॉलचे जेवढे पण लेख वाचले , ते त्या त्या देशाला डेडिकेटेड केले होते , तेच जिंकणार असं ग्रुहीत धरुन लिहीलेले ..
बाकी आमचे जेरार्ड आणि क्रिस्तियानो रोणाल्डो ... एवढेच आमचे आवडते खेळाडु .. झिनेदिन झिदान होते ते डोक्यात गुढगा असल्याने लाष्ट टायमाचा वल्डकप गमावुन बसले , ते देखील आमचे लाडके होते ;)
अवांतर : तो फुटबॉल आधी मैथुनचा आग्रह धरणारा जाउळ कट मारणारा रोणाल्डो कुठंय हल्ली ? ;) काका सुद्धा दिसत नाही !!
15 Jun 2010 - 10:15 pm | छोटा डॉन
>>हा डाण्या प्रभ्या आणि मेव्या अगदी एकेका क्लबाचे ओनर्स भांडावेत तसे भांडत असतात ,
खरं आहे.
कुठल्याही फालतु गोष्टीवर भांडण्यापेक्षा आपली शक्ती ह्यावर भांडण्यात खर्च केलेली उत्तम असे आम्हाला वाटते म्हणुन आम्ही क्लब ओनर्सच्या वरचढ भांडतो ;)
पुढेमागे एखादा क्लब विकत घेऊ तेव्हा प्रॅक्टिस कमी पडायला नको ना ;)
>>आत्ता पर्यंत फुटबॉलचे जेवढे पण लेख वाचले , ते त्या त्या देशाला डेडिकेटेड केले होते , तेच जिंकणार असं ग्रुहीत धरुन लिहीलेले ..
-१
( इथं खरे तर "प्रचंड गल्लत होते आहे" असा टिपीकल डॉनछाप प्रतिसाद पाडायला हवा ;) पण असो )
आम्ही फक्त देशांच्या ओळखी करुन देत आहोत व त्यांच्यात असलेले टॅलेंट इथे मांडण्याच प्रयत्न करत आहोत, बाकी प्रत्येक टीम जिंकण्यासारखेच खेळते हे खरे असल्याने प्रत्येकजण दावेदार असायला हरकत नाही.
बाकी आमच्या मागे आलेल्या एका लेखातले "आम्ही मॅच फिक्सिंग करत नसल्याने जिंकण्याची कसलीच गॅरेंटी देता येणार नाही" हे वाक्य आपल्याला आठवत असेलच. :)
अवांतर : आम्ही आमच्या फ्रान्सच्या लेखात ती टीम कप जिंकेल असे अजिबात लिहले नाही, स्पेनबद्दल लिहले कारण त्यांच्यात ती कपॅबिलिटी आहे, बाकी जे होईल ते होईल. आम्ही प्रामाणिकपणे आमचे काम करतो आहे.
>>बाकी आमचे जेरार्ड आणि क्रिस्तियानो रोणाल्डो ... एवढेच आमचे आवडते खेळाडु.
बेश्ट, रोनाल्डो आम्हालाही आवडतो.
पण आज त्याचा ड्रोग्बाच्या आयव्हरी कोस्टाने पार "घामटा" काढला, असो.
>>अवांतर : तो फुटबॉल आधी मैथुनचा आग्रह धरणारा जाउळ कट मारणारा रोणाल्डो कुठंय हल्ली ?
ते गेला चपला घालुन निघुन.
सध्या त्याचा वारसदार "टेरी" आहे असे म्हणतात ;)
>>Wink काका सुद्धा दिसत नाही !!
कोण काका ?
ब्राझिलचा म्हणत असशील तर त्यांची मॅच अजुन व्हायची आहे म्हणुन दिसला नसेल कदाचित. :)
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
15 Jun 2010 - 10:19 pm | मेघवेडा
टार्याच्या प्रतिसादास उत्तर देणारच होतो पण डॉनराव लिहत असतील या विचाराने थांबलो. अतिशय योग्य निर्णय! :)
15 Jun 2010 - 11:12 pm | टारझन
आपल्यासारख्या राजकिय व्यक्तिच्या बोटातुन अशी सरसकट भाषा शोभत नाही. आहो "फालतु गोष्टी" ची व्याख्या व्यक्तिसापेक्ष , त्या धम्याला क्रिकेट फालतु वाट्टे , आंद्याला फुटबॉल फालतु वाटु शकेल , काही जणांना "टार्याचेच्च" लेख फालतु वाटतात ... तेंव्हा .. हॅहॅहॅ
प्लिज .. पाडा पाडा, आपल्या प्रतिसादाचे मुल्यही आहे आणि किंमतही आहे ;)
होतं .. होतं असं कधी कधी :)
च्यायला , काय सांगता काय ? मालक काही बोलले का ब्राझिल चे ?
असो :) फुटबॉल आधनं मधनं पाहतो .. त्यामुळं आमचं ज्ञान लिमीटेड
15 Jun 2010 - 10:46 pm | बिपिन कार्यकर्ते
सुंदर ओळख. छायाचित्रांमुळे अजून मजा येते आहे.
बिपिन कार्यकर्ते
16 Jun 2010 - 1:13 am | ब्रिटिश टिंग्या
१/तळटीप : डानरावांनी जीटॉकवर लेख वाचावा असा आग्रह केल्याने प्रतिसाद देत आहे!
डान्या लेख मस्त आहे.....सब्र का फळ गोड रहा!
आमचे भाकीत -
उपांत्य सामना १ : जर्मनी वि. स्पेन
उपांत्य सामना २ : ब्राझील वि अर्जेंटीना/इंग्लंड (ग्रीनला डच्चु मिळाल्यास)
अंतिम सामना : ब्राझील वि. स्पेन
16 Jun 2010 - 2:23 am | मेघवेडा
टिंगोजीराव ब्राझील वि. इंग्लंड असा उपांत्य सामना होण्यासाठी इंग्लंडला ग्रुप टॉप करावा लागेल. म्हणजे इंग्लंड ग्रुप टॉप करणार हाही तुमच्या भाकीताचाच एक भाग आहे का? :?
कठीण आहे राव..
16 Jun 2010 - 10:40 am | ऋषिकेश
स्पेन विजेता असेल या कयासाला पूर्ण अणुमोदन!
बाकी इतर कोणत्याही टिमांची सेमी फायनल असूदे.. फायनल विजेता स्पेनच!
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
16 Jun 2010 - 12:23 pm | चेतन
स्पेन हा आमचाही आवडता संघ.
स्पेन विजेता असेल हा आमचा ही कयास..
चेतन
अवांतरः Xavier Hernandez Creus हा आमचा अजुन एक आवडता खेळाडु .. त्याचा फोटो आणि माहिती न लिहल्याबद्द्ल डॉन रावांचा निषेध
16 Jun 2010 - 12:28 pm | छोटा डॉन
>>अवांतरः Xavier Hernandez Creus हा आमचा अजुन एक आवडता खेळाडु .. त्याचा फोटो आणि माहिती न लिहल्याबद्द्ल डॉन रावांचा निषेध
क्षमा असावी मालक !
झॅवी आमचाही आवडता मिडफिल्डर आहे, पण लेखनभयास्तव ( आणि त्याला टरकुन पब्लिक लेख उघडणार नाही ह्या भितीने ) मी त्याचे, जेरार्ड पिके, राऊल अल्बालियो, पेड्रो ऱोड्रिग्झ ह्यांची माहिती टाळली ...
पुढे एखाद्या प्रतिसादात ती ही द्यायचा प्रयत्न करीन.
तुर्तास ती इथे नसल्याबद्दल "क्षमस्व" असे म्हणतो.
------
(दिलगीर)छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
16 Jun 2010 - 1:04 pm | चेतन
वायदेआझम जरुर लिहा वाट बघतोय....
अवांतरः शॅबी हर्नाडेझ का झॅवी हर्नाडेझ...?
अतिअवांतरः तुम्ही काहिही म्हणा मी झॅवीच म्हणणार.. ;)
16 Jun 2010 - 9:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डान्या लेका, लेख वाचून आज स्पेन वि. स्वितझर्लंड चा खेळ पाहिला.
स्पेन आक्रमक होता पण गोल करता आला नाही. स्वितझर्लंड भारी पडला ना...!
-दिलीप बिरुटे
16 Jun 2010 - 10:01 pm | गणपा
या प्रतिसादाचा केवळ आणि केवळ उद्देश डॉन्याला डिवचणे हाच आहे ;)

(मागे चेल्सी विरोधकांनी त्यास डिवचले होते आणि शेवटी चेल्सीनेच बाजी मारली. समझने वालोंको इशारा काफी है काय डॉण्या)
16 Jun 2010 - 10:03 pm | मेघवेडा
गणपा.. दिवाळी रोज रोज नही आती हय! =))
16 Jun 2010 - 10:22 pm | छोटा डॉन
आजचा स्पेनचा अनपेक्षित आणि धक्कादायक असा स्विसकडुनचा १-० असा पराभव आम्ही "पहिला डाव भुताला ..." म्हणुन सोडुन दिला आहे.
स्पेन मॅच हरली हे जरी सत्य असले तरी संपुर्ण मॅचमध्ये स्पेनने एकदम जोरदार आणि दणकेबाज खेळ केला, अर्थात त्यांना गोल करण्यात अपयश आले व त्यांचा पराभव झाला हे सत्य आहे.
सामन्याच्या एकुण वेळामधले तब्बल ७४% वेळ एवढा ताबा स्पेनकडे होता, असे फार कमीवेळा घडते, तब्बल २५ शॉट्स आणि त्यातले ५ तर डायरेक्ट गोलवर व त्याचा सेव्ह, प्रतिस्पर्ध्यांची तब्बल ४ "यलो कार्ड्स" वगैरे बाबी आजच्या सामन्यामधले स्पेनचे डॉमिनेशन सांगण्यास पुरेश्या आहेत.
आज स्पेन केवळ एका स्ट्रायकरसह खेळणार हे आधीच समजले होते व त्यानुसार स्पेन आज ४-५-१ ( ४-१-४-१ ) ह्या रचनेत मैदानात उतरली, त्यांचा प्रमुख स्ट्रायकर डेव्हिड व्हिला पुर्वार्धात जरी काही अप्रतिम खेळ खेळुन गेला तरी उत्तरार्धात त्याचा अजिबात प्रभाव पडला नाही, समोर येणार्या संधी गोलमध्ये बदलायला किंवा कमीत कमी ती संधी दुसर्या सहकार्याकडे पास करण्यात तो बर्यापैकी आज अपयशी ठरला.
फुलबॅक 'सॅकिओ रॅमॉस'चा खेळ आज नेहमीप्रमाणे उत्तम होता, त्याने गोलक्षेत्रात अनेक धडका मारल्या, काही चान्सेसही मस्त तयार केले होते पण ते गोलमध्ये बदलण्यात स्पेनला अपयश आले.
डिफेंडर पुयॉल आणि पिके आज चांगलेच खेळले, १-२ अपवाद वगळता त्यांनी स्विस खेळाडुंना आपल्या गोलक्षेत्राकडे फिरकुसुद्धा दिले नाही, शेवटच्या काही मिनिटात ह्या जोडगोळीनेही स्विस गोलक्षेत्रात धडका मारुन गोल मारण्याचा अटोकाट प्रयत्न केला.
इनियेस्टा, झॅवी आणि शॅबी ओलेन्सो उत्तम, त्यांचे काही शॉट्स आणि पासेस उत्तम होते. शॅबीचा एक गोलपोस्टला धडकुन परत आलेला बॉल हा त्याच्या आजच्या वाईट नशिबाचा भाग होता.
स्विस खेळाडुंचा डिफेन्स आज लै भारी होता, अनेकवेळा त्यांना स्पेनच्या तोंडाशी आलेला घास अलगदपणे काढुन घेतला. गोली डियेगोचा बचाव अप्रतिमच.
गेल्सन फर्नांडिस आज स्विसचा हिरो ठरला, अगदीच कमी वेळा मिळणार्या चान्समधला एक चान्स त्याने आज गोलमध्ये बदलुन दाखवला.
फुटबॉल म्हणजे चान्सेस घेणे आणि ते गोलमध्ये बदलुन दाखवणे, ते आज स्विस फर्नांडिसला करेक्ट जमले.
डिफेन्सबद्दल अजुन सांगायचे म्हणजे त्यांचा डिफेन्स एवढा जीव तोडुन होता की तो करताना त्यांनी तब्बल ४ यलो कार्डे मिळवली. ;)
टोरेसला खुप उशीरा मैदानात उतरवले आणि फॅब्रिगास बेंचवरच होता ह्या गोष्टीही स्पेनला महागात पडल्या.
सामन्याच्या शेवटी इनियेस्ताला झालेली दुखापत जास्त महागात पडु नये हीच अपेक्षा.
बदली आलेल्या "झिझस नवास"चा खेळ फारच सुरेख होता, पुढच्या वेळी तो डेव्हिड सिल्व्हाला बसवुन अंतिम ११ मध्ये आल्यास आश्चर्य नको.
सामन्यातील एक मजेशीर घटना :
स्विस डिफेंडर "सॅन्ड्रोस फिलीप" ह्याने गडबडीत आपल्याच संघाच्या अजुन एका डिफेंडरला टॅकल करुन पाडले.
त्यानंतर काही मिनिटातच स्विस कोचने फिलीपला 'सन्मानाने' मैदानाबाहेर बोलावुन त्याच्या जागी दुसरा डिफेंडर पाठवला.
फिलीपची ही विश्चषकातील शेवटची मॅच ठरु नये हीच अपेक्षा ;)
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
16 Jun 2010 - 11:11 pm | ब्रिटिश टिंग्या
या विश्वचषकातला पहिला धक्कादायक निकाल!
दरवेळेस एखाद-दुसरा मानांकित संघ पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळतो..... यंदा ही वेळ स्पेनवर येउ नये हीच इच्छा.....(नाहीतर जर्मनीचा अंतिम फेरीचा मार्ग निर्धोक होईल)
- टिंग्या नवास!
16 Jun 2010 - 11:14 pm | प्रभो
>>- टिंग्या नवास!
टिंग्या तू नवसाचा का रे???? ;)
17 Jun 2010 - 3:40 am | Nile
स्पेन हगलं!
=)) =)) =))
तुम्ही डाव भुताला सोडा नायतर काय बी करा. आज पर्यंतचा एकही वर्ल्ड कप विनर सुरुवातीची मॅच हरला नाही हे माहित असुद्या म्हंजे झालं.
-Nile
17 Jun 2010 - 9:14 am | छोटा डॉन
>>आज पर्यंतचा एकही वर्ल्ड कप विनर सुरुवातीची मॅच हरला नाही हे माहित असुद्या म्हंजे झालं.
असे विक्रम हे मोडण्यासाठीच असतात आणि आकडेवारी ही पुन्हा अद्ययावत करण्यासाठीच असतात.
बाकी स्पेन हा आकडेवारीचे पालन करणारा नव्हे तर स्वतः आकडेवारी घडवणारा देश आहे ... ;)
बाकी अजुन एक माहिती असु द्या, डॉन्या ज्या टीमला सपोर्ट करतो ती टीम "फायनल विनर" असते, बाकी असो.
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
17 Jun 2010 - 12:31 pm | Nile
हॅ हॅ हॅ, ते बघुच. पण पहिल्या गेम मध्ये हगले हे सत्य आहे का नाय! ;)
-Nile
17 Jun 2010 - 1:00 pm | छोटा डॉन
स्पेनने पहिल्या गेममध्ये चांगले खेळुनपण एंड रिझल्टमध्ये घाण केली हे मान्य.
तुमच्या म्हणण्यानुसार 'स्पेन पहिल्या सामन्यात हागली' हे ही मान्य.
ओके ?
पण पुढे चांगले खेळतील असा विश्वास आहे.
------
छोटा डॉन
आजवर ज्यांची वाहिली पालखी, भलताच त्यांचा देव होता !
उजळावा दिवा म्हणुनिया किती , मुक्या बिचार्या जळती वाती !
17 Jun 2010 - 7:29 am | सहज
लेख व प्रतिसाद दोन्ही वाचायला मजा आली.
26 Jun 2010 - 12:38 am | ब्रिटिश टिंग्या
डेविड विलाने कसला अफलातुन गोल मारलाय! :)
चिलीच्या गोलरक्षकाला अतिउत्साह नडला!
आज चुकुन मेघवेडाच चिलीचा गोलकीपर म्हणुन खेळतोय की काय अशी शंका आली :)
26 Jun 2010 - 12:41 am | ब्रिटिश टिंग्या
प्रतिक्रिया प्रकाशित होईपर्यंत इनियेस्टाने अजुन १ गोल केला.... हुर्रे! :)
बाकी आमचा टोरेस नाटकं करण्यात मात्र पटाईत हां! :)
26 Jun 2010 - 12:54 am | छोटा डॉन
>>आज चुकुन मेघवेडाच चिलीचा गोलकीपर म्हणुन खेळतोय की काय अशी शंका आली
हा हा हा, खरे आहे.
पण काय रे टिंग्या, आज त्या मार्कोस का कोण आहे त्याला रेड कार्ड का दाखवले व गणपा का बाहेर गेला ?
------
छोटा डॉन
26 Jun 2010 - 1:02 am | प्रभो
no offense to David Villa, पण एवढे वर्ष फुटबॉल खेळल्यावर कोणीही रिकाम्या गोल वर गोल मारेल... त्या गोलचा खरा हिरो अलोन्झो....माझ्या मते....
26 Jun 2010 - 1:06 am | ब्रिटिश टिंग्या
चिली इज बॅक!
26 Jun 2010 - 1:52 am | ब्रिटिश टिंग्या
जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम् जीतम्
26 Jun 2010 - 2:27 am | मेघवेडा
लोल... टिंग्या कालचा तुझा प्रतिसाद आठवतोय का? का देऊ लिंक? :B
आणि हो तिज्यायला मीच खेळत होतो चिलीचा गोलकीपर म्हणून.. स्पेन इतक्यातच बाहेर पडलेली बघवलं नसतं म्हणून थोडी मदत करायला.. गेलो धावत पुढे.. :D
बाकी प्रभ्याशी सहमत! :)
26 Jun 2010 - 8:08 am | ऋषिकेश
सांगितलं होतं.. फुदकु नका.. :P
पहिला डाव भुताला सोडला होता..
आता तसंही एकतर इंग्लंड नाहितर जर्मनी एकच रहाणार आहे.. मात्र स्पेन, ब्राझिलला न भिडता पुढे जाईल!!! आता ब्राझिलशी भेट बहुदा क्वार्टर-फायनलला
ऋषिकेश
------------------
कोणीही जाहिरातीसाठी संपर्क न साधल्याने मीच माझ्या काहि आवडत्या ब्लॉग्सची जाहिरात करत आहे.
या आठवड्याचा ब्लॉग: मराठी साहित्य, लेखकः नंदन