unicorn घोडा...

अभिषेक९'s picture
अभिषेक९ in जनातलं, मनातलं
11 Jun 2010 - 11:47 pm

परवा औंध कडून डांगे चौकाकडे unicorn गाडीवर येत होतो. रस्ता पण साफ होता, नवीन गाडी, त्यामुळे ६०-७० च्या वेगाने मस्त गाडी चालवत होतो. पण रक्षक चौकात लाल सिग्नल आडवा आला आणि जरा हिरमोडच झाला. गाडीचे break दाबून गाडी रस्त्याच्या डाव्या बाजूला थांबवली. फारसी वर्दळ नव्हती त्यामुळे मोजून ५-१० गाड्या सिग्नलवर थांबल्या होत्या. सिग्नल मोठा असल्यामुळे मी गाडी बंद करून इकडे तिकडे बघत होतो. अचानक मागून टप टप असा आवाज आला. घोड्याच्या टापांचा आवाज असल्यासारखा वाटत होता. आणि खरच तो तोच आवाज होता. मी मागे वळून बघितले. एक पंधरा शुभ्र घोडा अगदी रुबाबदारपणे एकेक टाप टाकत येत होता. घोडेस्वार एक १६-१७ वर्षाचा मुलगा होता. सिग्नल लालच होता, त्यामुळे त्याने लगाम आवळली आणि घोडा बरोबर पांढऱ्या रेषेच्या मागे थांबला. अगदी माझ्या बाजूलाच. लाल सिग्नल, मी unicorn वर, बाजूला घोडा, असे एक विलक्षण चित्र होते. मला फार भारी वाटले. माणसांसाठी केलेले नियम प्राण्याने पण अचूक पाळावेत. जरा विचित्रच आहे!! timer १० सेकंदाच्या आत आले, मी गाडी चालू केली आणि घोडा काय करतो याकडे बघत बसलो. सिग्नल हिरवा झालं की घोडेस्वाराने टाच मारली, घोड्याला सिग्नल मिळाला. त्याने पवित्र घेतला आणि ऐटीत पांढरी रेघ ओलांडली. मी हे दृश्य बघत जरा वेळ तसाच होतो. मागच्या हॉर्नने भानावर आलो. गिअर टाकला आणि घोड्याला 'take over ' करून माझ्या वाटेकडे मार्गस्थ झालो.

प्रवासविरंगुळा

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

11 Jun 2010 - 11:57 pm | अभिज्ञ

हा हा हा.
मस्त अनुभव.

अवांतर :मी स्वतः सिग्नल चालु असताना पेडेस्ट्रीयन क्रॉसिंगच्या बरोबर आधीच गाडी थांबवतो. तो पर्यंत बरोबरचे लोक पार चौकाच्या मध्यभागाजवळ पोहोचलेले असतात. अन मागचे पुढे सरका म्हणून कोकलत असतात. अन वाईट म्हणजे इथल्या पोलिसांना देखील त्याचे काहि वाटत नाही.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
स्वतःला नुसतेच "शहाणे" समजण्यापेक्षा "शहाण्यासारखे" वागणे कधीहि जास्त महत्वाचे. :)

शानबा५१२'s picture

12 Jun 2010 - 12:01 am | शानबा५१२

एक पंधरा शुभ्र घोडा

- नक्की कीती होते घोडे???

खुपच अतरंगी लेख आहे.................

माणसांसाठी केलेले नियम प्राण्याने पण अचूक पाळावेत. जरा विचित्रच आहे!

- तो नियम अप्रक्षरीत्या मानवानेच पाळला,घोडा फक्त निमित्त.

टारझन's picture

12 Jun 2010 - 11:43 am | टारझन

तो नियम अप्रक्षरीत्या मानवानेच पाळला,घोडा फक्त निमित्त.

ही नविन रित पाहुन डोळे पाणावले :)

शिल्पा ब's picture

12 Jun 2010 - 12:55 am | शिल्पा ब

अतिशय निरीक्षक प्रतिक्रिया आल्याचे पाहून मन भरून आले... आणि घोडा कसे काय नियम पाळेल? त्याच्यावर बसलेला माणूसच नियम पाळणार , हो कि नाही? लेखकसाब आप एकदम properly क्यू नाही लिखते हो ? नाहीतर हम को कैसे समझेगा ? आणि पंधरा का पांढरा ? घात करणारी ५१२ memory आहे बा तुमची..

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/

योगायोग गमतीदार आहे.. ही कथा काल्पनिक असावी :)

त्या पांढर्‍या घोड्याला Horn नसेल ना?

शानबा५१२'s picture

12 Jun 2010 - 2:33 am | शानबा५१२

लेखक फार भन्नाट कल्पना शक्तीचे असावेत्,त्यांणा लहान गोष्टीत ही बरेच काही दीसल.............छान!!

त्या पांढर्‍या घोड्याला Horn नसेल ना?

होता ना होर्न.........फक्त दाबायचा कधी व कुठे ते माहीती हव =)) =))
अहो म्हण्जे हत्तीला कस टोचन देतात ना तस.........हाताने अंगाचा एखादा भाग दाबायचा(घोड्याच्या अंगाचा बर का!!) आवाज येतोच!!

--पुढच्याचा horse riding ने पाय तुटलेला पाहुन घोड्यांना कुत्र्यापेक्षा जास्त घाबरणारा.

शानबा कमळ बघ.
शानबा घोडा बघ.
शानबा horn म्हणजे शिंग.
शानबा unicorn म्हणजे शिंग असलेला घोडा.

शानबाची मजा आहे. आठवीपर्यंत परीक्षा नाही.

कुत्र्या वरुन एक जाहिरात आठवलि आता सेरातल काय माहित नाय बा! पन खेड्यात दुरदर्शन वर एक जहिरात एत्ये ! एक कुत्र कुठुन तरि येत !लाल शिग्नल पायल्यावर ! त्या ढवळ्या पट्या जवळ थांबत! गाडि गेलि सिग्नल पडला कि ते पुड जात ! आता ...........कुत्रा शाना का ? ..................बाकि लेख आनुभव म्हनुन आवड्ला .......................मला काहुन यात आडकवता ?............एक मेलेल कुत्र ........................

टारझन's picture

12 Jun 2010 - 11:46 am | टारझन

त्या पांढर्‍या घोड्याला Horn नसेल ना?

"y" राहिला का कुठे ? बाकी असे घोडे वरातीत सगळ्यांचे तोंड पाहाण्यासारखे करतात .. असा अनुभव आहे

परिकथेतील राजकुमार's picture

12 Jun 2010 - 11:53 am | परिकथेतील राजकुमार

टारझनजी तुमची अतिशय हॉर्नीरीक्षक प्रतिक्रिया पाहून बरच काय काय भरून आले...

माझी प्रतिक्रीया मला न विचारता/न कळवता उडवण्यात आलेली मला कोणत्याही परिस्थितीत चालणार नाही..

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

चन्द्रशेखर सातव's picture

12 Jun 2010 - 10:11 am | चन्द्रशेखर सातव

नवीन गाडी, त्यामुळे ६०-७० च्या वेगाने मस्त गाडी चालवत होतो,

timer १० सेकंदाच्या आत आले, मी गाडी चालू केली

काय राव ? तुम्ही नवी unicorn गाडी घेतलीत आणि पुण्यात असूनपण सिग्नल पाळता,हे सांगण्यासाठी एका आख्या धाग्याची गरज नव्हती.

एक खोचक पुणेकर.

Pain's picture

13 Jun 2010 - 7:50 am | Pain

हे तर काहीच नाही. हल्ली लोक भाजी खरेदी, पाउस पदताना गाणॅ ऐकणे यावर धागे काढतात. वर दुसर्‍याने तसे केले की "तुझे योगदान काय" म्हणुन विचारतात.

अविनाशकुलकर्णी's picture

12 Jun 2010 - 11:50 pm | अविनाशकुलकर्णी

घोड्याला माहिती असेल कि नियम नाहि पाळले तर घोडा लागेल म्हणून.....

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Jun 2010 - 1:41 am | बिपिन कार्यकर्ते

=)) =)) =)) =)) =))

बिपिन कार्यकर्ते

अभिज्ञ's picture

13 Jun 2010 - 6:59 am | अभिज्ञ

.../\...

अग्गाग्गा...

मिपावर वाचलेला आतापर्यंतचा बेस्ट "श्लेष".

अभिज्ञ

Pain's picture

13 Jun 2010 - 7:51 am | Pain

=)) =)) =))

Pain's picture

13 Jun 2010 - 7:52 am | Pain

=)) =)) =))

पाषाणभेद's picture

13 Jun 2010 - 12:46 pm | पाषाणभेद

हो अन लागलेला घोडा अरबी असेल तर हा घोडा मेलाच म्हणून समजा.

The universal symbol for diabetes
मधुमेहा विरुद्ध लढा

माझी जालवही

चतुरंग's picture

14 Jun 2010 - 9:32 pm | चतुरंग

घोड्याला तरी सोडा!!

चतुरंग

वाटाड्या...'s picture

14 Jun 2010 - 10:45 pm | वाटाड्या...

"फारसी वर्दळ" नव्हती? ही कसली गर्दी बुवा आता? फारशी माहीत होतं.

एक पंधरा शुभ्र घोडा अगदी रुबाबदारपणे एकेक टाप टाकत येत होता. - हे वाक्य अगदीच "कमल बस. शरद पळ." (इयत्ता १ ली तुकडी फ) सारखी आहेत.

"माणसांसाठी केलेले नियम प्राण्याने पण अचूक पाळावेत. जरा विचित्रच आहे!!" - ह्यात विचित्र काय आहे? का तुम्हाला प्राणी माणसांपेक्षा जास्त शहाणे आहेत असं म्हणायचय, आँ?

- वा

शिल्पा ब's picture

15 Jun 2010 - 6:36 am | शिल्पा ब

एक पंधरा शुभ्र घोडा अगदी रुबाबदारपणे एकेक टाप टाकत येत होता. - हे वाक्य अगदीच "कमल बस. शरद पळ." (इयत्ता १ ली तुकडी फ) सारखी आहेत.
=)) =)) =)) =)) =)) =))

***********************************************************
http://shilpasview.blogspot.com/