office मधलं तेच रटाळ वातारण त्या deadlines आणि कामाचे डोंगर ... बाहेर उन्ह भकाभका आग ओकताय असा एकंदरीत माहोल अतिशय कंटाळवाणा ..... प्रचंड चीडचीड होत होती.... पण खरच इलाज नव्हता
असाच कसाबसा दिवस सरकत होता आणि अचानक दुपारी थंड गारवा हवेत पसरायला लागला AC चे सगळे नियम धाब्यावर बसवून मी खिडकी उगडली आणि आहाहाहा ............. एक थंड हवेचा झोत गालाचे लाड करून गेला ... मागचा कंटाळा विसरून आणि काम थोड बाजूला टाकून मी बाहेरच्या निरीक्षणात गुंतले ...क्षणभरापूर्वी जे आकाश आग ओकत होत तेच आता सुंदर नीळसावळ झाल होत ..बरसायला आतुर ...
आणि झाल त्याच आगमन ..टपटप आवाज करत तो आला आणि तनमन चैतन्यमय करत गेला ...एकेका थेंब बरोबर कंटाळा हाहा म्हणता विरघळत गेला .... रस्तावर उगीचच धावपळ माजली ... रेनकोट घालायला वेळाही मिळालं नाही म्हणून आडोश्याला उभ राहून कोणी रेनकोट चढवत होत... कुणी तसाच भिजत पहिल्या पावसाचा मनमुराद आनंद घेत होत .... लहान मुल दिसतील त्या डबक्यात उद्या मारून त्याचं लहानपण साजर करत होती ....
त्यांना पाहिलं आणि वाटल अरे आपण आपल लहानपण कुठच्या कुठे विसरून आलोय ....अश्या पावसाळी डबक्यात उडी शेवटची कधी मारली हे ही आठवत नव्हत ....मोठेपणाच्या नावाखाली मोठ्या आनंद मिळवण्यात गुंतलेय मी असा वाटून गेल ..लहानपणी मला उगीचच खोटे केस लावायची हौस होती म्हजे डोक्याला रुमाल लावायला आणि गल्लीभर माझे केस माझे केस करून फिरायचं ...आणि परवाच नवीन कंपनी जॉईन करण्याआधी हातभार लांब वेणीचा सुटसुटीत लेयर कट करून आले ... संक्रातीला अगदी पहिल्या घरापासून शेवटच्या घरापर्यंत मी तिळगुळ घ्यायला जायची (तिळगुळ अजिबात आवडत नसत तरीही ) दसर्यालाही हीच तर्हा पण परवाच्या दसर्याला मावशिकडेही रडत खडत गेले .... चोरून काजू खाणे हाही आवडीचा उद्योग आता तर दिएतिन्ग मुळे तेही बंद झालाय ..... पूर्वी आठवतंय आत्याकडे गेलो होतो तेव्हा तिने एक पेन ठेवायचा पाउच दिलेला मला इतका काही आनंद झाला होता की बस्स ...पूर्ण प्रवासात शाळा सुरु झालीये आणि मी माझा तो अलौकिक पाउच मिरवतेय असा स्वप्न मला पडत होती ....आणि वाढदिवसाच्या दिवशी बाबांनी नवीन पर्स दिली अस्सल कातडी आनंद झाला पण तीव्रता खूपच कमी झाली होती ....
का असा झाल असेल ???? आनंद लुटण्याची क्षमता कमी झालीये की अपेक्षा वाढल्या आहेत .... प्रोफेशनल लाईफ जगता जगता मी स्वताबाद्दलाही प्रोफेशनल झाले होते ....मग ठरवलं या पावसाळ्यापासून नवी रुजवात करायची पुन्हा एकदा नव्याने जगायचं लहान लहान आनन उपभोगत आणि हो दुसर्यालाही आनंद देत ........मस्त कॉफी चा वाफाळलेला कप मी हातात घेतला आणि रेदिओ ट्यून केला गायक गात होता .....give me some sunshine
give me some rain GIVE ME ANOTHERE CHANCE I WANNA GROW UP ONCE AGAIN LA LA LA LA LALA LA
प्रतिक्रिया
4 Jun 2010 - 2:15 pm | स्पंदना
किती दिवसांनी दिसते आहेस?
छान लिहिल आहेस.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
4 Jun 2010 - 2:18 pm | मेघवेडा
विषय जुनाच आहे पण लिखाण फ्रेश वाटलं!! लेख आवडला!! :) मस्त!!
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
4 Jun 2010 - 3:03 pm | नावातकायआहे
पुन्हा मि.पा.वर पाउस (गारा विरहीत) आणि सकाळला फोटो...(ह. घ्या) ;)
4 Jun 2010 - 4:21 pm | झुम्बर
कमवायला लागल्या पासून हट्ट करा लागत नाही म्हणून त्या गोष्टी चे अप्रूप वाटत नाही ....
भरल्या पोटी मिठाई चा आनंद तो काय?????
पण अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या केवळ मी मोठी झाले आहे म्हणून मला करता येत नाहीत ....
अगदी शेवटच्या घोटापर्यंत फ्रुटी पिणे ....आता थोडी बाकी ठेवावी लागते
जोरजोरात हसणे अगदी कुठेही ...... आता हसण्याला क्लब मध्य जावे लागते ...
लहानपणी रडण फार सहज होत निरागस होत .... आता एकतर पटकन रडू येत नाही आलं तरी कोणाच्या तरी रागाने असूयेने येत .....
लहानपणी मी पटकन सॉरी म्हणत असे ......आता ते ही नाही जमत स्वताची चूक असली तरी ......
"लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा राव"
4 Jun 2010 - 5:42 pm | श्रीराजे
हे मात्र खर आहे...! अगदी सहमत..
4 Jun 2010 - 9:50 pm | अनिल हटेला
सहमत........
:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
АНИЛ ХАТЕЛА :D
5 Jun 2010 - 8:42 am | अप्पा जोगळेकर
कमवायला लागल्या पासून हट्ट करा लागत नाही म्हणून त्या गोष्टी चे अप्रूप वाटत नाही ....
भरल्या पोटी मिठाई चा आनंद तो काय?????
वृथा दिपो दिवापि च, वृथा सृष्टि समुद्रेषु |
वॄथा दानं समर्थस्य, वॄथा तृप्तस्य भोजनम ||
----- दिवसाउजेडी दिवा लावण्याचा काय उपयोग, समुद्रामध्ये पाऊस पडून काय उपयोग ?
सामर्थ्यवान माणसाला मदतीचा काय उपयोग आणि जेवून तृप्त झालेल्या माणसाला भोजनाचा काय उपयोग ?
अगदी शेवटच्या घोटापर्यंत फ्रुटी पिणे ....आता थोडी बाकी ठेवावी लागते
जोरजोरात हसणे अगदी कुठेही ...... आता हसण्याला क्लब मध्य जावे लागते ...
आँ ! हे नाही झेपलं. का नाही पिऊ शकत बरं फ्रुटी शेवटपर्यंत ? आणि हसण्याला क्लब मधे जावं लागणं का गरजेचं आहे बरं?
बाकी लिखाण आवडलं. एकदम टकाटक.
8 Jun 2010 - 8:12 pm | वेदश्री
>कमवायला लागल्या पासून हट्ट करा लागत नाही म्हणून त्या गोष्टी चे अप्रूप वाटत नाही ....
हट्ट करण्यासारख्या गोष्टी कायमच असतात. त्या फक्त वयानुसार बदलत जातात इतकेच. हट्ट करायला आवडतील अशा गोष्टी शोधून हट्ट पुरवणार्या व्यक्तींकडे तो करायला लागा, हट्ट पूर्ण झाल्याचे अप्रूप आपोआप वाटायला लागेल! गोष्टी कायमच पैशांशी संबंधित असतात, असे नसतेच! :)
>भरल्या पोटी मिठाई चा आनंद तो काय?????
मिठाईचा नसेल पण वर्षातून एखाददोन वेळेस आपल्या आवडीच्या माणसांबरोबर आवडीचे जेवण झाले की भरल्यापोटीदेखील गुलकंदाचे पान खाण्याचा आनंद अवर्णनीय असतोच की नाही? :)
>पण अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या केवळ मी मोठी झाले आहे म्हणून मला करता येत नाहीत ....
फुकाचे अवघडलेपण घ्यायला मोठेपणा सांगत नाही, तो आपला आपण घेत असतो. तो घ्यायचा की नाही ते सर्वस्वी आपल्या हातात असते. आपल्या आयुष्याचे अॅक्सलरेटर आणि ब्रेक्स आपल्या हातात ठेवायचे आणि ते कधी, कसे वापरायचे तेही आपणच ठरवायचे म्हणजे मग 'होल वावर इज आवर' असे होते!
>अगदी शेवटच्या घोटापर्यंत फ्रुटी पिणे ....आता थोडी बाकी ठेवावी लागते
छ्या! मी तर आजही रस्त्यावरून जाताना हरडा किंवा बोरं खात जाणे निषिद्ध मानत नाही. फ्रुटी मला आवडत नाही म्हणून नाहीतर लस्सी एक थेंब ग्लासात उरेल तर शप्पथ!
>जोरजोरात हसणे अगदी कुठेही ...... आता हसण्याला क्लब मध्य जावे लागते ...
अजाबात नाय! बिनधास्त हसते मी..
>लहानपणी रडण फार सहज होत निरागस होत .... आता एकतर >पटकन रडू येत नाही आलं तरी कोणाच्या तरी रागाने असूयेने येत .....
लहानपणच्या रडण्याचं त्यावेळच्या भावनांमध्ये शिरून विश्लेषण करा.. बघा उत्तर वेगळे नसणार तुमचे. त्यावेळचे संदर्भ आज बिनबुडाचे वाटतात म्हणून पण तेव्हा ते तितकेच संयुक्तिक होते जितके आजच्या परिस्थितीतले आजचे संदर्भ आहेत.
>लहानपणी मी पटकन सॉरी म्हणत असे ......आता ते ही नाही जमत स्वताची चूक असली तरी ......
मी तर आजही पटकन सॉरी म्हणते माझी चूक आहे हे मला बरोबर पटवले गेले तर! आता तसे कोणी करत नाही सहसा, तो भाग वेगळा! ;-)
बेधुंद जगायचं.. बास्स!
4 Jun 2010 - 5:00 pm | बिपिन कार्यकर्ते
झुम्बर... लेखन छान आहे. वर म्हणलंय तसं, विषय जुना पण लेखन फ्रेश आहे.
बिपिन कार्यकर्ते
4 Jun 2010 - 8:56 pm | टारझन
अर्रे काय झुंबर ... किती दिवसांनी ? कुठे होतास पठ्ठ्या ? ... लिहीलंस ? छाण केलंस :) लेका माझे डोळे थकले होते तुझ्या लेखाची वाट पाहुन ;) ... आता मी मोकळा मोकळा .............. डोळे धुवायला रे :)
बाकी लेख जुणा असला तरी विषय फ्रेश आहे ...
- झुम्बराबर झुम
4 Jun 2010 - 11:42 pm | Pain
पुन्हा पुन्हा..तेच ते..
4 Jun 2010 - 11:46 pm | स्वाती२
आवडले.
5 Jun 2010 - 2:27 pm | झुम्बर
टाऱझन बर झाल त्या निमित्ताने नजर साफ होइल तुमची .........
>>>अगदी शेवटच्या घोटापर्यंत फ्रुटी पिणे ....आता थोडी बाकी ठेवावी लागते
जोरजोरात हसणे अगदी कुठेही ...... आता हसण्याला क्लब मध्य जावे लागते ...>>>>>>>
मी असा म्हणले कारण शेवट पर्यन्त फ्रुटि प्यायला लागल्यावर इतके विचित्र आवाज निघतात आणि आजूबाजूचे लोक एवढे मोठे झालात पण अक्कल नाही का असल्या नजरेने बघतात .........
5 Jun 2010 - 2:57 pm | टारझन
खि खि खि .. नजरेचं माहित नाही , पण हे वाचुन हसुन हसुन पोट मात्र साफ झालं =))
- (डोळ्यांना झुम्बर लटकवल्याने "नजर साफ झालेला") डाम्बर
आमच्या येथे अंतरजालिय नजरा साफ करुन मिळतील
5 Jun 2010 - 2:57 pm | परिकथेतील राजकुमार
मी असा म्हणले कारण शेवट पर्यन्त फ्रुटि प्यायला लागल्यावर इतके विचित्र आवाज निघतात आणि आजूबाजूचे लोक एवढे मोठे झालात पण अक्कल नाही का असल्या नजरेने बघतात .........
लोक काय म्हणतील हा विचार करणारी आणखी एक व्यक्ती.
आपली पुढील आंतरजालीय वाटचाल खडतर असणार हे नक्की.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
5 Jun 2010 - 3:07 pm | टारझन
मला महाजालावर जे शिकायला वर्ष लागले ते पर्याने तुम्हाला आत्ताच सांगितलेले पाहुन खुप आनंद झाला
- (तोता-ए-तिलिस्म धारी) परिकथेतील जादुगार
5 Jun 2010 - 3:23 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सही चुकली रे टार्या, "गणनायक सहालग" असं काहीतरी पाहिजे होतं तिथे! ;-)
अदिती
5 Jun 2010 - 3:20 pm | झुम्बर
लोकांनाचा विचार काही ठिकाणी करावाच लागतो .......
आणि माझा आंतरजालीय प्रवास कसा होईल ते होईल पण लोकांच भान ठेवून वागण्यात मला तरी काही गैर नाही वाटत ..... मी म्हणतो ते खर आणि लोकांशी देण घेण नाही हा attitude आपल्याला सगळी कडे लावता येत नाही ......
बॉस ही दुसरी व्यक्तीच असते आणि ती लाख मूर्ख असेल तरी तिच्याशी देण घेण असताच ना .... अर्थात हे मी उदाहरणा दाखल म्हणतेय.....बॉस समोर बसुन तुम्हि आवज काढुन फ्रुटि पिता का??
.......................................................................
5 Jun 2010 - 7:26 pm | रेवती
लेखन आवडले. लहानपणी मलाही मोठ्या केसांची भारी आवड होती. केस लहान होते तरी अगदी खांद्यापर्यंत येइल असा गजरा घालायचे ते आठवले. आता तसं करणारी एखादी छोटी मुलगी दिसली कि मला इतका आनंद होतो. बाकि ते फ्रुटी किंवा तश्याच अनेक नको त्या प्रथा पडल्यात त्याबद्दल बोलायला नको. कधी झुगारून देता येतात कधी नाहीत.
रेवती