पापड

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in पाककृती
21 Apr 2008 - 3:48 pm

पापड ही एक साईड डीश.
भाजका तळका आणि मसाला हे तीन प्रकार आपल्याला माहीत असतात
हे आणखी दोन नवे प्रकार पापड खाण्याचे
१) कच्चा पापड त्याला दोन्ही बाजुनी किंचीत तुपाचा हात लावुन घ्यावा. पोळी भाजतो त्याच गरम तव्यावर पापड ठेउन त्यावरुन वाटीची उलटी बाजु फिरवावी..पापड हवा तेव्हढा भाजुन घ्यावा. हा पापड एकदम सपाट भाजला जातो.
२)पोळी लाटुन घ्यावी त्यावर कच्चा पापड ठेवावा . त्यावर बारीक चिरलेला कांदा पसरून टाकावा.तिखटपूड आणि हवा असल्यास कांदा लसूण मसाला पेरावा. यावर आता दुसरी पोळी लाटुन ठेवावी. व पोळ्यांच्या कडा थोडे लाटणे फिरवुन बन्द करुन घ्याव्यात.
नेहमी भाजतो तशी पोळी भाजावी ( रोल हवा असल्यास गरम असतानाच करावा) होऊ शकतो.. ही डीश मी स्वतः डीझाईन केली असल्याने मला याचे नाव सुचले नाही

पाकक्रियाआस्वाद

प्रतिक्रिया

मनस्वी's picture

21 Apr 2008 - 3:52 pm | मनस्वी

पोळी लाटुन घ्यावी त्यावर कच्चा पापड ठेवावा

आतला पापड भाजला जातो?

आनंदयात्री's picture

21 Apr 2008 - 3:53 pm | आनंदयात्री

ठेवला तर कसें ?

विजुभाऊ's picture

21 Apr 2008 - 3:59 pm | विजुभाऊ

हो.पापड छान भाजला जातो.पोळी ही मस्त खरपुस कडक होते.
पोळी फक्त लगेच तव्यावरुन उतरती खावी लागते. अन्यथा ती पुन्हा मयक्रोवेव्ह मधुन गरम करुन द्यावी लागते.

आनंदयात्री's picture

21 Apr 2008 - 3:52 pm | आनंदयात्री

पापड पोळी हे नाव कसे वाटते ?

(धनगर बसला जेवाया ..... ह घ्या हे वे सां न लगे :) )

विसोबा खेचर's picture

21 Apr 2008 - 3:56 pm | विसोबा खेचर

पापड ही खास गुज्जू-मारवाडी समाजाची देन आहे. विजूभाऊ जरी मराठमोळे मिपाकर असले तरी ते गुज्जूही आहेत, त्यामुळे पापडावर त्यांच्याइतकं अधिकारानं बोलणारं मिपावर दुसरं कुणी नसावं असं मला वाटतं! ;)

केम बिजूभाई, हू एकदम चोक्कस बोलू छू के नथी? ;)

आपला,
(शेयरबाजारातला) तात्या पटेल.

मनस्वी's picture

21 Apr 2008 - 4:03 pm | मनस्वी

कसे वाटते?

धमाल मुलगा's picture

21 Apr 2008 - 4:19 pm | धमाल मुलगा

पोपारोल चांगलंय.
व्हॅटीकन सीटीत पोप पण हेच खातो असं आपण सांगू :-)

विजुभाऊ-द रसिकलाल, एकदम हटके डिश दिसतीय.

एक शंका:
ह्याच्या मध्ये थोडेसे फेरफार करुन म्हणजे रोलचे तुकडे तळून शेजवान सॉसबरोबर किंवा केचप बरोबर (आवडीप्रमाणे) सर्व्ह केले तर एक उत्तम चखणा होऊ शकेल काय?

छोटा डॉन's picture

22 Apr 2008 - 6:45 am | छोटा डॉन

"व्हॅटीकन सीटीत पोप पण हेच खातो असं आपण सांगू :-"
काय सांगता ? मी जेव्हा गेलो तेव्हा तर ते म्हणाले की ते दारू पित नाहीत त्यामुळे पापड खात नाहीत.
कदाचित त्याआधीचे पोप जॉन पॉल खात असावेत ....

बाकी चखण्याचे अप्रतिम ...
पोळ्या लाटने जरा अवघड आहे, दुसरे काही जमू शकेल का ? पाव, ब्रेड वगैरे ?

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

मला कच्चा पापड ,पक्क्का पापड,कच्चा पापड ,पक्क्का पापड म्हणत पापड तळायला आवडतो.
खूप छान लागतो असं म्हणत केल्यावर.
करून पहा हव तर.

मीनल.

स्वाती राजेश's picture

21 Apr 2008 - 7:13 pm | स्वाती राजेश

तु म्हणतेस तसे केले तर,
पापड एक तर काळा (भाजला तर)खायला लागेल किंवा तपकिरी.:)))))))))))))))))))))

रामदास's picture

21 Apr 2008 - 7:39 pm | रामदास

मा. विजुभाउ, आपल्याकडे पापडाची भाजी बनवतात.त्याची रेसिपी पण देउ शकाल का?

विजुभाऊ's picture

21 Apr 2008 - 7:59 pm | विजुभाऊ

हो योग्य वेळ येताच देईन.

वरदा's picture

21 Apr 2008 - 9:00 pm | वरदा

करुन पाहीन एकदा रोज पोळ्या करता करता करुन पहाता येईल्..विजुभाऊ सांगेन तुम्हाला करुन पाहीली की...

अवांतरः माझी आई लहान असताना पापडपोहे करायची..चिवड्यासारखा चिवडा करायचा आणि त्यात तळलेले पापड कुस्करुन टाकायचे, पोह्याचे उडदाचे, जे असतील ते...मस्त लागायचं..त्याची आठवण झाली....

इनोबा म्हणे's picture

21 Apr 2008 - 10:29 pm | इनोबा म्हणे

माझी आई लहान असताना पापडपोहे करायची
तुमची आई लहान असताना स्वयंपाक शिकली घ्या...आजकालच्या पोरीना साधा चहा करता येईल तर शप्पथ! (न विसरता ह.घ्या.)

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

वरदा's picture

21 Apr 2008 - 9:02 pm | वरदा

ते पापड भाजायचं नवीन टेकनिक आवडलं बरं का कारण माझ्याकडे सिरॅमिक कुकटॉप आहे त्यामुळे पापड भाजता येत नाही नेहेमीच्या गॅस सारखा, आता तुमची आयडीया वापरेन.....

इनोबा म्हणे's picture

21 Apr 2008 - 10:34 pm | इनोबा म्हणे

मला तर वाटले विजुभाऊंनी कैरीनंतर आता पापडावर लेख लिहीला की काय...
जरा निराशाच झाली म्हणायची... असो.(खायला आवडेल)

(फूकट ते पौष्टीक मानणारा)
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

वरदा's picture

21 Apr 2008 - 10:54 pm | वरदा

आवडला जोक...