विडंबनाचा प्रथमच प्रयत्न. प्रेरणा श्री. विशाल कुलकर्णी यांची अतिशय सुंदर
"विचारू नका " ही कविता.श्री. कुलकर्णी साहेबांची मनापासून माफी मागून
विचारू नका..!
स्मरत नाही कोण मी
काहीच ह्या क्षणी
मज विचारू नका
होती घ्यायची घोटभर
पचवलि कैसी पोटभर
आज मज विचारू नका
रीचवले प्याले अनंत
तरंगतो अधांतरी हलका हलका
काय जादू जाहली
आज मज विचारू नका
मार्गस्थ ह्या झालो कसा
तो मार्ग मज विचारू नका
ब्रम्हानंदी टाळी लागली
वेदनांचा पत्ता विचारू नका
होतो तल्लीन वारूणी संगे
भाई, दादा, अन तात्याही टपकला
साधली वैरी वेळ सांगुनी कैसी
"हिशेब" आता मज विचारू नका
खणखणला भ्रमण ध्वनी
अन गळून पडला प्याला करीं चा
स ssर्र ss कन काटा तनुवर, थरथरते काया का ?
काहीच मज आता विचारू नका
आणीबाणी आता घरी
विवंचना माझी विचारू नका
त्सुनामी घोंगावते दारात माझ्या
नाव त्याचे विचारू नका
तरीपण
“ चाखले ना ज्यांनी कधीही
ह्या वारुणीचे थेंबही
हाय रे दुर्दैव त्यांचे
मुक्ती ना परलोकीही “
नावे ऐशा अभागी जनाची
आज तुम्ही विचारू नका
निरंजन वहाळेकर
प्रतिक्रिया
23 May 2010 - 11:37 am | विशाल कुलकर्णी
क्या बात है.. मस्त :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
25 May 2010 - 11:04 am | निरन्जन वहालेकर
धन्यवाद व आभार ! श्री.विशाल कुलकर्णी साहेब ! ! !
सस्नेह
निरन्जन