नांदी

सन्जोप राव's picture
सन्जोप राव in जे न देखे रवी...
15 May 2010 - 10:30 am

विडंबनाचे विडंबन हा नवा खाक्या स्वीकारुन किंवा जुन्या बाटलीत भरलेली नवी दारु म्हणून

काही बोल बोलले , अन मौन काही अंतरी
(सोलवटली ढोपरे, अन शेकल्या नडग्या तरी)
काही लाह्या तडकल्या, अन मूग गिळले भर्भरी

बंडझेंडे फडकले अन उग्र वळलेल्या मुठी
काही म्हणती लाजुनि 'शोभा झाकलेली बरी'

पाठमोर्‍या आकृतीला पाहुनि उद्गारले
'माणूस हा होता बरा' गोष्ट असतसे हीही खरी

काय चमचे, किति पळ्या अन डाव कित्येकी येथे
मेल्या म्हैशीला पिळुनि दावू दूध मणभरी

हरवल्याचे दु:ख नाही, हरवले ते हरवले
कोतवाला हाती फसलो, शल्य हे उरले उरी

पालखी ती उतरली अन भोई खांदे चोळती
पादुकांवर चालवूया राज्य हे भरतापरी

यमन गाती भाट येथे अजुनि उंच गर्जुनि
सूर मात्र आर्त येतो पिचलेल्या मडक्यापरी

भग्न वाडा, खांब कलला, धूर कडूसर धुमसतो
बाह्यरुपी भूल कैसी, 'जनुके' कैसी अंतरी

थांब 'केशा',जाशी कोठे , ठेव जोडे बाजुला
ऐकुनि जा वगाआधी, नांदी ही अर्धी तरी

करुणविडंबन

प्रतिक्रिया

निरन्जन वहालेकर's picture

15 May 2010 - 10:40 am | निरन्जन वहालेकर

छान विडम्बन ! लै भारी ! ! आवडले ! ! !

मितभाषी's picture

15 May 2010 - 10:43 am | मितभाषी

वा!!! एकदम आर्त.

गण-गौळण, रंगबाजी-वग सोडुन थेट नांदी???????? :?

( कोंगाड्या )भावश्या.

प्रमोद देव's picture

15 May 2010 - 1:03 pm | प्रमोद देव

:)

सहज's picture

15 May 2010 - 1:06 pm | सहज

मालकद्वेष, संस्थळद्वेष यावर पोसले जाणारे एक बांडगूळ आता नव्या सावजाच्या शोधात इतकीच नांदीची टोटल लागली.

किती करुण!!

टारझन's picture

15 May 2010 - 4:22 pm | टारझन

=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
बांडगुळ हा शब्द काळजाला भिडला , बाकी शब्दक्रम चेंज करुन ह्यातुन अजुन मजेशीर शब्द निघतात :)

विजुभाऊ's picture

15 May 2010 - 3:14 pm | विजुभाऊ

सहज भौ अगदी योग्य लीहिलेत
अर्थात आपण व्यक्तीबद्दल बोलण्यापेक्षा या लिखाणाच्या घसरलेल्या क्वालिटीबद्दल बोलुया...
हल्ली या नावाने कोणी वेगळेच लिहीत असावे किंवा लेखकाची प्रतिभा अगदीच हरवली असावी असा मला संशय आहे

शुचि's picture

16 May 2010 - 1:12 am | शुचि

नाट्य अप्रतिम रीत्या काव्यात उतरवलय.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

sur_nair's picture

16 May 2010 - 7:01 pm | sur_nair

वा. लाजवाब. विडंबन मुळी वाटतच नाही. सदर परिस्थिती वर उत्तम भाष्य जमलंय.