फांदी-२
आमची प्रेरणा : प्रदीप कुलकर्णींची अप्रतिम गझल "फांदी".
........................................
(फांदी)
........................................
अर्थ शब्दांचा जरा आहे अघोरी!
काव्य आहे आमचे थोडे मुजोरी!
येव्हढा गलका इथे का चाललेला?
तोकड्या कपड्यातल्या जमल्यात पोरी!
बायको समजून धरलेले जिला मी...
नेमकी सासू निघावी पाठमोरी!
का अधी केलेस त्याच्या धन हवाली?
अन जगाला सांगतो झालीय चोरी...
पाहता कविता नवी मजला कळवती...
"केशवा" कविता नवी आलीय कोरी!
पोच 'काट्या'ची कमी पडते जराशी...
उगिच ना देहास या, म्हणतात बोरी!
येव्हढे हे काय जे चमकून गेले?
आरसा ना आमचे टक्कल बिलोरी!
मी तुझ्या कवितेस कंटाळून गेलो...
"केशवा" झाली तुझी कितवी लगोरी?
आमची दुसरी कुठे नाहीच 'फांदी'...
ही पुणेरी धन्यता, ना ही मुजोरी!
- केशवसुमार
........................................
रचनाकाल १४ मे २०१०
........................................
In reply to पाठमोरी सासू लई भारी! by बेसनलाडू
बायको समजून धरलेले जिला मी... नेमकी सासू निघावी पाठमोरी!हाहाहा =)) जबरा !! कुठे जॅकपॉट लागला का ? ते शोधत होतो ;) जॅकपॉट वरुन एक जोग आठवला , पोस्टमन खाली रहाणार्या देशपांड्यांकडे पाचव्या मजल्यावर राहाणार्या जोष्यांचं पत्र टाकून जातो . देशपांडे पडले समाजसेवक , तडक पाचव्या मजल्यावर पत्र द्यायला निघाले ... आता पाच मजले चढे पर्यंत बिचार्यांना पार धाप लागली .... त्यांनी दरवाजा वाजवला , तर आतून त्यांच्या कामवाली ने दरवाजा उघडला. देशपांडे (हाफत हाफतंच) : देशपांडे आहेत का ? कामवाली(एकदम हळु आवाजात) : नाहीयेत .. या नां !! (फांदी टू फांदी) टारझन
In reply to बायको by टारझन
>>बायको समजून धरलेले जिला मी... नेमकी सासू निघावी पाठमोरी!क्षणभर प्रसंग डोळ्यापुढे उभा राहिला आणि =)) =)) =)) =)) =))
पाठमोरी सासू लई भारी!