चंपूची जिंदगी

फटू's picture
फटू in जे न देखे रवी...
13 May 2010 - 10:59 pm

चंपूची बायको खुपच हैराण झाली होती
नॉट हॅपनिंग जिंदगी वैराण झाली होती
चंपूच्या जीवाला कधी आराम नसायचा
ऑफीसात नुसता काम करत बसायचा

चंपूचा बॉस होता अगदी पक्का शहाणा
दर प्रमोशनला तो शोधी नविन बहाणा
डेडलाईन पठठया कधी विसरला नाही
नऊपूर्वी चंपू घरी कधी अवतरला नाही

चंपूलाही व्हायचंच होतं अगदी बेस्ट
त्यानंही मग कधी घेतली नाही रेस्ट
रात्रंदिन गुलामासारखा राबत राहीला
बढतीसाठी बॉसचे पाय दाबत राहीला

असे दिवसामागून दिवस गेले वर्षे गेली
आणि चंपूची अवस्था फार वाईट झाली
चंपूला ना हल्ली काही आठवतच नाही
कधीकधी चुकून बायकोलाच म्हणतो ताई

शेवटी एक दिवस चंपूला अक्कल आली
प्रमोशनची सारी मोहमाया सोडून दिली
बॉसला म्हणाला तू का रे सतावतो मला
बढतीचा लाडू दाखवून येडा बनवतो मला?

प्रमोशन दे नाही तर ईथून निघून जाईन
इन्क्रीमेंट जरी दिलंस तरी तिथेच राहीन
बॉसही उस्ताद म्हणे तू कुणी मोठा नाही
तुझ्यासारख्या चंपूंना इथे काही तोटा नाही

तुझ्यासारखे चंपू इथे पैशाला दहा मिळतात
करीयरच्या शर्यतीत ते उंदरासारखे पळतात
तू नाही दुसरा कुणीतरी इथे भेटेलंच रे मला
तुझ्यासारखाच दुसरा चंपू बनवेन मी त्याला

हास्यनोकरी

प्रतिक्रिया

नाना बेरके's picture

14 May 2010 - 1:43 pm | नाना बेरके

पुळचट-पुंग्या चंपूला, म्हणते त्याची बायको
"मै जाती हू, ऑफिसको. रोता है कायको"
सोडून सारे घरदार, निघून गेली घाईघाई
बॉसच झाला 'दुसरा चंपू', खुर्चीत आता बस्ते 'ताई'

चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके

फटू's picture

15 May 2010 - 12:34 am | फटू

कवितेचा शेवट म्हणून अगदी चपखल (की चपलख?) बसतं हे कडवं.

बायको ईंजिनीयर हवी म्हणतोस तर मग तिलाही करीयर अस्पायरेशन्स असतील. जर तीची ग्रोथ तुझ्यापेक्षा जास्त वेगाने झाली तर तिला ग्रो व्हायला संधी देऊन तू मुलं सांभाळत घरी बसशील का? - ईति आमच्या प्रोजेक्ट मॅनेजर

- फटू

परिकथेतील राजकुमार's picture

14 May 2010 - 1:58 pm | परिकथेतील राजकुमार

फटू आपले खरे नाव सतीश गावडे आहे का ? कारण हि कविता ह्या आधी त्यांच्याच ब्लॉगवर वाचल्याचे स्मरते आहे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

llपुण्याचे पेशवेll's picture

14 May 2010 - 3:07 pm | llपुण्याचे पेशवेll

थोडी खोदाखोद उचकापाचक कर, सवयिनुसार. ;) म्हणजे कळेल.
बादवे, फटू कविता छान. बरेच दिवसानी दिसलास.
पुण्याचे पेशवे
आम्ही हल्ली सहीत वाक्यं लिहिणं बंद केले आहे.
Phoenix

फटू's picture

15 May 2010 - 12:24 am | फटू

@ प. रा.

मीच तो.

तुमच्या आक्षेपावरून माझाही ब्लॉग वाचला जातो हे जाणवलं आणि अंगावर मुठभर मांस चढल्याचा भास झाला :|

त्याहीपेक्षा आपण ब्लॉगवरील नोंदीच्या संदर्भात दाखवलेली सतर्कता पाहून खुप बरं वाटलं. आज जादूगाराने हातचलाखी करावी इतक्या सहजतेने ब्लॉगवरील नोंदी ढापून आपल्या नावावर खपवल्या जातात. जर खरा वाचक या बाबतीत सतर्क राहीला तर या प्रकाराला थोड्याफार प्रमाणात नक्कीच आळा बसेल.

... एव्हढयासाठीच आपला सलाम आहे तुम्हाला.

अवांतरः ही कविता एका हिंदी ढकलपत्राचं मी केलेला स्वैर मराठी अनुवाद आहे. म्हणजे तशी एका अर्थाने उचलेगिरीच ;)

@ पेशवे,

श्रीमंत, प्रतिसादासाठी धन्यवाद... जवळजवळ वर्षभरानंतर लॉगिन केलं :|

- फटू

आनंदयात्री's picture

15 May 2010 - 12:42 am | आनंदयात्री

हॅ हॅ हॅ .. पराचा कावळा .. छ्या छ्य्या .. चुकले चुकले .. पराचा पोपट झाला !!

चेतन's picture

14 May 2010 - 2:32 pm | चेतन

सही रे

बिपिन कार्यकर्ते's picture

14 May 2010 - 3:35 pm | बिपिन कार्यकर्ते

छान कविता. फटू, बर्‍याच दिवसांनी दिसलास रे... कसा आहेस?

बिपिन कार्यकर्ते

फटू's picture

15 May 2010 - 12:37 am | फटू

बिपीनदा... मी मजेत. तू कसा आहेस?

पुढच्या आठवडयात व्य. नि. टाकतो निवांत.

- फटू