आजच "टिंग्या" हा प्रकाश हाडवळे यांचा चित्रपट पाहिला.
खेडेगावाचं व तेथिल ग्रामिण जीवनाचं नितांतसुंदर चित्रण केलं आहे. एक सरळ साधी कथा आहे टिंग्या व त्याचा बैल पतिंग्या याची,
बरोबरोनी आजच्या शेतकर्याचं दाहक वास्तव आपल्या समोर येतं.
ओतुर जवळच्या मांडवा या खेडेगावात ही कथा घडते, लावणी चे दिवस असताना अचानक टिंग्याच्या दोन बैलांपैकी एक
बैल (पतिंग्या) बसतो म्हणजेच कामाला निरुपयोगी होतो. आणि लावणी (बटाटयाची लावणी लवकरात लवकर केली नाही तर त्याला
मोड येतात आणि बटाटा ख्रराब होतो) लवकर करणे गरजेचे असते, त्यावेळी टिंग्याच्या वडिलांसमोर एकच पर्याय असतो पतिंग्याला
कसायाला विकून त्या पैशाने नवीन बैल आणणे कारण पैसे येण्याचा दुसरा मार्गच नसतो, सावकारा कडून आधीच कर्ज घेतलं असतं व
पुन्हा कर्ज मिळणे दुरापास्त असतं.
त्यामधुन कथा हळुहळू उलगडत जाते, टिंग्याची त्याचा लाडका बैल पतिंग्याला वाचविण्यासाठी जी काही धडपड केली
आहे ती अगदी पहाण्याजोगी आहे . प्रसंगी पतिंग्याला दाखविण्यासाठी तो लांबून पायी चालत जाऊन माणसांच्या डॉ़क्टरला भेटतो
आणि वडिलांचा मार खातो. डॉ़क्टरना पेशंट विषयी सांगतो त्यावेळेसचा त्याचा अभिनय अगदी लाजवाब!
लहान मुलांचे निरागस प्रश्न असतात आणि म्हणूनच मोठ्यांना त्याची उत्तरे देता येत नाहीत, टिंग्याच्या शेजारी त्याच्या
मैत्रीणीची आजी आजारी असते आणि तिला तपासायला डॉ़क्टर आणतात तेव्हा टिंग्या वडिलांना प्रश्न विचारतो कि नानी आजारी आहे
तर तिला कोणी कापायला नेतं का?विनादाबरोबर आपल्याला एक कारुण्याची झालर दिसते.
शेवटी "टिंग्या" त्याच्या "पतिंग्याला" वाचवतो का? ह्या सर्व गोष्टी पहाण्यासारख्या आहेत.
प्रकाश हाडवळे यांचं लेखन दिग्दर्शन उत्तम आहे, त्याचबरोबर पार्श्वभुमीला एक गाणं सतत वाजतं "तुझं आभाळ मला माझं आभाळ तुला"
हे गाणं फार छान वाटतं. आणि टिंग्यासकट सर्वांचा अभिनय लक्षात रहाण्याजोगा झाला आहे.
(वेळ मिळेल तेव्हा मि.पा. वर पडीक असलेली प्रगती)
प्रतिक्रिया
16 Apr 2008 - 2:05 pm | आनंदयात्री
पाहिला पाहिजे हा टिंग्या, टिंग्याच्या ओळखीबद्दल धन्यवाद.
16 Apr 2008 - 2:30 pm | भडकमकर मास्तर
प्रकाश हाडवळे नाही, मंगेश हाडवळे
http://www.orkut.com/Profile.aspx?uid=5290297604561010299
16 Apr 2008 - 2:15 pm | अभिज्ञ
फारच गुळमुळित समी़क्षा आहे.तुम्हाला बहुतेक भडकमकरांची शिकवणि घ्यावि लागेल...) ह्.घ्या.
प्रगति ताई, फारच थोडक्यात तुम्ही चित्रपटाचि कथा उरकलित.....
तरिपण आपल्या परि़क्षणानुसार हा चित्रपट पहायलाच हवा असे वाटले.
टिंग्याच्या ओळखीबद्दल धन्यवाद.
अबब.
16 Apr 2008 - 2:16 pm | सन्जोप राव
'टिंग्या' पहाण्याची जबरदस्त इच्छा आहे.
'लाईफ इज बीईंग मिसस्पेंट इन परस्यूट ऑफ कॉमर्स...'
सन्जोप राव
16 Apr 2008 - 2:22 pm | मनस्वी
टिंग्याला बघायला हवे.
16 Apr 2008 - 5:24 pm | विसोबा खेचर
वरील सर्वांशी सहमत आहे...
आपला,
(उत्सुक) तात्या.
16 Apr 2008 - 10:23 pm | मुक्तसुनीत
व्ही सी डी किंवा डीवीडी वर मिळतो का ?
16 Apr 2008 - 11:11 pm | भडकमकर मास्तर
व्ही सी डी किंवा डीवीडी वर मिळतो का ?
उत्सुकता म्हणून ठीक आहे, आणि बाहेरच्या देशात तर मराठी थिएटर्ला लागणे अशक्य आहे ., या सर्व गोष्टी मान्य आहेत......अहो पण फक्त चार दिवसांपूर्वी रिलीज झालाय हो हा सिनेमा...
जेव्हा रिलीजच्या दिवशीच लोक हे प्रश्न विचारतात ,तेव्हा एका प्रोड्यूसर आणि डिरेक्टर ला फार यातना होतात म्हणे , ....
( सिनेमा थिएटरमध्ये पाहणारा)
स भडकमकर
16 Apr 2008 - 11:19 pm | मुक्तसुनीत
तुमच्या भावना समजू शकतो. मी इतकेच सांगतो की जेव्हा जेव्हा एखादा चांगला चित्रपट लागतो - मग तो कुठल्याही भाषेतला असो - तो आवर्जून हॉलमधे जाऊनच पहातो. अलिकडची उदाहरणे : तारे जमीं पर , चक दे इंडिया. "श्वास" चा खे़ळ येथल्या मराठी मंडळींनी हॉलमधे लावला होता तिथे आम्हा सर्वांचा उत्तम प्रतिसाद होता. पण हे शक्य नसेल तेव्हा पायरेटेड कॉपी न खरेदी करता, योग्य तीच कॉपी घरी पहाणे म्हणजे त्या त्या कलाकृतीला आर्थिक मदतच नव्हे काय ?
16 Apr 2008 - 11:46 pm | भडकमकर मास्तर
परदेशात एक वेळ ठीक आहे हो तुमचं...पण अहो देशावर अगदी महाराष्ट्रात राहूनही लोक हाच प्रश्न विचारतात.... (परवा आय बी एन लोकमत वाहिनीवर वळूच्या गँगची मुलाखत होती...त्यात दिग्दर्शक उमेश कुलकर्णी एका प्रेक्षकाच्या याच प्रश्नाने वैतागला....).... "अहो थिएटरला बघा हो, "अशी विनन्ती केली त्याने.... "सिनेमा जोपर्यंत चालतोय, तोपर्यंत तरी डी व्हीडी वगैरे काढायचा अजिबात विचार नाही" असेही म्हणाला....
आता रिलीजच्या आठवड्यात तुम्ही हा डीव्हीडीचा प्रश्न विचारत आहात म्हणजे दोन शक्यता...एकतर तुम्ही पायरेटेड कॉपीबद्दल बोलत आहात किंवा दुसरं म्हणजे सिनेमा प्रचंड आपटला तर उत्पन्नचं अजून एक साधन म्हणून निर्माता योग्य ती डीव्हीडी काढतो, त्याबद्दल बोलत आहात......
दोन्ही शक्यता दिग्दर्शकाला दु:खदायकच...
योग्य तीच कॉपी घरी पहाणे म्हणजे त्या त्या कलाकृतीला आर्थिक मदतच नव्हे काय ? आहे की....
सिनेमा आत्ताच रिलीज होत आहे...मग योग्य ती कॉपी ( म्हणजे प्रोड्यूसरने काढलेली ) कशी असेल?? अर्थातच ती नाही.... त्यामुळे जर सिनेमा चालला तर योग्य ती कॉपी लवकर येणार नाही... त्यासाठी वाट पाहणे योग्य...
17 Apr 2008 - 12:30 am | मुक्तसुनीत
तुमच्या स्पष्टीकरणामधे जो अध्याहृत आरोप आहे त्याचे निराकरण करणे योग्य होईल.
आता रिलीजच्या आठवड्यात तुम्ही हा डीव्हीडीचा प्रश्न विचारत आहात म्हणजे दोन शक्यता...एकतर तुम्ही पायरेटेड कॉपीबद्दल बोलत आहात किंवा दुसरं म्हणजे सिनेमा प्रचंड आपटला तर उत्पन्नचं अजून एक साधन म्हणून निर्माता योग्य ती डीव्हीडी काढतो, त्याबद्दल बोलत आहात......
यापैकी दोन्ही गोष्टी माझ्या मनात नव्हत्या. सिनेमा कधी प्रदर्शित झाला , प्रदर्शित झाल्या झाल्या त्याची सीडी निघाली का ? सीडी मुळात निघते का नाही ? याबद्दल मला अजिबात कल्पना नाही. परंतु वरील विधाने करताना तुमचा लांच्छन लावण्याचा जो प्रकार केला आहे त्याचा मी निषेध नोंदवतो. स्पष्टीकरण ऐकूनही परत तुम्ही घालून पाडून बोललात. हा प्रकार अश्लाघ्य आहे.
17 Apr 2008 - 12:56 am | भडकमकर मास्तर
प्रदर्शित झाल्या झाल्या त्याची सीडी निघाली का ? सीडी मुळात निघते का नाही ? याबद्दल मला अजिबात कल्पना नाही.
या वाक्याने सगळेच क्लिअर झाले आम्हाला....सीडी मुळात निघते का नाही ? याबद्दल अजिबात कल्पना नसणे, ही एक तिसरी शक्यता...
आम्ही गृहित धरले हो...ते चुकले....
... आम्ही बोललो हेच चुकले..सॉरी
स्पष्टीकरण ऐकूनही परत तुम्ही घालून पाडून बोललात. हा प्रकार अश्लाघ्य आहे.
सोडून द्या, परत सॉरी म्हणतो..
17 Apr 2008 - 7:34 am | बगाराम
पण हे शक्य नसेल तेव्हा पायरेटेड कॉपी न खरेदी करता, योग्य तीच कॉपी घरी पहाणे म्हणजे त्या त्या कलाकृतीला आर्थिक मदतच नव्हे काय ?
आणि तेही शक्य नसेल तेव्हा पायरेटेड कॉपी बघीतली तर चालते का?
पण त्यातही मी एक तत्व पाळतो "पायरटेड कॉपी कधीही विकत घ्यायची नाही!"... इंटरनेटावर फुकट बघायची
-बगाराम
16 Apr 2008 - 11:50 pm | अभिज्ञ
तेव्हा एका प्रोड्यूसर आणि डिरेक्टर ला फार यातना होतात म्हणे , ....
मी तरी,असे मानत नाहि.
एखाद्या कलेतून प्रोडयुसर/डायरे़क्टरला कितपत उत्पन्न असावे ह्याला काहि मर्यादा आहेत का?
ही मंडळि ,ऩक्कि किति खर्चात सिनेमे बनवतात? ह्याचि खरी माहिती कधी बाहेर आलि आहे?
एखादा सिनेमा ९० कोटि रुपयात बनतो?????? आइला कमाल आहे!!!!
मी तरी अद्याप कुठल्याहि चित्रपट निर्मात्या कडुन ह्या किमतिचा ब्रेक अप दिलेला ऐकला नाहिये.
आणि एवढे पैशे ह्यांच्या कडे येतातच कुठुन्?शाहरुख खान आय पी एल ची अक्खि टिमच विकत घेतो
ती सुध्दा काहि करोड रुपयांना.
बाकि मी पायरसि चे समर्थन करत नाहिये,पण यातना होतात वगैरे शी पुर्णतः सहमत नाहि.
अबब.
17 Apr 2008 - 12:07 am | भडकमकर मास्तर
साहेब, सन्दर्भ मराठी सिनेमांचा आहे.... ते पुढचं सगळं (९० कोटि,एवढे पैशे ह्यांच्या कडे येतातच कुठुन्?शाहरुख खान आय पी एल ची अक्खि टिमच )गैरलागू आहे... ९० कोटींमध्ये किमान २०० मराठी सिनेमे बनतील...
...मन्गेशाने जुन्नरजवळच्या खेड्यातून एक स्वप्न घेऊन येऊन एफ टी आय आय मध्ये दिग्दर्शनाची पदवी घेऊन मग एक फिल्म लिहिली, त्याला प्रोड्यूसर अर्थात मिळत नाही म्हणून खूप भटकन्ती झाली, काही वर्षे मध्ये गेली.......... लइ कष्टांनी एक प्रोड्यूसर मिळवले आहेत, रवि राय नावाचे...आणि मग बनवलेला आहे सिनेमा...सिनेमा चांगला बनलेला आहे, कुठे कुठे बक्षिसे घेऊन आला आहे, आणि आता रिलीज होत आहे... त्याच दिवशी डीव्हीडी मिळते का ही चर्चा होणे , नक्कीच वेदनादायक आहे.... आता बघा पटते का....
हे म्हणजे लग्नाच्या दिवशी हॉलवर येऊन घटस्फोटाच्या वकिलाने आपले कार्ड दिल्यासारखे आहे, ....
17 Apr 2008 - 12:34 am | अभिज्ञ
आपले "यातना होतात" हे विधान मी तरि जनरल संदर्भात धरले होते/आहे.
हि चर्चा जर मराठी सिनेमांबद्दल असेल तर ह्या बाबत आपण दिलेले स्पष्टीकरण पटते.
परंतु आपण मी आधि विचारलेल्या मुद्यांवर काहिच प्रतिसाद दिलेला नाहि.
१.प्रोड्युसर चित्रपट बनवतो तो काहि व्यावसायिक फायदा पाहुनच.(अर्थातच आर्थिक.)
२.दिग्दर्शक/अभिनेते स्वतःची किंमत (ती काहि विचारु नका) वसुल करतातच.
३.तो वितरित करणारे पण त्यांचा आर्थिक फायदाच पाहतात.
४.चित्रपट दाखवणारे सुध्दा ,आजकालचे मल्टिप्लेक्स, त्यांचा आर्थिक फायदाच पाहतात.
आता ह्या चारहि प्रकारात मला तरि कोणि समाजसेवा करताना दिसत नाहि.(फारच क्वचित ..)
मग राहतो कोण? तो ति़किट काढणारा सामान्य प्रे़क्षकच.
सगळि बंधने त्याच्यावरच का? त्याने जर त्याचा आर्थिक फायदा बघितला तर कुठे बिघडते?
हे म्हणजे लग्नाच्या दिवशी हॉलवर येऊन घटस्फोटाच्या वकिलाने आपले कार्ड दिल्यासारखे आहे, ....
आता उद्या लग्नाला पण तिकिट लावलेत अन घटस्फोटाचा वकिल आला तरि त्याचे अप्रूप वाटणार नाहि.
अबब
17 Apr 2008 - 1:15 am | भडकमकर मास्तर
नाही नाही म्हटलात तरी तुमचा बेसिक मुद्दा पायरसीचे समर्थन असा दिसतो....
आता सिमिलर उदाहरण...
१. शेतकरी भाजी पिकवतो.( फायदा घेउन विकतो..)
२. होलसेलवाला फायदा घेउन आणखी एका रिटेलर ला विकतो.
३. मंडईत भाजीवाला अजून फायदा घेऊन विकतो...
आता मध्येच कोणीतरी चोर त्यातली भाजी चोरून चोरताना खराब झालेली भाजी स्वस्तात विकतो...कोणीतरी घेतेच.... सडकी भाजी गोड मानून खाणारे आहेतच्....त्यात आर्थिक फायदाही होतोच....आता कसली भाजी कशी खायची तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे...पण भाजी चोरीची आहे आणि बेकायदेशीर आहे हे नक्की.....
सगळि बंधने त्याच्यावरच का? त्याने जर त्याचा आर्थिक फायदा बघितला तर कुठे बिघडते?
आता चित्रपट बघणे म्हणजे नक्की काय , ते आधी मनाशी पक्के पाहिजे...
पायरेटेड सीडीवरती संवाद ऐकू न येता चित्रांचा आनंद न घेता फक्त गोष्ट कळणे म्हणजे चित्रपट पाहणे असे ज्यांना वाटते त्यांनी सीडीवरती पहावा...
भरपूर आर्थिक फायदा होईल...
17 Apr 2008 - 9:58 am | आनंदयात्री
आता उद्या लग्नाला पण तिकिट लावलेत अन घटस्फोटाचा वकिल आला तरि त्याचे अप्रूप वाटणार नाहि.
तुमचा हजरजवाबी पणा आवडला ! :)))
17 Apr 2008 - 2:58 pm | आंबोळी
आता उद्या लग्नाला पण तिकिट लावलेत अन घटस्फोटाचा वकिल आला तरि त्याचे अप्रूप वाटणार नाहि.
सहमत... उद्या नवरा-नवरी चे पालक(प्रोडुसर) भरपूर पैसे कमावण्यासाठी पोरांची लग्ने ठरवणार, नवरा , नवरी भरमसाठ बिदागी घेउन लग्नाला उभे राहिले...भटजी (मग तो प्रस्थापीत असो किंवा खेडेगावातून स्वप्न घेउन आलेला असो) स्वत:चा फायदा बघून लग्न लावणार. कार्यालयवाला स्वत:चा फायदा बघुन त्या लग्नाची तिकीटे विकणार. मग स्वत:चा फायदा बघायला घटस्फोटाचा वकिल जर तिथे पोचला तर त्याचे काय चुकले? त्याला पोट नाही? त्याला यातना नाहीत? आणि तिकीटे काढून गेलेल्या सामान्य प्रेक्षकाचे काय? त्याच्या पानात जर जिलबीचा फक्त एक तुकडा येणार आसेल किंवा पोटभर जेवायला मिळणार नसेल तर त्याने कुणाकडे दाद मागायची? त्याने कमी पैशात जास्त जिलब्या मिळवायचा प्रयत्न केला तर काय चुकले?
शेवटी
कन्या वरयते रुपं माता वित्तं पिता श्रुतम्
बान्धवा: कुलमिच्छन्ति मिष्टान्ने इतरेजना:
हेच खरे.
अवांतर : मला ह्या विषयावर प्रतिसाद दिला गेला तरि आम्हि तो वैयक्तिक न घेता चर्चेचा भागच समजु/समजतो.
(मिष्टान्ने चापणारा)आंबोळी
17 Apr 2008 - 6:22 pm | भडकमकर मास्तर
अहो आम्बोळी....
एका लग्नाची गोष्ट झकास... अप्रतिम प्रतिसाद... आवडला....
पण हा चर्चेचा भाग समजा....आम्ही केलेले कौतुक वैयक्तिक घेऊ नका... :):)
17 Apr 2008 - 10:36 am | तात्या विंचू
पतिंग्या नव्हे....
बैलाचे नाव "चितंग्या" असे आहे....
"तुझं आभाळ मला माझं आभाळ तुला" नव्हे...
माझं आभाळ तुला घे..तुझं आभाळ मला...असे हवे....
टिंग्या सुरेख आहे...जरूर बघा....
-सो कॉल्ल्ड समीक्षक
तो मी नव्हेच..
(भडकमकर तुमचा करस्पाँडन्स कोर्स आहे का हो???)
17 Apr 2008 - 10:52 am | धमाल मुलगा
मुक्तसुनितराव,
बहुधा आपण भडकमकरांचं बोलणं व्यक्तिशः घेतलं असावं असा माझा कयास आहे. परंतु जर आपण एका बराच काळ अभिनयक्षेत्राशी निगडीत असलेल्या व्यक्तिच्या जागी स्वतःला ठेऊन हा विचार केला तर नक्की भडकमकरांची तळमळ आपल्याला जाणवेल.
हा जो काही सर्वसाधारण राग आहे डिव्हीडी आणि पायरसीबाबत, त्यापायी कदाचित त्यांच्याकडून आपल्याला दुखावणारी काही वाक्यं आलेली असु शकतात. जसं भ्रष्टाचार, आणि सवंग राजकारणाबाबत बोलताना आपोआप आपल्या तोंडून नेहमीपेक्षा जास्त कडक विचार निघतात तसंच आहे हे.
जोपर्यंत मोठ्या हौसेने आणि अपेक्षेने उभे केलेले नाटक्/चित्रपट केवळ वर उल्लेखात आलेल्या कारणांपायी चालत नाही ना, तोपर्यंत ही अशी तळमळ, चिडचिड मनाच्या गाभ्यापासून नाही हो येत.
अबबशेठ,
आपण हिंदी चित्रपटांचा मुद्दा सरळ बाजुलाच ठेऊया. मराठी सिनेमे हे बर्याचदा सरकारच्या मदतीवर आणि प्रोड्युसर्सच्या हाता-पाया पडून उभे राहतात. इथं दुबईचा पैसा येत नाही. प्रसंगी निर्माता-दिग्दर्शक पदरमोड करुन पैसा उभारतात.
श्वास सारखा अप्रतिम चित्रपट जेंव्हा ऑस्करला जाणार असतो तेंव्हा दिग्दर्शकापासून ते कलाकारांपर्यंत सगळ्यांना हातात पत्र्याची डबडी घेऊन रस्त्यातून 'ऑस्कर-निधी' साठी भिका मागत फिरावं लागतं. ही अवस्था 'सुवर्णकमळ' विजेत्या चित्रपटाची...तर इतरांची काय कथा हो?
आता
सगळि बंधने त्याच्यावरच का? त्याने जर त्याचा आर्थिक फायदा बघितला तर कुठे बिघडते?
ह्यामध्ये आर्थिक फायदा ही 'रिलेटिव्ह कॉन्सेप्ट' वाटते. निर्माता-दिग्दर्शक त्याच्या आर्थिक फायद्यासाठी सिनेमा काढतो, अभिनेते त्यांचा फायदा बघून काम करतात, चित्रपटगृहं त्यांचा फायदा बघतात, ब्लॅकवाले त्यांचा फायदा बघतात (मराठीसाठी ब्लॅक?),
पण म्हणून आपला आर्थिक फायदा बघताना आपण ओरिजनल नव्हे तर नक्कल खरेदी करतो आहोत असं नाहीय्ये का?
म्हणजे पुडा ही पिवळा, त्यावरच्या मुलाचं चित्रही तसंच, आणि नावात मात्र 'पारले-जी' चं 'पाले-जी' करायचं आणि रद्दी बिस्किटं आठ आणे-रुपया कमी किंमतीनं विकायचं असं नाही का होतय?
बिस्किटं दोन्ही पुड्यात आहेत. पुडेही दिसायला जवळपास सारखे आहेत. पण पारलेच्या बिस्किटाची चव, दर्जा 'पाले'च्या बिस्किटाला आहे का?
बरं हे कोण कुठले 'पाले', त्यानी मानकांचं पालन केलं आहे का? त्यांना ब्रँड मार्केटींगचा खर्च आला का? 'पारले'ला हे सगळं आहे, म्हणून त्यांची किंमत थोडी जास्त ! आता मला सांगा, ४ पैसे कमी देऊन टुकार प्रिंट आणायची आणि चित्रपटात काय वाक्यं आहेत, काय बोलताहेत हे कान ताणून ऐकण्याचा प्रयत्न करायचा, चित्रही तेव्हढं योग्य दर्जाचं नसतं. चित्रपट बघितल्याच्या समाधानाची पार काशी होऊन नाही जात काहो?
असो, राग नसावा. माझं बोलणं खटकलं असल्यास मोठ्या दिलानं माफ करुन टाका! अहो, बोलुनचालुन टवाळ आम्ही! आमचं म्हणणं काय मनावर घेता?
-(श्वासच्या ऑस्कर-निधीसाठी भिका मागत हिंडलेला) ध मा ल.
17 Apr 2008 - 11:21 am | आनंदयात्री
वा धम्या, सुंदर अन संयत प्रतिसाद. पायरसीबद्दलची कळ्कळ पोचली. आता ओरिजनलच खरेदी करणार अन एटलिष्ट मराठी तरी थेटरातच बघणार.
भडकमकरांनी अशा तर्हेने वाकडे न बोलता प्रतिसाद द्यायला हरकत नव्हती असे वाटले, असो, भडकमकर साहेब नो ऑफेन्स मिन्ट बरका !
17 Apr 2008 - 11:40 am | धमाल मुलगा
आता ओरिजनलच खरेदी करणार अन एटलिष्ट मराठी तरी थेटरातच बघणार.
आनंदयात्रीशेठ,
शतशः आभार ! असेच आपण सगळ्यांनी ठरवलं तर नक्कीच मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल.
-(आभारी) ध मा ल.
17 Apr 2008 - 12:48 pm | मनस्वी
मी नेहेमी थेटरातच बघणे पसंत करते. आणि खूपच प्रेक्षणीय आणि मनोरंजक वाटला तरच बाजारात चकती आल्यावर चकती घेते.
अवांतर :
म्हणजे पायरटेड न घेता ओरीजनल व्हीसीडी घेतल्यास मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल?
हम्म्म्म.. हे विधान जरा विचारमंथनीय आहे.
अहो कोणाला वाटणार नाही मराठी रंगपट दणदणून निघावा. पण काय आजचे ते चित्रपट, काय ती गाणी, काय ते विनोद (हसू ही रडू!), काय ते नाच (शाळेतल्या गॅदरींगमध्ये तरी चांगले).
(१-२% अपवाद वगळता.जसे उत्तरायण, श्वास, वळू, टिंग्या, डोंबिवली फास्ट, तू तिथं मी इ.)
बनवाबनवी, गंमत जंमत, नवरी मिळे नवर्याला, एकापेक्षा एक, भूताचा भाऊ इ. मनोरंजक चित्रपट देणारा सचिन नवरा माझा नवसाचा देतो, धुमधडाका, थरथराट, दे दणा दण, झपाटलेला महेश कोठारे 'क्यू की मै झूठ नही बोलता' चे मराठीकरण - नाव पण आठवत नाही.
पूर्वीच्या लावण्या बघायला अजूनही मस्त वाटते आणि आत्ताच्या - न बोललेलेच बरे.
हिंदी रंगपटातील कलाकारांना ५-१० मिनिटे झळकवण्याचा अट्टहास, हिंदी गायकांकडून गाणी गाऊन घेण्याचा अट्टहास, वेस्टर्न नाचण्याचा अट्टहास.. का?
किती मराठी चित्रपट संगीताच्या ध्वनीफिती निघतात आज? चांगली गाणी कोणाला आवडत नाहीत. फिटे अंधाराचे जाळे का हाऊसफुल्ल जातो? नव्या पिढीच्या राहुल देशपांडेचे बगळ्यांची माळफुले, दाटून कंठ येतो का वन्स मोअर घेते?
सांगा बरं काल परवा निघालेल्या चित्रपटांची नावे, लक्षात राहिलेले कलाकार, लक्षात राहिलेली गाणी, लक्षात राहिलेले विनोद?
मराठी रंगपटाचा प्रेक्षकवर्ग म्हणाल तर त्याला जे हिंदीत बघायला मिळतेय आणि तो बघतोय, म्हणजेच मराठी, घरच्या चित्रपटांकडून नक्कीच त्याच्या वेगळ्या अपेक्षा आहेत.
श्यामची आई, गोरा कुंभार, शिवाजी महाराज, पिंजरा, दादा कोंडके, राजा गोसावी, दामुअण्णा, दिलीप प्रभावळकर, अशोक सराफ, रंजना, सुलोचना, जयश्री, साधी माणसं, आत्मविश्वास, दोघी, सरकारनामा रुचणारी माणसं पळालेली कोंबडी धरायला का म्हणून जातील.
दर्जा दाखवा पावती मिळेल.
* वरील मत हे वैयक्तिक आहे.
17 Apr 2008 - 12:57 pm | आनंदयात्री
म्हणजे पायरटेड न घेता ओरीजनल व्हीसीडी घेतल्यास मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल?
असहमत .. धम्याला म्हणायचे आहे की थेटरात पाहिल्याने मराठी रंगपट पुर्वीसारखा दिमाखानं उभा राहिल.
बाकी सर्व मुद्द्यांशी अगदी तंतोतंत सहमत. बहुतांशी पिक्चर भुक्कड असतात, काय तो "नाना मामा","नाथा पुरे आता" .. भरत जाधव ने तर आधी चांगले कमावलेले नाव गमावलेय आता .. वात आणतो तो आता अगदी त्या होममिनिष्टर पेक्षाही ..
17 Apr 2008 - 1:04 pm | मनस्वी
भरत जाधव?.. मला नाव आठवलेही नाही!
टुकार पिक्चर बघायला कोण जाईल थेटरात? वेळ खर्च, पैसा खर्च, स्टोरी समजून घेता घेता डोक्याची मंडई. आजचा सामान्य मराठी माणूस त्यापेक्षा मिसळपाव / वडापाव / भेळ खाईल, ताम्हिणीच्या घाटात फिरायला जाईल.
17 Apr 2008 - 1:14 pm | आनंदयात्री
>>टुकार पिक्चर बघायला कोण जाईल थेटरात?
खरे आहे, जत्रा मधले ह्यालागाड त्यालागाड पाहुन त्या भरत जाधवला गाडावे वाटत होते, अर्ध्यातुन उठुन आलो, पैसे गेले मनस्ताप झाला अन "सांगितले होते मराठी पिक्चर नको ! कोणत्या भुक्कड पिक्चरला घेउन आलास !" असे बोलने खाल्ले ते वेगळेच.
पण श्वास, डोंबिवली फास्ट, डोह, सरीवर सरी अशीच काही चांगली चित्र पण येतात ती पहायला मात्र थेटरातच जायला पाहिजे, धम्या म्हणतो तसा खरच या लोकांकडे दुबइचा पैसा नाही. खारीचा वाटा तर उचलला जाइल.
17 Apr 2008 - 2:06 pm | मनस्वी
मान्य.
म्हणजे उत्तम कलाकृती बघायला ५०-१०० करोड लागतातच? पूर्वीच्या लोकांकडे होता का हो दुबईचा पैसा?
श्यामची आई पठडीतला पिक्चर दाखवायला लागतात का करोडोंचे सेट्स, फॉरेन लोकेशन्स आणि स्पेशल इफेक्ट्स?
आम्हाला मराठी माणसाला बांधून ठेवणारे कथा, कलाकार आणि संवाद (डायलॉग्ज्) हवे आहेत.
17 Apr 2008 - 2:53 pm | आनंदयात्री
खरे आहे. येतिल लवकरच तसेही दिवस येतिल.
18 Apr 2008 - 3:40 am | अभिज्ञ
मला वाटते कि हि चर्चा फ़ारच भरकटलि आहे.
मुळात माझा आक्षेप हा "निर्माता दिग्दर्शक ह्यांना फ़ार यातना होतात हो" ह्या वाक्यावर आहे/होता.
श्री भडकमकर आणि धमाल मुलगा ह्यांनि सांगितलेले बरेचसे विचार पटले.
परंतु काहि मुद्यांवर मी तरी सहमत नाहि.
नाहि नाहि म्हंटले तरी तुम्हि पायरसिचे समर्थन करताय.......
भडकमकरांनि आम्हाला या पायरसिच्या वादात शेवटि ओढलेच.)
नुसतेच मराठी चित्रपट चालत नाहित हि बोंब मारत सुटायचे,हे गेले कित्येक वर्षे मी पाहतोय,
ऐकतोय.....वरील चर्चांमधुनहि हाच सुर ऐकायला मिळाला.
आपल्याला असेच म्हणायचे आहे ना......कि
"एकतर चित्रग्रुह नाहित,वर सांगितल्याप्रमाणे प्रेक्षकवर्ग नाहि.त्यात परत हि पायरसिची भानगड...म्हणजे निर्माता/दिग्दर्शक झोपलाच की. मग निर्माता शेवटि कंटाळून चित्रपटाचे हक्क एखाद्या टी.व्हि.चॆनेलला विकून स्वत:चा खर्च
काढून घेतो.............मग काय घरबसल्याच जाहिराती पहात पहात तो बघायचा.तोच एक शेवटचा नैतिक मार्ग."
डी.व्हि.डी...............
मुळात मराठी चित्रपटाचि डी.व्हि.डी निघते का हो?(चोथी शक्यता...)
बर हि डि.व्हि.डि. प्रत्येक वेळेस पायरेटेडच असेल कशावरून? मग ती ख्ररेदि केली तर बिघड्ले कुठे?
किंवा लोकांनि त्या चित्रपटाचा भर ओसरुन तो चित्रपट डि.व्हि.डि वर येइ पर्यंत वाट पहायचि?
मराठि चित्रपटांना ह्या बाबी लागु होताना दिसतच नाहीत.
मराठी चित्रपटाचि डी.व्हि.डी मी तर फ़ार क्वचित वेळा पाहिलि असेन.
महाराष्ट्रात अशा किति चित्रग्रूहात मराठी चित्रपट लागतात हो?
आणि लागले तर किती दिवस चालतात?एकुणच पहायच्या संधि कमीच.....
मग माणुस जर ह्या माध्यमाकडे जर वळाला तर त्यात नवल ते काय?किंबहुना अशा वेळि तो प्रामुख्याने हिंदि
चित्रपटाकडे वळतो.आणि खुद्द महाराष्ट्रात जर ही अवस्था तर बाहेर हा प्रश्नच येत नाहि. (ह्याच पुण्या मुंम्बैत भोजपुरी चित्रपट मात्र जोरात चालतात.)
आता वळुयात पायरसिकडे....
मुळात पायरसि वाइट हेच विधान मी चुकीचे मानतो.किंवा पायरसि हि सुद्धा relative concept आहे.
आश्चर्य वाटून घेउ नका.भडकमकर आणि ध.मु. ह्यांनि दिलेली उदाहरणॆ अजिबात पटत नाहित.
आपण सांगितलेली सडकि भाजी आणि पारले-पाले उदाहरणे दिशाभुल करणारी आहेत.
ती पायरसिच्या व्याख्येत जरी बसत असलि तरी ती इथे लागु होत नाहीत.
आमच्या मतानुसार चित्रपटाचि डी.व्हि.डि. आणि सि.डि. हे दोन्हि प्रकार मुळ चित्रपटच दाखवतात.
त्यात सडकि भाजी किंवा पाले जी असला प्रकार नसतो.(इथे बनावट आहे.)
अबबशेठ,
आपण हिंदी चित्रपटांचा मुद्दा सरळ बाजुलाच ठेऊया. मराठी सिनेमे हे बर्याचदा सरकारच्या मदतीवर
आणि प्रोड्युसर्सच्या हाता-पाया पडून उभे राहतात. इथं दुबईचा पैसा येत नाही. प्रसंगी निर्माता-दिग्दर्शक पदरमोड करुन पैसा उभारतात.
श्वास सारखा अप्रतिम चित्रपट जेंव्हा ऑस्करला जाणार असतो तेंव्हा दिग्दर्शकापासून ते कलाकारांपर्यंत
सगळ्यांना हातात पत्र्याची डबडी घेऊन रस्त्यातून 'ऑस्कर-निधी' साठी भिका मागत फिरावं लागतं.
ही अवस्था 'सुवर्णकमळ' विजेत्या चित्रपटाची...तर इतरांची काय कथा हो?
मान्य...........
आता फ़क्त मराठी सिनेमांनाच पायरसिचा धोका का हो?
तामिळ,तेलुगु,कन्नड सर्वच भाषांच्या चित्रपटांच्या पायरेटेड डी.व्हि.डी. पोत्याने मिळतात,
तरीहि तिथली थेअटर्स हाउसफ़ुल्लच दिसतात.
मग चुकतेय कुठे?
मला वाटते कि मराठी चित्रपटांची अधोगति होण्यास ही पायरसि जबाबदार नसुन बाकी बरेचसे प्रकार मुख्यत: जबाबदार आहेत.
१.बॉलिवूड........मुख्य धोका तोच आहे.मराठी चित्रपटांच्या अधोगतिस हाच एक जबाबदार असा भाग आहे.
मराठी चित्रपटस्रुष्टि घ्या किंवा मराठी भाषाच घ्या....अस्तित्वासाठी जेवढा संघर्ष ह्यांना करावा लागतो तेवढा संघर्ष
कुठ्ल्याही भाषेला करावा लागत असेल असे माझ्या पाहण्यात तरी नाहि.
मराठी सिनेमाला जगवायचे असेल तर हि बॉलिवूडची घाण प्रथम इथून बाहेर काढलि पाहिजे.
२.मराठी चित्रपटांचि जास्त जाहिरात होताना दिसत नाहि.
३.आर्थिक अभाव,प्रदर्शनाकरिता उपलब्ध संधि नाहित....
४.एकंदरीत मराठी समाजाचि उदासिनता.....................
आणिक बरेच काहि देता येइल....
तर मुद्दा हा पायरसि संदर्भात होता...........
या पायरसि संदर्भात मी इथे काहि उदाहरणे देउ इच्छितो.
१.मायक्रोसॉफ़्ट विन्डोज चे उदाहरण तर सर्वश्रुत आहे.
आपल्या पैकि किति जणांनि आजपर्यंत हा प्रकार कधिहि पायरेटेड वापरलेला नाहि?
ह्याचे उत्तर जवळपास ० असेच असेल.
बाजारात ह्या सॉफ़्टवेअरचे पायरेटेड वर्जन बहुत करून मायक्रोसॉफ्ट्च आणते अशीच धारणा आहे.
२.आमच्या व्यावसायिक अंगात autocad नावाचे एक सॉफ़्टवेअर आहे.
माझ्या माहिति प्रमाणे हे बनवणारी कंपनीच ह्याचे पायरेटेड वर्जन बाजारात आणते.
आता ह्या दोन्हिहि अतिशय प्रस्थापित अशा कंपन्या आहेत.तरीहि दोन्ही हा प्रकार करतात.
कारण सोप्पे आहे.बाजारावर पकड.
माणसाला आपल्या उत्पादनाचि सवयच लावून टाकतात.माणसाला त्या प्रणालीचा गुलाम करुन टाकतात.
मग हळूहळू माणूस एक का होइना ओरिजिनल वर्जन घेतोच.
समजा ,विण्डॊज हि वर्जन जर पहिल्यापासुनच फ़क्त पैशे देणा-यालाच मिळेल ह्या तत्वावर त्यांनी जगात राबवली असति
तर आजपर्यंत एवढि हीट झाली असति का?
आधि मला विंडोज हे काय आहे हे जो पर्यंत कळ्त नाहि तो पर्यंत मी तरी ती कशी काय विकत घेउ?
३.आपण टि.व्हि.,वर्तमानपत्र ह्यात ब-याच वेळा ऐकले/वाचले असेल,कि
अफ़गाणिस्तान,पाकिस्तान येथे हिंदि चित्रपट फ़ारच हिट आहेत.तेथे ते officially प्रदर्शित होत नाहित
तरिहि ते तेथे पायरेटेड सी.डी. वगैरे प्रकाराने उपलब्ध असतात.
त्या बद्दल एकाहि बॉलिवूडकराला मी गळे काढताना पाहिलेले नाहि.उलट ह्याचे आपल्या सर्वांना कौतुकच असते, नाहि का?
मग मला तरी हाच प्रश्न पडतो कि च्याइला आपणच का एवढे कर्मदरिद्रि?
का नाहि आपले चित्रपट चालत,ते हि आपल्याच राज्यात!!!!!!!!!!
मुळात आपली कला/अविष्कार लोकांपर्यंत पोहोचतोय का?लोकांना ते माहिति आहे का?
लोकांपर्यंत आपले काम कसे पोहचोवता येइल?
लोक येउन माझे काम पाहणार का मी स्वत:हा ते लोकांना दाखवायला पाहिजे?
हे विचार कोणि करतेय??????
खरि गोम तर मला इथेच आढळते.
लोकांनि येउन माझे काम पहावे.ते हि पैशे देउन (अर्थातच).मी कशाला लोकांना दाखवायला जाउ?
आधि माझा झालेला खर्च काढा.............हि असलि व्रुत्ति.............
अरे मित्रा, जर तुझ्या सिनेमाच्या पाय़रेटेड सि.डि. बाजारात आल्या तर त्यातूनहि तुलाच प्रसिद्धि मिळते.
लोकांना नाहि.त्याप्रसिद्धिवर तुलाच पूढचे चित्रपट जास्त फ़ायदा करतिल.
आज संदिप खरे,सलील कुलकर्णि हे का एवढे प्रसिध्द आहेत?त्यांचि गाणिहि नेटवर मिळतातच कि फ़ुकट.
तरिहि लोक त्यांच्या शोजना गर्दि करतातच ना.
का? तर तिथे दर्जा तर आहेच,पण तो लोकांपर्यंत पोहोचवण्यात ते यशस्वी झालेत.
आणि हा प्रकार फ़क्त चित्रपटांच्या बाबतीत आहे असे नाहि.
नाटक घ्या.पुणे मुंबई सोडले तर नाटकाचा प्रोडुयुसर मराठवाडा,विदर्भ अशा लांबच्या ठिकाणि जायला नाखुशच असतो.
का तर तिथे नाटकाला कितपत प्रतिसाद मिळेल अशि शंका.
पुण्यात तर कानडि,तेलुगु वगैरे बहुभाषिक वर्तमानपत्रे मिळतात.पण बेळगाव सोड्ल कि महाराष्ट्राबाहेर मराठी व्रुत्तपत्रे
का मिळत नाहित?
सगळी कडे आर्थिक गणितेच पहायचि.नाहि का?
आत्ता खरि गरज आहे ती "मराठी चित्रपट बघा" हे सांगायचि.मग तो तुम्हि थेटरात बघा किंवा पायरेटेड सी.डि. वर बघा.
कसाहि बघा ,अरे पण बघा.उगाच नसत्या झुलि पांघरुन बसु नका.
बाकि,
मुळात तुम्हाला "श्रीमंत झालेला मराठी" पहायचाय की "श्रीमंत झालेली मराठी" पहायचि आहे?
पहा, दोन्हित खुप फ़रक आहे.पहिल्या प्रकार घडल्याने दुसरी गोष्ट घडेलच असे नाहि,पण दुसरा प्रकार
घडला तर पहिले प्रकार लाखोंनि पहायला मिळतिल.
(मराठी सिनेमाप्रेमी) अबब
अवांतर-असो, राग नसावा. माझं बोलणं खटकलं असल्यास मोठ्या दिलानं माफ करुन टाका! अहो, बोलुनचालुन टवाळ आम्ही! आमचं म्हणणं काय मनावर घेता?
हे कोणाकरिता होते?
17 Apr 2008 - 2:07 pm | भोचक
माझं आभाळ तुला घे तुझं आभाळ मला
आठवांच्या पारंबीला बांधू एक झुला
ही प्रकाश होळकरांची एक छान कविता आहे. त्याचेच टिंग्यामध्ये गाणे केले आहे. होळकर मुळचे लासलगाव (जि.नाशिक) येथील कवी आहेत. नव्या पिढीतील होळकर एक सशक्त कवी आहे. त्यांच्या कविता आशयघन आहेत. कोरडे नक्षत्र हा त्यांचा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला आहे.
17 Apr 2008 - 3:54 pm | ब्रिटिश टिंग्या
बघितला पाहिजे टिंग्या.....
अवांतर -
चामारी आमच्या नावाचा शिणेमा???? अन् आमाला त्याचं आवतान बी नाय......
आयला कमीत कमी रॉयल्टी तरी द्या राव.......
आपला,
(वरिजनल) टिंग्या ;)
17 Apr 2008 - 6:10 pm | धमाल मुलगा
सर्वप्रथम आनंदयात्री माझ्या म्हणण्याशी सहमत झालात, आणि माझ्या अनुपस्थितीत किल्ला लढवलात त्याबद्दल आभार!
मनस्वी,
अगदी बिनतोड आहेत तुझे मुद्दे.
अगदी मान्य!
पण ह्याच्या मुळाशी दुष्टचक्र आहे. 'प्रेक्षकांची अशी आवड/मागणी असते म्हणून आम्ही असं बनवतो'...आणि 'दुसरं काही नाही म्हणून हेच बघतो'
सास-बहू इ.इ. प्रकार आधी बघायचे, नंतर चटक लागली की टाळता येत नाहीत! लोक बघताहेत म्हणून बदाबदा सगळ्या असल्याच मालिका काढायच्या...असाच प्रकार आहे मराठीतही.
बरं, काही वेळा दर्जेदार देणार्यांनाही सवंग देणं भाग असतं... प्रत्येक प्रकारची लाट येत असते, इनोदी की इनोदीच....बांगड्या आणि तंगड्या की तेच ते...रोमँटीक आले की फटाफट तसलेच आणखी चित्रपट. इथं अस्तित्व टिकवणं हे देखील एक कारण असतं. शेवटी वाहत्या गंगेत हात धूणं कोणाला नकोय?
फिटे अंधाराचे जाळे का हाऊसफुल्ल जातो? नव्या पिढीच्या राहुल देशपांडेचे बगळ्यांची माळफुले, दाटून कंठ येतो का वन्स मोअर घेते?
अभिरुचीसंपन्न प्रेक्षक/रसिक नक्कीच चांगलं तेच उचलतात...पण हेच रसिक नक्की आपल्या कलाकृतीला पहायला येतीलच, ह्याची खात्री वाटली नाही की मग असं व्हायला होतं!
आजही चांगले चित्रपट निघत आहेत. आता, नाण्याच्या बाजूप्रमाणे चांगल्याबरोबर वाईटही येणारच. फरक एव्हढाच आहे की वाईट जास्त आहे, चांगलं कमी. कारण सोपं आहे, चांगल्या कलाकृतीसाठी जास्त मेहनत घ्यावी लागते, विषयाचा योग्य अभ्यास करावा लागतो. त्यात वेळा खर्ची पडतो, पैसाही लागतो...एव्हढ्या वेळात जर आलेली लाट परत गेली तर? म्हणून बरेच जण आपली पोळी ह्या तापल्या तव्यावर भाजून घेतात! परिणामः तद्दन भिकार चित्रपट.
मला खात्री आहे, परिस्थिती नक्की सुधारेल. गजेंद्र, मंगेश, किंचित संतोष ही आणि अशी मंडळी नक्की मराठी रंगपटाला वर आणतील. हळू हळू प्रेक्षकांच्या अपेक्षा बदलतील...सातत्याने असे दर्जेदार चित्रपट आल्यानंतर त्यांची सवय लागून फालतू प्रकार प्रेक्षकांकडून नाकारले जातील. पण..थोडा धीर धरायला हवा, पुन्हा बाळसं धरायला जरा वेळ लागेलच की. काय?
दोन्ही प्रश्नांचे उत्तर एकच : 'नाही'
आणि कोण म्हणतं करोडोंनी पैसा ओतले की चित्रपट चांगले बनतात? लो-बजेट वाले नागेश कुकनुरचे चित्रपट आहेत साक्षीला..
आणि भव्य-दिव्य सेट्सवाले गर्भश्रीमंत चित्रपटही...जे सडकून आपटले आहेत. अर्थात हा नियम सार्वत्रीक नाही.
दुबईचा संदर्भ मी अबबशेठच्या हिंदी-मराठी चित्रपट तुलनेशी बोलताना दिला होता.
त्यासाठी गरज आहे ती उत्तम लेखकांची, दिग्दर्शकांची आणि सकस अभिनयक्षमतेच्या अभिनेत्यांची...हे सगळं येतं ते पैसा ओतूनच.
मग त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज नको व्हायला? त्यांना योग्य तो मोबदला नको मिळायला? हाच माझा सूर आहे...चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पहा म्हणण्यामागे.
17 Apr 2008 - 6:45 pm | मनस्वी
हे विधान चुकीचे वाटते (तुझे नाही, जो करतो त्याचे.) ही प्रेक्षकांची आवड अजिबात नसते, म्हणूनच गर्दी खेचत नाही.
बरोबर आहे. पण सिनेमा, नाटक, मालिका हे समाजाशी संवाद साधण्याचे एक माध्यम आहे असे मी समजते. आजच्या मालिका बघणार्या बहुसंख्य महिला वर्गाची सायकोलॉजी बदलण्याची शक्ती त्यांच्यात असते आणि त्यांनी ती सत्कारणी लावावी असे मला वाटते.
आज विचारले तुला टिपरे आवडेल की या सुखांनो - तर पटकन टिपरे हेच उत्तर येईल.
रडुबाई, हतबल, काळी जादू, जळुबाई, खलनायकी विचार न येता आधीच टेन्शनमध्ये असलेल्या बायकांच्या मनात हलकेफुलके, प्रगल्भ, विनोदी, खंबीर असे विचार यावेत असे मला वाटते.
हवाय कशाला तोच रसिक. आपापला प्रेक्षकवर्ग तयार करा पण तो तरी कायम ठेवा. जसे दादा कोंडके.
बरोब्बर. म्हणून पोळी भाजून घेणार्याने भाजावी पोळी. पण ती पोळी त्यांची त्यांनाच खावी लागणार आहे हे विसरू नये. असे म्हणू नये मराठी प्रेक्षकाने पाठ फिरवली वगैरे.
मान्य आहे.
बाळसं धरता धरता २० वर्ष सरली हो. बाळाचा बाळ्या झाला.
हो, मी सहमत आहे. म्हणूनच म्हटलं, चांगला मराठी सिनेमा चित्रपटगृहात जाउनच बघावा. आणि त्याची सीडी / व्हीसीडी पण ओरीजनलच घ्यावी.
टुकार चित्रपटांची पायरटेड तरी कोण घेणारेय?
17 Apr 2008 - 7:47 pm | मुक्तसुनीत
भडकमकर आणि धमु यांना थोडे स्पष्टीकरण देणे योग्य होईल. मी नोंदवलेला निषेध हा भडकमकरांच्या एका विधानाचा निषेध होता. त्याबाबत मी व्यक्तिगत आकस किंवा अनादर दाखविलेला नाही. त्यांचे विधान मी व्यक्तिशः घेतले असे धमु म्हणतात. तसे ते सरळसरळ व्यक्तिगत निर्देश करणारे होतेच. भडकमकरांची तळमळ मी समजतो असे मी याधीच म्हण्टले आहे. या निमित्ताने त्यानी हा महत्त्वाचा मुद्दा प्रकाशात आणला, लावून धरला हे स्पृहणीय आहे.
धमु आणि आनंदयात्री यांचे प्रतिसाद विशेष उल्लेखनीय, समंजस आहेत. त्यांचे अभिनंदन.
18 Apr 2008 - 11:41 am | धमाल मुलगा
क्या बात है! नक्कीच!
तेच रसिक मी अश्या अर्थानं म्हणालो, की जे कलेसाठी गर्दी करतात..जीव टाकतात.
सुरुवात झालेली आहे... निव्वळ इनोदी चित्रपटांचा रतीब घालून तेच ते दाखवणं कमी झालं असून सुधारित दर्जाची निर्मीती चढत्या भाजणीने निदर्शनास येऊ लागलेली आहे.
:-)) जेव्हा एक देशपांडा एका जोश्याशी सार्वजनीक ठिकाणी बोलताना देखील मायमराठीचा वापर करायला लाजतो तेव्हा हा प्रश्न विचारणंच चूकीचं ठरतं. सर्वसाधारण मनोवृत्ती म्हणजे, "थेटरात जाऊन तिकीट काढून पिक्चर बघायचं आणि तेही मराठी? काय येडा झालास का तू?"
काही प्रमाणात असहमत. प्रसिद्धी नक्कीच मिळते, कित्येकांची अशीही उदाहरणं आहेतच की, ज्यांचे चित्रपट सडकून आपटले, कुत्रंही गेलं नाही बघायला, पण त्यांना पुढे कामं मिळत गेली...यशस्वीही झाले.
का नाही?
मायबाप प्रेक्षक, कलेची सेवा इ.इ. सगळ्या गोष्टी मनाला समाधान देतात, पण त्या समाधानाच्या जोरावर मुलांना चांगल्या शाळेत प्रवेश नाही घेता येत, त्यासाठी मोजावा लागतो तो पैसाच. दोन वेळचं जेवण-खाण, औषध-पाणी हे समाधानाने नाही विकत घेता येत.
पुर्वीचे मराठी अभिनेते आर्थिक गणितं पहायचे नाहीत, काही अपवाद वगळता काय झालं त्यांच्या आयुष्याच्या शेवटी?
शेठ, एके काळी आम्हीही व्यावसायीक नाटकं केली आहेत. एका दौर्याचा खर्च किती येतो, काय त्रास पडतो हे चांगलं ठाऊक आहे.
स्थळाप्रमाणे आवड बदलते. पुणे-मुंबई सोडलं तर इतर ठिकाणी फार्सिकल शिवाय फारसं काहीच चालत नाही.
पुण्या-मुंबईत 'गोलपीठा' चाललं(!) म्हणून ते इतर ठिकाणी चालेलच ह्याची वेडी आशा बाळगणं योग्य नाही. तिथे 'मोरुची मावशी' आणि 'वासुची सासु' च न्यायला हवं.
असो, बरंच पुराण चालवलं मी. आता थांबतो.
मुक्तसुनीतराव,
अभिनंदनाबद्दल आणि विशेष दखल घेतल्याबद्दल आभारी आहे.
-ध मा ल.
24 Apr 2008 - 8:44 am | प्रभाकर पेठकर
पायरसी थांबविण्याच्या उद्देशाबाबत खुद्द निर्माते किती उदासीन आहेत हे खालील लिंक वर वाचता येईल. http://www.loksatta.com/daily/20080424/mp06.htm
24 Apr 2008 - 3:11 pm | डॉ. श्लोक _भातखंडे
आता निर्मात्यांनाच उत्साह नाही पायरसी थांबवायसाठी तर आम्हाला का असावा?
... मी अबब साहेबांशी सहमत आहे, पायरेटेड प्रिंट पाहायचे त्यांचे लॉजिक आम्हाला आवडले.
24 Apr 2008 - 3:17 pm | मनस्वी
डॉक्टर.. तुम्हीसुद्धा..??
:)
24 Apr 2008 - 3:48 pm | डॉ. श्लोक _भातखंडे
आम्हाला फक्त लॉजिक आवडले....पायरेटेड प्रिंट संवाद ऐकू येत नाहीत त्यामुळे अजिबात आवडत नाहीत... केबलवाला लावतो तेव्हा मी ती प्रिंट पाहत नाही....एक अक्षर कळत नाही...आपल्याच भाषेतला पिक्चर तमिळ किंवा मल्याळी सिनेमासारखा पहावा लागतो , ते मला आवडत नाही.....
28 Apr 2008 - 11:46 pm | प्रमोद देव
टिंग्या हा चित्रपट बर्याच लोकांना आवडला तो त्यातल्या कथेमुळे आणि त्यातील कलाकारांच्या अभिनयामुळे. विशेषतः टिंग्याच्या भूमिकेतील बालकलाकाराच्या अभिनयामुळे. मी स्वतः चित्रपट पाहात नसल्यामुळे माझे स्वतःचे असे ह्याबाबत काहीच मत नाही.आत्तापर्यंत इतरांकडून ऐकलेल्या मतांमध्ये जरा वेगळे वाटलेले आणि विचारप्रवृत्त करणारे हे मत वाचल्यावर ते आपल्यासमोर मांडावे असे वाटले.
त्या चित्रपटाच्या कथेसंबंधात आणि एकूणच आपल्या प्रेक्षक मंडळींबद्दल एक गमतीदार तरीही वास्तववादी वाटणारा हा अभिप्राय वाचा.
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
29 Apr 2008 - 1:03 am | भडकमकर मास्तर
प्रमोदकाका,
माचकरांचा वरील लेख एकदम मस्त आहे.. आवडला... <):)
29 Apr 2008 - 1:50 pm | प्रभाकर पेठकर
प्रमोदकाका,
अभिप्राय वाचला. अंतर्मुख करायला लावणारा आहे. आवडला.
श्री. स _भडकमकर
प्रमोदकाक?
प्रमोदकाकांना तुम्ही अगदीच कावळा करून टाकलेत हो... असे करू नका. प्लीज...