केळीची मांडलेली पाने.
अन पानापानावर सांडलेले जिन्नस..
कुठेतरी मधुनच डोकावणारा..
शुध्द तुपातला बेसनलाडु..
द्रोणांचे खोल डोह..
सांबारावर तरंगणारी दगडफुले..
पुन्हा पुन्हा मागणारे..
लग्नावळीतील बेलाज हावरे..
दूर दूर जाणारे वाढपी..
अन त्यांना पुन्हा पुन्हा बोलावणारा मी..
- खुशाल.
प्रतिक्रिया
12 May 2010 - 8:15 pm | चिरोटा
द्रोणांचे खोल डोह..
सांबारावर तरंगणारी दगडफुले..
सुंदर!
P = NP
12 May 2010 - 8:25 pm | मदनबाण
वा... चवदार कविता. :)
मदनबाण.....
When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss
13 May 2010 - 5:32 am | बेसनलाडू
एकदम चवदार, चित्रदर्शी! आवडले.
(हावरट)बेसनलाडू
13 May 2010 - 10:20 am | भारद्वाज
एक नंबर भावा
-खादाड्या
13 May 2010 - 1:39 pm | विशाल कुलकर्णी
अगदी माझ्या मनातलं बोललास रे मित्रा =D>
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"