"त्या" धाग्याबद्दल मिलिंद फाटक यांचे स्पष्टीकरण

शानबा५१२'s picture
शानबा५१२ in जनातलं, मनातलं
11 May 2010 - 8:28 pm

माझा हा लेख(?)
http://misalpav.com/node/12218
काही दीवसांपुर्वी तुम्ही वाचायचा त्रास घेतलात त्याबद्दल धन्यवाद...........
त्यातली मध्यवर्ती भुमिका करणारे 'मिलिंद फाटक' त्या लेखात ज्यांना 'हीरो' असे संबोधले आहे ते.ह्यांनी त्यावर ही प्रतिक्रिया दीली.........

"धन्यवाद,comments छान आहेत,पण एक चुक आहे.फक्त टकला म्हणून नाही तर माझ्या चेह-यावर डाग ही असतात,मी वयाने मोठाही असतो आणि मला चस्मा ही असतो."

मग मी जरा आगावपणा(?) केला,आता तो आगावपणा का ते सांगतो थांबा नंतर......पहील मी काय प्रतिसाद दीला तो लिहतो.......
"शतशा: आभार फाटक सर,
अहो पण फाटक सर मुद्दा कायम राहतो ना!! त्या आनंदीने 'त्या' माणसाच्या व्यंगामुळेच त्याला नाकारले ना? मग काय निंर्मात्या मंडळीना हा असा शेवट दाखवुन 'तिने' योग्य केले केले असे दाखवायचे होते का? अहो तेच तर दाखवलय ना? मग हा एक चुकीचा संदेश नाही का?
जर त्यांनी शेवटी ते दोघे एकत्र आनंदाने राहतात.......आनंदी आपल्या नव-याने जे केले त्यासाठी त्याच्याशी कृतज्ञ राहुन त्याला स्विकारल असत तर तो चांगला शेवट झाला नसता का?असा शेवट करुन एक चांगला संदेश देता आला नसता का?? की त्या निर्मात्या मंडळीनी ठरवुनच तशी कथा बनवली?
नाही त्या कथेचे समर्थन कोणीच नाही करु शकत..आपण ते केले अस मी नाही म्हणत........पण हो ते पात्र छान साकारलत."

झाल तो लेख लिहुन मस्त १०-१५(एकुण ३०) comments आल्या.............मग घरातल्या एका सदस्याशी चर्चा(?) चालु असताना मी हा विषय काढला "काय तो end दाखवलेला 'ह्या!!'.....जरा चांगला message पोहचवाना....मला दोन तास दीले असते तर मी स्वःता एक चांगला शेवट सुचवला असता"......हे एकुन "हा राहु दे" अशे काहीसे भाव समोरच्याच्या चेह-यावर आले.व ती व्यक्ती म्हणाली "त्यात कुठे अलग राहताना दाखवलेत.ते एकत्रच राहतात..त्या नंणदचा त्रास असतो म्हणुन ते वेगळ घर घेतात पण एकत्रच राहतात........नीट पुर्ण बघितलस तरी का? की आठवत नाहीये?(मला एखादी गोष्ट नाही आठवली की त्याचा दोष माझ्या स्म्रुतीभ्रष्ट करणा-या सवयींना दीला जातो व मला थोबाड बंद ठेउन एकाव लागत....तेव्हा पण तेच केल)
मग बोललो च्यायला लिहुन तर झाल राहु दे आता कोणाच काय नुकसान होतय??आणि माझ तर नव्हतच होत मग कशाला त्रास?...चालु द्या चर्चा......त्या एका कधी न झालेल्या मालिकेच्या शेवटावर!

पण आज मिलिंद फाटक ह्यांचा message आला............
"do publish my comment. Add this to it.आनंदीला आपला नवरा टकला आहे हे कळत नाही,कारण तिला डोळे येईपर्यंत ते physically अगदीच जवळ येत नाहीत.
Secondly,endला ते दोघेही एकत्र राहतात पण ते वेगळ घर करतात.कारण दोन्ही सुना एकत्र राहु शकत नाहीत म्हणुन.I think सिरियल नीट न बघता ह्या comments केल्या गेल्या आहेत.
So please clear the misunderstanding."

धन्यवाद मिलिंद सर.

मी बोललो चला आता एक कारण भेटल आहे चुक rectify करायला म्हणुन हे लिहल.बाकी आपण काहीतरी उद्देश ठेउन लिहतो भाउ.
आणि हो माझा तो लेख वाचुन कोणी एखादा मराठी माणूस गालातल्या गालात जरी हसला असेल तर अशी चुकी केल्याचा मला काडीचा पश्चाताप वाटत नाही.(तसा मला ज्या गोष्टींचा पश्चाताप वाटला पाहीजे अस खुपजणांना वाटत त्या गोष्टींचाही मला पश्चाताप वाटत नाही हो!)
ओके बाय,खुश रहा.

मांडणीप्रतिसाद

प्रतिक्रिया

शुचि's picture

11 May 2010 - 8:34 pm | शुचि

चश्मा आणि मोठं वय - हे निकष झाले का नाकरण्याचे. काही जणांना हेच आवडतात असो.

चेहेर्‍यावरच्या डागांना "क्लिअरेसिल" लावा म्हणावं

काय बालीशपणा आहे. ती मुलगी आंधळीच रहायला हवी होती. X(

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||

टारझन's picture

11 May 2010 - 8:36 pm | टारझन

बा शाणबा .. काय चाल्लंय तुझं हल्ली ? बरा आहेस ना भो ? :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 May 2010 - 8:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आरं शानबा...! व्यंगामुळे नाकारणे वगैरे योग्य नाही असे आपण फार तर म्हणू.
दिग्दर्शकाला वाटेल तसे कथेत फेरबदल होतात. आपण कशाला इतकं विचार करत बसायचं.

मिलिंद फाटक कोण ? मालिकेचे निर्माते आहेत का ? सॉरी हं काही लिंक लागेना राव...! :(

-दिलीप बिरुटे

टारझन's picture

11 May 2010 - 8:53 pm | टारझन

कृपया शाणबा दादा किंवा अहमदनगरी दादांना विणंती आहे , की "मिलींद फाटक यांना अनावृत्त पत्र" लिहावे .

-(पत्र प्रेमी) अनौवृत्त पत्र

इंटरनेटस्नेही's picture

12 May 2010 - 2:36 am | इंटरनेटस्नेही

असे पत्र लिहिल्यास नक्कीच वाचायला आवडेल! =))
--
इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.

शानबा५१२'s picture

12 May 2010 - 9:57 am | शानबा५१२

त्यातली मध्यवर्ती भुमिका करणारे 'मिलिंद फाटक' त्या लेखात ज्यांना 'हीरो' असे संबोधले आहे ते

अहो दीलीप भाउ,वाईस धागा वाचायचा तरास घ्या की..........

शिल्पा ब's picture

11 May 2010 - 9:49 pm | शिल्पा ब

एका मालिकेवरून दोन लेख ? अहो शेवटी ते काही खरं नसतं...बघायचं आणि सोडून द्यायचं...काय एवढं महत्त्व द्यायचं त्याला..

http://shilpasview.blogspot.com/