खुप दीवसांपासुन लिहीन म्हणात होतो,तर आज लिहतो.
काही दीवसांपुर्वी Star प्रवाह ह्या गरज नसताना चालु असलेल्या वाहीनीवर "गोष्ट एका आनंदीची" ही मालिका चालु होती.ती मालिका म्हणजे मालिकांची 'मालिका' होती,म्हणजे 'गोष्ट एका लग्नाची'.नंतर "गोष्ट एका कॉलेजची"............वगैरे आणि नंतर हे "गोष्ट एका आनंदीची".
त्या कथेत आनंदी एक आंधळी मुलगी असते,दीसायला सुदंर....लग्नाच्या वयात आलेली.आई बाबांची लाडकी,त्या आईबाबांना सारखी तिची काळजी.......तिच लग्न कस होईल,नवरा हीला प्रेम देइल का,सासरची माणस कस वागवतील वगैरे.हीच ऑपरेशन करुन तिला द्रुष्टी येणार नाही अस त्यांच्या डॉ़क्टरांच मत असत.
काही काळाने तिच्या लग्नासाठी शोधाशोध सुरु होते..मुलाची हो......मुलगा असतो तो "कुलवधु"(Zee मराठी) मधे नाही का टक्कल असणारा आसावरीचा भाउ.नाही माहीती हा बघा.........
" alt="" />
आता ह्यातला कोण तो,ते सांगायला नको....
हा तर त्यांच लग्न ठरत.....आनंदी नावाची ती बया लग्नाला तयार होते.तिने त्याला बघितलेल नसत आणि प्रेम वगैरे तस काही प्रगती मार्गावर असत काही भेटींनंतर.त्याच लग्न होत ही त्याच्या घरात जाते,सासरची माणस बरी असतात,typical मराठी सिरियलप्रमाणे मधीच एक नासका वाटाणा म्हणुन तीची नणंद खडुस दाखवलेय,तो मुद्दा नाही.
तर लग्नानंतर ह्या भाईला वाटत आपण आनंदीला चांगल्या डॉक्टरांना दाखवु.तस सास-याला सांगतो..सासरा पण केस नसलेला......तो जावयाच कौतुक करतो.
हीरोच्या मनात पाल चुकचुकते........जर आनंदीला दीसु लागल्यानंतर तिने मला अस पाहील आणि तीला हे आवडल नाही,तिला फसल्यागत वाटल तर.व तिने आपल्याला नाकारल तर??.....'हे अस पाहील तर' म्हणजे टक्कल पाहील तर.
तो अस्वस्थ होतो......पण..........नाही आनंदी माझ्यावर पेम करते........मी तिला आधार दीलाय तिच्या कठीण वेळेत..........ती मला माझ्या आहे त्या रुपात स्विकारेल अस त्याला वाटत.डॉक्टर सांगतात तिला ऑपरेशनने दीसु लागेल व तो ऑपरेशनसाठी तयार होतो.....आनंदीही होकार देते.
ऑपरेशन यशस्वी होत,काही दीवसांनी डोळ्यावरची पट्टी काठायची वेळ येते.त्या दीवसांदरम्यान आनंदी व हीरो जास्त जवळ येतात...........आनंदी सुखावते मी ह्याना बघणार म्हणुन!! हीरो स्वःताला मानसिकद्रुष्ट्या तयार करतो.........पट्टी काढायचा दीवस येतो..पट्टी निघते............आनंदी समोर एका माणसाला बघुन हसते
माझा नवारा कीती सुंदर आहे म्हणुन सुखावते...........तो माणुस "दादा,वहीनीला दीसायला लागल" अस आनंदाने बोंबलतो.मग दादा............आनंदीचा नवरा समोर येतो.......आनंदीचा चेहरा त्याला बघुन शेण खाल्यासारखा होतो.हीरो पण हसु की रडु ह्या स्थितीत असतो.पण मन गंभीर करतो.तिच्याशी बोलतो...ती उत्तर नाही देत.तो तिच्याजवळ जाउन तिचा हात पकडायचा प्रयत्न करतो..आनंदी कोणी घाणेरडा माणुस जवळ आल्यासारखा थोबडा करते.व हात मागे घेते.....हीरोला कळत.....झाला आपला पत्ता कट........पण तो मोठ्या मनाचा असतो तो स्वःताला सावरतो.हे त्याला अपेक्षीत असते............मग तिचे आईबाबा येतात,दात काढतात......हसतात हीरोचे आभार मानतात....डॉक्टर्चे आभार.....डिसार्ज भेटतो......घरी आले............
घरी कोणाच्या तर आनंदीच्या..आनंदी सर्व काही विसरते की हे ऑपरेशन हीरोने केले.त्याने आपल्याला आपल्या आंधळया डोळ्यासह स्विकारल.त्याच्या प्रयत्नांमुळे आपल्याला आज दीसु लागल......सर्व........ आनंदी हीरोबरोबर राहायला तयार नसते ती तस बोलताना नाही दाखवल पण शेवटी हीरो व ती वेगवेगळे जीवन जगतात अस दाखवलय.......
काssssssssय.........म्हणजे त्या director,story writer मंडळींना काय सुचवायचय???? की टक्कल पडलेल्या माणसांनी उपेक्षीतच रहावे??समाजात त्यांची वेगळी जागा आहे का? टक्कल पडण म्हणजे सर्वांनी त्या माणसाला टाळण्,नकार देण्,त्याबरोबर कामपुरतेच सबंध ठेवण..त्याबरोबर फारस फिरायला न जाण्,गेलात तर awkward feel होण हे योग्य आहे अस त्या director व story writer ला दाखवायच होत का?
काय संदेश द्यायचा होता त्यांना हा असा शेवट दाखवुन??
अशा कथेचा धिक्कार,निषेध ...........मनापासुन.....अगदी खोल मनातुन धिक्कार...शि थु करायच्या लायकीची आहे ही विचारसरणी !!!
मी येथे जे काही लिहलय त्यात एकदातरी तुम्हाला काहीतरी point अस वाटल तर तेथे सभासद बनुन मला प्रतिसाद द्या.
नोट : हे सर्व फक्त साईटचे members वाढवण्यासाठी नाही ह्याची क्रुपया नोंद घ्यावी
duniyadari.webs.com
प्रतिक्रिया
6 May 2010 - 9:50 pm | डावखुरा
कुठे आणि काय लिहिलेय?
"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"
6 May 2010 - 9:52 pm | पिंगू
अरे शानबा दुवा तरी दे की रे लेका प्रतिसाद टंकायला...
6 May 2010 - 9:55 pm | शानबा५१२
प्रतिसाद सभासत्वाच्या रुपात अपेक्षीत आहे........
किंवा सभासद व्हायला काही त्रास वाटत असेल तर यिथेच कळवा की.
*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
6 May 2010 - 10:02 pm | मुत्सद्दि
मित्रा शानबा,
तु जे काहि तिथे लिहिले आहेस ते इथेच चिकटव ना.
निश्चितच बरेवाईट प्रतिसाद मिळतील.
तिकडे जाऊन सभासद बना,प्रतिसाद द्या वगैरे भानगडी कशाला?
मुत्सद्दि.
6 May 2010 - 10:14 pm | शानबा५१२
हे घ्या भाउ
आपण दुस-याची मर्जी निस्वार्थपणे राखतो(योग्य असेल तर).........आपली स्व:ताची मर्जी कोणीच विचारत नसल तरी.......आपण आपल उपेक्षीतच रहायच
*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
6 May 2010 - 10:07 pm | टारझन
काय चर्चा चालु आहे रे ???
- चर्चेश मेंब्रंवाढवी
6 May 2010 - 10:24 pm | मुत्सद्दि
शानबा,
मालिका परिक्षण आवडले.
वास्तविक पाहता हे "स्क्रिप्ट" अतिशय टिपिकल/कॉमन आहे रे.
हे असले काहितरी दाखवले तरच लोक मालिका पाहतात ह्याची ह्या दिग्दर्शक मंडळिंना जाणीव असते.
असो,
फारच मनापासून लिहिलेले दिसतेस.
:)
मुत्सद्दि.
6 May 2010 - 10:51 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शानबा,
मालिका परिक्षण आवडले.
6 May 2010 - 10:50 pm | गोगोल
परीक्षण .. भु. ले. शु.
6 May 2010 - 11:17 pm | पक्या
परिक्षण वाचले. एक प्रश्न पडला- डोळे नसले तरी आनंदीला स्पर्श ज्ञानाद्वारे समजले नाही कधी आपल्या नवर्याला टक्कल आहे. कथालेखक आणि दिग्दर्शकाच्या कामाची किव आली ही कथा वाचून.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
7 May 2010 - 6:50 am | शुचि
खरय ! आणि डोळे आल्या आल्या सौन्दर्यदृष्टी कशी काय डेव्हलप झाली?
काही वर्ष तर जावी लागतील :?
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
7 May 2010 - 8:24 am | शानबा५१२
पक्या सर आणि शुचि मॅडम...............
ते दोघ आजुन एवढ्या जवळ नव्हते आले की ती हीरोच्या डोक्याला हात लावेल.जवळ नव्हते आले म्हणाजे मनाने आणी परीणामी शरीराने.आणि सहसा ही डोक्याला हात लागण्याची शक्यता मिठी मारणे आणि तत्सम कामातुनच येउ शकते.............तेवढे जवळीक नव्हती त्याच्यांत.
अशा शंका नका काढु ओ..............मला मी त्या भिकार्,दलिदंर कार्यक्रमाला defend करतोय अस वाटायला लागत.
*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
8 May 2010 - 12:05 am | पक्या
अहो मग तो आधीच आनंदीला सांगत का नाही की मला टक्कल आहे. त्यातूनही ती लग्नाला तयार झाली असती तर पुढचा प्रश्न च निकाली निघाला असता ना.
आणि हे टकलू महाशय धडधाकट असताना एका आंधळ्या मुलीशी लग्न करायला तयार कसे होतात? त्यांना टकलू पणामुळे मुली मिळत नसतात म्हणून का?
- जय महाराष्ट्र , जय मराठी !
6 May 2010 - 11:34 pm | नितिन थत्ते
हॅ हॅ हॅ. नका हो पहात जाऊ असले काही. मनावर वाईट परिणाम होतात.
असो मला टक्कल पडणार आहे हे बायकोला आधीच सांगितले होते.
(भावी टकलू)नितिन थत्ते
6 May 2010 - 11:51 pm | टारझन
भावी ? =)) =)) =)) क्या थत्ते चचा !!
7 May 2010 - 8:09 am | नितिन थत्ते
म्हणजे वरच्या चित्रात दाखवलंय तितकं भावी. =))
(नुकताच चंद्रोदय होत असलेला) नितिन थत्ते
7 May 2010 - 12:28 am | इन्द्र्राज पवार
श्री. शानबा जी....
त्या इडियट बॉक्स वरील गटार मालिकेबद्दल इतके भाऊक होऊन तुम्ही (जरी संतापाने असले तरी....) लिहिले आहे ते वाचून प्रश्न पडला आहे की, काय म्हणून तुम्ही अशा दळभद्र्या मालिकांना "मोठे" करीत आहात ? अहो, फेकून द्या त्यांना "गार्बेज कॅन" मध्ये लागलीच.... काय यांची पात्रता की तुमच्यासारख्या एका अभ्यासू व्यक्तीने ते पाहून आपला बी.पी. वाढवुन घ्यावा ? २०-२२ मिनिटे त्यांचे माकडी चाळे बघायचे आणि लागलीच विसरून आपल्या नित्याच्या कार्यक्रमाला लागावे हे उत्तम. तुम्ही "मराठी" मालिका पाहता म्हणजे तुम्हाला मराठी संस्कृती विषयी प्रेम वा आस्था नाही असे म्हणावे लागेल, कारण या मालीकामधून जे काही दाखीविले जात असते ते पाहता (मी स्वत: "सारेगामा" शिवाय काही पाहत नाही....) "मराठी" चा आपण अपमान करीत आहोत असेच म्हटले पाहिजे..... सबब फर्गेट इट !
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
7 May 2010 - 7:33 am | पाषाणभेद
मला माझा अभिमान आहे की मी असले भिकार कार्यक्रम कधीही पाहिलेले नाहित. बाकी बातम्या त्या ही सह्याद्री अन डिडी वरील पहातो तेही कधी कधी. अन शेअर मार्केटचा स्क्रोल. तोही डबड्याचा आवाज बंद करून.
डायबेटीस विरुद्ध लढा
माझी जालवही
7 May 2010 - 9:07 am | डॉ.प्रसाद दाढे
पवारसाहेब आणि पाषाणभाऊंशी शंभर टक्के सहमत. मीही कुठल्याच मालिका पाहून वेळ वाया घालवत नाही;
त्याऐवजी मिसळपाव लॉग इन करतो!
7 May 2010 - 10:36 am | वेताळ
पण वर जे मालिकेतले उत्तान छायाचित्र डकवले आहे ते मात्र खटकले.
मात्र त्या मालिका तुम्ही का बघत असता हे कळाले. :D
वेताळ
7 May 2010 - 11:48 am | शानबा५१२
'उत्तान' म्हणजे काय?? :D
मात्र त्या मालिका तुम्ही का बघत असता हे कळाले. =)) का माहीती नाही पण मी हे वाचुन खुप वेळ हसत होतो.........Thanks
का बघत असतो तुम्हीच सांगाल का जरा,मला तरी कळेल कारण मी काही खास उद्देश ठेउन नाही बघत.
*************************************************
देवाने सर्व गोष्टींची एक वेळ ठरवलेय हेच सर्वात मोठ सत्य आहे!
ते आज मला "ओर्कुत" व "फचेबूक" वर जे सापडल्/भेटल्/मिळाल त्यावरुन पुन्हा एकदा कळल.
7 May 2010 - 4:33 pm | मृगनयनी
काssssssssय.........म्हणजे त्या director,story writer मंडळींना काय सुचवायचय???? की टक्कल पडलेल्या माणसांनी उपेक्षीतच रहावे??समाजात त्यांची वेगळी जागा आहे का? टक्कल पडण म्हणजे सर्वांनी त्या माणसाला टाळण्,नकार देण्,त्याबरोबर कामपुरतेच सबंध ठेवण..त्याबरोबर फारस फिरायला न जाण्,गेलात तर awkward feel होण हे योग्य आहे अस त्या director व story writer ला दाखवायच होत का?
ह्म्म्म्म...... :| प्रत्येक मुलीच्या मनात आपल्या जोडीदाराबद्दलच्या काही संकल्पना असतात. एखादी मुलगी कितीही सामान्य रुपाची - काळी- बेन्द्री असली, तरी त्यांना "टकला" (अर्ध-टकला) नवरा नको असतो.... एकवेळ काळा-सावळा नवरा चालतो.. किन्वा पूर्ण-टकला पण नवरा (काहींना) चालतो..पण अर्ध-टकला नवरा स्वीकारायला फारच कमी मुली तयार असतात!... मग भले तो कितीही शिकलेला असो... किन्वा लाखो रुपये कमावणारा असो!
(काही २% मुली याला अपवाद असू शकतात!)
त्यामुळे अर्ध-टकल्या उपवधू- मुलांनी पूर्ण टक्कल तरी करावे... किन्वा अर्ध-टक्कल झाकण्यासाठी "आर्टिफिशियली केस प्लॅन्ट" तरी करावेत.
एक प्रश्न : दुर्दैवाने एखाद्या उपवर मुलीला जर टक्कल असेल, अर्ध-टक्कल असेल, किन्वा तिच्या डोक्यात 'चाई' पडली असेल... तर तिच्याशी लग्न करायला किती मुलं तयार असतात? :|
युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||
8 May 2010 - 12:07 am | पक्या
ह्म्म बरोबर आहे. मुलीला टक्कल असेल तर तिचे लग्नच जमणार नाही. काही मुली मात्र टकलू नवरे मान्य करतात हे पाहिले आहे.
- जय महाराष्ट्र , जय मराठी !
7 May 2010 - 5:09 pm | sagarparadkar
अहो कोणी मला या शब्दाची व्युत्पत्ति सान्गेल का?
ध्रुव बाळाच्या वडिलानचे नाव "उत्तान्पाद" होते असे लहान्पणी ऐक्ले होते ...
त्याचा या शब्दाशी काही सम्बन्ध आहे का ? :)
8 May 2010 - 12:09 am | पक्या
ह. ह. पु.वा.
=)) काय जबराट नाव आहे - उत्तानपाद.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
8 May 2010 - 12:34 am | टारझन
>> उत्तानपाद
=)) =)) =)) हसुन हसुन मेलो =))
- ढम्मकन्पाद
श्याणबा गड्या , आत्ता वाचला तु काय लिवला त्ये =)) =)) =)) एकदम् फ्यँटॅष्ठीक @@ =)) छापरफाड =)) टकल्या हिरोचं थोबाड कसं झालं असेल हे आठवुन ठार झालो =))
- केसाळ
ह्या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहीजेत.
7 May 2010 - 4:09 pm | कानडाऊ योगेशु
शानबा भाऊ हे परिक्षण,समीक्षण कि चिरफाड जे असेल ते फार आवडले.
भरपूर हसलो.
>मुलगा असतो तो "कुलवधु"(Zee मराठी) मधे नाही का टक्कल
असणारा आसावरीचा भाउ.नाही माहीती हा बघा.........
=)) =)) =)) =)) =)) =)) अगदी लोटपोट.
एकतर कुलवधू (खुळळवधु) चा रेफरन्स..त्यातुन त्याचे हायलाईट केलेले टक्कल आणि पुन्हा तो फोटो ही असा कि तो नक्की काय करतोय हा प्रश्न पडावा...!!! पुन्हा =)) =)) =)) =)) =)) =))
>तर लग्नानंतर ह्या भाईला वाटत आपण आनंदीला चांगल्या डॉक्टरांना दाखवु.तस सास-याला सांगतो..सासरा पण केस नसलेला......
पुन्हा =)) =)) =)) =)) =)) =))
- (गॉनकेस) योगेश
---------------------------------------------------
लोकांच्या खरडवहीत लिहिण्याची सुविधा नसणे म्हणजे तोंड दाबुन बुक्क्यांचा मार खाणे.लोक तुम्हाला भलत्यासलत्या खरडी लिहुन जातात आणि तुम्ही काहीही करु शकत नाहीत.
7 May 2010 - 4:48 pm | बिपिन कार्यकर्ते
http://www.facebook.com/?ref=home#!/milind.phatak
बिपिन कार्यकर्ते
8 May 2010 - 1:27 am | शुचि
ती मुलगी माजुरडी, बाह्य रूपावर जाणारी, आगाव आहे अजून काय. आंधळीच रहायला हवी होती. X(
सवतचि भासे मला| दूती नसे ही माला||
नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
8 May 2010 - 11:52 am | तिमा
त्या मुलीचं काय चुकलं ? तिची दृष्टी देवाने परत दिली, टकलु नवरा केवळ निमित्तमात्र होता. तिला जर टकलु आवडत नसेल तर व्यक्तिस्वातंत्र्य आहे ना? उगाच भावनेच्या आहारी जाऊन वास्तवाचे(टकलाचे) भान कसे विसरणार ?
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
16 Jul 2012 - 8:39 pm | मन१
डोळे नीट करायची शस्त्रक्क्रिया होते तशीच टक्कल पडलेले असेल तरीही नैसर्गिक म्हणता यावेत असे केस पुन्हा उगवायची Direct Hair Implant सुद्धा करता येते हे हर्ष भोगले, सल्मान व इतर अनेक मान्यवरांच्या उदाहरणांवरूनही सदर इसम शिकला नाही काय?
टक्कल आताशा मिरवायला शिकलेला