अगदी थोडक्यात मरता मरता वाचलो.... काळ आला होता पण वेळ आली नव्हती... असले वाक्प्रचार आपण बर्याच वेळा वापरतो / ऐकतो. पण खरेच कधी कधी अगदी जिवावरचा प्रसंग ओढवलेला आसतो. माझ्या आयुष्यातले असे 2 प्रसंग येथे सांगतो. आपल्यालाही असे अनुभव आले असतील तर जरूर सांगा.
तसा जन्माला येताना मी गुदमरलो होतो, काळानिळा पडलो होतो, थोडक्यात वाचलो, अशी आख्यायिका माझी आजी, आई आमच्याविषयी सांगतात पण तो प्रसंग नीट आठवत नसल्याने येथे तपशीलवार देत नाही. पण थोडक्यात मरता मरता मी जन्माला आलो असे म्हणता येईल.
मी साधारण 6-7 वर्षाचा आसताना आम्ही एका वाड्यात माडीवर राहात होतो. तेंव्हा पाणी हे कॉमन नळावरुन भरण्याचे दिवस होते. बाथरूम मधे नळ वगैरे कल्पना त्याकाळी एवढ्या प्रचलित नव्हत्या. मोरीत एक पत्र्याचा गोल हौद ठेवला जायचा आणि तो रोज सकाळी खालून कळशीने पाणी आणून भरला जायचा.एका सुटीच्या दिवशी आई,वडील मोठा भाउ आणि त्याच्या वयाचा चुलत भाउ असे सर्व मिळून पाणी भरत होते. मी अगदीच लिंबुटींबू असल्यामुळे आणि पाणी भरण्यापेक्षा ते सांडवून त्यात खेळण्याकडे आमचा कल जास्त असल्याने आम्हाला पाणी भरण्याच्या जबाबदारीतून मुक्त केले होते. मी बाहेरच्या खोलीत काहीतरी खेळत यांच्या कामावर लक्ष ठेऊन होतो. मधेच मला लपून बसण्याची सुरसुरी आली. बाहेरच्या खोलीत कोणी नाही पाहून मी भिंतीत असलेल्या कापाटात शिरलो आणि त्याचा लाकडी दरवाजा ओढून घेतला. त्या दाराला वरती गोल फिरणारी खिटी होती. मी दरवाजा ओढून घेतल्यावर वजनाने ती खिटी फिरली आणि बाहेरून दरवाज्याला लागली. हळूहळू मला आत श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. आणि मी आतून दार वाजवायला सुरवात केली. त्याच वेळी नेमका माझा चुलत भाउ त्या खोलीत आला. आणि त्याने खिटी फिरवून कपाटाचे दार उघडून मला बाहेर काढले. गुदमरून मरता मरता मी दुसरयांदा वाचलो.
12-13 वर्षाचा असताना मी पोहायला शिकण्यासाठी म्हणून मे महिन्यात नदीवर गेलो होतो. पाठीला डबा बांधून निवांत पोहत होतो. पाठीला डबा असल्यामुळे आपण बुडत नाही हे लक्षात आल्यावर जरा आतल्या खोल भागात गर्दी नाही अश्या ठिकाणी हात पाय मारायला लागलो. मजा पण येत होती आणि लई भारी पण वाटत होते. आणि अचानक मी एक गटान्गळी खाल्ली. नाका तोंडात पाणी गेले. काहीच कळेना आणि दिसेना. ठसकतउसकत पाण्याच्या वर आलो. 1-2 क्षण पाण्यावर होतो तेंव्हा डबा दूर कोठेतरी तरंगताना दिसला. आसपास जवळ एकही माणूस पोहत नव्हता. खोकुन झाल्यावर आरडाओरडा करायला म्हणून श्वास घ्यायला गेलो तोच पुन्हा पाण्याखाली गेलो आणि जाताजाता थोड्या हवे बरोबर भरपूर पाणी नाका तोंडात गेले. असे 1-2 वेळा झाले. आणि त्याच वेळी कोणी तरी ओढल्याचे जाणवले. भरपूर खोकून , गिळलेले पाणी ओकून झाल्यावर जाणिवा जागृत झाल्या. पहातो तो एका ट्यूब घेऊन पोहणार्या मुलाने प्रसंग पाहून माझ्या जवळ येऊन मला त्याच्या ट्यूब वर ओढले होते. ती ट्यूब गच्च धरून मी त्याच्या बरोबर काठाला आलो. बुडून , हवे अभावी मरता मरता वाचण्याची माझी ही तिसरी खेप.
बहुदा मिसळपावकराना आमच्या रामसे स्टाइल टॉपिक पासून वंचित ठेवू नये असे यमाला वाटले असावे.
प्रतिक्रिया
15 Apr 2008 - 7:00 pm | विजुभाऊ
तेंव्हा कन्दील कोठे होता तुझा? कोणी लावला होता? तरी सांगत होतो की तो कन्दील जाळुन टाक म्हणुन.
मला वाटते की तेंव्हा बहुतेक त्यातले सेल संपले होते त्यामुळे बल्ब नीट पेटला नाही हे तुझे सुदैव
15 Apr 2008 - 8:09 pm | विकास
>>>तसा जन्माला येताना मी गुदमरलो होतो, काळानिळा पडलो होतो, थोडक्यात वाचलो,
यावरून एक (ऐकीव पण) सत्यकथा आठवली: असेच एक अर्भक मृतावस्थेत जन्माला आले. घरच्यांना वाईट वाटले. त्याला घेऊन जाण्याआधी घरातली मोठी व्यक्ती म्हणजे त्या अर्भकाची होउ शकलेली आजीने विचार केला की नाहीतरी मेलेलेच जन्माला आलयं काय बिघडत, असे म्हणत तिने शेगडीतील एक निखारा काढला आणि त्या बाळाच्या पोटावर अलगद ठेवला... आणि ट्यँ म्हणत ते बाळ जोरात रडायला लागले. त्या चटक्यातून पण ते वाचले! विचार करा वाचले नसते तर गीतरामायण आणि अनेक त्या तोडीची सुंदर गाणी कोणी लिहू शकले असते का?
15 Apr 2008 - 8:54 pm | इनोबा म्हणे
हे कार्ट जेव्हापासून आलंय तेव्हापासून फक्त मरण्या-मारण्याच्याच गोष्टी करतंय. :)
बाळ आम्बोळी तु रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचतोस का रे? (ह्.घ्या.)
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
16 Apr 2008 - 10:46 am | गोट्या (not verified)
हे कार्ट जेव्हापासून आलंय तेव्हापासून फक्त मरण्या-मारण्याच्याच गोष्टी करतंय. :)
बाळ आम्बोळी तु रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचतोस का रे? (ह्.घ्या.)
;) हा हा हाहा !
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
16 Apr 2008 - 11:12 am | आंबोळी
हे कार्ट जेव्हापासून आलंय तेव्हापासून फक्त मरण्या-मारण्याच्याच गोष्टी करतंय. :) हाहाहा हे बाकी खरे!
पण काका ते पुनर्जन्मावरचे (असंभव) विसरलात. आणि मदनबाणाच्या फोटूला चारोळ्या बी लिवल्यात्या.
बाळ आम्बोळी तु रत्नाकर मतकरींची पुस्तकं वाचतोस का रे? (ह्.घ्या.)
मतकरींचे लहानपणी निम्माशिम्मा राक्षस ऐकले होते. नंतर नाही हो काही वाचले त्यांचे.
|| भले सज्जनाला रोटी चिकन दिल |नाठाळाच्या नावे लावू कंदील||
-आम्बोळी म्हणे
16 Apr 2008 - 11:22 am | धमाल मुलगा
हाण तिच्याआयला !!!!
इनोबा भौ...आयला आता तुला 'सिग्नेचर'चं पेटंटच करुन घ्यायला लागणार दिसतंय.
-ध मा ल्या म्हणे
16 Apr 2008 - 12:38 pm | इनोबा म्हणे
इनोबा भौ...आयला आता तुला 'सिग्नेचर'चं पेटंटच करुन घ्यायला लागणार दिसतंय.
मला बी आसंच वाटतंय.
|| भले सज्जनाला रोटी चिकन दिल |नाठाळाच्या नावे लावू कंदील||
हा हा हा,आंबोळ्या.लगे रहो. आजकाल लोकं स्वाक्षरीची बी विडंबनं कराय लागलीत.
|| भले मृत्यू लिहीला ललाटावरी | चिंता मारु फाट्यावरी ||
ह्ये कसं वाटतंय... :)
|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे
16 Apr 2008 - 5:35 pm | आंबोळी
|| भले मृत्यू लिहीला ललाटावरी | चिंता मारु फाट्यावरी ||
ह्ये कसं वाटतंय... :)
मृत्यू बोलविण्या लोकाघरी | कंदील टांगू खुंटीवरी ||
(कंदीलधारी)आंबोळी
15 Apr 2008 - 10:55 pm | एक
दिड वर्ष होत आलं त्या गोष्टीला पण अजुनही धक्का पचवू शकलो नाही..
लग्न झाल्यावर एका महिन्यानंतर हे जोडपं हवाई ला हनिमून ला गेलं. एका खडकावर हा बसला होता आणि त्याची बायको फोटो काढत होती.
तेव्ढ्यात एक लाट उसळली आणि हा तोल जावून समुद्रात पडला..खडकावर पडून मार वर्मी बसला असावा त्याला हातपाय मारायलापण अवसर मिळाला नाही.
त्याच्या बायकोने त्याला वाचवायला उडी मारली. त्याला वाचवू शकली नाही. अर्धातास बिचारी पाण्यात हातपाय मारत होती. थकली आणि ती सुद्धा गेली..
तिच्या मनाची अवस्था काय झाली असेल याची आम्ही कल्पना ही करू शकत नाही...
खडकावर कॅमेरामिळाला घरच्यांनी तो ताब्यात घेतला.
आपण गेलो हे त्या मित्राला तरी खरं वाटलं असेल का?
आम्ही एक कंपनी काढणार होतो..हनिमून वरून आल्यावर ऍक्टिव्हली कामाची सुरूवात करायची होती.
या मित्राने मला गोल्फ खेळायला शिकवलं. वेगवेगळ्या कोर्सेसवर जाण्याचे आमचे बेत होते..
पण एका रविवारी सकाळी सगळे बेत, सगळे प्लॅन्स कोसळले..क्षणभंगुरता म्हणजे काय तेव्हा कळालं.
तेव्हापासून मी परत कधी बीचवर गेलो नाही.. सगळीकडे पोहेन पण समुद्राला पाय लावणार नाही..
19 Apr 2008 - 3:05 pm | रोचीन
ठाण्याचे होते का मुळचे??
19 Apr 2008 - 10:43 pm | एक
तुम्ही ओळखता?
16 Apr 2008 - 12:55 am | llपुण्याचे पेशवेll
मी पण असे अनेक अपघात पाहीले आहेत मुंबई बंगळूर हायवे वर. त्यात मेलेला माझा कोणी नव्हता पण त्या देहाची झालेली अवस्था पाहून असे वाटले की कदाचित लादेन जरी असा मरुन पडलेला दिसला तरी मला हळहळ वाटेल. त्या अपघातांचा उल्लेख मी 'मी पाहीलेला मृत्यू' म्हणूनच करेन.
पुण्याचे पेशवे
16 Apr 2008 - 10:28 am | श्री
मी आणी मित्र असे मिळुन ११ जण ३० डीसेबर २००६ रोजी क्वालीस गाडीने गणपतीपुळे साठी जात असता गोवा हायवे वर पेण नजीक आमच्या गाडीला अपघात झाला. माझे ३ मित्र त्या अपघातात वारले व बाकीचे जबरद्स्त ज़खमी झाले पण नशीबाने मला फक्त खरचटले,
अपघाताच्या वेळी सर्व जण झोपी गेले होते, मी आणी ड्राईव्हर फक्त जागे होतो, ड्राईव्हर तर जागीच वारला पण आज ही मला तो अपघात चित्रपटात दाखवतात त्या पेक्षा ही भयानक वाटतो.
त्यात मेलेला माझा कोणी नव्हता पण त्या देहाची झालेली अवस्था पाहून असे वाटले की कदाचित लादेन जरी असा मरुन पडलेला दिसला तरी मला हळहळ वाटेल.
अहो त्या अपघाताने फार चांगले /वाईट अनुभव दिले. जे ना ओळखिचे ते त्या रात्री आम्हाला मदत करायला धावले तर काहीनी मदतीच्या नावाने मोबाईल, पाकीट गायब केले. अम्बुलन्स वाल्यानी फ्री सेवा दीली पण 'टीप' घ्याला वीसरले नाहीत. त्यानंतर पोलिस, court- कचेरी बापरे बाप................
16 Apr 2008 - 12:47 pm | अभिषेक पटवर्धन
साधारण ४ वर्षा पूर्वी मी सुधा मरण अगदी जवळून पाहीलय. माझी सीए ची परीक्शा होती आणि माझा टॉन्सिल्स च ऑपरेशन झाल होत. ऑपरेशन मधे वापरल्या जाणार्या एका औषधा ची जबरदस्त रीऍक्शन येउन माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या. तात्काळ दीनानाथ मन्गेशकर मधे मला हलवल. साधारण तीन दिवस मी आय सी यु मधे राहुन मी जेव्हा तीथून बाहेर आलो तेव्हा चा आई बाबान्चा चेहेरा मी कधीच विसरु शकणार नाही.
पण हा प्रसन्ग माला अजुन सम्रुद्ध करुन गेला. मी हॉस्पिटल मधे पोचण्या आधी तिथे पोचलेले मित्र मला मिळाले. आईच्या मायेने काळजी घेणार्या डॉक्टर मिळाल्या. तीथल्या मामा आणि मावशीन्शी माझी मैत्री झाली जी आजही टीकुन आहे. त्या दिवसा पासुन मी खरा आयुष्य भक्त झालो अणि अगदि छोट्या अणि साधारण वाटणार्या गोष्टी मधे मला खुप आनन्द सापडु लागला. मरणा चा अनुभव जगण्यातली मजा सान्गून गेला
16 Apr 2008 - 2:00 pm | अभिज्ञ
मरता मरता वाचण्याची माझी ही तिसरी खेप.
....
अरेरे ......वाचून वाईट वाटले.....(
"बाकि आमच्या आळीत एक म्हातारी होती,पण ती लहानपणीच मेली."
आम्हि पाहिलेले हे एवढेच एकमेव मरण.
अबब.
16 Apr 2008 - 2:24 pm | प्रमोद देव
बाकि आमच्या आळीत एक म्हातारी होती,पण ती लहानपणीच मेली."
कुणाच्या? तिच्या?
कमाल आहे!!!!!!!!
मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे
16 Apr 2008 - 4:53 pm | अभिज्ञ
अहो वरच्या स्टो-या वाचून पार घाबरुन गेलो होतो.
थोडे वातावरण हलके करावे म्हणुन केलेला हा प्रयत्न.
बाकि, कंदिल लावल्याने जर माणसे मरत असतिल,तर म्हातारि लहानपणिच का मरु नये?)))ह.घ्या.
अबब.
16 Apr 2008 - 6:56 pm | शितल
दिपावली निमित्त मी सासरी कोल्हाप्॑रला गेले होते, माझा मुलगा जो त्यावेळी २ वर्ष ४ महिन्याचा होता तो, एका मुला बरोबर खेळ्त होता, त्याच्याबरोबर खेळ्णारा दुसरा मुलगा ६ वर्षाचा होता, त्याने पळ्त पळत जाऊन पाण्याच्या टाकी वरुन उडी मारली, माझाही लेक त्याच्या पाठीमागुन गेला पण जमिनी लगतच टाकी होती, आणि त्याचे झाकण अर्ध उघडे होते, त्यामध्ये तो पड्ला पण पड्ताना त्याने हाताने एकदम काठाला धरले तरी ही तो॑डापर्यत पाणी आले होते, जवळ्च सासुबाई होत्या त्या॑नी त्याला हाताला धरुन वर खेचले , जर त्याचा हात सुट्ला असता तर, कारण पळ्त पळ्त पडल्यामुळे हाताला हिस्का बसुन हाताच्या बोटा॑ना लागले होते . आणि तो म्हणतो आई मी कसा पाण्यात धप्पाक करुन पड्लो.
17 Apr 2008 - 3:56 am | गणपा
सगळ्यांचे अनुभव वाचले. म्हंटल की माझा गणपतीबाप्पा मोरया होता होता कसा राहीला त्याची कथा तुम्हास सांगावी.
६ वर्षांपुर्वी गणपतीच्या सुमरास भारतात सुट्टीवर यायचा योग आला. गणपती माझ अराध्य दे॑वत आणि गणपतीची खरी मजा गावाला. त्यामुळे दुसर्याच दिवशी गावाला प्रयाण केल. सुट्टीचे दिवस, त्यामुळे सगळी चुलत, मावस, मामे भावंड जमली होती. पावसाळा नुकताच झाल्यामुळे गावचा तलाव पण मस्त भरला होता . मी सगळया भावंडात मोठा, त्यामुळे सगळे मागे लागले की पोहायला जाउया. ( कुणी मोठ असल्याशीवाय घरचे पोहायला सोडत नसत.) आमच्या लहानपणी आम्ही असच कुणाला तरी मामा करायचो. (आता पोरांनी मला मामा बनवल. नवीन पिढी जुन्या पिढी कढुनच शिकते म्हणा.....चलताय )
बर्याच वर्षांनी पोहायला उतरलो. लहान भावंडांपुढे फुशारकी मारण्याचा मोह आवरेना. भराभर हात पाय मारले. ३-४ मीनीटांत अर्ध तळ पारपण केल. ट्यूब घेतली न्हवतीच (इज्ज्त का सवाल) . आणि तेवढच इंप्रेशन जास्त(कोण म्हणतय रे अतीशहाणा) मागे वळून पाहील पोरांच्या डोळ्यात अपार कवतीक दाटल होत (छाती २ इंच वर आली, पण पोटाच्या घेरापुढे लाजुन तीने लगेच मान टाकली ती गोष्ट वेगळी). आताशी जवळपास कुणी न्हवत. तेवढ्यात पायला क्रँप्स आले. बोंबला.... धड पुढे जाता येइना की मागे पण फिरता येइना. एकदा पाण्यात बुडी मारुन पायाला तळ लागतो का याचा अंदाज घेतला. पण पायी काही लागल नाही, उलट नाका तोंडात पाणी भरुन वर आलो. बर मदतीसाठी हाक मारवी तर पोपट होइल म्हणून गप्प बसलो.
हळु हळु पाण्यात हात मारत राहीलो. कसबस ३/४ तळ पार केल. आता हातांनी पण साथ सोडायची तायरी चालवली. परत एकदा तळ्याच्या तळाला पाय लागतोका ते पाहील. परत एकदा पाणी चाखत चाखत वर आलो. (वर आलो हे नशीब.) मग मात्र धाब दणाणल आमचं. ब्रंम्हांड का काय म्हणतात ते आठवल. आताशी कुणाला हाका मारुन पण उपयोग न्हवता, मदत पोहोचेस्तव माझ विसर्जन आटोपल असत.
तितक्यात समोरच्या काठावरुन आमचे तीर्थरुप येताना दिसले. एकदा वाटल की त्यांना हाक मारवी, पण त्यांना उच्च रक्तदाबाचा विकार. चोहुबाजूला मरण दिसत असतानाही त्यांना हाक मारयच टाळल. (इथे पोपट बीपट काही नाही.) त्यांना हाका मारुन काही उपयोग न्हवता, तेही माझ्या पर्यंत वेळेत पोहचू शकले नसते. नी आपल्या तरुण मुलाचा अंत त्यांनी डोळ्यादेखत पाहुनये असच वाटत होत. मनातल्या मनात गणपतीबाप्पांचा धावा केला. स्वतःलाच समजावत रहीलो अजुन थोडच उरलय... (Just do it...) अगदी इंच इंच पाणी कापत रहीलो. १० - १५ मीनीटांच्या अथक प्रय्त्नांती एकदाचे तळ्याच्या काठाला पाय टेकले. आणि मग जी ताणुन दिली तिथेच काठावर की ज्याच नाव ते... १/२ तास शवासन करत पडलो होतो.
पाण्याची इतकी धास्ती घेतली होती की दुसर्या दिवशी गणपती विसर्जनाला बाप्पाला काठावरुनच निरोप दिला.
लहान (पहिलीत) असताना पण पाण्याने अशीच एकदा सलगी करण्याचा प्रयत्न केला होता. ती गोष्ट पुन्हा कधीतरी...............तुर्तास इतीश्री.
-गणपा.
23 Apr 2008 - 4:16 pm | प्रभाकर पेठकर
अशा वेळी पाण्यावर उताणे पडून तरंगण्याचा अनुभव असावा. पाय न हलवता, नाका तोंडात पाणी न जाता, विश्रांती घेत घेत नुसते हात मारून काठापर्यंत येता येते. हा माझा अनुभव आहे.
28 Apr 2008 - 11:25 pm | गोट्या (not verified)
"अशा वेळी पाण्यावर उताणे पडून तरंगण्याचा अनुभव असावा. पाय न हलवता, नाका तोंडात पाणी न जाता, विश्रांती घेत घेत नुसते हात मारून काठापर्यंत येता येते. "
सहमत.
असा अनुभव घेत मी लहानपणी अनेकवेळा पंचगंगा ह्या काटावरुन त्या काठावर पार केली आहे व तोच अनुभव मला इतर जागी देखील नेहमी मदत करतो कारण आम्ही (म्हणजेच मी) धुम्रपान करतो तेव्हा श्वास जाण्याची शक्यता नेहमी असते त्यामुळे पाण्यामध्ये ही ट्रीक नेहमी वापरतोच.
राजे
(*हेच राज जैन आहेत)
माझे शब्द....
1 May 2008 - 2:06 am | गणपा
खरय पेठकर काका,
पण जाम टरकलो होतो. इतका की तळ्याच्या काठाशीवाय दुसर काहीही सुचतच न्हवत.
19 Apr 2008 - 11:56 am | जयवी
इतक्या सगळ्यांच्या कथा वाचून काटाच आला अंगावर....!!
19 Apr 2008 - 7:29 pm | मदनबाण
चला मी सुद्दा असंभव पाहीला सुरुवात करतो,,,,,च्या मारी शुभ्राचा नवरा नोकरी न करतासुद्दा मस्त लाईफ जगतोय.
बायकोही सोज्वळ दिसते आहे.....(अजुन पर्यंन्त सासु-सुनेच भांडणच झाले नाही????? हे कसं शक्य आहे?????)
आय ड्रीम ओफ धिस जॉब मॅन.....
(शुभ्राचा जबरदस्त पंखा)
मदनबाण>>>>>
28 Apr 2008 - 11:44 pm | आंबोळी
बाण्या (मला बेण्या म्हणायचे होते) ,
आयला इथे असंभवचा काय संबंध?
आय ड्रीम ओफ धिस जॉब मॅन.....
सहमत...
(शुभ्राचा जबरदस्त पंखा)
डबल सहमत
--आंबोळी
1 May 2008 - 4:57 pm | शरुबाबा
(शुभ्राचा आनी सुलेखाचा सुद्दा जबरदस्त पंखा)