ताजमहाल च्या मालकीबद्दल सध्या बराच वादविवाद मिपा वर सुरु आहे पण ताजमहाल अमर प्रेमाचे प्रतिक आहे यात सर्वाचे एकमत आहे. त्यासंबंधी सुचलेला विनोद .
प्रिया माझी "शहाजहान" ! ! !
होता बादशहा धनवान ऐसा,
" ताज " त्याने निर्मिला.
प्रेमवंचित आम्हां गरिबांना कायमचे करण्याचा
स्वार्थ त्याने साधला.
'' ताज " नाही ना " सदनिका "
शक्यही नव्हते "झोपडे "
झालो घर जावई
गातो आता
“ त्या तिथे पलीकडे
स्मारक अभिनव, अमर प्रितीचे,
माझिया प्रियेचे ( महालासम ) झोपडे “
निरंजन वहाळेकर
प्रतिक्रिया
29 Apr 2010 - 3:21 pm | सातबारा
कुणी हिस्कावून घेई
कुणी होई घरजावई
प्रीतीच्या फाल्तू ठिगळाने
'तेज' चा ताज होई
-------------------------
हे शेतकर्यांचे राज्य व्हावे.
29 Apr 2010 - 2:39 pm | निरन्जन वहालेकर
चार ओळीत खुप काही सान्गुन गेलात ! ! धन्यवाद !