स्पर्शून तारकांना गाई पहाट वारा
कंपीत शब्द माझे आणि तुझा इशारा!!!
गंधात नाहलेली, लाजून जात जाई
घेई उगा मिटूनी, तो शुभ्रसा पिसारा
झंकारले अशी की, काया सतार झाली
तू छेडीले जरा अन, देहावरी शहारा
आली भरात आता, भलतीच प्रेम वेला
बेबंध श्वास माझे आणि तुझा उबारा..
स्पर्शात या तुझ्या रे, वर्षाव हा हिमाचा
पेटून तप्त होई, माझ्या उरी निखारा
दर्यास या मनीच्या, भलते उधाण आले
आवेग सोसवेना, सांभाळ तोल सारा
- प्राजु
प्रतिक्रिया
23 Apr 2010 - 7:31 pm | विसोबा खेचर
वा प्राजू, जियो..!
तात्या.
23 Apr 2010 - 7:49 pm | मीनल
रात्रीच्या तारकांना स्पर्शून होणारी पहाट, लाजून स्वत:ला मिटून घेणे, सतारीच्या झंकारीसारखा शहारा, भरात आलेला बेबंद श्वास, उधाण आलेले असताना जाणारा तोल हे सारे एकमेकांशी निगडित आहे.
हिमाचा वर्षाव आणि उरीचा निखारा हेही आवडले. परस्पर विरूध्द तरी ही इथे मात्र पूरक आहेत.
क्लासिक रोमांस! :X
मीनल.
http://myurmee.blogspot.com/
26 Apr 2010 - 12:00 am | बेसनलाडू
कविता आवडली.
(प्रणयप्रेमी)बेसनलाडू
23 Apr 2010 - 7:52 pm | स्वाती दिनेश
प्राजु, कविता आवडली.
स्वाती
23 Apr 2010 - 8:35 pm | दिपाली पाटिल
कविता छान वाटली...
दिपाली :)
23 Apr 2010 - 8:49 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
आणखी एक सुंदर कविता प्राजु!
आता अगदी रहावत नाही आहे म्हणूनः कविता वाचून विडंबन करावं असं वाटलं, पण हाय दारू सोडून दुसरा विषय सुचतच नाही आहे.
अदिती
23 Apr 2010 - 8:58 pm | मदनबाण
सुंदर... :)
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
23 Apr 2010 - 9:59 pm | sur_nair
सर्वांशी सहमत असेच म्हणतो
23 Apr 2010 - 10:41 pm | स्पंदना
अतिशय सुन्दर!!
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
24 Apr 2010 - 2:24 am | अरुंधती
सर्वच काव्य खूप सुंदर, नादमधुर व उत्कट! :-) मस्त!
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
24 Apr 2010 - 2:34 am | डावखुरा
निशःब्द......
(गालावरुन कधी मोरपीस फिरवले आहे का?
अगदी तोच अनुभव आला...)
"राजे!"
24 Apr 2010 - 2:36 am | राजेश घासकडवी
एक धुंदी छान उतरली आहे सहजशब्दात...
वर्षाव हिमाचा उष्ण कटिबंधी रूपकांमध्ये बसत नाही असं वाटलं.
24 Apr 2010 - 1:20 pm | रानी १३
खुपच सुंदर आणि उत्कट! !!!!!
24 Apr 2010 - 1:28 pm | दिपक
अत्यंत सुंदर.. खुप आवडली.
24 Apr 2010 - 5:30 pm | भोचक
भन्नाट. मस्तच लिहिलैय. प्राजूतै.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
24 Apr 2010 - 5:38 pm | चित्रा
कवितेचे गाण्यात रूपांतर होऊ शकेल असे वाटते.
24 Apr 2010 - 5:44 pm | जयवी
प्राजु........फार गोड कविता :)
25 Apr 2010 - 9:12 am | मनीषा
झंकारले अशी की, काया सतार झाली
तू छेडीले जरा अन, देहावरी शहारा
सर्वच कल्पना आणि शब्दरचना सुरेख आहेत .
अतिशय सुंदर कविता
25 Apr 2010 - 3:54 pm | अविनाशकुलकर्णी
कविता आवडली.
25 Apr 2010 - 9:41 pm | प्रभो
मस्त!!
26 Apr 2010 - 8:44 am | अम्रुताविश्वेश
खूपच सूरेख
:) :X
26 Apr 2010 - 10:17 am | निरन्जन वहालेकर
अतिशय सुरेख कविता ! खूप खूप आवडली ! !
आतापर्यंत मिपा वर तुमच्या बहारदार कविता वाचल्यात आता नवीन अल्बम ची सी डी एकण्यांत कधी येते याची उत्सुकता आहे नवीन सीडी व कविता प्रकाशनासाठी अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा ! ! !
26 Apr 2010 - 3:45 pm | फ्रॅक्चर बंड्या
दर्यास या मनीच्या, भलते उधाण आले
आवेग सोसवेना, सांभाळ तोल सारा
फारच छान
binarybandya™
27 Apr 2010 - 1:22 am | चतुरंग
छान कल्पना आहेत.
आमची पेश्शल प्रतिक्रिया इथेही वाचता येईल! ;)
चतुरंग