आज श्रेयस ने आत्महत्या केली .... आमच्याच ऑफिसच्या ७ व्या मजल्यावरून उडी मारून ... क्षणभर काय होतंय काय झालाय याच भानच मला उरल नाही .... रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्याचे निष्प्राण कलेवर पाहून मी गलबलून गेले.
श्रेयस कॉलेज मध्ये मला दोन वर्ष सिनिअर कॉलेज मध्ये पाऊल टाकल आणि नोटस वगैरे मिळवण्याची गडबड सुरु झाली.
तेव्हा आमच्या ह्या सिनिअर नी परीक्षेसाठी आमच प्रबोधन केल होत...वाट्टेल ती मदत करेन असा सांगितलं होत आणि शब्द पाळलाही होता.
प्रचंड उत्साह, सकारात्मकता अशी नुसती ओसंडून जायची त्याच्या एक एक शब्दातून. कधी परीक्षेच्या ताणाने कधी कुणाच्या वागण्याने मनाला एकप्रकारची ग्लानी यायची निराशेची, तेव्हा हमखास मी श्रेयसचा नंबर डायल करायची ...त्याची रिंगटोन भारी असायची "में जिंदगी का साथ निभाता चला गया हर फिक्र को धुवे में उडाता चला गया " ते ऐकूनच निम्म मळभ दूर व्हायचं.. त्याच्या शी बोलताना हलके हलके बंध सैल होऊन मन शांतवून जायचं .....
नामांकित कंपनी चा माझा कॅम्पस होता apptitude, technical दोन्ही मी क्लीअर झाले पण HR च्या वेळेस त्यांनी मला तुमचे डिप्लोमा चे गुण ग्राह्य नाही धरता येणार असे सांगितले आणि त्यामुळे मला बादही केले ..नकाराची पहिलीच वेळ असल्याने मी रडकुंडीला आले आणि आता काही पुढच्या कंपनीच्या टेस्ट देणार नाही ठरवले .... पण श्रेयस ने मला बोलावलं विचारलं आणि सांगितलं आयुष्यात नकार पचवण खूप आवश्यक असत त्याशिवाय यशही पचवता येत नाही ... नकार जिद्द देतो ...लढ त्याच्या एका शब्दावर मी लढले (अर्थात लढणे हा मोठा शब्द होऊ शकतो पण त्यावेळी मला नोकरी ही आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट वाटली होती ) आणि मला नोकरीही मिळाली ६ महिने ती नोकरी करून मी मला ज्या कंपनीने नाकारले होते तिथेच प्रोजेक्ट लीडर म्हणून जॉईन झाले आणि त्यादिवशी श्रेयश माझा मित्र मार्गदर्शक माझ्या साठी रडला .... खूप आनंद वाटलेला त्याला ... दोन महिन्यातच टो ही त्याच कंपनी मध्ये माझा बॉस म्हणून रुजू झाला आणि एक वर्तुळ पूर्ण झाले ....त्याचे लग्न माझ्या लेखी त्याच्या आनंदाची पर्वणी होती एका अनाथ मुलीशी त्याने लग्न केले अर्थात मोठेपणाचा आव न आणता ...सगळ सुरळीत चालाल होत पण अचानक हे का?
त्या दिवशी माझा फोन सारखा वाजत होता त्याच्याच होता पण प्रोजेक्ट dead line असल्यामुळे मी तो silent वर ठेवला होता त्यामुळे कळलाच नाही आणि नंतर भेटूनच येऊ म्हणून फोन ही नाही केला ...कदाचित त्याला बोलायचं असेल काहीतरी सांगायचं असेल .... सगळ राहून गेले .... माझ्या हातून अक्षम्य अपराध घडला होता ज्याने मला वेळोवेळी निराशेतून बाहेर काढले त्याला जेव्हा माझी गरज होती तेव्हा मी तिथे नवतेच .... आता ही आयुष्य भराची टोचणी लागून राहिली .... पहिल्यांदा त्याला मन मोकळ करायला हव होत कुणीतरी आणि कुणीही नाही मिळाल ...
इतक्या सकारत्मक असलेल्या आणि मनातही कुणाच वाईट न चीन्तलेल्या माझ्या मित्रावर ही वेळ का यावी ... हा आनंदयात्री अचानक अकाली निघून का जावा ? उणपूर २५ वर्षा आयुष्य त्यात त्याने अनेकांना आनंद वाटला कदाचित त्यामुळे तो रिता झाला का ? हे जीवघेणे प्रश्न त्याच्या असतीत्वासाराखेच मनात राहतील... आणि माझी ही निराशा आणि अपराधीपणाची भावना घालवायला श्रेयश नसणार ..... मी कस माफ करू स्वतःला? मला मदत हवी आहे ...यातुन बाहेर पडायला....
प्रतिक्रिया
26 Apr 2010 - 10:33 am | आनंदयात्री
ही टोचणी अत्यंत धारदार असणार याची कल्पना येतेय.
>>हा आनंदयात्री अचानक अकाली निघून का जावा ?
हळुहळु कारणे कळतील. दु:खाचे प्रार्थमिक कढ ओसरल्यावर नजर साफ होते, तोवर बरेच काही उगवुन आलेले असते. ते पहा. प्रश्नांची उत्तरे मिळतील, पण ती तुम्हाला स्वतःच शोधावी लागतील.
>>उणपूर २५ वर्षा आयुष्य त्यात त्याने अनेकांना आनंद वाटला कदाचित त्यामुळे तो रिता झाला का ?
असे कोणी रिते होत नसते हो. सावरा.
26 Apr 2010 - 3:28 pm | स्पंदना
भरपुर रड!! आणि आठव काय म्हणेल तो? हरु नको असच ना? मग ते ही मान. हरु नको!! नशिब कुणी वाचुन नाही आल.
कदाचीत तुझ्या कडे मन मोकळ करुन ही झालेल टालता नसत आल बाळा!! पण खम्बीर रहा! तो मनस्वी होता, तुझा मित्र होता आणि कायम राहिल.
शब्दांना नसते दुखः; शब्दांना सुखही नसते,
ते वाहतात जे ओझे; ते तुमचे माझे असते.
26 Apr 2010 - 3:51 pm | विसोबा खेचर
जे झाले ते झाले! आता तुम्ही स्वत:ला असा दोष देत बसणे बरे नव्हे..सायलेन्टवर असल्यामुळे त्याचा फोन येतो आहे हे तुमच्या लक्षात आले नाही..
परंतु त्याचे मिस्ड् कॉल्स पाहून तुम्ही त्याला लगेच फोन मात्र नक्की करायला हवा होता. तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे ज्या अर्थी त्याचा फोन सारखा वाजत होता त्या अर्थी त्याचे किमान ५-६ मिस्ड् कॉल्स तरी तुम्हाला दिसले असतील..जो माणूस तुमचा गाईड-फ्रेन्ड-फिलॉसॉफर आहे, त्याचे इतके मिस्ड् कॉल्स पाहून 'काय झालं असावं बरं?' असा स्वत:शी विचार करून तुम्ही लग्गेच त्याला फोन करायला हवा होतात! ते न करता 'नंतर भेटूनच येऊ म्हणून फोन ही नाही केला' ही सबब नक्कीच चुकीची ठरते..
एखादी व्यक्ती जेव्हा आपल्याला वारंवार कॉल करते तेव्हा तिचे निश्चितच काहीतरी तातडीचे काम असते..!
अर्थात, पण म्हणून काही तुम्ही त्याच्या मृत्यूला जिम्मेदार ठरत नाही.. कृपया तसे मुळीच वाटून घेऊ नका..
जाणारा गेल्या आपल्या वाटेने.. तुम्ही आता लौकर स्वत:ला सावरायचा प्रयत्न करा..
तात्या.
26 Apr 2010 - 4:20 pm | झुम्बर
सर्वप्रथम आभार ....
फोनच करयला हवा होता हेच टोचनिच प्रमुख करन आहे खरच चुकलेच मी......
सावरायला हवे हे मलाही समजतंय गेले ८ महिने प्रयत्नही करते आहे पण अपराधी पणाची भावना जाताच नाहीये ...
त्याच्या घरच्यांना शक्य होईल ती मदत करते आहे पण लांबून त्याच्या पुढे उभे राहण्याची हिम्मत नाहीये
तो गेल्यावर अर्चनाने फोडलेला टाहो पुसलाच जात नाहीये ..... इतकी हादरून गेले होते मी ....
26 Apr 2010 - 4:23 pm | अश्वत्थामा
तुम्हाला किती दुखः होत असेल याची कल्पना करु शकत नाही. परंतू याला तुम्ही जबाबदार नाही हे मात्र नक्की.
शेवटी मृत्यू अटळ आहे. आज ना उद्या आपणा सर्वांनाच त्याची सोबत करावी लागणार आहे.
अपर्णाताईंनी म्हटल्याप्रमाणे
भरपुर रड!! आणि आठव काय म्हणेल तो? हरु नको असच ना? मग ते ही मान. हरु नको!! नशिब कुणी वाचुन नाही आल.
यावर नक्की विचार करा
26 Apr 2010 - 4:28 pm | II विकास II
>>न महिन्यातच टो ही त्याच कंपनी मध्ये माझा बॉस म्हणून रुजू झाला आणि एक वर्तुळ पूर्ण झाले
>> त्या दिवशी माझा फोन सारखा वाजत होता त्याच्याच होता पण प्रोजेक्ट dead line असल्यामुळे मी तो silent वर ठेवला होता त्यामुळे कळलाच नाही आणि नंतर भेटूनच येऊ म्हणून फोन ही नाही केला.
ह्या दोन वाक्यात काही गडबड नाही ना? कारण बॉसचे फोन कोण टाळत नाही. कॉल चुकला तरी लगेच हातातील काम सोडुन प्रथम साहेबाला फोन जातो.
बाकी तुमची टोचणी मी समजु शकतो.
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
26 Apr 2010 - 4:33 pm | झुम्बर
नाही कारण फोन त्याच्या वैयक्तिक नम्बर वरुन आला होता ....
काम असत तर त्याने कर्यलयचाच फोन वपरला असता याचि १००% खात्रि आहे ....(होती)...
26 Apr 2010 - 5:26 pm | बिपिन कार्यकर्ते
अरेरे!!! फारच वाईट हो... सांभाळा स्वतःला...
बिपिन कार्यकर्ते
26 Apr 2010 - 5:27 pm | इन्द्र्राज पवार
ज्यावेळी तुम्ही हा लेख लिहून पूर्ण केला आणि या संस्थळावर चर्चेसाठी ठेवला त्यावेळी त्याला दिलेले शीर्षक "अक्षम्य" वाचून मला तरी असे वाटले की येथील सदस्यांनी कोणत्याही त-हेने आपल्या मनास उभारी देण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हे स्वत:ला माफ करू शकणार नाही. असे असून देखील लेखाच्या शेवटी मदतीची (माझ्या दृष्टीने मार्गदर्शनाची...) मागणीही आपण केली आहे, ती योग्यच आहे. कारण आपण समाजप्रेमी व्यक्ती आहोत, आणि आपल्या आयुष्यात ज्या काही डाव्या उजव्या घटना घडत असतात त्या आपले सगेसोयरे मित्र यांच्यात वाटल्या तर दु:ख निश्चीत्तच हलके होते. इथे तर श्रेयसच्या मृत्युनंतर तुम्हाला केवळ दु:ख झालेले नाही, तर ती अपराधीपणाची भावना तुम्हाला सतत टोचणी देत आहे, मात्र ती हमेशा तुमच्याजवळ एखाद्या ठसठसणा-या वेदनेप्रमाणे राहणे ही बाब श्रेयसच्या आत्म्यालाही क्लेश देणारी ठरेल यात संदेह नाही. प्रत्येकाचा मृत्यू कशाप्रकारे होणार आहे yaache ठोकताळे जगातल्या मोठ्या तत्वद्न्याकडेही नसतात, मग आपण तर किरकोळ लोक ! तेन्ह्वा तुमच्यासाठी नव्हे तर "श्रेयस" नावाच्या आठवणीसाठी तुम्ही इतकेच करू शकता की, त्याच्या पत्नीची एक सच्ची सहेली बनून तिला मानसिक उभारी देण्याचे काम करणे. मी हे अशासाठी म्हणत आहे कि, ही बाब सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे की, तुम्हाला बसलेल्या धक्क्यापेक्षाही ("अपराधीपणाची भावना" हा मुद्दा इथे थोडा बाजूला ठेऊ या....!) अर्चनाला तिचे सर्वस्व संपल्याचा धक्का कितीतरी पटीने जास्त असणार हे तुम्ही देखील मान्य कराल. आणि तसे असेल तर तुमच्या मनास लागलेली ती टोचणी कमी करण्याचा एकमेव उपाय म्हणजे तुम्ही अर्चनाची जीवाभावाची मैत्रीण होणे ! काही काळानंतर (अशा परिस्थितीत "काळ" हे फार मोठे जालीम औषध आहे.) "श्रेयस"च्या नावे तुम्ही एखाद्या प्राथमिक शाळेत मुलांसाठी "शिष्यवृत्ती" ठेवलात तर त्याची आठवणही राहील, तसेच तुमच्या मनास लागलेली टोचणीही कमी होण्यास मदत होईल.
जाता जाता > तुम्ही ज्या स्वरूपात लेख लिहिला आहे, त्यावरून तो अकाली मृत्यू तुमच्यासाठी किती धक्कादायक आहे याची प्रचीती येते. तथापि त्याला दुसरीही बाजू अशी आहे कि आपल्या लेखावरील सर्व प्रतिक्रिया वाचल्यानंतर आपण लिहिले ते बरे झाले अशीही तुमची भावना झाली असणार.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
26 Apr 2010 - 6:02 pm | मदनबाण
जो जन्माला आला त्याला मृत्यु अटळ आहे...
तुम्ही कुठलीच गोष्ट जाणुन बुजुन केली नाही...त्यामुळे मनाला टोचणी लावुन घेउ नका...
तुमच्या या कथनावरुन मला पिंगला आणि भर्तृहरी राजाची कथा आठवली...
जमल्यास ती कथा वाचुन पहा...
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
26 Apr 2010 - 7:47 pm | प्राजु
सांभाळा स्वतःला..
काळजी घ्या.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
26 Apr 2010 - 10:09 pm | इंटरनेटस्नेही
अरेरे...! ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो.