घेता घेता नशा चढेल देता देता प्रेम वाढेल बोलता बोलता शब्दच संपेल बघता बघता नजर अडकेल भेटता भेटता मनच गुंतेल निघता निघता पाऊल थबकेल चालता चालता वाटच संपेल पाहता पाहता नजर पाणावेल घेता घेता श्वासही थांबेल वळून बघता वाटेल, इथं सारंच संपेल या निरगाठी तोडता ह्रदय नक्की तुटेल सारंच संपताना नंतर आठवण सुद्धा रडेल..!--- मी अश्विनी
प्रतिक्रिया
12 Apr 2008 - 1:57 pm | फटू
क्या बात हैं.... एकदम झकास...
पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो
मी शोधतो किनारा...
14 Apr 2008 - 3:15 pm | चिनू
फारच छान. अशाच छान छान काविता करत जा
14 Apr 2008 - 1:12 pm | सत्या
मस्तच.........
16 Apr 2008 - 3:12 pm | पिस्तुल्या
चटकदार काव्य होते. तुमचे अभिन॑दन.
16 Apr 2008 - 3:36 pm | शेवटचा बाजीराव
फारच धमाल काव्य होते. अशीच धमाल काव्य करीत रहा.
16 Apr 2008 - 4:39 pm | उदय सप्रे
अश्विनी
छान आहे !
माझी एक कविता आहे मधुबाला वर :
तुझी आठवण म्हणजे
सुखाने दु:खाची पाठवण आहे
मरगळल्या आयुष्याच्या वहीत
जणू.....मोरपिसाची साठवण आहे !
उदय "सप्रे"म
काही कलाकृती :
कलास्वाद :
http://uday-saprem.blogspot.com/
आणि
कवितांजली :
http://uday-sapre.blogspot.com/
16 Apr 2008 - 5:33 pm | धनंजय
सुंदर कल्पना.
पण शेवटच्या तीन महत्त्वाच्या ओळी समजल्या नाहीत.
16 Apr 2008 - 5:41 pm | आंबोळी
लिहीता लिहीता कविता पडेल
वाचता वाचता मिपाकर धडपडेल
16 Apr 2008 - 11:45 pm | मी अश्विनी
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.....