राम राम मायबाप मिपाकरहो,
अदिती यांनी सुरू केलेल्या 'आजची स्त्रीची प्रतिमा' या धाग्यात मिपाच्या मुखपृष्ठाबद्दल, खादाडी सदराबद्दल अनेकांनी हिरिरीने आपले विचार मांडले व मते नोंदविली..
वास्तविक या धाग्याचा काही भाग हा 'आजची स्त्री व विविध माध्यमात तिचे होणारे दर्शन/प्रदर्शन' या संबंधी काही भाष्य करणारा होता, तोही पुसट अक्षरात! व बराचसा भाग हा चन्नम्मा या एका इतिहासकालीन कर्तृत्ववान स्त्रीवर होता. परंतु त्या संदर्भात फारच कमी प्रतिसाद-लेखन झाले व मिपाच्या मुखपृष्ठाबद्दल, खादाडी सदराबद्दलच अधिकाधिक लिहिले गेले असे वाटते आणि ही कदाचित खेदाची बाब म्हणावी लागेल..!
असो,
तरीही मिपाच्या मुखपृष्ठाबद्दलच्या, खादाडी सदराबद्दलच्या सर्व मतांचा, विचारांचा आदर आहेच व त्यांची नोंदही घेतली आहे. त्यावर यथावकाश विचार करून भविष्यात त्यानुसार मिपाच्या मुखपृष्ठात व खादाडी सदरात काही बदल केले जाऊ शकतील..
धन्यवाद,
तात्या.
प्रतिक्रिया
23 Apr 2010 - 9:07 am | II विकास II
जे काही व्हायचे ते सर्व लोकांच्या मतांचा विचार करुन करा. उगाच, कोणी धागा टाकला आणि निर्णयात बदल झाला असे नको.
उद्या प्रत्येक न पटणार्या गोष्टीबद्दल धागे टाकण्याची प्रवृत्ती बळावेल. तीला खत पाणी मिळता कामा नये. असो.
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
23 Apr 2010 - 9:10 am | विसोबा खेचर
हे मात्र पटण्याजोगे! ;)
असो,
तात्या.
23 Apr 2010 - 9:29 am | टुकुल
तिकडच्या धाग्यावर बिरुटे सरांचा ह्या ओळी आवडल्या.
" आज अशी चित्र नको म्हणतील. उद्या काही शब्दांवर आक्षेप येईल. उद्या काही प्रतिसाद दिसायला नको म्हटल्या जाईल. उद्या असे लेख आक्षेपार्ह वाटतील. उद्या असेच...उद्या असेच...
असो, आमच्यासाठी विषय संपला."
आज धागा पाहीला तेव्हा खरोखर त्या चित्राकडे नजर गेली, नाहीतर ती नजरेआडच होत. म्हणजे एकंदरीत मला ती उत्तान किंवा मादक कधीच वाटली नाहीत. आणी जरी एखाद्याला ती तशी वाटली तर त्यांनी तेव्हढे नजरेआड करावे आणी "मिसळपाववर स्वागत" च्या खालची चित्रे पाहावीत. कुणी काय दाखवेल यावर आपला ताबा नसतो पण आपण काय पाहाव हे तर ठरवता येत ना? बा़की एव्ह्ढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी मुखप्रुष्टावर असताना त्या चित्रांचा उगाच एव्हढा बाउ नको व्हायला होता.
एकंदरीत तात्या आपला तुम्हाला पुर्ण पाठींबा आणी तुम्ही योग्य तो निर्णन घ्यालच.
--टुकुल
23 Apr 2010 - 9:20 am | नीलकांत
मिसळपाव हे नवीन येणार्यांसाठी आधी संकेतस्थळ असतं... हळू हळू ते मित्रांना भेटायचं स्थळ होतं. आणि जेव्हा ते मित्र आपले होतात आणि मिपावर जीव बसतो तेव्हा ते आपलं घर होतं... माझा ही प्रवास असाच झालेला आहे.
त्यामुळे मिपावर काही चुकीचं वाटलं तर लोक बिनदिक्कत ते बदलायला सांगतात. हा त्यांचा हक्कं त्यांच्या प्रेमापोटी आलेला असतो. 'हे बदला अशी विनंती करण्यापेक्षा हे टाळावं' असा त्यांच्याजवळ पर्याय असतोच मात्र ते निवडतात तो बदला सांगण्याचा पर्याय. याला कारण त्यांचे मिपावरील प्रेम हे आहे.
कुणीतरी काहीतरी सांगतंय तर तेवढं सांगूनच थांबत नाही तर त्याला साजेसे मुद्दे देऊन ते पटवून देत असेल तर त्यावर जरूर विचार व्हायला हवा.
त्या विचारांशी मीही सहमत आहेच. मिपाची खादाडी आवश्यक तेवढी आकर्षक करण्याकरीता मिपाकरांच्या पाककृती पुरेश्या आहेत असं माझं मत आहे.
- नीलकांत
23 Apr 2010 - 9:23 am | विसोबा खेचर
धन्यवाद नीलकांता, तुझं मतही नोंदवलं आहे..
तात्या.
23 Apr 2010 - 10:28 am | यशोधरा
नीलकांत, अतिशय संतुलित प्रतिसाद.
23 Apr 2010 - 10:32 am | टारझन
निलकांतने संतुलीत प्रतिसाद देऊन बायस्ड पणा टाळला आहे.
हे असं असेल तर मात्र जरूर मुद्द्यांचा विचार व्हावा , नव्हे व्हायलाच पाहिजे ... काल मात्र बरेच लोकं (छोटी-मोठी बरीच) आपापले बोळे मोकळे करतांना दिसले बॉ !!
पण ड्रामाबाजीला आमचा सक्त विरोध होता , असेल , राहिल !!
भेंडी टार्याशी फुकाचे पंगे घेऊन हुशार्या नाय पायजेल मिपावर :)
- (लेग हपायर) डिकी बर्ड
24 Apr 2010 - 3:42 pm | इन्द्र्राज पवार
"......मिसळपाव हे नवीन येणार्यांसाठी आधी संकेतस्थळ असतं... हळू हळू ते मित्रांना भेटायचं स्थळ होतं. आणि जेव्हा ते मित्र आपले होतात आणि मिपावर जीव बसतो तेव्हा ते आपलं घर होतं... माझा ही प्रवास असाच झालेला आहे....."
श्री. नीलकांत यांचे हे वाक्य तंतोतंत मला लागू होते. यातही विशेष असा आहे कि "हळू हळू ते मित्रांना भेटायचं स्थळ होतं. आणि जेव्हा ते मित्र आपले होतात" ही प्रक्रिया माझ्या बाबतीत येथील सदस्यत्व घेतल्यापासून केवळ एका आठवड्यात झाली आहे..... त्यामुळे ते म्हणतात तसे मिपावर जीव बसतो तेव्हा ते आपलं घर होतं .... खरयं. सर्वांचा प्रवास असाच होत राहो ! सावन-भादो, ज्वार-भाटा ह्या जशा निसर्ग नियमाच्या प्रक्रिया आहेत त्याचप्रमाणे एखाद्या विषयावर वाद आणि विवाद, उत्तरे प्रत्त्युत्तरे या बाबीदेखील समाज जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे असे वाददेखील त्या त्या वेळेच्या मत प्रदर्शनांची मर्यादा संपल्यानंतर संपुष्टात येत असतात, यावेत ! प्रवास सुरु होणे महत्वाचे असते.
-------------------------------------------------------
"चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
24 Apr 2010 - 4:07 pm | इन्द्र्राज पवार
......!!!!
23 Apr 2010 - 9:42 am | Pain
आहे तसे राहु द्या. उगाच बाउ कशाला ?
उद्या नास्तिक लोक सन्तान्चे फोटो तर कोलेस्टेरोल वाले लोक मिसळ नको अस म्हणतील.
प्रत्येक गोष्टीत लोकशाही नको.
23 Apr 2010 - 9:54 am | वेताळ
चालायचे पेनराव.
आजकाल मिपाकर चित्रपटात एकादे चुंबन दृश्य आलेतर आपले डोळे घट्ट बंद करतात. व तो चित्रपट कितीही चांगला असला तरी इतराना चुंबन दृश्याच्या लाजेखातर बघायला देखिल सांगायला धजावत नाहीत.
बाकी तात्या आमचा गुरु आहे.
वेताळ
23 Apr 2010 - 9:56 am | II विकास II
>>आजकाल मिपाकर चित्रपटात एकादे चुंबन दृश्य आलेतर आपले डोळे घट्ट बंद करतात. व तो चित्रपट कितीही चांगला असला तरी इतराना चुंबन दृश्याच्या लाजेखातर बघायला देखिल सांगायला धजावत नाहीत.
अगदी अगदी.
तेच मिपाकर इतर ठिकाणी काय चर्चा करतात ते पहा म्हणजे झाले.
---
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
23 Apr 2010 - 9:55 am | II विकास II
माझा विरोध बदलाला नसुन बदल कसा घडवायचा ह्याच्यावर आहे.
काही भाग संपादित..
--तात्या.
तो कालच धागा म्हणजे नीलकांत ने चालु केलेल्या प्रयत्नांना एक खीळ घालण्याचा हिणकस प्रयत्न होता. नाव चिन्नमाराणीचे, नेम खादाडीवर.
असो.
--
प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
23 Apr 2010 - 10:14 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
स्वतःच्या नावात काड्या घालणारे विकास, माझ्यावरच्या राग-द्वेषापायी एक आख्ख्या प्रतिसाद आपण माझ्यासाठी लिहीता आहात हे विसरू नका.
तात्या, मागच्या वेळी पुरावा नव्हता, आता आहे. काड्याघालू विकास यांनी सरळसरळ माझ्यावर व्यक्तीगत हल्ला केल्याचा पुरावा म्हणजे वरचा प्रतिसाद आहे.
असो, राणीचे चिन्नम्मा नसून चेन्नम्मा होते. स्वतःच्या नावात काड्या घालणारे विकास, अंमळ नीट वाचा. आणि न लिहीलेल्या ओळी वाचण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका.
अदिती
23 Apr 2010 - 10:22 am | विसोबा खेचर
योग्य ते संपादन केले आहे..
तात्या.
23 Apr 2010 - 10:16 am | विसोबा खेचर
असो..! :)
तात्या.
23 Apr 2010 - 10:26 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
ज्याचा त्याचा दृष्टीकोन नाही का? प्रत्येकाला नवा चष्मा मी नाही देऊ शकत. असो.
तुम्ही बदला वा नका बदलू ... मिपाबाहेरचं जगही बघायला मी शिकते आहे.
अदिती
23 Apr 2010 - 10:33 am | विसोबा खेचर
तेही खरेच!
आपली मर्यादा निश्चितच समजण्यासारखी आहे! त्याचप्रमाणे मुखपृष्ठाच्या बाबतीत प्रत्येकच सभासदाचे समाधान मी करू शकत नाही ही कदाचित माझी मर्यादा असावी. असो..!
अनेक शुभेच्छा!
तात्या.
23 Apr 2010 - 9:56 am | नितिन थत्ते
>>उद्या नास्तिक लोक सन्तान्चे फोटो तर कोलेस्टेरोल वाले लोक मिसळ नको अस म्हणतील
मी नास्तिक आहे हे मिपाजाहीर आहे. पन मी कधी मुखपृष्ठावरून तुकाराम, ज्ञानेश्वर यांची चित्रे हटवा असे म्हटलेले नाही. माझ्यासारख्या दुसर्या कोणीही नास्तिकाने तसे म्हटल्याचे वाचलेले आठवत नाही.
नितिन थत्ते
23 Apr 2010 - 10:37 am | टारझन
व्वा व्वा @!!@ थत्ते काका नेहमी माझ्या मनातले लिहीतात.
- टार्झन भांडणकर्ते
23 Apr 2010 - 11:07 am | प्रकाश घाटपांडे
नितिन अगदी मनातल बोल्लात
(श्रद्धेचा आदर करणारा नास्तिक)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
23 Apr 2010 - 10:00 am | जयंत कुलकर्णी
तात्या,
धन्यवाद ! I like this about your site. Wisdom has prevailed.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
23 Apr 2010 - 10:11 am | Nile
बदलाची भुमिका जाणुन घेण्यास उत्सुक आहे. शुभेच्छा.
23 Apr 2010 - 10:18 am | श्रावण मोडक
हे बाकी खास आहे!
मिपाच्या मुखपृष्ठाबद्दलच्या, खादाडी सदराबद्दलच्या सर्व मतांचा, विचारांचा आदर आहेच व त्यांची नोंदही घेतली आहे. त्यावर यथावकाश विचार करून भविष्यात त्यानुसार मिपाच्या मुखपृष्ठात व खादाडी सदरात काही बदल केले जाऊ शकतील.
हेच आधीही म्हणता आले असते. विषय तिथंच संपला असता. पण नाही. सगळं घडू द्यायचं. म्हणजे अगदी त्यात हेतूंविषयी शंका घ्यावी लागावी इथंपर्यंत ताणायचं. मग हे 'पाणी ओतायचं' आणि कशी मज्जा केली म्हणून हसत बसायचं, असं तर नाही ना?
आता, हे आधी माझ्या डोक्यात आले नव्हते असा खुलासा करू नका. हा विषय या बदलांपाशीच येतो आणि तिथंच थांबतो. पण मधल्या काळात जी चर्चा झाली, त्यानं हे संकेतस्थळ हॅपनिंग, व्हायब्रंट झालं वगैरे मानायचं तर मानूया!
23 Apr 2010 - 10:25 am | आनंदयात्री
>>पण मधल्या काळात जी चर्चा झाली, त्यानं हे संकेतस्थळ हॅपनिंग, व्हायब्रंट झालं वगैरे मानायचं तर मानूया!
स्थळ आधीपासुनच हॅपनिंग,व्हायब्रंट आहे, आणी यात इथे कुणालाही शंका नाहीच. (यात इथे हा शब्द महत्वाचा)
बाकी चालु द्या ..
23 Apr 2010 - 10:31 am | श्रावण मोडक
हाहाहाहा... खरंय. पण मला जे म्हणायचं आहे ते 'अधिक' या अर्थानं. अधिक हॅपनिंग, अधिक व्हायब्रंट अशा अर्थानं. समजून घ्या, माझ्या भावना.
23 Apr 2010 - 10:39 am | आनंदयात्री
"काडीने मलम लावणे" ही म्हण आठवली.
>>पण मला जे म्हणायचं आहे ते 'अधिक' या अर्थानं. अधिक हॅपनिंग, अधिक व्हायब्रंट अशा अर्थानं. समजून घ्या, माझ्या भावना.
असे अजिबात वाटले नाही.
मर्यादा सोडुन बोललो असेल तर माफ करा.
23 Apr 2010 - 10:45 am | श्रावण मोडक
खवत बोलू.
23 Apr 2010 - 10:29 am | विसोबा खेचर
शक्यता नाकारता येत नाही..
बहुधा नाही! :)
काय खुलासा करायचा आणि काय नाही हे माझ्यावर सोपवलेत तर बरे होईल..
तो प्रत्येकाचा प्रश्न आहे. कुणी मानतील, कुणी मानणार नाहीत..
धन्यवाद,
तात्या.
23 Apr 2010 - 10:30 am | Nile
असं भिजत घोंगडं ठेवु नका. काय असेल ती भुमिका स्पष्ट करा झालं.
23 Apr 2010 - 10:35 am | विसोबा खेचर
हुकूमवजा सूचनेचा जमल्यास विचार केला जाईल!
तात्या.
23 Apr 2010 - 10:44 am | Nile
हुकुम वाटायचं कारण नाही. तुम्ही धाग्यात म्हणल्याप्रमाणे,
फक्त मत नोंदवले आहे. वादाचे विषय लवकर संपावेत एव्हढाच उद्देश.
23 Apr 2010 - 12:10 pm | पक्या
>>हेच आधीही म्हणता आले असते.
पण चर्चा घडल्यावरच लोकांची मते कळणार ना. आधीच कोणाला काय वाटते ते कसे समजेल? त्यामुळे मतांचा , विचारांचा आदर , नोंद घेणे वगैरे हे चर्चेचे फलित असू शकते.
जय महाराष्ट्र , जय मराठी !
23 Apr 2010 - 12:15 pm | श्रावण मोडक
प्रतिसाद वाचला. नोंद घेतली.
23 Apr 2010 - 1:01 pm | प्रकाश घाटपांडे
सहमत आहे
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
23 Apr 2010 - 10:19 am | Pain
@ नितिन थत्ते
1) It is just an example, not an accusation.
2) it is in future tense. Why do you respond it with past tense reference ? Doesn't make any sense.
Or are you implying that things which did not happen in past won't happen in future ? highly illogical.
23 Apr 2010 - 1:04 pm | डॉ.श्रीराम दिवटे
तुम्ही प्रतिसाद वाचत नाहीसे दिसते.
23 Apr 2010 - 3:02 pm | टारझन
कोण वाचत नाही प्रतिसाद ? हरभजन सिंग की रमेश पोवार ?
23 Apr 2010 - 3:58 pm | भोचक
हम्म चालू द्या. ही बातमी वाचा.
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
23 Apr 2010 - 4:03 pm | बिपिन कार्यकर्ते
=))
आपन तर ब्वॉ नाय घाबरत भूकंपाला ;)
बिपिन कार्यकर्ते
23 Apr 2010 - 5:39 pm | टारझन
स्साला , ही स्त्री-प्रतिमा पाहुन डागाळले !! काय ते इचारायचं काम न्हाई !!
- टोचक
23 Apr 2010 - 4:12 pm | विसोबा खेचर
अरे वा!
भोचकराव, या जेनिफर मॅकराईटजी राहतात कुठे काही कल्पना? :)
अंमळ आकर्षकच दिसतात..
त्यांनी त्या इराणच्या मौलवींना जे खुलं आव्हान दिलं आहे त्यात त्यांना अवश्य यश मिळो हीच अल्लाकडे प्रार्थना..कारण स्त्रियांनी उरोभागाचे प्रदर्शन करावे किंवा न करावे, भूकंप मात्र केव्हाही वाईटच!
बाई मात्र आवडल्या असे पुन्हा एकदा रसिकतेने नमूद करावेसे वाटते! :)
आपला,
तात्या मॅकराईट! :)
23 Apr 2010 - 4:20 pm | प्रकाश घाटपांडे
आता ही बया मिपाच्या मुखपृष्ठावर येणार की काय?
जगदंब जगदंब!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
23 Apr 2010 - 5:26 pm | वेताळ
ह्या विषयी संशोधन व्हायला हवे असे मला वाटते.
वेताळ
23 Apr 2010 - 5:46 pm | प्रियाली
खालील शब्द पैशेच आहेत याची नोंद घ्यावी आणि त्यांना पैशांचीच किंमत दिली तर आपले काही एक म्हणणे नाही याचीही.
१. मिपाच्या सदस्यांनी संकेतस्थळाविषयी सुचवणी करणे यांत मला काही गैर वाटत नाही. सुचवणी आणि दादागिरी यात फरक असतो ही वेगळी बाब. तसे चेनम्मावरील धाग्यात झाल्याचे दिसले नाही.
२. काही सदस्यांनी दिलेले उदाहरण म्हटलेले की उद्या न पटणार्या गोष्टींविरुद्ध धागे काढण्याची प्रवृत्ती बळावेल यात मला तथ्य वाटते. विशेषतः, उपक्रमावर अशी प्रवृत्ती माझ्या पाहण्यात आहे.
३. मुखपृष्ठावर किंवा आजची खादाडी या सदरात वैविध्य असावे असे मला वाटते. त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. म्हणजे आजची खादाडी कोणा रंजीता वगैरे दाक्षिणात्य नट्यांबरोबर करण्याबरोबरच आजची खादाडी अक्षय कुमार, शहारुख खान, जॉन अब्राहम, शशी थरूर, सचिन तेंडुलकर, राज ठाकरे वगैरें*
४. हे संकेतस्थळ खाजगी आहे हे आम्हाला त्याच्या जन्माआधीपासून ठाऊक असल्याने आम्ही सुचवणी करू शकतो; हक्क वगैरे नाही याची जाणीवही आहे.
५. मिपाच्या मुखपृष्ठात वैविध्य असावे असे वाटते. मिपावर कलादालनात अनेक प्रकाशचित्रकार आपली कला प्रदर्शित करतात. त्यातील चांगल्या चित्रांना मुखपृष्ठावर स्थान दिल्यास सदस्यांना हुरुप येऊन अधिक चांगली चित्रे मिपावर येतील.
बाकी, मालक समर्थ आहेत असे म्हणून अशा विषयांवर मौन बाळगणे उचित वाटते.
* वरील मंडळी ही माझी आवड आहे असा कृपया गैरसमज करून घेऊ नये.
24 Apr 2010 - 12:16 am | भडकमकर मास्तर
सहमत...
24 Apr 2010 - 6:01 am | मिसळभोक्ता
विशेषतः, उपक्रमावर अशी प्रवृत्ती माझ्या पाहण्यात आहे.
अगदी खरे आहे.
मागे एकदा कुणीतरी एक उपटसुंभ छायाचित्रेच काढून टाका म्हणत होता.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
24 Apr 2010 - 6:09 pm | प्रियाली
अरे हो की! विसरलेच त्या उपटसुंभाला.
त्याचा सुंभ जळाला तरी पीळ गेलेला दिसत नाही. :)
23 Apr 2010 - 8:23 pm | ईन्टरफेल
मि मिपावर सदस्य झाल्यापासुन एकदाहि खादाडि पाहिलि नाहि {कारन आम्हि खाऊनच नेट वर बसतो } बाकि डायरेक्ट चर्चा वर क्लिक करायचे आनि विद्वान मनडळिच्या चर्चा वाचायच्या तेव्हा कुठे आम्हाला समझले कि तेथे उन्हात वगेरे काहि आसते बकि मालकाना {तात्याना} सर्व आधिकार आहे
23 Apr 2010 - 11:51 pm | sur_nair
पदार्थाच्या नावा वरून 'खादाडी' वा 'खादाडा' असे चित्र टाकावे. उदाहरणार्थ
डोसा, वडा, हलवा, ढोकळा = खादाडा
खिचडी, रसमलाई, कोथिंबीर वडी = खादाडी
सदराचे नाव 'आजचे खादाडे' असे देता येईल.
24 Apr 2010 - 12:00 am | चित्रगुप्त
24 Apr 2010 - 12:09 am | विसोबा खेचर
काय बोलू? शब्दच संपले राव.. क्षणभर अगदी वेडावलो, खुळावलो..
मालक, नाव काय हो हिचं? तशी ही बया नजरेखालून अनेकदा गेली आहे पण नाव काही चटकन लक्षात येत नाहीये! :(
बाकी काय असेल ते असो, विशेष करून दाक्षिणात्य स्त्रियांचं सौंदर्य आम्हाला भुरळ पाडतं खरं! :)
आय लव्ह सौथ इंडिया! :)
तात्या.
24 Apr 2010 - 9:24 am | चित्रगुप्त
हिचं नाव नवनीत कौर...
(Navaneet Kaur)
मुळात पंजाबी, पण तेलगू सिनेमातील नटी आहे म्हणे.
http://actress.telugucinemastills.com/navneetkaur/gallery3/
http://www.telugufm.com/modules/photo/ActorList.aspx
http://puremasalablog.blogspot.com/2007/08/navaneet-kaurtelugu-actress-s...
24 Apr 2010 - 1:49 pm | मितालि
आजचा सचिन सोबत मॅंगो मिल्कशेक चा फोटो छान आहे.. असेच अधुन मधुन हीरोंचे फोटो टाकत जा म्हणजे वाद होणार नाहीत की फक्त मुलींचे फोटो टाकता... :) दाक्षिणात्य हीरो पण काही आहेत चांगले..सुर्या, माधवन, अजिथ..
--
सचिन ला वाढदिवसाच्या शुभेच्छा
24 Apr 2010 - 2:12 pm | पर्नल नेने मराठे
आजची खादाडी !
खास सचिनसोबतच
त्याच्या वाढदिवसानिमित्त
मँगो मिल्क शेक पिऊया!
=)) सहिच
चुचु
24 Apr 2010 - 4:16 pm | चित्रगुप्त
खादाडी साठी उपयुक्त फोटोद्वय:

मादक सौन्दर्याचे दोन अॅटमबाँब....आणि झणझणीत कोल्हापुरी रस्सा....