Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Fri, 04/23/2010 - 09:01
राम राम मायबाप मिपाकरहो, अदिती यांनी सुरू केलेल्या 'आजची स्त्रीची प्रतिमा' या धाग्यात मिपाच्या मुखपृष्ठाबद्दल, खादाडी सदराबद्दल अनेकांनी हिरिरीने आपले विचार मांडले व मते नोंदविली.. वास्तविक या धाग्याचा काही भाग हा 'आजची स्त्री व विविध माध्यमात तिचे होणारे दर्शन/प्रदर्शन' या संबंधी काही भाष्य करणारा होता, तोही पुसट अक्षरात! व बराचसा भाग हा चन्नम्मा या एका इतिहासकालीन कर्तृत्ववान स्त्रीवर होता. परंतु त्या संदर्भात फारच कमी प्रतिसाद-लेखन झाले व मिपाच्या मुखपृष्ठाबद्दल, खादाडी सदराबद्दलच अधिकाधिक लिहिले गेले असे वाटते आणि ही कदाचित खेदाची बाब म्हणावी लागेल..! असो, तरीही मिपाच्या मुखपृष्ठाबद्दलच्या, खादाडी सदराबद्दलच्या सर्व मतांचा, विचारांचा आदर आहेच व त्यांची नोंदही घेतली आहे. त्यावर यथावकाश विचार करून भविष्यात त्यानुसार मिपाच्या मुखपृष्ठात व खादाडी सदरात काही बदल केले जाऊ शकतील.. धन्यवाद, तात्या.
  • Log in or register to post comments
  • 21143 views

प्रतिक्रिया

Submitted by II विकास II on Fri, 04/23/2010 - 09:07

Permalink

जे काही

जे काही व्हायचे ते सर्व लोकांच्या मतांचा विचार करुन करा. उगाच, कोणी धागा टाकला आणि निर्णयात बदल झाला असे नको. उद्या प्रत्येक न पटणार्‍या गोष्टीबद्दल धागे टाकण्याची प्रवृत्ती बळावेल. तीला खत पाणी मिळता कामा नये. असो. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 04/23/2010 - 09:10

In reply to जे काही by II विकास II

Permalink

उद्या

उद्या प्रत्येक न पटणार्‍या गोष्टीबद्दल धागे टाकण्याची प्रवृत्ती बळावेल. तीला खत पाणी मिळता कामा नये
हे मात्र पटण्याजोगे! ;) असो, तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by टुकुल on Fri, 04/23/2010 - 09:29

In reply to उद्या by विसोबा खेचर

Permalink

हेच म्हणतो...

तिकडच्या धाग्यावर बिरुटे सरांचा ह्या ओळी आवडल्या. " आज अशी चित्र नको म्हणतील. उद्या काही शब्दांवर आक्षेप येईल. उद्या काही प्रतिसाद दिसायला नको म्हटल्या जाईल. उद्या असे लेख आक्षेपार्ह वाटतील. उद्या असेच...उद्या असेच... असो, आमच्यासाठी विषय संपला." आज धागा पाहीला तेव्हा खरोखर त्या चित्राकडे नजर गेली, नाहीतर ती नजरेआडच होत. म्हणजे एकंदरीत मला ती उत्तान किंवा मादक कधीच वाटली नाहीत. आणी जरी एखाद्याला ती तशी वाटली तर त्यांनी तेव्हढे नजरेआड करावे आणी "मिसळपाववर स्वागत" च्या खालची चित्रे पाहावीत. कुणी काय दाखवेल यावर आपला ताबा नसतो पण आपण काय पाहाव हे तर ठरवता येत ना? बा़की एव्ह्ढ्या चांगल्या चांगल्या गोष्टी मुखप्रुष्टावर असताना त्या चित्रांचा उगाच एव्हढा बाउ नको व्हायला होता. एकंदरीत तात्या आपला तुम्हाला पुर्ण पाठींबा आणी तुम्ही योग्य तो निर्णन घ्यालच. --टुकुल
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Fri, 04/23/2010 - 09:20

Permalink

परिवार आणि सदस्यं

मिसळपाव हे नवीन येणार्‍यांसाठी आधी संकेतस्थळ असतं... हळू हळू ते मित्रांना भेटायचं स्थळ होतं. आणि जेव्हा ते मित्र आपले होतात आणि मिपावर जीव बसतो तेव्हा ते आपलं घर होतं... माझा ही प्रवास असाच झालेला आहे. त्यामुळे मिपावर काही चुकीचं वाटलं तर लोक बिनदिक्कत ते बदलायला सांगतात. हा त्यांचा हक्कं त्यांच्या प्रेमापोटी आलेला असतो. 'हे बदला अशी विनंती करण्यापेक्षा हे टाळावं' असा त्यांच्याजवळ पर्याय असतोच मात्र ते निवडतात तो बदला सांगण्याचा पर्याय. याला कारण त्यांचे मिपावरील प्रेम हे आहे. कुणीतरी काहीतरी सांगतंय तर तेवढं सांगूनच थांबत नाही तर त्याला साजेसे मुद्दे देऊन ते पटवून देत असेल तर त्यावर जरूर विचार व्हायला हवा. त्या विचारांशी मीही सहमत आहेच. मिपाची खादाडी आवश्यक तेवढी आकर्षक करण्याकरीता मिपाकरांच्या पाककृती पुरेश्या आहेत असं माझं मत आहे. - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 04/23/2010 - 09:23

In reply to परिवार आणि सदस्यं by नीलकांत

Permalink

मिपाची

मिपाची खादाडी आवश्यक तेवढी आकर्षक करण्याकरीता मिपाकरांच्या पाककृती पुरेश्या आहेत असं माझं मत आहे.
धन्यवाद नीलकांता, तुझं मतही नोंदवलं आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Fri, 04/23/2010 - 10:28

In reply to परिवार आणि सदस्यं by नीलकांत

Permalink

+१

नीलकांत, अतिशय संतुलित प्रतिसाद.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 04/23/2010 - 10:32

In reply to परिवार आणि सदस्यं by नीलकांत

Permalink

+१

निलकांतने संतुलीत प्रतिसाद देऊन बायस्ड पणा टाळला आहे.
कुणीतरी काहीतरी सांगतंय तर तेवढं सांगूनच थांबत नाही तर त्याला साजेसे मुद्दे देऊन ते पटवून देत असेल तर त्यावर जरूर विचार व्हायला हवा.
हे असं असेल तर मात्र जरूर मुद्द्यांचा विचार व्हावा , नव्हे व्हायलाच पाहिजे ... काल मात्र बरेच लोकं (छोटी-मोठी बरीच) आपापले बोळे मोकळे करतांना दिसले बॉ !! पण ड्रामाबाजीला आमचा सक्त विरोध होता , असेल , राहिल !! भेंडी टार्‍याशी फुकाचे पंगे घेऊन हुशार्‍या नाय पायजेल मिपावर :) - (लेग हपायर) डिकी बर्ड
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Sat, 04/24/2010 - 15:42

In reply to परिवार आणि सदस्यं by नीलकांत

Permalink

मिपावर जीव बसतो.....!

"......मिसळपाव हे नवीन येणार्‍यांसाठी आधी संकेतस्थळ असतं... हळू हळू ते मित्रांना भेटायचं स्थळ होतं. आणि जेव्हा ते मित्र आपले होतात आणि मिपावर जीव बसतो तेव्हा ते आपलं घर होतं... माझा ही प्रवास असाच झालेला आहे....." श्री. नीलकांत यांचे हे वाक्य तंतोतंत मला लागू होते. यातही विशेष असा आहे कि "हळू हळू ते मित्रांना भेटायचं स्थळ होतं. आणि जेव्हा ते मित्र आपले होतात" ही प्रक्रिया माझ्या बाबतीत येथील सदस्यत्व घेतल्यापासून केवळ एका आठवड्यात झाली आहे..... त्यामुळे ते म्हणतात तसे मिपावर जीव बसतो तेव्हा ते आपलं घर होतं .... खरयं. सर्वांचा प्रवास असाच होत राहो ! सावन-भादो, ज्वार-भाटा ह्या जशा निसर्ग नियमाच्या प्रक्रिया आहेत त्याचप्रमाणे एखाद्या विषयावर वाद आणि विवाद, उत्तरे प्रत्त्युत्तरे या बाबीदेखील समाज जीवनाचा एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे असे वाददेखील त्या त्या वेळेच्या मत प्रदर्शनांची मर्यादा संपल्यानंतर संपुष्टात येत असतात, यावेत ! प्रवास सुरु होणे महत्वाचे असते. ------------------------------------------------------- "चन्द्रकिरणानो, तुम्हा वाजते का कधी थंडी स्वतःची ? मध्यरात्री?"
  • Log in or register to post comments

Submitted by इन्द्र्राज पवार on Sat, 04/24/2010 - 16:07

In reply to परिवार आणि सदस्यं by नीलकांत

Permalink

मिपावर जीव बसतो.....!

......!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by Pain on Fri, 04/23/2010 - 09:42

Permalink

आहे तसे

आहे तसे राहु द्या. उगाच बाउ कशाला ? उद्या नास्तिक लोक सन्तान्चे फोटो तर कोलेस्टेरोल वाले लोक मिसळ नको अस म्हणतील. प्रत्येक गोष्टीत लोकशाही नको.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Fri, 04/23/2010 - 09:54

Permalink

हॅहॅहॅहॅ............

चालायचे पेनराव. आजकाल मिपाकर चित्रपटात एकादे चुंबन दृश्य आलेतर आपले डोळे घट्ट बंद करतात. व तो चित्रपट कितीही चांगला असला तरी इतराना चुंबन दृश्याच्या लाजेखातर बघायला देखिल सांगायला धजावत नाहीत. बाकी तात्या आमचा गुरु आहे. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by II विकास II on Fri, 04/23/2010 - 09:56

In reply to हॅहॅहॅहॅ............ by वेताळ

Permalink

>>आजकाल

>>आजकाल मिपाकर चित्रपटात एकादे चुंबन दृश्य आलेतर आपले डोळे घट्ट बंद करतात. व तो चित्रपट कितीही चांगला असला तरी इतराना चुंबन दृश्याच्या लाजेखातर बघायला देखिल सांगायला धजावत नाहीत. अगदी अगदी. तेच मिपाकर इतर ठिकाणी काय चर्चा करतात ते पहा म्हणजे झाले. --- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by II विकास II on Fri, 04/23/2010 - 09:55

Permalink

माझा विरोध

माझा विरोध बदलाला नसुन बदल कसा घडवायचा ह्याच्यावर आहे. काही भाग संपादित.. --तात्या. तो कालच धागा म्हणजे नीलकांत ने चालु केलेल्या प्रयत्नांना एक खीळ घालण्याचा हिणकस प्रयत्न होता. नाव चिन्नमाराणीचे, नेम खादाडीवर. असो. -- प्रतिसादात आणि स्वाक्षरीत मराठी संकेतस्थळांची जाहीरात करुन मिळेल. विद्रोही संकेतस्थळांना खास सुट. योग्य बोली सह संपर्क करावा.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 04/23/2010 - 10:14

In reply to माझा विरोध by II विकास II

Permalink

स्वतःच्या

स्वतःच्या नावात काड्या घालणारे विकास, माझ्यावरच्या राग-द्वेषापायी एक आख्ख्या प्रतिसाद आपण माझ्यासाठी लिहीता आहात हे विसरू नका. तात्या, मागच्या वेळी पुरावा नव्हता, आता आहे. काड्याघालू विकास यांनी सरळसरळ माझ्यावर व्यक्तीगत हल्ला केल्याचा पुरावा म्हणजे वरचा प्रतिसाद आहे. असो, राणीचे चिन्नम्मा नसून चेन्नम्मा होते. स्वतःच्या नावात काड्या घालणारे विकास, अंमळ नीट वाचा. आणि न लिहीलेल्या ओळी वाचण्याचा निरर्थक प्रयत्न करू नका. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 04/23/2010 - 10:22

In reply to स्वतःच्या by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

तात्या,

तात्या, मागच्या वेळी पुरावा नव्हता, आता आहे. काड्याघालू विकास यांनी सरळसरळ माझ्यावर व्यक्तीगत हल्ला केल्याचा पुरावा म्हणजे वरचा प्रतिसाद आहे.
योग्य ते संपादन केले आहे.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 04/23/2010 - 10:16

In reply to माझा विरोध by II विकास II

Permalink

नाव

नाव चिन्नमाराणीचे, नेम खादाडीवर.
असो..! :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by ३_१४ विक्षिप्त अदिती on Fri, 04/23/2010 - 10:26

In reply to नाव by विसोबा खेचर

Permalink

ज्याचा

ज्याचा त्याचा दृष्टीकोन नाही का? प्रत्येकाला नवा चष्मा मी नाही देऊ शकत. असो. तुम्ही बदला वा नका बदलू ... मिपाबाहेरचं जगही बघायला मी शिकते आहे. अदिती
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 04/23/2010 - 10:33

In reply to ज्याचा by ३_१४ विक्षिप्त अदिती

Permalink

ज्याचा

ज्याचा त्याचा दृष्टीकोन नाही का?
तेही खरेच!
प्रत्येकाला नवा चष्मा मी नाही देऊ शकत. असो.
आपली मर्यादा निश्चितच समजण्यासारखी आहे! त्याचप्रमाणे मुखपृष्ठाच्या बाबतीत प्रत्येकच सभासदाचे समाधान मी करू शकत नाही ही कदाचित माझी मर्यादा असावी. असो..!
... मिपाबाहेरचं जगही बघायला मी शिकते आहे.
अनेक शुभेच्छा! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Fri, 04/23/2010 - 09:56

Permalink

संत

>>उद्या नास्तिक लोक सन्तान्चे फोटो तर कोलेस्टेरोल वाले लोक मिसळ नको अस म्हणतील मी नास्तिक आहे हे मिपाजाहीर आहे. पन मी कधी मुखपृष्ठावरून तुकाराम, ज्ञानेश्वर यांची चित्रे हटवा असे म्हटलेले नाही. माझ्यासारख्या दुसर्‍या कोणीही नास्तिकाने तसे म्हटल्याचे वाचलेले आठवत नाही. नितिन थत्ते
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 04/23/2010 - 10:37

In reply to संत by नितिन थत्ते

Permalink

है जबरा :)_

मी नास्तिक आहे हे मिपाजाहीर आहे. पन मी कधी मुखपृष्ठावरून तुकाराम, ज्ञानेश्वर यांची चित्रे हटवा असे म्हटलेले नाही. माझ्यासारख्या दुसर्‍या कोणीही नास्तिकाने तसे म्हटल्याचे वाचलेले आठवत नाही.
व्वा व्वा @!!@ थत्ते काका नेहमी माझ्या मनातले लिहीतात. - टार्झन भांडणकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 04/23/2010 - 11:07

In reply to संत by नितिन थत्ते

Permalink

अगदी मनातल

नितिन अगदी मनातल बोल्लात (श्रद्धेचा आदर करणारा नास्तिक) प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by जयंत कुलकर्णी on Fri, 04/23/2010 - 10:00

Permalink

धन्यवाद !

तात्या, धन्यवाद ! I like this about your site. Wisdom has prevailed. जयंत कुलकर्णी. त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून ! www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Fri, 04/23/2010 - 10:11

Permalink

त्यावर

त्यावर यथावकाश विचार करून भविष्यात त्यानुसार मिपाच्या मुखपृष्ठात व खादाडी सदरात काही बदल केले जाऊ शकतील..
बदलाची भुमिका जाणुन घेण्यास उत्सुक आहे. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 04/23/2010 - 10:18

Permalink

हे खास

हे बाकी खास आहे! मिपाच्या मुखपृष्ठाबद्दलच्या, खादाडी सदराबद्दलच्या सर्व मतांचा, विचारांचा आदर आहेच व त्यांची नोंदही घेतली आहे. त्यावर यथावकाश विचार करून भविष्यात त्यानुसार मिपाच्या मुखपृष्ठात व खादाडी सदरात काही बदल केले जाऊ शकतील. हेच आधीही म्हणता आले असते. विषय तिथंच संपला असता. पण नाही. सगळं घडू द्यायचं. म्हणजे अगदी त्यात हेतूंविषयी शंका घ्यावी लागावी इथंपर्यंत ताणायचं. मग हे 'पाणी ओतायचं' आणि कशी मज्जा केली म्हणून हसत बसायचं, असं तर नाही ना? आता, हे आधी माझ्या डोक्यात आले नव्हते असा खुलासा करू नका. हा विषय या बदलांपाशीच येतो आणि तिथंच थांबतो. पण मधल्या काळात जी चर्चा झाली, त्यानं हे संकेतस्थळ हॅपनिंग, व्हायब्रंट झालं वगैरे मानायचं तर मानूया!
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 04/23/2010 - 10:25

In reply to हे खास by श्रावण मोडक

Permalink

एक लहानशी सुधारणा

>>पण मधल्या काळात जी चर्चा झाली, त्यानं हे संकेतस्थळ हॅपनिंग, व्हायब्रंट झालं वगैरे मानायचं तर मानूया! स्थळ आधीपासुनच हॅपनिंग,व्हायब्रंट आहे, आणी यात इथे कुणालाही शंका नाहीच. (यात इथे हा शब्द महत्वाचा) बाकी चालु द्या ..
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 04/23/2010 - 10:31

In reply to एक लहानशी सुधारणा by आनंदयात्री

Permalink

हाहाहाहा

हाहाहाहा... खरंय. पण मला जे म्हणायचं आहे ते 'अधिक' या अर्थानं. अधिक हॅपनिंग, अधिक व्हायब्रंट अशा अर्थानं. समजून घ्या, माझ्या भावना.
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदयात्री on Fri, 04/23/2010 - 10:39

In reply to हाहाहाहा by श्रावण मोडक

Permalink

काडीने मलम लावणे

"काडीने मलम लावणे" ही म्हण आठवली. >>पण मला जे म्हणायचं आहे ते 'अधिक' या अर्थानं. अधिक हॅपनिंग, अधिक व्हायब्रंट अशा अर्थानं. समजून घ्या, माझ्या भावना. असे अजिबात वाटले नाही. मर्यादा सोडुन बोललो असेल तर माफ करा.
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 04/23/2010 - 10:45

In reply to काडीने मलम लावणे by आनंदयात्री

Permalink

खवत बोलू

खवत बोलू.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 04/23/2010 - 10:29

In reply to हे खास by श्रावण मोडक

Permalink

हेच आधीही

हेच आधीही म्हणता आले असते. विषय तिथंच संपला असता.
शक्यता नाकारता येत नाही..
म्हणजे अगदी त्यात हेतूंविषयी शंका घ्यावी लागावी इथंपर्यंत ताणायचं. मग हे 'पाणी ओतायचं' आणि कशी मज्जा केलीत्त म्हणून हसत बसायचं, असं तर नाही ना?
बहुधा नाही! :)
आता, हे आधी माझ्या डोक्यात आले नव्हते असा खुलासा करू नका.
काय खुलासा करायचा आणि काय नाही हे माझ्यावर सोपवलेत तर बरे होईल..
हा विषय या बदलांपाशीच येतो आणि तिथंच थांबतो. पण मधल्या काळात जी चर्चा झाली, त्यानं हे संकेतस्थळ हॅपनिंग, व्हायब्रंट झालं वगैरे मानायचं तर मानूया!
तो प्रत्येकाचा प्रश्न आहे. कुणी मानतील, कुणी मानणार नाहीत.. धन्यवाद, तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Fri, 04/23/2010 - 10:30

In reply to हेच आधीही by विसोबा खेचर

Permalink

म्हणजे

म्हणजे अगदी त्यात हेतूंविषयी शंका घ्यावी लागावी इथंपर्यंत ताणायचं. मग हे 'पाणी ओतायचं' आणि कशी मज्जा केलीत्त म्हणून हसत बसायचं, असं तर नाही ना?
बहुधा नाही! Smile
असं भिजत घोंगडं ठेवु नका. काय असेल ती भुमिका स्पष्ट करा झालं.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 04/23/2010 - 10:35

In reply to म्हणजे by Nile

Permalink

असं भिजत

असं भिजत घोंगडं ठेवु नका. काय असेल ती भुमिका स्पष्ट करा झालं.
हुकूमवजा सूचनेचा जमल्यास विचार केला जाईल! तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by Nile on Fri, 04/23/2010 - 10:44

In reply to असं भिजत by विसोबा खेचर

Permalink

हुकुम

हुकुम वाटायचं कारण नाही. तुम्ही धाग्यात म्हणल्याप्रमाणे,
सर्व मतांचा, विचारांचा आदर आहेच व त्यांची नोंदही घेतली आहे
फक्त मत नोंदवले आहे. वादाचे विषय लवकर संपावेत एव्हढाच उद्देश.
  • Log in or register to post comments

Submitted by पक्या on Fri, 04/23/2010 - 12:10

In reply to हे खास by श्रावण मोडक

Permalink

>>हेच आधीही

>>हेच आधीही म्हणता आले असते. पण चर्चा घडल्यावरच लोकांची मते कळणार ना. आधीच कोणाला काय वाटते ते कसे समजेल? त्यामुळे मतांचा , विचारांचा आदर , नोंद घेणे वगैरे हे चर्चेचे फलित असू शकते. जय महाराष्ट्र , जय मराठी !
  • Log in or register to post comments

Submitted by श्रावण मोडक on Fri, 04/23/2010 - 12:15

In reply to >>हेच आधीही by पक्या

Permalink

प्रतिसाद

प्रतिसाद वाचला. नोंद घेतली.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 04/23/2010 - 13:01

In reply to >>हेच आधीही by पक्या

Permalink

सहमत आहे

सहमत आहे प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by Pain on Fri, 04/23/2010 - 10:19

Permalink

@ नितिन

@ नितिन थत्ते 1) It is just an example, not an accusation. 2) it is in future tense. Why do you respond it with past tense reference ? Doesn't make any sense. Or are you implying that things which did not happen in past won't happen in future ? highly illogical.
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ.श्रीराम दिवटे on Fri, 04/23/2010 - 13:04

Permalink

प्रतिसाद वाचा..

तुम्ही प्रतिसाद वाचत नाहीसे दिसते.
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 04/23/2010 - 15:02

In reply to प्रतिसाद वाचा.. by डॉ.श्रीराम दिवटे

Permalink

कोण वाचत

कोण वाचत नाही प्रतिसाद ? हरभजन सिंग की रमेश पोवार ?
  • Log in or register to post comments

Submitted by भोचक on Fri, 04/23/2010 - 15:58

Permalink

अंगप्रदर्शन नि भूकंप....

हम्म चालू द्या. ही बातमी वाचा. (भोचक) हा आहे आमचा स्वभाव
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 04/23/2010 - 16:03

In reply to अंगप्रदर्शन नि भूकंप.... by भोचक

Permalink

#%$*(@)_

=)) आपन तर ब्वॉ नाय घाबरत भूकंपाला ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 04/23/2010 - 17:39

In reply to #%$*(@)_ by बिपिन कार्यकर्ते

Permalink

स्साला , ही

स्साला , ही स्त्री-प्रतिमा पाहुन डागाळले !! काय ते इचारायचं काम न्हाई !! - टोचक
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 04/23/2010 - 16:12

In reply to अंगप्रदर्शन नि भूकंप.... by भोचक

Permalink

अरे

अरे वा! भोचकराव, या जेनिफर मॅकराईटजी राहतात कुठे काही कल्पना? :) अंमळ आकर्षकच दिसतात.. त्यांनी त्या इराणच्या मौलवींना जे खुलं आव्हान दिलं आहे त्यात त्यांना अवश्य यश मिळो हीच अल्लाकडे प्रार्थना..कारण स्त्रियांनी उरोभागाचे प्रदर्शन करावे किंवा न करावे, भूकंप मात्र केव्हाही वाईटच! बाई मात्र आवडल्या असे पुन्हा एकदा रसिकतेने नमूद करावेसे वाटते! :) आपला, तात्या मॅकराईट! :) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रकाश घाटपांडे on Fri, 04/23/2010 - 16:20

In reply to अरे by विसोबा खेचर

Permalink

आता ही बया

आता ही बया मिपाच्या मुखपृष्ठावर येणार की काय? जगदंब जगदंब! प्रकाश घाटपांडे आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Fri, 04/23/2010 - 17:26

Permalink

बहुधा ग्लोबल वॉर्मिगला देखिल हेच कारण असेल असे वाटते.

ह्या विषयी संशोधन व्हायला हवे असे मला वाटते. वेताळ
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Fri, 04/23/2010 - 17:46

Permalink

माझे दोन पैशे

खालील शब्द पैशेच आहेत याची नोंद घ्यावी आणि त्यांना पैशांचीच किंमत दिली तर आपले काही एक म्हणणे नाही याचीही. १. मिपाच्या सदस्यांनी संकेतस्थळाविषयी सुचवणी करणे यांत मला काही गैर वाटत नाही. सुचवणी आणि दादागिरी यात फरक असतो ही वेगळी बाब. तसे चेनम्मावरील धाग्यात झाल्याचे दिसले नाही. २. काही सदस्यांनी दिलेले उदाहरण म्हटलेले की उद्या न पटणार्‍या गोष्टींविरुद्ध धागे काढण्याची प्रवृत्ती बळावेल यात मला तथ्य वाटते. विशेषतः, उपक्रमावर अशी प्रवृत्ती माझ्या पाहण्यात आहे. ३. मुखपृष्ठावर किंवा आजची खादाडी या सदरात वैविध्य असावे असे मला वाटते. त्यात काही गैर आहे असे मला वाटत नाही. म्हणजे आजची खादाडी कोणा रंजीता वगैरे दाक्षिणात्य नट्यांबरोबर करण्याबरोबरच आजची खादाडी अक्षय कुमार, शहारुख खान, जॉन अब्राहम, शशी थरूर, सचिन तेंडुलकर, राज ठाकरे वगैरें* ४. हे संकेतस्थळ खाजगी आहे हे आम्हाला त्याच्या जन्माआधीपासून ठाऊक असल्याने आम्ही सुचवणी करू शकतो; हक्क वगैरे नाही याची जाणीवही आहे. ५. मिपाच्या मुखपृष्ठात वैविध्य असावे असे वाटते. मिपावर कलादालनात अनेक प्रकाशचित्रकार आपली कला प्रदर्शित करतात. त्यातील चांगल्या चित्रांना मुखपृष्ठावर स्थान दिल्यास सदस्यांना हुरुप येऊन अधिक चांगली चित्रे मिपावर येतील. बाकी, मालक समर्थ आहेत असे म्हणून अशा विषयांवर मौन बाळगणे उचित वाटते. * वरील मंडळी ही माझी आवड आहे असा कृपया गैरसमज करून घेऊ नये.
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Sat, 04/24/2010 - 00:16

In reply to माझे दोन पैशे by प्रियाली

Permalink

सहमत...

सहमत...
  • Log in or register to post comments

Submitted by मिसळभोक्ता on Sat, 04/24/2010 - 06:01

In reply to माझे दोन पैशे by प्रियाली

Permalink

खरे आहे

विशेषतः, उपक्रमावर अशी प्रवृत्ती माझ्या पाहण्यात आहे. अगदी खरे आहे. मागे एकदा कुणीतरी एक उपटसुंभ छायाचित्रेच काढून टाका म्हणत होता. -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Sat, 04/24/2010 - 18:09

In reply to खरे आहे by मिसळभोक्ता

Permalink

उपटसुंभ

अरे हो की! विसरलेच त्या उपटसुंभाला. त्याचा सुंभ जळाला तरी पीळ गेलेला दिसत नाही. :)
  • Log in or register to post comments

Submitted by ईन्टरफेल on Fri, 04/23/2010 - 20:23

Permalink

मुख

मि मिपावर सदस्य झाल्यापासुन एकदाहि खादाडि पाहिलि नाहि {कारन आम्हि खाऊनच नेट वर बसतो } बाकि डायरेक्ट चर्चा वर क्लिक करायचे आनि विद्वान मनडळिच्या चर्चा वाचायच्या तेव्हा कुठे आम्हाला समझले कि तेथे उन्हात वगेरे काहि आसते बकि मालकाना {तात्याना} सर्व आधिकार आहे
  • Log in or register to post comments

Submitted by sur_nair on Fri, 04/23/2010 - 23:51

Permalink

नावा वरून 'खादाडी' वा 'खादाडा'

पदार्थाच्या नावा वरून 'खादाडी' वा 'खादाडा' असे चित्र टाकावे. उदाहरणार्थ डोसा, वडा, हलवा, ढोकळा = खादाडा खिचडी, रसमलाई, कोथिंबीर वडी = खादाडी सदराचे नाव 'आजचे खादाडे' असे देता येईल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com