संडे स्पेशल (मँगो सुफ्ले)

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in पाककृती
13 Apr 2008 - 1:44 am

विजुभाऊंच्या आंब्याच्या बनात बसून खाण्याकरता :)))))))

मँगो सुफ्ले
साहित्यः
४ पिकलेले आंबे
२ टे.स्पून पाणी
१ टे.स्पून जिलेटीन (पावडर)
२ अंडी (पिवळे व पांढरे वेगळे करणे)
अर्धा कप दुध
अर्धा कप साखर
दिड कप क्रिम
सजावटी साठी वाळलेल्या खोबर्‍याचे थोडे भाजलेले पातळ काप

१.पिकलेल्या आंब्याच्या चौकोनी फोडी कराव्यात. त्यातील २/३(दोन तृतीयांश) फोडी सुफ्ले डीश मधे तळाला पसराव्यात.

२.पाण्यात जिलेटीन विरघळून घ्यावे.(एका बाऊलमधे पाणी घेऊन त्यात जिलेटीन घालणे. ५ मिनिट किंवा ते स्पंजी होईपर्यंत थांबणे.बाऊल गरम पाण्याच्या मोठया भांड्यात ठेऊन जिलेटीन विरघळेपर्यंत सतत ढवळणे.)

३.एका जाडबुडाच्या भांड्यामधे अंड्यातील पिवळे, साखर आणि दुध घालून मंद गॅसवर मिश्रण दाट आणि फेस येईपर्यंत ठेवणे पण सतत ढवळणे.गॅस वरून खाली काढावे व मिश्रण थंड होईपर्यंत सतत ढवळावे. नंतर जिलेटीन मधे घालून ढवळावे.

४.मिक्सरमधून उरलेल्या आंब्याच्या फोडींची प्युरी बनवणे व वरील मिश्रणात घालणे व दाट होईपर्यंत साईडला ठेवणे.

५.क्रीम फेटून ४ टी.स्पून डेकोरशन करता बाजुला ठेवून उरलेले वरील मिश्रणात घालणे.

६.सुफ्ले डीशला बाहेरून बटर पेपर (मिश्रण बाहेर येऊ नये म्हणून)लावून त्यात तयार मिश्रण घालावे.३/४ तास फ्रिजर मधे ठेवणे.

७.सेट झाले कि काळजीपूर्वक बटरपेपर काढावा. नंतर त्यावर डेकोरेशन करता फेटलेले क्रीम घालावे त्यावर भाजलेले खोबर्‍याचे काप.

थंडगार सर्व्ह करावे.

मांडणीआस्वाद

प्रतिक्रिया

स्वाती राजेश's picture

13 Apr 2008 - 3:24 am | स्वाती राजेश

वरील कृती मधे अंडी (पिवळे व पांढरे) वेगळी न करता, पुर्ण अंडी कृती ३ मधे घालावीत.

स्वाती राजेश's picture

13 Apr 2008 - 3:35 am | स्वाती राजेश

१.पिकलेल्या आंब्याच्या चौकोनी फोडी कराव्यात. त्यातील २/३(दोन तृतीयांश) फोडी सुफ्ले डीश मधे तळाला पसराव्यात.
असे न वाचता काही फोडी तळाला पसराव्यात व बाकीच्या फोडींची प्युरी बनवावी.

विसोबा खेचर's picture

13 Apr 2008 - 9:01 am | विसोबा खेचर

नेहमीप्रमाणे सुरेख पाकृ!

माझी अत्यंत आवडती पाकृ आहे ही!

तात्या.