प्रेम कर माझ्यावर
किंवा माझा द्वेष कर
मागणं मात्र एक मान्य कर
जे करशील ते मनापासून कर
तुझ्या प्रेमाने मला मढव
आणि प्रीतिने जडव
अथवा रस्त्यात अडव
आणि सँडलने तुझ्या बडव
कॄपा मात्र एक माझ्यावर कर
जे करशील ते मनापासून कर
हात तुझा दे माझ्या हातात
अथवा दे श्रीमुखात
आयुष्यात दे मला साथ
अथवा पेकाटात घाल लाथ
धन्य होईल प्रेम माझं ऐकलंस तू जर
जे करशील ते मनापासून कर
प्रतिक्रिया
20 Apr 2010 - 11:25 am | श्रीराजे
कविता चांगली वाटली...!
20 Apr 2010 - 11:30 am | वेताळ
नाक्यावर जावुन एकादा पोरीची छेड काढा.
वेताळ
20 Apr 2010 - 11:34 am | चिर्कुट
:O
20 Apr 2010 - 1:18 pm | टारझन
मना पासुन कर म्हणा ... उगा एक्स्ट्रा एफर्ट्स लाऊन .. कुंथुन कुंथुन करण्यात काहीही हाशिल नाही :)
- प्रेमेश जोडेबडवी
20 Apr 2010 - 3:31 pm | झुम्बर
मस्तय आवडली..... :*
20 Apr 2010 - 8:54 pm | शुचि
ह्म्म ..... पराकोटीचा द्वेष व्हायलाही ऋणानुबंधाच्या गाठी असाव्या लागतात. हिरण्यकश्यपूची विपरीत भक्ती होती श्रीविष्णूंवरती म्हणून त्याला मोक्ष प्राप्ती झाली.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Music and poetry only reach the ears
of those in anguish.
20 Apr 2010 - 9:40 pm | अनिल हटेला
खरं असावं बहुतेक....
कविता आवडली की नाही काय माहीत...
पण प्रतीसाद आवडला....
:)
बैलोबा चायनीजकर !!!उर्फ..
тельца имени индиго :D