उंदियो हा गुजराथी प्रकार आहे..तरला दलाल च्या रेसिपी मधे थोडा बदल केला आहे.
साहित्यः
१/२ किलो सुरती पापडी
१/२ किलो कंद
१/४ किलो बटाटे लहान
१/४ किलो रताळी
१/४ किलो वांगी लहान
३ कच्ची केळी
मेथी पकोडा:
१ मेथी पेंडी
बेसन
१ टे.स्पून ओवा, हळद,
पाव चमचा खायचा सोडा
मीठ
मसाला:
अर्धा नारळ खोवलेला
तीन चतुर्थांश कप कोथिंबीर
अर्धा कप पातीचा लसूण(पाती सकट चिरणे)
२ टी.स्पून धने पावडर
२ टी.स्पून जिरे पावडर
१ टे.स्पून हिरवी मिरची, आलं पेस्ट
२ टी.स्पून तिखट
४ टी.प्सून साखर
१ टे.स्पून लिंबु रस
मीठ चवीनुसार
हिंग आणि तेल फोडणीसाठी
१.प्रथम सुरती पापडी अर्धवट सोलावी. एकाच साइडने ओपन करावी. १ इंचाचे तुकडे करावेत.कंद आणि रताळी सोलुन चौकोनी तुकडे करणे.
२.मेथी पकोडाचे साहित्य एकत्र करून तळून घ्यावेत.
३.वरील सर्व मसाला वाटून घ्यावा.
४. बटाटे (सोलून),वांगी आणि केळी (न सोलता) यांना मधे दोन अर्धवट काप देऊन वरील अर्धा मसाला घेऊन भरणे ( भरल्या वांग्यात कसा भरतो तसा).
५.प्रेशर कुकर मधेफोडणी साठी तेल,हिंग टाकणे त्यात सुरती पापडी, कंद, रताळी, बटाटे, वांगी टाकणे २ शिट्या देणे.
६.एका मोठ्या पातेल्यात वरील कुकर मधील भाजी काढणे त्यात भरलेली केळी, मेथी पकोडे आणि उरलेला मसाला घालणे.
७.मंद आचे वर केळी शिजेपर्यंत वाफवावे वर झाकण ठेवावे. मधून मधून पातेलं शेक करावे किंवा हलक्याच हाताने ढवळावे.
८.बारीक शेव घालून सर्व्ह करावे.
प्रतिक्रिया
10 Apr 2008 - 6:25 pm | प्राजु
उंदियो माझा विक पॉईंट आहे. माझी गुजराती मैत्रिण मस्त करते हा प्रकार. पण ती यामध्ये ओले मटार, आणि काही पावट्याचे दाणेही घालते. तेही मस्त लागतं
धन्यवाद स्वाती या पाककृतीबद्दल.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Apr 2008 - 6:34 pm | विजुभाऊ
या पदार्थाचे नाव उंधीयो असे असण्या चे कारण
गुजराती मधे "उंधु" म्हणजे उलटे
हा पदार्थ पूर्वी शेतात एक खडडा केला जायचा त्यात भांडे ठेउन सगळ्या भाज्या मसाले टाकले जायचे.
त्यावर मडके उलटे ठेउन त्यावर विस्तव पेटता ठेवला जायचा व भाजी शिजली जायची.
"उंधु राखीने कर्यु ए उंध्यु " म्हणजे उलटे ठेउन केले ते उंधियो
उंधीयो ची खरी मजा भाजी केल्याच्या दुसर्या दिवशी येते, दुसर्या दिवशी भाजीत मसाले चांगले मुरलेले असतात.
दुसरे म्हणजे यात मेथी चे पकोडे नसतात. तर मेथीचे "मुठीया" असतात.
साखरे ऐवजी गुळ वापरतात. शेवग्याच्या शेंगा असतील तर लज्जत आणखीन वाढते
..............कळावा आपला मराठमोळा गुज्जुभाई विजुभाऊ
10 Apr 2008 - 11:18 pm | llपुण्याचे पेशवेll
विजुभाऊ उंधियो हा पोपटीचा भाऊ आहे का? कारण साधारण कल्पना तशीच वाटली... फक्त पोपटी मधे मडक्याचे तोंड बांधून ते विस्तवावर उपडे टाकतात आणि उंधियो मधे भांड्यात भाज्या मसाले टाकून त्यावर मडके उलटे टाकतात.
पुण्याचे पेशवे
10 Apr 2008 - 7:31 pm | प्राजु
उंधियो बद्दल छान माहिती सांगितलीत विजुभाऊ.. हे माहितीच नव्हतं.
खरंतर मी तुमच्या प्रतिसादाची वाट पहात होते. उंधियोबद्दल तुमच्यापेक्षा चांगली माहिती कोण देऊ शकेल आणखी...
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Apr 2008 - 7:38 pm | स्वाती राजेश
विजुभाउ,
हे मात्र आम्हाला माहित नव्हते. छान माहिती दिलीत.
तुमची पण येऊ दे उंधियो ची कृती कारण आमच्यापेक्षा तुमच्याकडे जरा वेगळी करत असतील नं?
प्राजु, तू म्हणतेस तसे पावट्याचे दाणे घालून पाहिले पाहिजे, तसेच हिरवे मटार सुद्धा.
काही जण ओला हरभरा सोलून घालतात.
13 Apr 2008 - 9:25 am | विसोबा खेचर
मिपाच्या अन्नपूर्णादेवी स्वातीताई यांस,
उंदियो ही आपलीही एकदम लाडकी डिश बर्र का! तुमची उंदियोची पाकृ नेहमीप्रमाणे फर्मासच आहे!
तात्या.