आयडीज .. आणि त्यांच्या कार्स :)

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
4 Apr 2010 - 2:36 pm

रामराम्स लोक्स ,

उन्हाळ्यातली दुपारची वेळ म्हणजे अंमळ सुस्तावणारी असते , पण आता दुपारीच उठलो असल्यानं पुन्हा सुस्तीही येत नाही.
फार दिवसांपासुन एक विचार मनात घोळत होता.. तसे आम्ही सुपर कार्स आणि सुपर बाईक्स चे दिवाने .. आपल्या मिपाकरांच्या क्यारॅक्टर ला सुट होणारी कार कोणती असेल ? असा विचार चाटुन गेला आणि मग हे ...
तुर्त तरी फक्त निवडक क्यारॅक्टर्स चा विचार केल्या गेला आहे

पिवळा डांबिस : यांची कार असेल "लेक्सस आरेक्स३५० ". लेक्सस चं नावंच पुरेसं आहे. एखाद्या गर्भश्रीमंताचंच काम ! एकदम स्टायलिश , आरामदायक आणि सुंदर इंटेरियर. चोखंदळ कारमालकाची पुरेपुर थाट ठेवणारी , त्रुटी काढायला जागाच नाही. लेक्सस कोण्या लेच्यापेच्या च्या खिशाला परवडणारी नाहीच ! त्यांनी पहावी ती फक्त स्वप्न ! अशी ही स्वप्नातली कार .. खास पिडांसाठीच !

विसोबा हम्मर : यांची कार असेल "हम्मर एच६ ". मोठ्या लोकांसाठीची मोठी गाडी. युएस आर्मीसाठी हवं तेवढं वजन वाहुन न्यायला आणि अक्षरशः कोणत्याही प्रकारच्या रोडवर (एव्हन फोरास रोडवरही :) ) चालण्यासाठी बनवलेलं हे मिलिटरी व्हेईकल. असं म्हणतात हम्मर घेतलीत तर पेट्रोलपंपही विकत घ्यावा. कोणालाही हा पांढरा हत्ती पोसता येत नाही :) द बेस्ट स्पोर्ट युटिलिटी व्हेईकल इन इट्स क्लास . हम्मर पास झाली की लोकांच्या नजरा वळल्या शिवाय राहात नाहीत.

सहजराव : यांच्यासाठी एकंच ब्रांड .. "कॅडिलॅक एसारेक्स" :) ४.८ लिटरचं व्ही८ इंजिन आणि ६५०० आरपीएम वर ३२० अश्वशक्ती म्हणजे जणु झंझावातंच ... कॅडिलॅक शोभते ते स्ट्राँग कॅलिबर वाल्यांनाच ! प्रत्येकालाच हेवा वाटावा अशी कॅडिलॅक एसारेक्स फक्त सहजरावांना समर्पित :)

मुक्तसुनित : यांच्यासाठी आमची चॉइस आहे, " रोल्स रॉईस सिल्वर क्लाऊड ". रोल्स चं सर्वांत सुंदर क्लासिक आणि अँटिक मॉडेल. केवळ आणि केवळ रसिक व्यक्तिमत्वासाठी. चक्क १८ फुट लांबीची ही प्रचंड कार पहाताच मनात भरते. ही कार लग्जरी ,लालित्य आणि एक राजेशाही थाटाचं प्रतिकंच जणु !

बिपीन कार्यकर्ते : ह्या अरबस्तानच्या सुलताना साठी काय सुचवावं ? फारंच कनफ्युज झालो ... पण आम्हाला योग्य वाटली ती "ऑस्टिन मार्टीन" . इट्स युनिक अँड एक्स्लुझिव्ह. खास ग्राहकाच्या पसंतीनुसार एक न एक पार्ट तयार केला जातो. ही कार केवळ त्यांच्यासाठी आहे जे कार साठी वाट्टेल तेवढा पैसा ओतायला तयार आहेत. आणि म्हणुनंच तुमच्या एरियातंच काय .. पंचक्रोशीतही कोणाकडे तुमच्या कडे असलेली "युनिक अँड एक्स्क्लुझिव्ह ऑस्टिन मार्टिन" दिसणार नाही. जेम्स बाँडची कार म्हणुन देखील ऑस्टीन मार्टिन प्रसिद्ध आहे.

चतुरंग : आमच्या रंगोबांना आम्ही काय देणार ? माणुस फार मोठा .. तेंव्हा कारंही तशीच हवी , एक कार फिट झाली .. ती " ऑडी क्यु७" जीला पाहुनंच मन भरावं ! ऑडि क्यु७ म्हणजे जमिनीवरचा कुबेराचा रथंच ! लुक्स बद्दल ऑडी बाकी सर्व कार्स ला लाजवते. लाजबाव इंटेरियर, अफलातुन हेडलाईट्स ... हेडलाईट एलिडी ची फॅशन आणली ती ऑडि नेच ! सुरक्षिततेच्या सर्वात जास्त पेटंट्स ऑडिच्या नावावर आहेत. एक स्मार्ट चॉइस , ऑडी केवळ रंगासाठीच ,

आवलिया : हाहाहा ... "रोल्स रॉयस फँटम" सोडुन दुसरी चॉईसंच दिसली नाही. अफलातुन .. अफलातुन ...अफलातुन ...
उद्या उठुन तुम्हाला लॉटरी लागली आणि तुम्ही मिलियनर झालात .. आणि पैसे घेऊन रोल्स वाल्यांकडे जाऊन .. ओ एक फँटम द्या म्हणालात .. तर तुम्हाला फाट्यावर मारण्यात येईल. तुम्हाला फँटम द्यायची की नाही .. हे रोल्संच ठरवते. इट्स लाईक मेंबरशिप ओन्ली बाय इन्व्हिटेशन. फँटम कुठुन येतो .. कुठे जातो ? कुठे राहातो .. कोणालाही माहित नाही.. पण त्याच्या बद्दल कुतुहल मात्र सर्वांना आहे. बुलेटप्रुफ बॉडी .. शायनिंग चॅसी .. स्पेशीयस आणि लग्झुरियस .. फँटम .. फक्त सेलेब्रेटिंसाठी , माफियांसाठी , बिझनेस टायकुन्स साठी किंवा राजकारण्यांसाठी .. आणि हो .. नान्यासाठी :)

परिकथेतील राजकुमार : स्टड अँड हंक . :) पर्‍याला कार अशी हवी की पोरी फुल फिदा झाल्या पाहिजेत. मग "लँबॉर्गिनी गॅलॅर्डो" शिवाय दुसरं नाव सुचेलंच कसं ? दिल फिदा ... !! स्पिड , लुक्स , परफॉर्मन्स , कंट्रोल्स , व्हाटेव्हर यु आस्क ! ट्रॅक्टर बनवणार्‍या मीस्टर लँबॉर्गिनीने एकदा एन्झो फेरारी ला क्लच चं एक डिझाईन सादर केलं होतं , त्यावर फेरारी कुत्सितपणे हसले होते, एका ट्रॅक्टरवाल्यानं आपल्याला ज्ञान शिकवावं ? त्यांचा अहंकारही दुखावला होता, त्यांनी लँबॉर्गिनींना फायर केलं , खुन्नस घेऊन लँबॉर्गिनी ने कार्स बनवल्या... गॅलॅर्डो हे त्यांच बेस्ट मोडेल .. ही कार पुर्ण पणे हँडमेड आहे असं म्हणतात.

कोलबेर : स्साला .. ह्याच्या सारखा तुफान आम्ही जालावर पाहिला नाही ... तुफाना साठी केवळ एकंच नाव ... "फेरारी एफ४३० स्पायडर " ...... स्टिरींग हातात घेताच एका प्रचंड शक्तिवर आपण केवळ एका मुव्ह सरशी कंट्रोल घेतोय ह्याची जाणीव होते. जबराट वेग ... जबराठ थरार ... बटर मधे चाकू फिरवावा तशी रोड कापते फेरारी ... शुमाकर हा जिचा ब्रँड अँबेसेडर आहे .. ती फेरारी .. कोलबेरासाठीच !

श्रावण मोडक : तुम्ही कोणत्या मिशन वर निघाला आहात .. आणि तुम्हाला कोणत्याही रोडवरुन सर्व आडथळे पार करुन सराईत पणे निघायचंय ? श्रामोंसाठी केवळ एकंच कार .. विचार न करता ... "टोयोटा लँड रोव्हर " .. एकदा सिट वर बसलं की डायरेक्ट डेस्टिनी ! लँड रोव्हर एक प्रेस्टिजियस कार आहे.

धमालराव : सिग्रेट असो वा ड्रिंक्स .. कपडे असो वा बॉडी लँग्वेज .. प्रत्येक गोष्टीत स्वतःची खास स्टाईल असलेल्या धमल बारामतीकरांसाठी ... "मर्सेडिझ एस-क्लास" सगळं म्हणजे सगळं स्टायलीस ... रिच

छोटे नवाब .. सॉरी छोटे डॉण : यांना नावाप्रमाणेच प्रदिद्ध अशी "रोल्स रॉयस घोस्ट " अर्पण करण्यात येत आहे. गुपचुप स्विकार करावा ... आता यांना आम्ही कार बद्दल सांगणे म्हणजे ज्ञानेश्वराला (किंवा उपक्रमी जंतनुला) शुद्धलेखन शिकवण्यासारखं आहे. जसं वोल्टमोरचं नाव काढणं हॅरी पॉटरकथेत निशिद्ध आहे .. तसंच घोस्ट बद्दल बोलणं .. त्यामुळे इतकंच ! घोस्ट आमच्या डाणबासाठी ..

शेखर : कोणालाही ह्याच्याबद्दल जास्त माहित नाही .. बहुतेक "बीएमडब्लु जिना" सारखंच ! एकदम आधुनिक , फिक्शन कार .. एकेक काम इतक्या बारिकतेने केलंय की ... इन्क्रेडिबल .. बिएमडब्लु एक स्टेटस आणि ब्राण्ड आहे .. आमच्या शेखर्‍यासाठी खास 'बिएमडब्लु जिना "

प्राजु : केवळ एकच चॉईस ... "वोक्सवॉगन्स बिटल" इतकी नाजुक आणि सुंदर गाडी ... आम्ही तरी अजुन पाहिली नाही. प्राजुला ही एकंच कार सुट होईल असं वाटलं ! नीड फॉर स्पिड चा गेम खेळतांना मी नेहमी ह्या गाडीने खेळायचो .. माझी आवडती कार

रेवती : तुमच्यासाठी "बीएमडब्लु मिनी" ही सर्वांत परफेक्ट वाटली. एक क्लासिक मजबुत आणि इन्क्रेडिब्ली भारी गाडी .. इटालियन जॉब मधे या गाडीने उडवलेली धुम आपण पाहिलीच असेल ... मिनी युरोपातली सर्वाधीक लोकप्रिय गाडी आहे .

आनंदयात्री : आमच्या आंद्याला कार हवी .. मोठी .. स्पेशीयस .. श्रीमंतीचा आयकॉन असलेली .. आणि मजबुत ... आणि... सर्वांत सर्वांत महागडी. ... मग बेंटली शिवाय आहेच कोण ? बेंटली चा सुद्धा एक न एक पार्ट हँडमेड आहे. स्टेटस ऑफ रॉयल मॅन ... आंद्या

नंदन : नंद्या साठी जीएमसी ची कन्सेप्ट एसयुव्ही... .. नंद्या असतो सगळ्यांच्या पुढे ... तशीच ही कार ... कुठल्या कुठे पुढे निघुन गेलीये .. ह्या कार मधे काय नाही ? कधी कसली लिंक लागेल सांगता येणार नाही ;)

अँड लास्ट बट नॉट द लिस्ट :
सुदुर पुर्वेचे काका आणि देव काका : यांना त्यांच्याच पिढीतल्या गोष्टी जास्त आवडतात असं निरिक्षण आहे.. त्यांना ह्या जमान्यातल्या कार्स आवडणार नाहीत. म्हणुन त्यांच्यासाठी खास खालची कार सिलेक्ट करण्यात आली आहे. अँटिक पिस आहे... कोणाकडे शोधुन सापडणार नाही .. मला माहितीही नाही,

संस्कृतीआस्वाद

प्रतिक्रिया

नंदन's picture

4 Apr 2010 - 3:18 pm | नंदन

अगागागा, काय सुपीक डोस्कं आहे राव :). जीएमसी कन्सेप्ट एसयूव्ही बद्दल मंडळ आभारी आहे. बाकी, स्वतःबद्दलही आवडीची गाडी निवडा की.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

प्रमोद देव's picture

4 Apr 2010 - 3:37 pm | प्रमोद देव

टारुशेठ...मला आपलं चालायलाच आवडतं...गाडी परवडतही नाही चालवताही येत नाही..तरीही कल्पनेत का होईना तू मला गाडी दिलीस...आता उद्यापासून ये...तूच डायवर म्हनून... गाडी बाकी आवाडली बर्रका! :D

पर्नल नेने मराठे's picture

4 Apr 2010 - 4:47 pm | पर्नल नेने मराठे

मला कुठल्या कारमधे लिफ्ट मिळेल 8>
माझा एक फोटो पाहिलास तु ना ह्या पैकी एका कार बरोबर ;) =))
चुचु

jaypal's picture

4 Apr 2010 - 6:58 pm | jaypal

साठी मी एखादी कार शोधु का?

;-)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

बिपिन कार्यकर्ते's picture

4 Apr 2010 - 4:59 pm | बिपिन कार्यकर्ते

काय हो टारगट? काय काय आयडिया काढाल तुम्ही... धन्य आहात. :)

गाडी आवडली. :D

बिपिन कार्यकर्ते

आनंदयात्री's picture

4 Apr 2010 - 5:15 pm | आनंदयात्री

तु दिलेली कार स्वप्नातली असु शकते ..
आम्ही सध्या घेउ शकतो ती कार म्हणजे ..

जयवी's picture

4 Apr 2010 - 6:18 pm | जयवी

टारझन.....फार कल्पकतेने निवडल्या आहेस गाड्या :)

अरुंधती's picture

4 Apr 2010 - 6:41 pm | अरुंधती

वा वा टारझनराव! आवडली तुमची कल्पकता! :-)

अरुंधती

http://iravatik.blogspot.com/

श्रावण मोडक's picture

4 Apr 2010 - 10:09 pm | श्रावण मोडक

=D>

शुचि's picture

4 Apr 2010 - 10:27 pm | शुचि

काय मस्त मॅपींग केलय व्यक्तीमत्वांच आणि गाड्यांचं :)
>>रोल्स चं सर्वांत सुंदर क्लासिक आणि अँटिक मॉडेल. केवळ आणि केवळ मुसु सारख्या रसिक व्यक्तिमत्वासाठी.>>
क्या बात है!!! =D>
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
I fly when you persue me, But when you shy I woo thee
Explain it to me , can't you,Why I must ever want to want you.

भाग्यश्री कुलकर्णी's picture

4 Apr 2010 - 10:33 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त.

मी-सौरभ's picture

5 Apr 2010 - 12:43 am | मी-सौरभ

आजुन काही मोठी लोक राहीली की हो........

१. तुम्ही
२. रामदास
३. मास्तर
४. विकास (दोन्ही) :)

आम्हाला पण तेवढ्या गाड्या बघाया मिळतील

-----
सौरभ :)

अंतु बर्वा's picture

5 Apr 2010 - 2:04 am | अंतु बर्वा

हमरबद्दल एके काळी म्हटलं जायचं, हिचा अ‍ॅवरेज माईल्स पर गॅलन नव्हे तर गॅलन्स पर माईल मोजावा लागतो... :-)

बाकी तुमची चॉईस छानच टारझनराव...

गणपा's picture

5 Apr 2010 - 3:57 am | गणपा

पैचान कोन?

प्रभो's picture

5 Apr 2010 - 5:01 am | प्रभो

लै भारी टारूशेठ...

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

प्राजु's picture

5 Apr 2010 - 8:05 am | प्राजु

टारूभाय...अजब आहे डोकं तुझं!!!
ऑफिसमध्ये सध्या बेंचवर आहेस की काय? फावल्या वेळात चांगले उद्योग सुचताहेत. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

टारझन's picture

5 Jun 2010 - 12:48 pm | टारझन

च्यायला , ह्या धाग्यावर पब्लिक च्या प्रतिसादांबद्ध आभार प्रदुषण करायच र्‍हायलंच की :)
सगळ्या मायबाप लोकांचे आभार :)
रामदास रावांना पण आता एखादी कार द्यायला पायजेल .. नाही काय आहे , संपादक झालंय पब्लिक :) करावं लागतं ;)

टिप : बर्‍याच उमेदवार लोकांना कार्स वाटप करायचं राहिलंय , पाहु जे प्रतिसाद देतील त्यांना कार देण्याचा विचार केल्या जाईल =))

टारझन
(साला , आपले जुणे धागे वर कसे आणायचे ते टार्‍याला विचारा)

परिकथेतील राजकुमार's picture

5 Jun 2010 - 12:59 pm | परिकथेतील राजकुमार

*संपादित - प्रत्येक ठिकाणी टारझनला हिणकस समर्थन देऊ नये हि विनंती*

मनिष's picture

5 Jun 2010 - 1:33 pm | मनिष

इथले एक जुने काड्याघालू 'धागाराम वरकाढणे' ह्यांची आठवण झाली! ;)

टारझन's picture

5 Jun 2010 - 1:42 pm | टारझन

५१२ नंबरी प्रतिसाद =))

- पोलिष

शानबा५१२'s picture

5 Jun 2010 - 2:09 pm | शानबा५१२

'कार्स' वाचल आणि ह्या शब्दाला 'unknown' श्रेणीत टाकल.
नंतर कळल ते 'cars' आहे.
आमच नाव टाकल नाही म्हणून बर झाल........आम्ही म्हण्जे कुबेराचे बाप मंडळी!!
आम्ही रोज गाड्या बदलणारी माणस........आमच्याकडे चॉइसच चॉइस!
Autorickshaw-LR" alt="" />

डावखुरा's picture

5 Jun 2010 - 2:16 pm | डावखुरा

बाकि छान ..गाड्यांची माहिती अनि जुळवलेल्या जोड्याही...

मी पण तोच विचार करत ....टारझनभाउ मलाही कार.....

सुचवा..
----------------------------------------------------------------------

"निसर्ग संगती सदा घडो,
मंजुळ पक्षीगान कानी पडो,
कलंक प्रदुषणाचा घडो,
वृक्षतोड सर्वथा नावडो...!"