मला आठवतं आहे तेव्हापासूनच्या लहानपणाच्या आठवणी समर्थ नगरशी संबंधीत अशा आहेत.
समर्थ नगर म्हणजे चुनाभट्टीचं समर्थ नगर.
आमच्या समर्थ नगरातल्या इतर मुलांसारखाच मी पण होतो.
फरक एव्हढाच होता की मी इतर मुलांपेक्षा मनस्वी होतो. आई शाळेत जायची , ताया दोन्ही माझ्यापेक्षा मोठ्या ,दादा म्हणजे दादा सगळ्यात मोठा.वडील अकाली गेलेले.त्यामुळे माझ्या मनस्वी वागण्याला मोकळा वाव मिळाला.
आधी लहान म्हणून फारसं लक्ष कुणी दिलं नाही पण मग मनस्वी पणाल एक हट्टीपणाची झाक आली.
शाळेत हुषार . पहील्या पाचात नंबर .शेजार पाजार सुशिक्षीत ब्रह्मवृंदांचा. पण इतर मुलांपेक्षा मी वेगळा होतो हे नक्की. सवयी स्वच्छ.
व्यायामाची आवड. निटनेटकेपणा अंगात होताच .
त्यावेळी पाचवीत इस्त्रीचेच कपडे घालणारा मी एकटाच . सहावीत असताना पासून माझ्यासाठी कपड्याची खरेदी मी (हट्टानी मीच)करायचो.दिसायला मी चांगला आहे हे मला फार लवकर कळलं होतं . कर्तबगारीची हुशारी दाखवायचे ते दिवस नव्हते पण ताईचं लग्न ठरलं तेव्हा मी आठवीत होतो.लग्नाची तयारी ,भटजी , आचारी सगळं काही मीच केलं होतं .ते दिवस टंचाईचे होते. घरात आई एकटीच कमावती.पण आईचा माझ्यावर पूर्ण विश्वास.आईनी त्यावेळी खरेदीसाठी माझ्या हातात पाच हजार ठेवले होते.(१९६९ साली).
माझ्यासाठी कुणी मोठेपणा घेऊन काही करावं याचा मला थोडा रागच होता.करायचे ते मी करणार आणि मीच करणार अशी रग अंगात भिनली होती हे सगळं सांगायचं कारण एव्हढंच की प्लँचेटशी माझा दूरान्वयानी काही संबंध नव्हता आणि इतरांनी काही सांगीतलं असतं तर मी विश्वास ही ठेवला नसता. पूजा .कर्मकांड यावर कधीच विश्वास नव्हता.
सेल्फ मेड मॅन बनण्याची माझी पूर्वतयारी झाली होती.
______________________________________________________
प्लॅचेटचा माझा पहीला संबंध आमच्या बहीणीचं लग्न झाल्यावर आला.तो सुध्दा तिच्या सासर्यांकडून ऐकूनच.आत्मा येतो .तो वाटी हलवतो. प्रश्नांची उत्तरं देतो वगैरे ऐकूम उत्सुकता चाळवली गेली होती.आपटे नावाचे गृहस्थ त्यांच्याकडे यायचे .त्यांना प्लँचेटचे चांगले ज्ञान होते आणि त्यावर त्यांचे संशोधन चालू होते असंही कानावर आलं .
मग उत्सुकतेची एक पायरी वर गेलो .बहीणीच्या सासर्यांना भेटलो. त्यांच्या कडून प्लॅचेटचा आराखडा कसा बनवायचा ते शिकून घेतलं .मग घरी प्रयोग सुरु झाले. घरची सगळीचजणं आपापल्या कामात .त्यामुळे दुपारी हे उद्योग करायला मी मोकळा .
सुरुवातीला सगळं काही चेष्टामस्करी या सदरात मोडणारं होतं.
एक पाट घेऊन त्यावर एक ते नऊ आकडे लिहायचे. त्याखाली होकारार्थी आणि नकारार्थी उत्तरासाठी वाय आणि एन लिहायचे.एक वाटी उपडी घालून त्यावर तीन सभासद एकेक बोट ठेवायचे.
अशा प्रयोगात जे होतं ते सगळं व्हायचं .कुणीतरी बोट जोरात चेपून हवं ते उत्तर मागायचं.
म्हणजे अमुक तमुक मुलगी मला पटेल का वगैरे. उत्तर नेहेमी होकारार्थी यायचं .
परीक्षा संपल्यावर पास नापासचे प्रश्न. जे काही चालायचं ते एखाद्या उन्हाळी सुटीतल्या दुपारच्या खेळासारखं.
हा खेळ अचानक कधीतरी गंभीर वळण घे ईल असं तेव्हा वाटतही नव्हतं पण एक कळलं होतं की मी हात ठेवला तर उत्तर बरोबर येतात.
मग आपट्यांकडे चौकशी केली तर असं कळलं की ते रुढ अर्थाच्या प्लॅचेटच्या बरेच पुढे गेले होते.
ते विवक्षीत आत्म्याला प्रार्थना करून बोलवायचे. हातात एक पेन घेऊन बसायचे .प्रश्नाचं उत्तर त्यांच्या हाती लिहीलं जायचं.
मग मला वाटायला लागलं की आपणही असंच प्रार्थना करून आत्म्यांना बोलवावं आणि प्रश्नोत्तरं करावी.
मग तोच प्रयत्न इतरांनी करून बघीतला तर सगळे प्रयोग फसले.
मी मात्र नेटानी माझे प्रयत्न चालू ठेवले .म्हणजे नेमकं काय केलं ?
रोज एकच नेम. अमुक तमुकच्या आत्म्याला या असं आवाहन करायचं आणि काही होतं आहे का याची वाट बघायची.काही प्रयत्नानंतर मी सगळं सोडून द्यायच्या विचारात होतो .मग मी बहीणीच्या सासर्यांच्या मध्यस्थीने आपट्यांकडे चौकशी केली. त्यांच्याकडून कळलं की आत्मा असा सरधोपट मार्गानी येत नाही. त्यांना एका मिडीयमची आवश्यकता असते. त्यांनी परवानगी दिली तरच आत्मा आपल्याशी संपर्क साधू शकतो.आणि तो प्रकार घडला.
आमच्या साधारण ओळखीचे एक पेटकर नावाचे गृहस्थ माझ्याकडे आले. त्यांना त्यांच्या आजोबांशी संपर्क करायचा होता.एकूण प्लॅचेटची धुंदी अशी चढली होती की मी लगेच हातात पेन घेऊन बसलो. बराच वेळ प्रार्थना केली. अचानक माझा हात कोपरापासून जड पडला आणि पेन झराझर चालायला लागलं .
मी काही बेशुध्द किंवा ट्रान्स मध्ये नव्हतो पण मी माझ्या मनानी काहीच लिहीत नाही आहे हे पण कळत होतं.
पेटकरांनीही त्यांच्या आजोबांना पडताळणीसाठी काही प्रश्न विचारले त्याचे उत्तर पण बरोबर आले.
त्या दिवसापासून माझी लेखणी पळायला लागली.त्या आत्म्यांकडून त्यांची सही पण माझ्या हातून हुबेहुब कागदावर उतरायला लागली.
हाताचं जड पडणं ,प्रश्नांची उत्तरं तंतोतंत बरोबर येणं हे फार सहज व्हायला लागलं.
माझा स्वतःचा पण विश्वास फारसा घट्ट नव्हता .पण एक दिवस माझ्या हातून माझ्याच वडीलांची मोडीतली सही झरकन कागदावर उमटली आणि आम्ही सगळे प्रयोगकर्ते हादरलो.(मला मोडी काय आहे हे पण माहीती नव्हतं )
घरात दुपारी जत्रा भरायला लागली.आत्म्यांची गर्दी व्हायला लागली. त्या त्या व्यक्तीच्या संभाषणाच्या लकबी, आवडते शब्द वगैरे यायला लागले.
त्यावेळी मी इंटर सायन्सला होतो.ए ग्रुप घेतला होता आणि इंजीनीअरींग अॅडमीशनसाठी अभ्यासाची तयारी जोरात चालू असेल अशा समजात आमची आई होती.
एक दिवशी आई शाळेतून अचानक घरी आली आणि घरातला दरबार बघीतला आणि खवळली.
दरबार बरखास्त करून मला कान पिचक्या दिल्या.दरबारी मंडळींची बोळवण करण्यात आली.वह्या आणि टिपणं माळ्यावर भिरकावून देण्यात आली.
मी पण प्लॅचेटविसरून अभ्यासाला लागलो.व्हिजेटीआयला अॅडमीशन मिळवली.
पण तेव्हा हे माहीती नव्हतं की गूढ विज्ञानाचा मी दरवाजा उघडून ठेवला आहे आणि अजून पुन्हा त्याच मार्गानी मी वाटचाल करणार आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------
प्रतिक्रिया
14 Mar 2010 - 9:01 pm | प्रकाश घाटपांडे
म्हणजे परत प्लँचेट बिंचेट करायचा विचार आहे काय? काहो माणुस मेल्यावर त्याचा आत्मा दुसर्या योनीत प्रवेश करतो मग तो इतक्या वर्षानी येतो ते काय दुसर्या योनीतुन येतो काय? या प्लँचेट भानगडीवर श्री नावाच्या साप्ताहिकात पुर्वी बरच चटपटीत मजकुर येत असे. स्वराज्य विचित्र विश्व अशी काही मासिके अशा अद्भुत विषयाला वाहिलेली असायची. मी परिक्षेत पास होईन का? असे प्रश्न डायरेक्ट शिवाजी महाराजांच्या आत्म्याला विचारली जायची.
एकदा का अंधश्रद्धेच भुत मानगूटीवर बसल की भल्या भल्या मांत्रिकांना ते उतरवाता येत नाही ;)
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
15 Mar 2010 - 1:52 am | विकास
एकदा का अंधश्रद्धेच भुत मानगूटीवर बसल की भल्या भल्या मांत्रिकांना ते उतरवाता येत नाही
म्हणूनच एकदा "अंधश्रद्धेलाच" सरळ प्लँचेट करून बोलावले पाहीजे...
या प्लँचेट भानगडीवर श्री नावाच्या साप्ताहिकात पुर्वी बरच चटपटीत मजकुर येत असे. स्वराज्य विचित्र विश्व अशी काही मासिके अशा अद्भुत विषयाला वाहिलेली असायची.
Good old days... 8}
कुठे गेले ते सारे अक्षर वाड्मय :? त्यावेळेस "परवडत" नसल्याने वर्तमानपत्राच्या दुकानात अथवा ग्रंथालयातच मुखपुष्ठ पाहून समाधानी रहावे लागायचे. :( मला आठवते एकदा तर श्री साप्ताहीकाच्या संपादकाला अश्वत्थामा भेटला होता, सुभाषबाबू तर काय नेहमीच भेटत होते.
मी परिक्षेत पास होईन का? असे प्रश्न डायरेक्ट शिवाजी महाराजांच्या आत्म्याला विचारली जायची.
काय चूक आहे त्यात? एकेक परिक्षा म्हणजे गड सर करण्यातलाच प्रकार असायचा. त्यामुळे एखाद्याला परीक्षेत पास होण्यासाठी "गनिमी कावा" वापरावा लागणार असला तर, शिवाजी महाराजांना प्लँचेट करून सल्लामसलत करण्यापेक्षा अजून कुठला उत्तम उपाय असणार?
--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)
15 Mar 2010 - 9:36 am | II विकास II
>>त्यामुळे एखाद्याला परीक्षेत पास होण्यासाठी "गनिमी कावा" वापरावा लागणार असला तर, शिवाजी महाराजांना प्लँचेट करून सल्लामसलत करण्यापेक्षा अजून कुठला उत्तम उपाय असणार?
गनिमी कावा कसा वापरावा, साथीदार कसे निवडावेत, शत्रु आला की लपुन कसे बसावे, रसद कुठुन आणावी ह्यावर खुद्द राजे मार्गदर्शन करत आहेत, असा कल्पनाविलास आवडला. जाम हसायला आले.
14 Mar 2010 - 11:55 pm | Nile
शाबास!
ते नाडी आणि भविष्य कमी होतं म्हणून हे आता प्लँचेट वाले आले. चालुद्या!
15 Mar 2010 - 12:01 am | नितिन थत्ते
+१
नितिन थत्ते
15 Mar 2010 - 11:49 am | पाषाणभेद
+२

डायबेटीस विरुद्ध लढा
महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्यांच्या कटी||
महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३
15 Mar 2010 - 12:26 am | वात्रट
<<ते नाडी आणि भविष्य कमी होतं म्हणून हे आता प्लँचेट वाले आले. चालुद्या>>
च्या मारी..
timepass काय भारी होतो पण.. ;)
15 Mar 2010 - 12:47 am | राजेश घासकडवी
तुमच्यासाठी टाईम पास असला तरी बऱ्याच लोकांचा धंदा आहे तो. पोट अवलंबून असतं त्यावर. कोणी जर कोणाला बिनकिमतीची वस्तू विकली आणि लोकांनी ती घेतली तर आपण कोण बोलणारे खरं खोटं काय आहे म्हणून....उद्या तुम्ही म्हणाल की लोकांनी सिनेमाला जाऊ नये, किंवा मिपावरच्या कविता, लेख वगैरे वाचू नये कारण त्यातल्या गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेल्या नाहीत म्हणून. आयुष्य किती रूक्ष होईल कल्पना आहे का तुम्हाला?
आणि घाटपांडेसाहेब, आता समजा कोणी विचारलं शिवाजीमहाराजांच्या आत्म्याला की मी पास होईन की नाही, तर काय बिघडलं? तिकडे स्वर्गात तर कोणी यवन नाहीत (ते गेले त्यांच्या ७२ सुंदरींबरोबर....), स्वराज्य स्थापन करण्याची वगैरे गरज नाही, मग त्यांचा वेळ तरी कसा जायचा? पोरं पास होणार की नाहीत, मराठी माणसाचा मुंबईत टिकाव लागतोय की नाही, कोण्या क्रिसला आवडणारी पोरगी त्याला लाईन देणार की नाही अशा प्रश्नांवर विचार त्यांनी केला तर काय बिघडतं?
ओ प्लॅंचेटवाले भाऊ,तुम्ही काही लक्ष देऊ नका असल्या पाय जमिनीवर खेचणाऱ्यांकडे. तुमच्या भराऱ्या तुम्ही चालू ठेवा. तुम्ही इंजिनीअर झाल्यावर जी काय यंत्रं तयार केली असतील किंवा काही धरणं, पूल वगैरे बांधले असतील त्यातसुद्धा कोणी मधुबालाच्या वगैरे आत्म्याने मदत केली असेल तर त्याच्या गमती जमती सांगा.
राजेश
15 Mar 2010 - 1:03 am | शुचि
एक वांग्मय म्हणून छान आहे हा लेख. ऐकावे जनाचे, करावे मनाचे.
लहानपणी मी ही प्लँचेट करायचे....... एक सनसनाटी अनुभव : ) म्हणून.
ती वाटी हलायची/फिरायची खरी. नवर्याचं नाव म पासून येइल म्हणून आलं होतं. आताचं आडनाव म पासून आहे : )
***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.
15 Mar 2010 - 4:11 am | मीनल
माझ्या लग्नाचे वय, नव-याचा शिक्षण अचूक कळला होता एकदा प्लँचेट मधे .
आई म्हणाली भूताखेतांच्या भानगडीत नाही पडू.
मीही घाबरून पुन्हा त्या वाटेला फिरकले नाही.
पण माझा विश्वास अजून ही आहे.
मीनल.
15 Mar 2010 - 6:55 am | मदनबाण
या बद्धल बरचं ऐकलय्...पण अजुन हा प्रकार नक्की काय असतो ते कळलं नाही आणि पहायला देखील मिळाले नाही.
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
15 Mar 2010 - 8:11 am | मुक्तसुनीत
हे असले लेख वाचून नरेंद्र दाभोळकर वगैरे लोक म्हणतील : शहरात राहाणार्या एन्जिनियरींग ला जाणार्या लोकांमधे जर का हे असले समज सहज पसरत असतील तर गावातल्या गोरगरीबांचे अंधश्रद्धांचे निर्मूलन कसे होणार !?
People need to wake up and smell the morning coffee.
15 Mar 2010 - 10:19 am | हर्षद आनंदी
दाभोळकर किंवा वैज्ञानिक म्हणजे दुसरे ब्रम्हदेवच नाही का?
इथे वैज्ञानिकांना कमी लेखण्याची चुक करणार नाही, पण विद्यानाचे आयाम किती आणि काय याचा अंदाज कुणाला आहे.
चर्चमध्ये सर्वांनी मोठ्या आवाजात प्रार्थना म्हटली की ते सश्रध्द आणि जंगलातल्या आदिवासींनी हातात काठ्या घेउन, विचित्र आवाजात हेल काढुन त्यांची भक्ती दाखविली की ते अंधश्रध्द का?
श्रध्दा आणि अंधश्रध्दा ह्या व्यक्तीसापेक्ष असतात. त्यांच्या भानगडीत शहाण्याने पडु नये. एखादी प्रथा चुकीची असु शकेल पण श्रध्दा नाही..
एक उदाहरण :- माझा मामा, एका मोठ्या कंपनीत जनरल मॅनेजर आहे, त्याला ह्या प्रकारात गती आहे. तो बसल्या जागेवरुन शेकडो कोसावरील जागेचे वर्णन सांगु शकतो.
शुक्रवार पेठेतील आमच्या घरात बसुन त्याने घरमालकाला, त्यांचे पैठण येथे वडिलोपार्जित घर असुन, त्यांच्या घरात ३ पिढ्यांआधी एक ब्रम्हचारी होता अशी माहीती सांगितली आणि ऊपाय सांगितला. तो घरमालकांना प्रथमच भेटला होता.
अशी अनेक उदाहरणे, असे अनेक लोक तुमच्या आजुबाजुला सापडतील. याचे स्पष्टीकरण कोणत्या विज्ञानात येते?
आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल तर सोडुन द्यावी, संगणक वापरता, विमानातुन प्रवास करता म्हणजे सगळे कळले असे होत नाही.. विज्ञानाला समाधी अवस्थेचे गुढ अजुन ऊकलता आलेले नाही, हे सारे प्रकार त्याच्या कैक पटीने पूढचे आहेत. मानवी मेंदुचा १०% जास्त वापर करता आला, तर विमानाची, संगणकाची गरज उरणार नाही. पण हे सारे प्रकार विनाशाच्या तेवढेच जवळ जाणारे आहेत, म्हणुन लिमीटेड आणि निभावुन नेण्याची ताकद असणार्याला मिळतात. ह्या शक्ती खिरापतीप्रमाणे वाटल्या जाणार्या नव्हेत.
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
15 Mar 2010 - 11:30 pm | आळश्यांचा राजा
आपल्याला एखादी गोष्ट पटत नसेल तर सोडुन द्यावी, संगणक वापरता, विमानातुन प्रवास करता म्हणजे सगळे कळले असे होत नाही..
आळश्यांचा राजा
1 Apr 2010 - 12:18 am | गोगोल
मग उरलेल्या ३ पिढ्या कशा काय झाल्या? :P
1 Apr 2010 - 12:23 am | मुक्तसुनीत
आपल्याला एखादी गोष्ट कळत नसेल तर सोडुन द्यावी, संगणक वापरता, विमानातुन प्रवास करता म्हणजे सगळे कळले असे होत नाही..
;-)
1 Apr 2010 - 1:29 am | गोगोल
की ते नैष्ठिक ब्रह्मचर्य असावे...मामांना विचारून सांगतो.
1 Apr 2010 - 12:38 am | टिउ
त्याने (ब्रह्मचार्याने) प्लँचेट करुन कुणाचा तरी आत्मा बोलावला असेल घरी... ;-)
कशावर उपाय सांगितला? समस्या काय होती?
15 Mar 2010 - 9:43 am | प्रकाश घाटपांडे
मायबोलीवर प्लँचेट ही कथा वाचण्यात आली होती. तसा हा हल्ली काही टाईमपासचा विषय नसावा. कारण इतर गोष्टी आता आल्या ना मनोरंजनासाठी
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
15 Mar 2010 - 10:21 am | हर्षद आनंदी
पण तेव्हा हे माहीती नव्हतं की गूढ विज्ञानाचा मी दरवाजा उघडून ठेवला आहे आणि अजून पुन्हा त्याच मार्गानी मी वाटचाल करणार आहे.
म्हणजे अजुन करता का? का फी फक्त एक कपोलकप्लीत कथा आहे?
दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||
15 Mar 2010 - 12:25 pm | Dipankar
पण उद्या काय घडणार आहे हे आज कळले तर उद्या जगण्यात काय मजा? जसे तेंडूलकर २०० धावा करणार आहे हे आधीच कळले असते तर त्याला धावा करण्यात आणि आपल्याला बघण्यात काय रस राहिला असता?
15 Mar 2010 - 1:09 pm | विसोबा खेचर
अजब मामला दिसतो आहे एकंदरीत..
असो,
बर्वेगुरुजी, लेखनशैली छान.
लेखाखाली 'क्रमश:' असे लिहायचे विसरलात काय? येऊ द्या पुढचेही भाग.. :)
आपला,
(गाण्याबजावण्यात आणि बाईबाटलीत आत्मा असणारा) तात्या.
15 Mar 2010 - 7:36 pm | अप्पा जोगळेकर
शैली छान आहे. मतकरींची गोष्ट वाटते आहे. चालू ठेवा. बाकी माझी इच्छा अशी आहे की आज संभाजीराजांच्या पुण्यतिथीनिमित्ताने औरंग्याला बोलवावं प्लॅचेट करुन आणि एक बुक्का मारावा पाठीत.
15 Mar 2010 - 9:37 pm | योगी९००
हे प्लॅचेटखरे की खोटे हे माहीत नाही..पण आमचा हॉस्टेलवर वेळ मात्र मस्त जायचा..
एकदा असेच आम्ही टोळ्भैरव प्लॅचेट प्लॅचेट खेळत होतो..आमच्यातला एक फारच प्लॅचेटबाबत serious (की sincere) होता..नेहमीप्रमाणे गांधीजींना बोलावत होतो.. आमच्यातला एकजण म्हणाला "गांधीजी तुम्ही आला असाल तर Yes कडे जावा".. असे चारवेळा म्हणाल्यावर दुसरा ओरडला.."आणि नसाल आला तर ताबडतोब No कडे जावा"..फुSSSS करून सगळे हसले. जो प्लॅचेटप्रेमी serious मित्र होता..तो रागाने "ह्याचे परिणाम फार वाईट होतील"..असा शाप देऊन रागाने पाय आपटत गेला...
खादाडमाऊ
15 Mar 2010 - 11:53 pm | आळश्यांचा राजा
विवेकानंद आणि श्री अरविंद यांनी या विषयावर काही टिप्पणी केलेली वाचनात आली होती. विवेकानंदांनी त्यांच्या एका अमेरिकन शिष्येला असं करण्यापासून परावृत्त केले होते. अरविंदांनी यावर बरेच प्रयोग करून नंतर ते प्रकरण कायमचे बंद केले होते. योगिक साधन नावाचे एक पुस्तक त्यांच्याकडून पोंडेचरीत असताना लिहिले गेले होते. त्यांनी त्यावर स्वतःचे नाव टाकू दिले नव्हते कारण ते प्लांचेट द्वारा लिहिले गेले होते. पुढे एकदा त्यांनी हिंट दिली होती की ते पुस्तक राजा राम मोहन राय यांनी त्यांच्याकरवी लिहिले होते. अलिपूर जेल मध्ये अरविंद साधना करीत असताना त्यांना विवेकानंदांचा आवाज ऐकू येत असे. हे सर्व या महामानवांनी स्वतःच सांगितलेले आहे. त्यांचे मोठेपण उगाच वाढवण्यासाठी कुणा भक्तमंडळींनी हे पसरवलेले नाही.
असो. वर म्हटल्याप्रमाणे पटत नसेल तर सोडून द्यावे. हा कुचेष्टेचा विषय होऊ नये. प्रत्येकाची कुठे ना कुठे श्रद्धा ही असतेच. पूर्ण अश्रद्ध माणूस असेल असे मला तरी वाटत नाही.
ब्रोकाज ब्रेन हे कार्ल सगान यांचे पुस्तक वैचारिक संतुलनाचे उत्तम उदाहरण आहे. विज्ञानाचा अहंकार कितपत(च) असावा आणि (तथाकथित गूढ - कारण सापडेपर्यंतच ते गूढ असते) सत्याचा मागोवा कोणत्या वृत्तीने घ्यावा हे त्यातून शिकायला मिळते.
आळश्यांचा राजा
1 Apr 2010 - 12:01 am | प्रियाली
दिवस सार्थकी लागला. ;)
प्लँचेट वगैरे असण्यास आपली काहीही हरकत नाही. अन्यथा दुकान चालायचं कसं आमचं?
1 Apr 2010 - 12:57 am | डावखुरा
हे कसे शक्य आहे?
माझ्याकडे प्लेंचेट आणि परलोक जीवन हे पुस्तक आहे पण एकदाही पुर्ण वाचुन झाले नाही
"राजे!"
1 Apr 2010 - 1:15 am | डावखुरा
मायबोलीवर प्लँचेट ही कथा वाचण्यात आली होती. तसा हा हल्ली काही टाईमपासचा विषय नसावा. कारण इतर गोष्टी आता आल्या ना मनोरंजनासा
"राजे!"
21 Jul 2014 - 4:51 pm | अधिराज
एक शंका आहे, प्लँचेट एकट्याने करता येते किंवा केले तर चालू शकते का, कि प्लँचेट करण्यासाठी एकापे़क्षा अधिक व्यक्तीच असाव्यात असा नियम आहे. अनुभवींनी माहिती द्यावी.
21 Jul 2014 - 5:27 pm | नगरीनिरंजन
दाभोलकरांच्या खुन्याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी म्हणे प्लँचेट केले; आता हा प्लँचेट प्रकार खरा असता तर दाभोलकरांनी स्वतः येऊन खुन्याचे नाव सांगितले असते आणि वर त्याला सोडून द्या असेही सांगितले असते. पण तसे काही झालेले नाही; उलट पोलिसांच्याच मागे चौकशीचे लचांड लागले. करा प्लँचेट आणखी!
21 Jul 2014 - 5:54 pm | अत्रुप्त आत्मा
26 Jul 2014 - 12:09 am | आयुर्हित
22 जुलै : अंधश्रद्धेविरोधात लढा देणार डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला पण त्याहुन धक्कादायक म्हणजे तब्बल 11 महिने तपास न लावणारे पोलिसच तपासासाठी अंधश्रद्धेचा वापर केला असल्याची बाब समोर आली.
‘पोळ’खोल, हा पाहा ‘प्लँचेट’ स्टिंग ऑपरेशनचा व्हिडिओ