कुमार गंधर्व जयंती - चांगला लेख

मानस's picture
मानस in जनातलं, मनातलं
9 Apr 2008 - 2:12 am

स्त्रोत : महाराष्ट्र टाईम्स - एप्रिल ८, २००८

कुमार गंधर्वांची गायकी चित्रित करण्यासाठी एकदा जब्बार पटेल कॅमेरा घेऊन आले. मधु लिमये आणि ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर त्यावेळी उपस्थित होते. मैफलीत कॅमेरा पाहून कुमारजींना आश्चर्य वाटले. पंडितजींनी जब्बारना विचारले , कॅमेरात किती मोठा रोल आहे ? थोडक्यात किती वेळाचे गाणे चित्रित करायचे आहे ? जब्बार यांनी सांगितले , पावणे चार मिनिटे. एका चीजेसाठी पावणे चार मिनिट म्हणजे फारच अवघड काम. पण पंडितजींनी घड्याळ लावले आणि सांगितले सुरू करा चित्रीकरण. त्यांनी तराणा सुरू केला. समा बांधली आणि बरोबर २२५ सेकंदात समेवर येऊन गाणे संपविले...

कुमार गंधर्व नावाची ही जादूच अशी आगळी वेगळी होती.
हा लेख पूर्ण स्वरूपात इथे वाचा.

कलासद्भावना

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

9 Apr 2008 - 10:21 pm | प्रमोद देव

९५ वाचने होऊनही एक देखिल प्रतिसाद नाही? कुमार गंधर्वांना मिसळपावकर ओळखत नाहीत की काय? असो.

कुमार गंधर्वांबद्दल थोडक्यात पण महत्त्वपूर्ण माहिती देणारा हा लेख आवडला. मानसराव आपण इथे त्याचा दुवा दिलात त्याबद्दल मी तुम्हाला दुवा देतो.
कुमारजी माझ्या आवडत्या गायकांपैकी एक आहेत. त्यांनी सहजतेने हाताळलेले विविध गानप्रकार ऐकल्याशिवाय त्यांची खरी महती कळणार नाही. निव्वळ एका फुफ्फुसावर, श्वास,दमसास कसास लावणार्‍या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात त्यांनी जी उंची गाठली ती एक असामान्य गोष्ट होती. असा कुमार गंधर्व पुन्हा होणे नाही.
कुमारांना माझी आदरांजली.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

मानस's picture

9 Apr 2008 - 10:41 pm | मानस

प्रमोदकाका

धन्यवाद. कुमारजींच्या जयंत्ती निमित्त त्यांची आठवण व्हावी एवढीच इच्छा होती. लेखही छोटा पण अर्थपूर्ण वाटला म्हणून हा अट्टाहास.

मानस

मी लेख कालच वाचला पण काल प्रतिक्रिया देण्यास वेळ झाला नाही.
कुमारजी एक असामान्य कलाकार होते ह्यात शंकाच नाही. दैवदत्त देणगीला मेहेनतीची जोड देऊन आणि फुफ्फुसांच्या विकाराचा दैवाघात समर्थपणे पचवून गाण्यात त्यांनी स्वतःचे असे विश्व उभे केले. निर्गुणी भजने ही केवळ त्यांच्यासाठीच जणू काही निर्माण झालेली असावीत असे वाटावे इतकी ती आणि ते एकरुप आहेत.
'अजुनी रुसूनि आहे' सारखी भावगीते सुध्दा केवळ त्यांनीच अमरत्वाला नेऊन ठेवली.
त्यांच्या स्मृतींना माझे वंदन!

चतुरंग

सुवर्णमयी's picture

10 Apr 2008 - 6:53 am | सुवर्णमयी

मानस, दुव्याबद्दल आभार. तो लेख आवडला.

शैलेश दामले's picture

10 Apr 2008 - 11:40 am | शैलेश दामले

फारच छान

कुमारजींवर जब्बार पटेल यांनी केलेल्या डॉक्युमेंटरीवर येथे लेख वाचला.
http://marathi.webdunia.com/entertainment/regionalcinema/starprofile/080...