घारापुरी

प्रशु's picture
प्रशु in कलादालन
20 Mar 2010 - 3:51 pm

गो नी दांचे 'कादंबरीमय शिवकाल' वाचत होतो. त्यात 'दर्या भवानी ' मध्ये उल्लेख आला 'घारापुरी' ...

द्वारकापुरी, शुर्पारक, घारापुरी, दाल्भ्य्पुरी ह्या प्राचीन सागर प्रवास मार्गातील एक...

'घारापुरी' ... मुंबईच्या इतके जवळ असुन हे ठीकाण पाहिला नाही ह्याची खंत वाटली आणि गोनींच्या शिल्प वर्णनांनी कुतुहल देखील चाळावले. लगेचच लोकसत्ते 'सीटी वाक'
च्या विनायक परबांच्या घारापुरी बद्द्ल लेख वाचला आणी ठरवले घारापुरी दर्शन करायचेच. प्र. के घाणेकरांचे 'इये महाराष्ट्र देशी' मधुन 'घारापुरीची माहिती मिळाली. मिपाकर स्वानंद ला बरोबर घेतले आणी निघालो घारापुरी बघायला. भारताच्या प्रवेशद्वाराहुन घारापुरीला जाणारी नाव पकडली, १०० रु. परतीच्या प्रवासासहित.


घारापुरीत उतरलो, १० रु देऊन छोट्या झुकझुक गाडीतुन लेण्याण्च्या पायथ्याशी पोहोचलो. खंर तर झुकझुक गाडीची काही गरजच नाही. चालत सुद्धा जाऊ शकतो आपण. दुतर्फा असलेली शोभेच्या वस्तुंची दुकाने पार करत वर लेण्यां पाशी पोहोचलो. चार पाच लेण्यांचा समुह असला तरी मुख्य शे॑व लेणंच बघण्या सारखं आहे.

हे पहा के॑लासरोहण.

शंकर पार्वती सारीपाट.

अर्धनारीनटेश्वर.

त्रिमुर्ती.. (हि ब्रम्हा, विष्णु आणि महेश नसुन, महेशाच्याच तीन रुपांची आहे.

गंगावतरण

नटराज

अश्या प्रकारे आमचे घारापुरी दर्शन सफळ संपुर्ण झाले....

कलासंस्कृती

प्रतिक्रिया

चित्रगुप्त's picture

20 Mar 2010 - 4:31 pm | चित्रगुप्त

व्वा....छान ....
घारापुरी म्हणजे टोपीकर ज्याला एलिफन्टा म्हणत, तेच का?

प्रशु's picture

20 Mar 2010 - 4:50 pm | प्रशु

ईथे पुर्वी एका हत्तीचं मोठठं शिल्प होत असं म्हणतात.. सध्या तो दाजी लाड वस्तु संग्रहालयात आहे असं म्हणतात... त्या हत्ती वरुन एलिफंटा हे नाव पडले असावे.

समंजस's picture

20 Mar 2010 - 5:35 pm | समंजस

वा!!छान!! बर्‍याच दिवसांपासून विचार करतोय तेथे जाण्याचा :)

मदनबाण's picture

21 Mar 2010 - 4:59 am | मदनबाण

वा छान... :)

मदनबाण.....

स्वतःच्या बंगल्यांवर जनतेचे कोट्यावधी रुपये उधळणार्‍या आणि याच जनतेच्या डोक्यावर व्हॅटचा तडाखा देणार्‍या सरकारचा मी निषेध करतो !!!

http://bit.ly/dlmzCy

स्वानन्द's picture

27 May 2010 - 4:05 pm | स्वानन्द

अरेच्चा! मी फारच उशीरा पाहिलं हे कला दालन.

प्रशु, वर्णन आणखी विस्तृत लिहिलं असतं तर धमाल आली असती. असो.
पण खरंच, एक दिवसाच्या भटकंती साठी अगदी आदर्श ठिकाण आहे हे; खास करून मुंबै करांसाठी.

ति़कीट तपासणी केंन्द्रापासून थोडे पुढे एक छोटेसे संग्रहालय आहे. तिथे नक्की जावे. आतील शिल्पांचे वर्णन केलेले आहे.

स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!