माझी हॉस्पीटल भरती

मूखदूर्बळ's picture
मूखदूर्बळ in जनातलं, मनातलं
17 Mar 2010 - 9:29 am

त्या दिवशी मला अचानक भोवळ आली. कदाचित बजेट सेशन लाईव्ह पाहील्यामुळे असेल किंवा राहुल महाजन च स्वयंवर (त्याच स्वयंवर आणि त्याच्या भावी वधूचा स्वयंवध) पाहील्यामूळे असेल. पण आली खरी. सौ ने घाबरून लगेच फॅमीली डॉक्टरला फोन केला आणि सरळ हास्पीटलचा रस्ता धरला.

तळमजल्यावरच्या दोन वॉर्डबॉयनी विड्या फुंकून झाल्यावर " पेशंट कोणाय?" अशी पॄच्छा केली. त्यांचीही चुक नाही म्हणा. कारण मी तसा थोडासा (बरचसा इती सौ) गुटगुटीत आहे खरा. सौ ने माझ्याकडे अंगुली निर्देश केल्यावर त्या दोघांनी सरळ 'कबड्डी कबड्डी' करत माझी गचांडी धरली आणि स्ट्रेचरवर मला उताणा केला. ह्या अनपेक्षीत हल्ल्याने घाबरून मी डोळे गच्च मिटून घेतले. त्यामुळे 'पेशंट सिरीयस आहे' अशी समस्त भगिनींची (नर्सीणींची हो) , मावश्यांची (मावश्या म्हणजे हास्पीटलातली एक मावशी त्याचे अनेकवचन मावश्या. उगाच तमाशाची वेगैरे आठवण काढू नका) आणि वॉर्ड बॉयांची समजूत झाली असणार. ह्या हॉस्पीटलच एक बर असत. तिथे आधीपासून आया, मावश्या, सिस्टर असे आपले नातेवाईक हजर असतात. वरच्या मजल्यावर आय सी यु (मराठी अनूवाद : मी तुला बघतो) नामक खोली मध्ये मला भरती करण्यात आल. सौ ला रीसेप्शन ला जाऊन सगळ्या फॉर्म्यालीटीज पूर्ण करण्याची सुचना करण्यात आली. परत एकदा माझी गचांडी धरून मला कॉटवर आदळण्यात आल. कॉटशेजारील रॉडवर एक प्लास्टीकची बाटली (ती सुद्धा उलटी) टांगण्यात आली आणि त्याच एक टोक माझ्या मनगटात खुपसण्यात आल.

" कसली बाटली हो? "
" ग्लुकोज"
" अहे पण ती अशी उलटी का टांगलीये. सरळ टांगा ना. उगाच पडली बीडली तर खात्रड होईल ना"
" अशीच टांगायची असते" (सिस्टरच्या नजरेत " हे कुण्या गावच पाखरू" असा काहीसा भाव दिसला)"
" हे ग्लुकोज कश्या करता असत ?"
" शक्ती येण्या करता"
" मग त्यापेक्षा मी सरळ ग्लुकोज बीस्कीट खाउ का हो? माझ्या कडे २ पुडे नेहेमी असतात. ५ रुपये वाले"
" तुम्हाला झोपेच इंजेकशन देऊ का हो ? "
(हा प्रतिप्रश्न कदाचित माझ्या प्रश्न टाळण्यासाठी असावा.)
मी लगेच त वरून ताक भात ओळखून पांघरूण डोक्या वरून ओढून झोपेच सोंग घेतल.

थोड्यावेळाने जवळपास कुणी नाही ह्याची खातरजमा करून हळूच पांघरुण बाजूला केल. ती सलाईनची सुई खूपसून ठेवल्यामूळे एक तर झोप येत नव्हती आणि दूसर म्हणजे पोटात भुकेचा गोळा उठला होता. काही वेळाने सौ बाजूला येऊन उभी राहीली.
" सगळे सोपस्कार पूर्ण केलेस का?"
" हो. फॉर्म भरून दिला आणि दहा हजार रुपये डीपॉझीट म्हणून दिले"
" किती ??? "
" दहा हजार डीपॉसीट. दिवसाच भाड ४ हजार रुपये"

पेशंटला हास्पीटल मध्ये 'भरती करण' का म्हणतात ते मला आत्ता कळल. पेशंटला हास्पीटलात भरती केल की त्याच्या खिशाला ओहोटी लागते. आणि हा भरती ओहोटीचा खेळ सदैव चालू असतो.

" बर आता तुम्ही झोपा. मी बाहेर थांबलेय. काही लागल तर सांगा "
" लागल तर म्हणजे? लागतच आहे की. ही इतकी मोठी सुई मनगटात खुपसून ठेवलीये. ग्लुकोज म्हणे"
पण माझी फालतू कोटी ऐकायला सौ थांबली नाही. इथे भुकेने पोटात आग पडलेली.

"मला जेवायला मिळेल का हो? " मी मावशीला विचारल
" इथे आय सी यु मध्ये जेवण नाय. पेशंटला फक्त लीक्वीड डायट मिळेल"
"मग जरासा चहा मिळेल का हो? कधी पासून तल्लफ आलीये "
"बर आणते थोड्यावेळाने"
मला गदगदून आल. म्हणून मी पडल्या पडल्याच थोडस गदगदून घेतल. मराठीत "माय मरो पण मावशी जगो" अशी म्हण का आली असावी त्याची मला प्रचिती आली. मावशीने मला 'थोड्यावेळाने" म्हणजे साधारण तासा-भराने 'लपून छपून' चहा आणून दिला. कुणी मावशीला मला लपून छपून चहा आणून देताना पाहील असत तर 'मावशी पेशंटला ताडी-माडी विक्री केंद्रातून काहीतरी जिन्नस किंवा नीरा विक्री केंरातली उरलेली आदल्या दिवशीची नीरा तर आणून देत नाही ना?' अशी शंका त्याला/तीला आली असती. असो. चहा अगदी छान म्हणजेच 'पाणीदार' होता. पण त्या परीस्थीतीत तो तसा 'पाणीदार' चहाही खुप छान लागला.

मला थोडीशी डुलकी लागली असेल नसेल तोच मला कुणीतरी उठवल. बघतो तर माझ्या भोवती दोन डॉक्ट्रर (त्यांना आर एम ओ म्हणतात अस नंतर कुणीस सांगीतल.), दोन सीस्टर्स . मी जागा झालोय बघून एकीने माझ्या खाकेत थर्मामीटर खुपसल,दुसरीने दंडाला कसल तरी कापड चोपडल आणि फुस्स फुस्स करून हवा भरली. एका आर एम ओ ने गळ्यातला स्टेथस्कोप माझ्या छातीवर लावल्या सारखा केला आणि मला जोराने श्वास घेण्याची आज्ञ्या केली. दुसर्‍याने माझी नाडी (हाताची) धरली. कदाचित 'मल्टी टास्कींग मल्टी टास्कींग' म्हणतात ते हेच असावे. ते सर्व आपापसात काहीतरी पुटपुटत होते. मला त्यात 'ब्लड रीपोर्ट' 'ई सी जी' अस काहीस ऐकू आल.मी 'बी पी' असाही काहीतरी शब्द ऐकला आणि थोडासा कावरा बावरा झालो.
"मला नक्की काय झालय डॉक्टर"
"आमची तपासणी चालू आहे. कळेलच लवकर काय ते"
"मला डीस्चार्ज कधी मिळणार मग?"
"लवकरच. डोंट वरी. आल इज वेल"
(आयला हे डॉक्टर लोकही चित्रपट बघतात तर)
मला लगेच उडी मारुन ' जहापना तुसी ग्रेट हो. तोहफा कुबुल करो' अस म्हणावस वाटल. पण ते हाताला सलाईन लाउन ठेवलेल ना. त्यामुळे नाईलाज झाला.
एका सीस्टर ने मला फटकन टोचल आणि चांगल वाडगाभर रक्त काढल. दुसरीने छाती पोटावर कसलासा गोंद डकवला आणि कसले तरी रबराचे बील्ले त्यावर डकवले. बाजुच्या यंत्रावर काही तरी वेड्या वाकड्या रेशा उमटल्या (बहुदा मशीन बीघडल असाव. नायतर सरळ रेशा नसत्या का आल्या )
" हे काय हो?"
"ई सी जी"
"ई सी जी म्हनजे"
"एको कार्डीयो ग्राम"
" अस्स अस्स" मी मला समजल्या सारख दाखवल
तोपर्यंत त्या पहील्या सीस्टरच पूरेस रक्त शोषून झाल होत.
"बर आता पुढची टेस्ट फास्टींग नंतर"
"फास्टींग?" मी जोरात किंचाळलो
"अहो मला इथे भरती केल्या पासून काहीही खायला दिल नाहीये आणि त्यात आता वेगळ फास्टींग काय करायचय?"
त्या दोन्ही सीस्टर्स पुढच ऐकायला थांबल्या नाहीत. आपापसात काहेतरी पुटपुटत नीघून गेल्या. कदाचित 'ह्या पेशंटला एनीमा द्यावा का रेचक पाजाव का दोन्ही एकदमच कराव." हे त्या डीस्कस करत असाव्यात.

रात्री कधीतरी मग मला दमून झोप लागली. झोपेत छान छान स्वप्न पडत होती. मला इंजेक्शन देणारी सीस्टर एंजेक्शन्ची सुई मोडली म्हणून रडत होती. नाडी तपासू पहाणारा एम आर ओ हाताला नाडीच लागत नाही म्हणून कावरा बावरा झाला होता. मला एनीमा द्यायला वॉर्डबॉय आला तेंव्हा मी लब्बाड पणे बाजुच्या खुर्चीवर बसून राहीलो. आणि 'पेशंट कुठाय' अस विचारल्यावर 'काय माहीत नाही बॉ' अशा अर्थाची ओठ मुडपून खुण केली. शेवटी शेवटी तर मी कॉट खाली लपून राहीलो आणि सर्व जण पेशंट कशे शोधताहेत त्याची गम्मत बघत राहीलो. तेंव्हा का कोण जाणे कुठूनस एक मांजर आल आणि मला कॉट खाली येऊन अंग घासायला लागल.चाटायला लागल गुदगुदली होऊन मी अंग झटकल आणि टक्क जागा झालो. जागा होउन बघतो तर काय एक वॉर्डबॉय मला गरम कपड्याने खरवडून काढत होता. काय करताय विचारल तर म्हणला स्पंजींग.
घड्याळात बघीतल तर पहाटेचे ५ वाजले होते. आता पेशंटला झक्कत इतक्या पहाटे उठवून घासून पूसून काढायच काय अडल असत का हो? पण नाही (हे अगदी मोहनदास सुखटणकर स्टाईलीत बर)

शेवटी एकदाची ती शुभ घडी आली. डॉक्टर शहा का डॉक्टर मोदी असे कुणीसे एक डॉक्टर आले. ते आल्यावर एम आर ओ, सीस्टर, वॉर्ड बॉय आणि आमची सौ असा घोळका सभोवताली जमला. ते पाहून कुणीतरी पेशंट अत्यवस्थ आहे अशी तर पेशंटची आणि त्यांच्या नातेवाईकांची धारणा झाली असावी.
"तुमची तबेयत आता लय छान दिसते. तुम्हाला डीस्चार्ज द्यायला आता काय बी प्रॉब्लेम दिसत नाय. फकस्त काही टेस्ट वरचेवर करत जा"
माझा चेहरा आनंदाने खुलला. मी लगेच ती दुखणारी सलाईन काढायला लावली. माझ्या नेहेमीच्याच (म्हण्जे गबाळ्या) पेहेरावात आलो आणि लीफ्टने धावत पळत रीसेप्शनला पोहोचलो. तोपर्यंत सौ डीस्चार्ज पेपर्स घेउन आली. बील बघतो तर काय चक्क पंधरा हजार रुपये. मला पुन्हा भोवळ आली पण परत मला भरती करतील म्हणून मी ती थोपवून धरली.चेहेरा हसरा केला. शीळ घातली. ती नेहेमी सारखी न येता इडली लावलेल्या कुकरच्या शीट्टी सारखी आली. बील 'चुक'ते करून तीकडून काढता पाय घेतला. आणिक तीथे थांबलो तर अधिक भाड लावतील. उगाच कशाला.

आजकाल मला अचानकच भोवळ येते कधीतरी. मग मी लगेच जीवन नायतर रामकृष्ण हॉटेलात जाऊन म्हैसूर मसाला डोसा, नायतर इडली-वडा हादडतो आणि हास्पीटलच्या रस्त्यावर चुकून सुद्धा फिरकत नाही.'पंधरा हजार रुपये खर्च करण्यापेक्षा ५० रुपये खर्च केलेले कधीही उत्तम' काय म्हणता?

***************************************************
समाप्त

विनोदविरंगुळा

प्रतिक्रिया

उल्हास's picture

17 Mar 2010 - 9:38 am | उल्हास

जबरा
हसुन हसुन पुरेवाट

चिरोटा's picture

17 Mar 2010 - 9:47 am | चिरोटा

हा हा हा!!मस्त अनुभव.

मग मी लगेच जीवन नायतर रामकृष्ण हॉटेलात जाऊन म्हैसूर मसाला डोसा, नायतर इडली-वडा हादडतो

जीवनची मिसळपण ट्राय करा.(पण पावा ऐवजी ते ब्रेड देतात)
भेंडी
P = NP

मदनबाण's picture

17 Mar 2010 - 10:05 am | मदनबाण

क्लास लिहल आहेत.... :)
मूखदूर्बळ ... हास्पीटलात का गेलात ते आता कळले... ;)

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

पाषाणभेद's picture

17 Mar 2010 - 10:06 am | पाषाणभेद

स्वत:ला मूखदूर्बळ म्हणवता अन बराच लब्बाड दिसतात बरं का. नेहमी या हाटेलात या. दवाखाना विसरून जाल.
The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

शानबा५१२'s picture

17 Mar 2010 - 10:11 am | शानबा५१२

माझ्या कडे २ पुडे नेहेमी असतात. ५ रुपये वाले
माझ्याकडे पेपरमिंट्च्या गोळ्या असतात......आठआण्यावाल्या,मी त्या सिगरेट पिताना खातो.

*******चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........महान लेख व प्रतिक्रिया लिहुनही त्यांना फालतु बोलणारा*****

समंजस's picture

17 Mar 2010 - 12:11 pm | समंजस

मस्त :)

स्वाती दिनेश's picture

17 Mar 2010 - 12:46 pm | स्वाती दिनेश

खुसखुशीत लिहिले आहे,
स्वाती

गणपा's picture

17 Mar 2010 - 1:12 pm | गणपा

एकदम खुमसदार लेखन.
आवडल अनुभव कथन.

विसोबा खेचर's picture

17 Mar 2010 - 1:27 pm | विसोबा खेचर

गणपाशी सहमत..:)

दुर्बलराव, अजूनही लिहा..

तात्या.

झुळूक's picture

17 Mar 2010 - 1:38 pm | झुळूक

खुपच मस्त!
हसुन हसुन पोटात दुखत आहे.

मीनल's picture

17 Mar 2010 - 7:06 pm | मीनल

मस्त म्हणजे मस्तच लिहिल आहे.
भरतीकरण, फास्टींग, कूकरची शिट्टी, वेड्या वाकाड्या रेषांच मशिन,मल्टी टास्कींग ने खूप हसवलं.
शुभ घडीच्या वेळेचा तूमचा चेहरा प्रत्यक्ष डोळ्यासमोर आणवलत.

मीनल.
http://myurmee.blogspot.com/

रेवती's picture

17 Mar 2010 - 7:21 pm | रेवती

अरे वा वा वा!!!
किती बरं वाटलं हो तुमचे लेखन वाचून!
तुमची निरिक्षणे भारीच्चेत्......जसं इडली लावलेल्या कुकरसारखी शीळ वगैरे.
रेवती

डावखुरा's picture

17 Mar 2010 - 7:22 pm | डावखुरा

उत्तम !!!"राजे!"

शुचि's picture

17 Mar 2010 - 7:33 pm | शुचि

वाक्या वाक्याला हशा!!! मस्त फलंदाजी!!
>>कदाचित 'ह्या पेशंटला एनीमा द्यावा का रेचक पाजाव का दोन्ही एकदमच कराव." हे त्या डीस्कस करत असाव्यात.>>
=)) =))

भाग्यश्री कुलकर्णी's picture

17 Mar 2010 - 7:47 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मस्त आहे लिहीलेले.

टारझन's picture

17 Mar 2010 - 7:57 pm | टारझन

उत्तम विनोदी लिखाण .. जबरदस्त !!

मुखदुर्बळ जेंव्हा लेखणी उचलतो तेंव्हा जबडे हसुन हसुन दुर्बळ होतात'च' !

-टारझन

प्रमोद देव's picture

18 Mar 2010 - 10:03 am | प्रमोद देव

जबरदस्त फटकेबाजी.

मूखदूर्बळ's picture

18 Mar 2010 - 9:42 pm | मूखदूर्बळ

धन्यवाद :)

अनिल हटेला's picture

19 Mar 2010 - 12:12 am | अनिल हटेला

ह ह मु व.......=))

बैलोबा चायनीजकर !!!
© Copyrights 2008-2010. All rights reserved.

शुचि's picture

20 Mar 2013 - 6:17 am | शुचि

धागा वर आणते आहे.

धागा वर आणल्याबद्दल धन्यवाद.. मस्तच लिखिलय..

सुबोध खरे's picture

22 Mar 2013 - 10:17 am | सुबोध खरे

पेशंटला हास्पीटलात भरती केल की त्याच्या खिशाला ओहोटी लागते.
हसून हसून पुरेवाट
एक किस्सा आठवतो आहे
एका माणसाला चक्कर येत होती म्हणून तो आपल्या कौटुंबिक वैद्याकडे गेला त्याने चार दिवसाचे औषध दिले पण काही गुण आला नाही म्हणून त्याने त्याला फिजिशियन कडे पाठवले त्याने त्याचा ईसीजी एक्स रे वगैरे काढले आणि दोन दिवसाचे औषध दिले पण काही गुण आला नाही. म्हणून त्याने त्याला मेंदू विकार तज्ञाकडे पाठविले त्याने त्याचा सीटी स्केन वगैरे केला पण काही गुण आला नाही. त्यावर तो मेंदू विकार तज्ञ म्हणाला कि तुला व्हरटीगो असेल तर तू कानाच्या तज्ञाकडे जा. तो कानाच्या तज्ञाकडे गेला त्याने त्याच्या कानातील नळ्या वगैरेची तपासणी केली काही औषधे दिली पण गुण काही आला नाही. शेवटी हा माणू कंटाळून गेला दोन दिवसांनी तो आपल्या शिंप्याकडे गेला तर शिंप्याने विचारले साहेब तुमची कॉलर एवढी घट्ट (टाइट) आहे तर तुम्हाला चक्कर नाही येत?

"रात्री कधीतरी मग मला दमून झोप लागली."

दोन तीन तास कॉटवर पडुन रहिला आणि तुम्हाला दम लागला.........हे वाचुन गम्मत वाटली......

बॅटमॅन's picture

22 Mar 2013 - 4:26 pm | बॅटमॅन

अगायायायाय.........कळायचं बंद तिच्यायला :D