विं दा करंदीकर यांचे निधन

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in जनातलं, मनातलं
14 Mar 2010 - 10:59 am

ज्येष्ठ कवि व ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित विं दा करंदीकर यांचे मुंबईत भाभा रूग्णालयात निधन झाले.. ईश्वर
त्यांच्या आत्म्यास शांती देवो..

साहित्यिकबातमी

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

14 Mar 2010 - 11:03 am | विसोबा खेचर

खूप मोठा माणूस गेला..!

विनम्र श्रद्धांजली.

तात्या.

केशवसुमार's picture

14 Mar 2010 - 11:35 pm | केशवसुमार

खूप मोठा माणूस गेला!! :(
माझे सगळ्यात आवडते कवी..
विंदा, बापट आणि पाडागांवकरांचा कवितांचा कर्यक्रम ऐकला आणि बाजारातून लगेच जाउन त्यांची धृपद आणि स्वेदगंगा ही पुस्तके विकत घेतली..त्यांची किती पारायणे केली माहिती नाही...
आजचा दिवस खूप वाईट दिवस आहे.. :( , :(
विंदांना विनम्र श्रद्धांजली.
(दु:खी )केशवसुमार

II विकास II's picture

14 Mar 2010 - 11:04 am | II विकास II

भावपुर्ण श्रद्धांजली.

आजचा दिवस वाईट जाणार.

चिरोटा's picture

14 Mar 2010 - 11:15 am | चिरोटा

विंदांना विनम्र श्रद्धांजली.
भेंडी
P = NP

मदनबाण's picture

14 Mar 2010 - 11:17 am | मदनबाण

विनम्र श्रद्धांजली...

आशिष सुर्वे's picture

14 Mar 2010 - 11:50 am | आशिष सुर्वे

विंदांना भावपुर्ण श्रद्धांजली.
मराठी जनता आपली सदैव उपकृत राहिल..

======================
विंदांना भावांजली..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Mar 2010 - 2:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

विंदाच्या कितीतरी सुरेख कविता असतील, पण विंदा म्हटले की मला साठीचा गझल, कावेरी डोंगरे,
धोंड्या न्हावी, माझ्या मना बन दगड, ती जनता अमर आहे. अशा कवितांचे स्मरण होते.

मोठा माणूस गेला.

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

14 Mar 2010 - 7:19 pm | चित्रा

असेच म्हणते - मोठा माणूस गेला.
मला आठवतात ते एटू लोकांचा देश, अजबखाना आणि अशाच लहानपणी वाचलेल्या अनेक कविता..

दत्ता काळे's picture

14 Mar 2010 - 2:19 pm | दत्ता काळे

भावपूर्ण श्रध्दांजली.

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Mar 2010 - 2:37 pm | बिपिन कार्यकर्ते

यमाच्या बैलाला.... !!!!!!!!!!!

आज माझ्या मनाला दगड बनायला सांगतो आहे पण नाही बनत आहे... :(

बिपिन कार्यकर्ते

अनामिका's picture

14 Mar 2010 - 2:41 pm | अनामिका

नि:शब्द!
भावपुर्ण आदरांजली!
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।

JAGOMOHANPYARE's picture

14 Mar 2010 - 2:44 pm | JAGOMOHANPYARE

विंदाना श्रद्धांजली..

वि स खांडेकर
वि वा शिरवाडकर

आणि मग विन्दा करंदीकर

नावाची सुरुवात वि ने आणि शेवट कर ने झाल्याशिवाय मराठी माणसाला ज्ञानपीठ मिळत नाही, हे सिद्ध करणारे लेखक हरपले..

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

देणार्‍याचे हात घ्यावे म्हणणार्‍या विंदांचे आग्रही व एकांगी लिखाणाविषयीचे विचार आपणा सर्वांस मननीय ठरावेत...

वैशिष्ट्यपूर्ण नवे लेखन करणारे लेखक हे काही वेळा एकांगी दृष्टिकोनाचा अंगीकार करतात आणि तो आक्रमक रीतीने व्यक्तही करतात. अशा वेळी सुबुद्ध वाचकांनी, त्यांनी तसे करणे कदाचित त्यांच्या लेखनाला उत्तेजक ठरत असेल व ती त्यांच्या सृजनवृत्तीची निकड असेल, हे लक्षात घेऊन त्यांच्या लेखनातील अंगभूत गुणवत्तेकडे दुर्लक्ष करू नये. सुबुद्ध वाचकांनी आपला दृष्टिकोन खुला ठेवावा आणि अभिरुचीच्या सापेक्षतेची नेहमी दखल बाळगावी. वाड्‌.मयीन महात्मता ही मुख्यतः मूल्याधिष्ठित अथवा गुणाधिष्ठित असली तरी तीसुद्धा अपरिवर्तनीय नसते. आग्रही व एकांगी दृष्टिकोनावर वाड्‌.मयेतिहासांचे डोळस वाचन हाच खरा उतारा आहे.

(साहित्य अकादमीची फेलोशिप स्वीकारताना केलेले भाषण, १९६६)
साभार: सकाळ
- चिंतातुर जंतू

हेरंब's picture

14 Mar 2010 - 3:40 pm | हेरंब

अरेरे, फार मोठा कवि गेला. अशी व्यक्ति पुन्हा न होणे. आमच्या आदर्शांपैकी आता फारच थोडे लोक राहिलेत या जगांत.

कारे नाडवीसी | आपुल्या मनासी ;
पोषितो कुणासी ?| जगी कोण ?
महारोग्यापोटी | पोरांची खिल्लारे ;
जीवन तया रे | कोण देतो ?
कोणे केली बाळा | दु:खाची उत्पत्ती
वाढवी श्रीपती | पाप-पुण्य
कोणी दिली भूक ? | कोणे दिले रोग?
दारिद्र्याचे भोग दिले कोणी ?
दु:खाच्या अनंता | भोगितो संसार ;
येई भागाकार | आत्मरुपे.
आत्म्याचे हे गुह्य | ब्रह्माला ना ठावे ;
त्याच्या वंशा जावे | तेव्हा कळे.
जन्माच्या प्रश्नाला | मृत्युचे उत्तर;
देई विश्वंभर | दुजे काय ?

सारे दु:ख मानवनिर्मिती हायेत. त्यात देवाचा काय रोल नाय.
जल्माच्या प्रश्नाला मृत्यु एवढंच उत्तर देवाकडं. देव दुसरं कायबी देऊ शकत नाही.

देवालाबी जाब इचारणारा लय मोठा माणूस हरपला.
भावपूर्ण श्रध्दांजली.

बाबुराव :(

रेवती's picture

14 Mar 2010 - 5:55 pm | रेवती

विनम्र श्रद्धांजली!:(

रेवती

मुक्तसुनीत's picture

14 Mar 2010 - 7:46 pm | मुक्तसुनीत

ते गेलेले नाहीत. ते सदैव आपल्यासोबत असतील.

नितिन थत्ते's picture

14 Mar 2010 - 10:32 pm | नितिन थत्ते

असेच म्हणतो.

माझीही आदरांजली. :(

नितिन थत्ते

सुनील's picture

15 Mar 2010 - 6:57 am | सुनील

भावपूर्ण श्रद्धांजली!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

दिपाली पाटिल's picture

14 Mar 2010 - 9:08 pm | दिपाली पाटिल

विनम्र श्रध्दांजली...

दिपाली :<

सुमीत भातखंडे's picture

14 Mar 2010 - 9:29 pm | सुमीत भातखंडे

विनम्र आदरांजली!!!

देवदत्त's picture

14 Mar 2010 - 10:10 pm | देवदत्त

आदरांजली!!!

प्राजु's picture

14 Mar 2010 - 10:50 pm | प्राजु

माझी ही आदरांजली.
मराठी साहित्याचा मोठा आधार गेला.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

मिसळभोक्ता's picture

14 Mar 2010 - 11:06 pm | मिसळभोक्ता

लिहिता लिहिता विंदा काय लिहून गेले, हे त्यांचे त्यांनाच कळले असेल की नाही, कुणास ठाऊक.

ते म्हणाले,

धुंदीस ह्या गतीच्या, सारेच पंथ प्यारे

एका अर्थाने, पंथ हा शब्द धर्मांच्या उपशाखा, म्हणजे शिया-सुन्नी वगैरे, किंवा विहिंप-शिवसेना वगैरे, असा काहीसा.

आम्हा संकेतस्थळ धार्मिकांसाठी, पंथ म्हणजे मनोगत, उपक्रम, मिसळपाव, मीमराठी वगैरे.

ज्यांच्या आयुष्यात गती नाही, त्यांना हे सगळे पंथ वेगवेगळे.

आमच्या गतिमान आयुष्यासाठी मात्र, हे सर्व पंथ सारखेच.

विंदा, जियो !

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

चतुरंग's picture

15 Mar 2010 - 8:14 pm | चतुरंग

कालातीत तत्वे सांगणार्‍या महान लोकांचे विचार कसे सर्वंकष असतात हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

देणार्‍याने देत जावे
घेणार्‍याने घेत जावे

म्हणणार्‍या विंदांचे हात धरुन परमेश्वराने त्यांनाच जवळ बसवून घेतले!

(दु:खी)चतुरंग

प्रभो's picture

15 Mar 2010 - 8:03 am | प्रभो

माझीही आदरांजली.

--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी

समंजस's picture

15 Mar 2010 - 10:29 am | समंजस

विंदांना भावपुर्ण श्रद्धांजली!!!

दिपक's picture

15 Mar 2010 - 4:26 pm | दिपक

भावपुर्ण आदरांजली.