गमन !!

टारझन's picture
टारझन in जनातलं, मनातलं
14 Mar 2010 - 9:44 am

णमस्कार्स लोक्स ,,,

येस .. "गमन" म्हणजे मिपावर डावीकडे मार्गदर्शक रकाण्यातला लॉग आउटचं बटण नव्हे... गमण .. म्हणजे "गमनं" च ! आज मिसळपाव होमपेज वरचा फोटू आणि तात्यानं केलेलं वर्णन पाहिलं आणि एक किस्सा आठवला . बारावी नंतर काही सरकारी कागदपत्रांच्या कामासाठी मला गणेशपेठ मधे जावं लागे. अर्थात त्या काळी ऑटो फिटो चे खर्च परवडत नसायचे .. बस ने जाण्या ऐवजी एखाद वडापाव चापता येईल म्हणुन बसने ही जाणे टाळायचोच ! कॉर्पोरेशन ला उतरलं की पदयात्रा. वाटेत पुण्याचा "फोरास रोड" लागत असे. त्या वयात ह्या गोष्टींच भलतंच आकर्षण असे. पण तिकडे जाणे कधी स्वप्नातही आणले नव्हतं. एक कुतुहलवजा आकर्षण मात्र असायचं .. नक्की तिकडं असतं काय ? कोण लोकं येतात कोणत्या प्रकारची लोकं येतात ? कोणत्या प्रकारच्या बाया असतात ? पण पावलं तिकडे वळवण्याच्या विचारानेही अंगाला कापरं भरत असे.

एकदा मनाचा हिय्या करुन गेलोच त्या वाटेने. श्रिकृष्ण थेटराच्या बाजुने कोणत्यातरी गल्लीत घुसलो आणि घामंच फुटला, १७ वर्षांचा असेन तेंव्हा. फक्त ऐकुन असलेल्या भागात मी पहिल्यांदाच आलो होतो. अरुंद रस्ता .. दोन्ही बाजुंनी दोन-तीन मंजली माड्या .. आणि प्रत्येक खिडकीत; गॅलरीत उभ्या त्या ! यांच्या त्वचेचा रंगं नेमका कोणता ? कोणी गोरी असावी, ती तर चक्क गुलाबी दिसते, कोणी काळी सावळी असेल तर ती चिक्कार पावडर किंवा अजुन काय ?थापुन चक्क चक्क करड्या रंगाचीच झालीये ? वर हे काय ? डोळ्यात आख्खी काजळाजी डब्बी रिकामी केली की काय ? चमकी काय मारलीये .. गजरा काय लावलाय ? कपडे पण कसले ? श्श्शी .. आणि वर हाईट म्हणजे रस्त्यातल्या कोणालाही "ए शुक्शुक..","ए चल्ना .." ,"क्या रे ..मस्ती करेगा क्या ?" वगैरे कमेंट्स टाकणं ! खोल्यांच्या दरवाज्यातंच थोबाड लाल झालेली , छाती कुठे न पोट कुठे ह्याच्या पत्ताच नसलेली अत्तिशय उर्मट आणि रागिट भासणारी .. चालक असावी बहुदा ! मी पुर्णंच घामाघुम झालो होतो. कुठेसं पाणी प्यावं म्हणून थांबलो..
अशा वातावरणात काही करण्याची इच्छा तर सोडाच पण अल्मोस्ट उल्टी होईल असं वाटत होतं,
तोच माझ्या शेजारुन माझ्याच वयाचं एक पाच फुटाचं मिसरुड फुटलेलं कार्ट सेकंदांत माडीपाशी पोचलं आणि तिथे उभ्या एकीला काहीतरी बोललं , आणि ती त्याला आतंही घेऊन गेली,

मी आपली सरळ धुम ठोकली .. पुण्हा इकडे चुकूनही भटकायचं नाही.

कधी नव्हे तो मी वैचारिक झालो ! :) Sex is not something mechanical , it has to be emotional ... its not just an insertion of organ ! And of course how could it be paid ? :) मी जे दृष्य पाहिलं त्या वातावरणात माझी पाणी प्यायची इच्छा होत नव्हती तर बाकी इच्छांचं काय ? पण च्यायला, इथे सगळे लोकं तर एकाच उद्देशानं येतात.. केवळ वासना शमवण्यासाठी ? पण ह्यात सुख भेटतं का ? नो नो .. ह्यात सुख सापडेल असं ह्यांना वाटतं तरी का ? असं कोण-कुठली .. स्वच्छतेचा प्रश्न दोन कोस लांबंच ! नजरेत नजर घालुन बघायची इच्छा कशी होते ? की फक्त माझीच होत नाही ? ह्यांच्या खोल्यांतली स्ट्रक्चर्स कशी असतात ते माहित नाही , (पण ऐकीव माहितीच्या आधारे) छोट्याश्या रुम मधे ... एकाचा इकडे कार्यक्रम चालु , दुसर्‍याचा तिकडे .. जणु काही कटिंगच्या दुकाणात आपण शेजार-शेजारच्या खुर्च्यांत बसुन हेयरकट करत आहोत. दोन घटका गाडीच्या ब्लॉकपिष्टन प्रमाणे मेक्यानिकल हालचाली करून पुन्हा आपले कपडे घालुन चला पुढे .. तीही लगेच गॅलरीत लॉगिन करून उभी.. ते स्पर्शज्ञाने प्रत्येक सजीवाला असावं इव्हन गेंड्यालाही :) पण 'तो' स्पर्ष असा कुणाकडुनही कसा मिळेल ? आई-वडील-भाऊ-बहिण-मित्र-मैत्रिणी-नातेवाईक ह्यांना स्पर्ष करतो .. त्यात प्रत्येकाचं फिलींग वेगळं असतं .. त्यात 'ती' भावना कधीच नसते ! लहानपणी जेंव्हा सर्दी व्हायची तेंव्हा नाकाला- छातीला विक्स लाऊन द्यायची .. त्या स्पर्षानं एक समाधान भेटायचं .. एक फिलींग यायचं जे केवळ आणि केवळ आईच्याच स्पर्षाने यायचं! बहिणीबरोबर बर्‍याचदा मारामारी करायचो अंगमस्तीही करायचो एकदा तर डोकं फोडून घेतलं होतं :) ... पण त्यात कधी "तसं" भासलंच नव्हतं.

आपल्या मनात एक फँटसी असतेच की ( नाही म्हणता ? खोटं बोलताय :) ) पण ती भावना अशी कोणत्याही व्यक्तीसाठी येत नाही .. किमान मिपा मुखपृष्ठावरच्या व्यक्तिंसाठी तर नाहीच नाही. गप्पा-गोष्टी वाचनं , समाजात वावरताना बर्‍याच गोष्टी आपण ऐकतो. मग हे "गमन" करणारे लोकं कोण ? त्याविषयीही उद्बोधक चर्चा झालेलीच असते. मला आश्चर्य वाटतं ... ह्यांची इच्छाच कशी होते ?
बरं वरचा फोटू तर झाला भारतातला .. त्यातही एकदम रोड-लेव्हल बिजनेस :) आम्ही परदेशातही हे पाहिलं .. हो आता तिकडे काही असा स्पेशल झोन असावं असं काही नाही. किंवा तुम्हाला त्या साठी फक्त "व्यावसायिक" बायांकडेच जायला हवं असंही काही नाही. चालु चालु हँडशेक करतो तश्याच सगळ्या गोष्टी शेक केल्या जातात नो वंडर !
पण इथेही असा हाय-फाय शो असला तरी भावना कुठून विकत आणता येत नाही.. भले काही करा. एक क्षणिक आनंद आणि त्यानंतर केवळ पश्चाताप असं काहीसं ! Was it really that needed ? हा विचार आधी कधीच येत नाही :) असं का होतं ? जे रेग्युलर क्लायंट असतात अशांची मानसिकता काय असावी असा प्रश्न मला नेहमीच पडतो. प्राण्यांत आणि माणसात हा एक मोठा फरक असावा असं मला वाटतं ! माणसाच्या भावना अधिक प्रगल्भ आहेत आणि त्या भावनांतला फरक समजण्याची जाण निसर्गतःच आहे.

बोलण्यासारखं बरंच काही आहे , पण ते काही नविन नाही.. थोड्या फार फरकाने बरेच जण असा विचार करत असतीलंच ! असो !!

सर्व "गमन" करणार्‍यांना हा लेख अर्पण :)

हे ठिकाणप्रकटन

प्रतिक्रिया

विजुभाऊ's picture

14 Mar 2010 - 10:11 am | विजुभाऊ

Sex is not something mechanical , it has to be emotional ...
टार्‍या हे खरे नाहीरे. संभोगाची सुद्धा सवय होते. त्यातला सम भोग संपतो. आणि नुस्ते भोग सुरु होतात. भोग सुद्धा संपतात तेथे मग केवळ रुटीन सुरू होते.
माझे अरोरा सर म्हणायचे की
सेक्स आणि सम्भोगाबद्दल तुम्हाला कुतूहल असेल. तुमच्या मनात कल्पना येत असतील की लग्नाच्या पहिल्या रात्री स्वर्गातून अप्सरा यक्ष वगैरे आकाशातून फुले उधळतील....
तसे काही नसते........ ते कसे असते म्हणून साम्गू....... अगदी फीलिंग्स प्रमाणे सांगायचे तर...... कल्पना करा तुम्हाला खूप घाईची लागली आहे.....संडासात अगोदरच कोणीतरी गेलेय. आतला माणुस बहुतेक तेथे वीकांत साजरा करत असल्याप्रमाणे निवान्त आहे. तुम्ही अगदीच घाईला आला आहात. अचानक एकदम संडासातला माणूस बाहेर येवून तुम्हाला वॉक ओव्हर देतो....... तुम्ही हा..श्श....एकदम मोकळे होता.
तेच "मो़कळे झाल्याचे" फिलिंग तेथे ही येते.
डॉ अरोरानी सगळ्यांचीच हवा काढून टाकली होती.....

टारझन's picture

14 Mar 2010 - 1:55 pm | टारझन

नॉलेज आणि अनुभव शेयर केल्याबद्दल धन्यवाद विजुभाऊ !

मग हे रुटिन असे पैसे देऊन गलिच्छ वातावरणात असं कोणत्याही सडकछाप बरोबर कसे चालते ? प्रश्न हा आहे .

रेपिस्ट्स ही तर त्यापेक्षाही पुढची स्टेप. कसली ही भुक ? आणि ती अशी राक्षसी पद्धतीने बनवलीच पाहिजे का ? शोले मधल्या ठाकुर सारखे हात तर कापलेले नसतात नं यांचे ?

अर्धवटराव's picture

14 Mar 2010 - 10:33 am | अर्धवटराव

आज टारझनचं बाल रूप पहायला... म्हणजे वाचायला मिळाले :)
गोड आहेस रे तू टारूबाळ :)

(टार्‍याची सर्व रूपे आवडणारा) अर्धवटराव
-रेडि टु थिंक

पर्नल नेने मराठे's picture

14 Mar 2010 - 10:37 am | पर्नल नेने मराठे

टारझनने जणु काही माझ्या मनातलेच लिहिले आहे.
मला सुद्धा आश्चर्य वाटते, ह्याना भावना नसाव्यात का?
गेले आपले तिकडे नि आटोपले.
त्या बायकांच एक वेळ समजु शकतो, पोटापाण्यासाठी....

चुचु

शुचि's picture

14 Mar 2010 - 10:52 am | शुचि

>>सर्व "गमन" करणार्‍यांना हा लेख अर्पण>>
हे बाकी मस्त.
***********************************
हॅपीनेस चूझेस इट्स ओन टाइम.

विसोबा खेचर's picture

14 Mar 2010 - 10:59 am | विसोबा खेचर

टार्‍या प्रकटन चांगलं आहे रे..

समाजात वावरताना बर्‍याच गोष्टी आपण ऐकतो. मग हे "गमन" करणारे लोकं कोण ?

अहमद भिकारी, शिवा फटीचर, हुसेन लालटोपी, बाबू भंगार, नशेबाज डब्बल ढक्कन इत्यादी! ही ती सारी मंडळी...शिवाय भडवे, पोलिस, गुंड-मवाली यांच्यातच वावरलो मी..

"तात्याभाय, एक डॉक्टरका (म्हणजे 'जीएम् डॉक्टर' ही देशी दारूची क्वार्टर) पैसाईच तो बाकी है ना.. अगली बार देता हू ना भाय!"

असा माझ्याकडे लकडा लावून आमच्याच झमझम बार मध्ये उधारीवर दारू प्यायचे.. का? तर पैसे वाचवून पुढे रंडीबाजी करायला मिळावी म्हणून!

रांडांची बिनबापाची दोनचार वर्षांची उघडीनागडी उपाशी पोरंही बारच्या बाहेर घुटमळायची.. गल्ल्यावर बसलेला मी. मला ते पाहवत नसे.. मग कुणाला एखादी चाखन्यातली चकली दे, कुणाच्या हातावर चार चणे ठेव.. हेही मी केललं आहे..

वेळीअवेळी कुणा रांडेला ताप चढला, उलट्याजुलाब होऊ लागले, डॉक्टरकडे न्यायची वेळ आली की झमझम बारचा म्यॅनेजर तात्याच कधी खिशातले तर कधी गल्ल्यातले पाच-पंचवीस रुपये उसने द्यायचा!

कुणी आडदांड गुंड दारू ढोसून उधारी ठेऊन तसाच बारच्या बाहेर जाऊ लागला की शिवीगाळी करणे, पोलिसला बोलावणे, वसुलीकरता इतर गुंडांना बोलावणे ही कामंही म्यॅनेजर तात्याच करायचा! :)

असो..

तात्या.

मी-सौरभ's picture

14 Mar 2010 - 10:42 pm | मी-सौरभ

=D> =D> =D> =D> =D> =D>

आणि टा. रू. विचारी तुम्हाला पण.....
=D> =D> =D> =D> =D> =D>

-----
सौरभ :)

आगदी योग्य बोललास टारझन. माणसांच्या बाबतीत
"sex is not between to legs it is between to ears".
इतर प्राण्यांमधे माजावर येण्याचा ठराविक कालावधी असतो आणि(केवळ या नैसर्गीक प्रेरणेमुळेच) निव्वळ प्रजोत्पादनासाठी त्यांचा संग होत. हेच मनुष्याच्या बाबतीत त्याच्या प्रगत मेंदुमुळे तेवढ्या पुरत मर्यादीत रहात नाही, तो कल्प्ना विलासात(फॅन्टसी) रमु शकतो आणि त्याला हवी तेंव्हा कामेच्छा जागृत करु शकतो.
एखाद्या हाटेलात कुणी गरज अथवा नाइलाज म्हणुन जेवायल येतो तर कुणी चैन म्हणुन (भुक आणि चोचले). तस बघितल तर हे बाजार फार पुरातनकाला पासुन समाजाच्या गरजा भागवत आहेत आणि म्हणुनच मी त्यांना "shock absorbers" किंवा " punching bag" म्हणीन. हे बाजार जर या समाजात नसतील तर मिडीयाला रोज एक नवा विषय / बातमी चघळायला मिळाली असती.

पण एक मात्र खर "निसर्ग फक्त दोनच नाती जाणतो नर आणि मादी"
" alt="" />

***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

अप्पा जोगळेकर's picture

14 Mar 2010 - 12:58 pm | अप्पा जोगळेकर

टारुबाळ,

माझ्यासारखी बाळं सुद्धा इथे आहेत हे वाचून बरं वाटलं. मला वाटतं सेक्स याविषयावर अनुभवी किंवा विवाहित माणसांनी बोलावं. आपण मुकाट्याने ज्येष्ठ मंडळींना बोलू द्यावं.

मला एक कळतं नाही ते हे की रोजरोज जिलबी खाल्ली किंवा श्रीखंड खाल्ल तर जसा कंटाळा येतो तसा एकाच बाईचा किंवा पुरुषाचा कंटाळा कसा येत नाही ?

पर्नल नेने मराठे's picture

14 Mar 2010 - 1:06 pm | पर्नल नेने मराठे

>>>तसा एकाच बाईचा किंवा पुरुषाचा कंटाळा कसा येत नाही ?
शिव शिव शिव 8| ......जगबुडी होणार हो आता :O

चुचु

Pain's picture

14 Mar 2010 - 2:40 pm | Pain

In my opinoin, women are not that much interested in sex and can easily get laid if they want to. (not sure about first half)

On the contrary, men have to undergo a lot of trouble for the same. This fact and male dominance throughout the history might have set it up this way...

( Note: Emotions aren't considered as the article is about the specific system. May have a biased view because never discussed this topic in a mixed audience, rather never discussed it at all. Your comments/ taunts are appreciated. )

शार्दुल's picture

14 Mar 2010 - 3:00 pm | शार्दुल

मलाही हेच प्रश्न पडले,,,,,,,,,,,,,, पण टारु हा प्रकार आता ओल्ड फॅशन्ड बाबा आता काय नविन प्रकार कानावर पडतात,,,,,, त्यात हाय - फाय लोकंचा समावेश,,,,,, ह्याची कारणे कुठे शोधायची,,,,, दुनियाच बदलतेय,,,,,, :S

नेहा

टारझनभाऊंचा लेख व तात्यांचा प्रतिसाद, दोन्ही मस्त! कुठलं भाष्य जास्त चांगलं हे सांगणे कठीण.
"जणु काही कटिंगच्या दुकाणात आपण शेजार-शेजारच्या खुर्च्यांत बसुन हेयरकट करत आहोत" आणि "And of course how could it be paid?" ही दोन्ही वाक्ये आवडली.
तात्यांचे हे 'असले' अनुभव मी आणखी एका फोरमवर वाचले होते जिथे आमची प्रथम ओळख झाली. आजचा 'रेशमा'वरच्या लेखाचा पहिला भाग तिथेच वाचला होता!
दोघांच्या लेखनातील वैविध्य उल्लेखनीय!
------------------------
सुधीर काळे
राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा pmosb@pmo.nic.in या ई-मेल पत्त्यावर)

उग्रसेन's picture

14 Mar 2010 - 4:26 pm | उग्रसेन

भारी लिव्हलं आन मोट्या इषयाला हात घातला भो.
आमाला तर या इषयावर चर्चा कराला बी भ्या वाटतं. संस्काराची भांगड आडवी येते बाकी काय नाय. :)

एकाचा इकडे कार्यक्रम चालु , दुसर्‍याचा तिकडे .. जणु काही कटिंगच्या दुकाणात आपण शेजार-शेजारच्या खुर्च्यांत बसुन हेयरकट करत आहोत. दोन घटका गाडीच्या ब्लॉकपिष्टन प्रमाणे मेक्यानिकल हालचाली करून पुन्हा आपले कपडे घालुन चला पुढे .. तीही लगेच गॅलरीत लॉगिन करून उभी..

लय भारी . किती ह्यो यंत्रीकपणा. मह्या गावाकडं परसाकडं गेल्यावर कोण जोळ- जोळ-
बस्ला तरी मला मोकळं झाल्यासारखं वाटतं नाय. ह्या लोकायले आनंद आन् मजा कशी येत अशीन ?

ह्यांची इच्छाच कशी होते ?
अस्साच इचार आला.

परदेशात कसं असतं कोणी फोटो टाकून डिट्टेल लिव्हा ना भौ.
मंजी म्हैतीची देवान घेवाण व्हईन नै का. :)

बाबुराव :)

प्रकाश घाटपांडे's picture

14 Mar 2010 - 4:44 pm | प्रकाश घाटपांडे

बबन गमन कर.
मगन गमन कर.
छगन गमन कर.
अमन गमन कर.
----------
आपण काय शिकलात?
गमन गमन गमन गमन

प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.

jaypal's picture

14 Mar 2010 - 5:15 pm | jaypal

गमन- आगमन, गमन - आगमन करणा-यांचा

शेवट बहुधा असाच होतो
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Mar 2010 - 4:48 pm | बिपिन कार्यकर्ते

हम्म्म!!!

बिपिन कार्यकर्ते

दिपाली पाटिल's picture

14 Mar 2010 - 9:04 pm | दिपाली पाटिल

अगदी छान हाताळला आहेस विषय...मनापासून लिहीतोस तेव्हा खरच छान लिहीतोस...

दिपाली :)

प्राजु's picture

14 Mar 2010 - 10:27 pm | प्राजु

टार्‍या, बरा आहेस ना बाळा!
अचानक हा लेख.. छान लिहिले आहेस.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/

स्वाती दिनेश's picture

15 Mar 2010 - 4:39 pm | स्वाती दिनेश

टार्‍या, बरा आहेस ना बाळा!
अचानक हा लेख.. छान लिहिले आहेस.
हेच, प्राजुसारखेच आले माझ्याही मनात..
स्वाती

प्रभाकर पेठकर's picture

14 Mar 2010 - 10:54 pm | प्रभाकर पेठकर

मला वाटतं, शारीरिक गरजेची जाण झाल्या वयापासून त्या गरजेची तिव्रता वाढत जाऊन जेंव्हा अगतिकता, डेस्परेशन आदी भावनांनी माणूस (पुरूष) ग्रासतो आणि अशक्त संस्कार त्याला आवरु शकत नाहीत तेंव्हा त्याचे पाय प्रथम अशा गल्ली बोळात वळतात. (खूपदा कोणी अनुभवी मित्राच्या साथीने). सुरूवातीला घशाला कोरड पडणे, अपराधी वाटणे असे वाटते पण लवकरच माणूस रूळतो, निर्ढावतो, सरावतो.
तिथेही त्याचे कुणावर तरी 'प्रेम' बसते, तो तिच्याशी एकनिष्ठ राहतो आणि नुसती शरीराचीच नाही तर मनाची भावनिक भुकही भागवतो.

ह्यातील बरेच जणं पुढे एखाद्या मुलीशी लग्न वगैरे करून ह्या गल्ली बोळांपासून लांब राहतात.

तरीपण मुळात आपले संस्कार ह्या सर्व गोष्टींपासून आपले रक्षण करतात. त्यामुळे आपल्या मुलांवर योग्य त्या वयात योग्य ते संस्कार करणं हे पालक म्हणून आपलं कर्तव्य आपण पार पाडलं पाहीजे, असं मला वाटतं.

विषयाची व्याप्ती बरीच आहे. तेवढा माझा अभ्यास नाही.

विसोबा खेचर's picture

14 Mar 2010 - 11:01 pm | विसोबा खेचर

तिथेही त्याचे कुणावर तरी 'प्रेम' बसते, तो तिच्याशी एकनिष्ठ राहतो आणि नुसती शरीराचीच नाही तर मनाची भावनिक भुकही भागवतो.

माझ्या पाहण्यात अशी एकदोन उदाहरणे होती..

तात्या.

मुक्तसुनीत's picture

15 Mar 2010 - 8:25 am | मुक्तसुनीत

शरीरविक्रय, वेश्याव्यवसाय हा अर्थातच एक गहन विषय आहे. "द ओल्डेस्ट प्रोफेशन ऑन द अर्थ" असे ज्याचे वर्णन केले गेले तो हा व्यवसाय. या विषयाला अनेक बाजू आहेत. सांस्कृतिक परंपरा आहेत, सामाजिक बाबी आहेत , श्रेणी आहेत, प्रकार आहेत. शारिरीक नि मानसिक बाबी आहेतच. नृत्य, संगीत, चित्रकला या सार्‍यांचा या व्यवसायाशी निकटचा संबंध आहे. धार्मिक वाङ्मयात याबद्दल उल्लेख आहेत.

टारझननी पौगंडावस्थेतल्या दृष्टीकोनातून याबद्दल लिहिलेले आहे. मनाची चलबिचल मांडली आहे. या सर्व चलबिचलीचे उत्तर मला "अवेअरनेस" या एका शब्दात द्यावेसे वाटते, जे कशाच्याही बाबतीत खरे आहे.

या व्यवसायामधले शोषण, त्यातले एड्स सारखे भेडसावणारे प्रश्न, या वस्त्यांमधील मुलांचे प्रश्न , या सार्‍याचा एकंदर आर्थिक व्यवस्थेशी असलेला सबंध हे सारे लक्षांत घेणे गरजेचे आहे. कविकल्पना आणि आंबटशोकी साहित्यात वर्णिलेले रतिसुख आणि ग्राउंड रिअ‍ॅलिटीज याचा ताळमेळ लावायचा प्रयत्न करावा. सर्व चलबिचल इत्यादि गोष्टी वितळायला लागतील असे मला वाटते :-)

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Mar 2010 - 8:37 am | बिपिन कार्यकर्ते

या सर्व चलबिचलीचे उत्तर मला "अवेअरनेस" या एका शब्दात द्यावेसे वाटते, जे कशाच्याही बाबतीत खरे आहे.

"या सगळ्या मागची करूण वास्तवता ज्याला कळली तो सुटला." - पु. ल.

बिपिन कार्यकर्ते

हर्षद आनंदी's picture

15 Mar 2010 - 8:40 am | हर्षद आनंदी

मित्रा, एकदम भारी लिहिलय... विचार खुप छान आहेत!! =D> =D> =D>

पण हे सगळं कोणी स्वेच्छेने करत असेल असे नाही वाटत, ह्या जीवनाचे असे अनेक पैलु आहेत ज्यापासुन आपण फार लांब असतो. अनेक अडचणी, खोल नैराश्य, विकार, अगतिकता यानी झपाटलेली कितीतरी माणसे अश्या ठिकाणी आसरा शोधत असतील, ५ मिनिट का होईना ..पण सुख विकत घेऊन मनाचे समाधान करत असतील.

निसर्गाने मानवाला आयुष्यभर संभोग करण्याची शक्ती देऊन त्याच्या विनाशाचा एक मार्ग तयार केला आहे. केवळ एका स्त्रीच्या सहवासाच्या ईच्छेपोटी काय काय घडले हे ईतिहास सांगत आला आहे. कितीही संस्कारी माणुस असला तरी एका विशिष्ट वयात पोटाची आग शांत झाल्यावर शरीराची आग पेटणे नैसर्गिक आहे.
आजकालचा विचार केलास, तर स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचाराचा नंगा नाच तुला सर्वत्र दिसुन येईल. फॅशनच्या नावाखाली सौंदर्याचे प्रदर्शन समाजात सर्व स्थरांवर दिसुन येते. कपड्यांच्या नावाखाली चिरगुटं परीधान करुन, आदिवासी असल्याचा पुरावा देत रस्त्यावरुन किती जणी फिरत असतात, हे तुला सांगायला नकोच.
सिनेमाची पोस्टर्स, जाहीराती, विविध मुझ्यिक वाहिन्या, इंटरनेट,
यातुन प्रसारीत होणार्‍या भावनांना आळा घालणे किती जणांना जमु शकते?

सर्व काही हरवलेले, घरा-दारा पासुन पोटासाठी लांबवर आलेले, दीवसभर गुरासारखे राबणारे, त्यांना ही आग कितीवेळ काबुत करता येऊ शकेल? अश्या वेळी ही आग शांत करण्यासाठी ह्याच जागा कामाला येतात. ही सगळी भावनांची घाण स्वतःच्या अंगावर अनिच्छेने किंवा सवयीने किंवा पैश्यासाठी किंवा अजुन कशाकशासाठी घेणार्‍या त्या स्त्रीया..समाजातील ईतर स्त्रियांचे सुरक्षाकवच आहे, असे मला वाटते. अन्यथा मानवी समाज कधीच "सुसंस्कृत" ह्या शब्दापर्यंत पोहोचला नसता.

हा प्रकार समाजात सगळीकडेच आहे, जेवढ्या पायर्‍या चढशील तेवढ्या उच्चभ्रू जागेत आणि जितक्या ऊतरशील तितक्या अंधार्‍या खोलीत, पण हा वासनेचा खेळ चालु असतो. प्रत्येक खेळणार्‍याची कारणे आणि गरजा त्याच्यासाठी महत्वाच्या असतात.

भारतात संस्कृती \ संस्कार \ समाज काय म्हणेल याची भिती घालुन भावना मारायला शिकवण्याचे काम मध्यमवर्गात केले जात आले आहे. त्यामुळे हे सारे उघडपणे होत नसायचे. पण आता पुढच्या काही काळात मध्यमवर्गाचे अस्तित्व नाहीसे होऊन इथेही स्वैराचार बोकाळेल.

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

विसोबा खेचर's picture

15 Mar 2010 - 9:08 am | विसोबा खेचर

हर्षलराव,

एकंदरीत सुंदर प्रतिसाद..

निसर्गाने मानवाला आयुष्यभर संभोग करण्याची शक्ती देऊन त्याच्या विनाशाचा एक मार्ग तयार केला आहे.

आयुष्यभराची शक्ति? ती कशी काय बॉ?

आपला,
तात्या,
वय वर्ष ९५! :)

कपड्यांच्या नावाखाली चिरगुटं परीधान करुन, आदिवासी असल्याचा पुरावा देत रस्त्यावरुन किती जणी फिरत असतात, हे तुला सांगायला नकोच.
सिनेमाची पोस्टर्स, जाहीराती, विविध मुझ्यिक वाहिन्या, इंटरनेट,
यातुन प्रसारीत होणार्‍या भावनांना आळा घालणे किती जणांना जमु शकते?

सहमत आहे..

हा प्रकार समाजात सगळीकडेच आहे, जेवढ्या पायर्‍या चढशील तेवढ्या उच्चभ्रू जागेत आणि जितक्या ऊतरशील तितक्या अंधार्‍या खोलीत, पण हा वासनेचा खेळ चालु असतो.

सहमत..

उच्चभ्रू जागेबद्दल थोडेसे..

आमचा डोंगरीचा 'बाबा' आणि अनील शर्मा (माझा मित्र आणि मराठी/हिंदी शिणेमानट्यांचा, सिरियल अभिनेत्रींचा भडवा) यांच्यामुळे मला हे उच्चभ्रू वासनाकांडही बरेच पाहायला मिळाले..

अगदी चांगल्या उच्चभ्रू/श्रीमंत घरातल्या, मुंबैच्या महागड्या कालेजात शिकणार्‍या १३ वी ते १५ वीत शिकणार्‍या काही मुली डोंगरीचा बाबा पुरवतो..

रौशनीनंतर या 'उच्चभ्रू' प्रकाराबद्दल लिहिन विस्तृतपणे एकदा केव्हातरी सवडीने!

आपला,
(उच्चभ्रू!) तात्या.

हर्षद आनंदी's picture

15 Mar 2010 - 10:34 am | हर्षद आनंदी

घोडा आणि पुरुष कधी म्हातारा होत नाही असे विज्ञान सांगते, सध्या गद्धे पंचविशीत असल्याने फार अनुभव नाही!!

बर्‍याच वेळा अश्या मुली फसवल्या गेलेल्या असतात, पण फक्त ईझी मनी, छान-छौकी साठी हा "बिझीनेस" करणार्‍यांबद्दल न बोलणेच बरे!!

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

परिकथेतील राजकुमार's picture

15 Mar 2010 - 1:48 pm | परिकथेतील राजकुमार

टार्‍या जबर्‍याच लिहिले आहेस रे. एकदम आतुन आल्यासारखे वाटले. झकास !

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

चिरोटा's picture

15 Mar 2010 - 3:10 pm | चिरोटा

मनाची चांगली चलबिचल मांडली आहे.
सध्याची स्वामी/बाबा/राज्यपालांची बाहेर पडणारी प्रकरणे पाहिलीत की समाजातल्या सर्वच थरांमध्ये ह्याची लागण कशी झाली आहे ते दिसते.
P = NP

समंजस's picture

15 Mar 2010 - 4:26 pm | समंजस

टारोबा छान लिहीलयं एका नाजूक विषयावर!!!

विशाल कुलकर्णी's picture

15 Mar 2010 - 5:39 pm | विशाल कुलकर्णी

हा टार्‍या काही वेगळाच आहे. पण भावला लेख...

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"