(श्री. संदीप खरे यांच्या 'आयुष्यावर बोलु काही...." चे विडंबन अर्थात संदीपजींची क्षमा मागुन)
जरा चवीचे.., जरासे बेचव…
जरा चवीचे.., जरासे बेचव, खाऊ काही,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!
सदैव वळसे जिलबीचे हे खात रहा तू..
सदैव वळसे जिलबीचे हे खात रहा तू..
आला नाही ढेकर तोवर खाऊ काही..,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!
तवंग पाहून मिसळीवर, कुरकूरल्या बाई
तवंग पाहून मिसळीवर, कुरकूरल्या बाई
पाठ फिरू दे त्यांची नंतर, ओरपू तर्री..,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!
हवा हवासा वडापाव तूज हवाच आहे
हवा हवासा वडापाव तूज हवाच आहे
पर्याय नकोशा बर्गरवर चल शोधू काही..,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!
चयापचयाची कशा काळजी? हाण तू दाबून
चयापचयाची कशा काळजी? हाण तू दाबून
रबडी आहे ‘वड्या’च्या नंतर, खाऊ काही…
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!
लिंबू असू दे हातामध्ये, रेचक म्हणूनी
लिंबू असू दे हातामध्ये, रेचक म्हणूनी
भूक हावरी, तब्येत खडतर, खाऊ काही..,
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही ..!
चला खवैय्ये, खादाडीवर खरडू काही …….
नव-ईडंबनकार ईरसाल ‘खोटे’
प्रतिक्रिया
23 Feb 2010 - 3:42 pm | फ्रॅक्चर बंड्या
छान आहे...
आवडले
binarybandya™
24 Feb 2010 - 12:47 am | अन्या दातार
भन्नाट
10 Mar 2010 - 7:35 pm | अंकिता
रापचिक
11 Mar 2010 - 2:51 am | प्राजु
हाहाहा..
मस्त!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/