त्या दिवशी संध्याकाळी मी चर्चासत्रात भाग घेण्यासाठी म्हणून टॅक्सीच्या शोधात होतो तेव्हा स्ट्रँड बुकस्टॉल च्या जवळ माझा वरळीचा एकविसाव्या मजल्यावर राहणारा मित्र मला भेटला.
"काय कुठे ?" त्यानी मला विचारलं.
"काही नाही आपलं एक चर्चासत्र आहे दादरला .जरा जाऊन येतो." मी हळूच उत्तर दिलं. तसा मी प्रसिध्दीचा झगमगाट टाळतोच म्हणा.
पण हा म्हणजे प्रसिध्दीवाला मित्र .तो म्हणाला "म्हणजे ते गांगलांच्या साईटच्या उदघाटनाला जातोयेस म्हण की."
मी मान डोलावली.
"मग घाई काय आहे .जरा स्वागतमध्ये इडली खाऊ. मग जा दादरला.मी माझ्या गाडीतून सोडतो."त्याने प्रस्ताव मांडला .
माझ्या मनात दोन विचार आले.
एक म्हणजे गांगलांनी टॅक्सीभाडं दिलंच तर किती सांगावं ? आणि चर्चा सत्र म्हणजे काहीतरी पोटभरीचं खाणं असणारच .
माझा एकविसाव्या मजल्यावर राहणारा मित्र हुशार आहे.उगाच एकविसाव्या मजल्यावर थोडी राहणारे.
तो म्हणला माझं ऐक ."इथेच आता काय ती इडली वगैरे खाऊन घे .तिथे काही नसणार.
फक्त स्वच्छ निर्मळ थंड पाणी."
म्हण्जे माझ्या मनात फार काही नव्हतंच पण आपण गेलोच तर चार कवि लेखक भेटतील
माझ्या मनातला विचार ओळखून तो म्हणालाआणि "तसंही आज कोणी फारसं नसणार .सगळे गेलेत दुबईला.
अरे बाबा तो काही म्युच्युअल फंड किंवा इन्शुरन्स कंपनीचा मेळावा नाहीय्ये."
तसा मी फारसा चटावलेला नाहीय्ये पण...
मी इडलीच्या प्रस्तावाला होकार दिला.
***********************************************************************************
दादरला पोहचे पोहचे तो बिपीनचा फोन .
"मी पोहचतोय मालक"
(बिपीन तात्याला आणि सगळ्यांना एकाच मापात घेऊन मालक म्हणतो.तरी बरे तात्यानी त्याला संपादक बनवलं आहे)
"पंधरा मिनीटात.तात्या आलेत का ?"
आता मला माहीती नव्हतंच पण तात्या आला नाहीतर बिपीनला उभं करण्याचा प्लॅन बिपीनच्या लक्षात आला काय बॉ असं माझ्या मनात आलं खरं.
पण मी पोहचेतो तात्याचा फोन आलाच.
आता मात्र मला पोहचणं भागच होतं.
हो स्साला !!
या तात्याचा काय भरवसा नाय.
गांगलसाहेब माझ्या आधी त्याला भेटलेच तर .....
"बा झवला !! या वयात कसली साईट वगैरे काढताय ?" असं म्हणत एक नाही चर्चासत्रातल्या दोन खुर्च्या रिकाम्या करायचा.
आणि माझं तर पहीलंच चर्चासत्र...वगैरे मनात येऊन मी कासावीस झालो.
पण तसं काही झालं नाही बॉ.
मी आणि बिपीन हॉलमध्ये गेलो तेव्हा तात्या शांतपणे आनंद घारे आणि मुंडले काकांसोबत बसला होता.
*************************************************************************
आणि मग कार्यक्रमाला सुरुवात झाली. कवायती शिस्तीत .
आधी गुलाबाची फुलं वाटून कार्यक्रमाला सुरुवात झाली .
(माझ्या मनात आलं की फुलं म्हण्जे गुच्छ नाही म्हणजेच टेक्सीचं बिल आणि अल्पोपहार पण नाही.)
माधवराव शिरवळकर तयारीनी आलेले होते.त्यानी चर्चेला सुरुवात करण्यापूर्वीच सांगीतलं की ही चर्चा फक्त चाळीस मिनीटाचीच आहे.
मा. अतुल तुळशीबागवाले यांना पहीली खेळी देण्यात आली.
त्यांनी मराठी संस्थळाबद्दल त्यांचा अनुभव सांगीतला.पण त्यासोबत असेही म्हणाले की त्यांचा आणि मराठीचा संपर्क जरा उशीराच झाला आहे.शिक्षण इंग्रजीत झाल्यामुळे वगैरे.
त्यांना मिळालेली दोन मिंटं संपत आल्यावर त्यांनी खेळी मा. संजीव लाटकर यांचेकडे दिली .
संजीव लाटकर साहेब म्हणाले की "कठीण आहे बॉ.मराठी ब्लॉग्ज्सला काही फारसे चांगले दिवस दिसणार नाही."
मग माधवराव म्हणाले की हे तुमचं फारच निगेटीव्ह मत आहे बॉ.
मग तात्या म्हणाले की मला तर काही वाईट दिवस दिसत नाहीय्येत.
आता उदाहरण द्यायचं झालं तर बघा चकलीताईचा ब्लॉग.त्यावरच्या रेसीपी बघा.आहाहा...असं म्हणता म्हणता रुमाल शोधायला लागले मग मी संधी घेऊन सांगीतलं की मला तर ब्लॉग म्हणजे साठवणीच्या टाक्यांसारखे दिसतात.म्हण्जे उद्या तात्यानी चपला घालायला सांगीतलं की आपलं लिखाण कसं सुरक्षीत वगैरे असलेलं बरं .तरीपण ...
हा मुद्दा मांडल्यावर लगेच संपला.पण माझं दिड मिनीटं वाचलं त्याचं काय करावं कळेना .
मग माधवराव म्हणले की मराठी संस्थळं आणि पैशे याचा ताळमेळ कसा बसवावा बॉ.
मा.अतुलसाहेबांनी यावर काहीतरी उच्च विचार मांडला.पण मला तो काही कळला नाही .
संजीव लाटकर साहेब मात्र कळवळून म्हणाले "अहो मराठी संस्थळ म्हण्जे माझी पॅशन हो पण पैशे काय कोणी देत नाही .आता पैशे पाहीजेत म्हण्जे कल्पकता पाहीजे.कल्पकता वापरल्याशिवाय संस्थळातून पैशे मिळणार नाहीत."
यावर तात्यांनी डोळे मिटून मान डोलावली हे मी पाहीलं .
आता मालकांनी मान डोलावल्यावर मी पण मानेत मान डोलावली.
लाटकरसाहेबांचा लॉस मात्र फारच मोठा असावा.कारण नंतर त्यांनी उरलेली माझी आणि तात्यांची मिनीटं खाऊन टाकली.मग आम्ही काय गप्प बसलो.मी म्हटलं की बिकातरी प्रेक्षकातून ओरडून काही म्हणेल पण तो आपला गप्प.मी पुढच्यावेळी टारझनलाच घेऊन जाईन.
मी प्रयत्न करणार तेव्हढ्यात लाटकर साहेबांनी नजरेनीच गप्प करून टाकलं.
(सोसायटीचे नवीन मेंबर एस आर ए च्या लाभार्थींकडे जसं बघतात तसं बघीतलं .मग मला खूपच वाईट वाटलं)
मग ते काही बोल्ले ते सगळं त्यांनी रवीवारच्या अंकात छापून आल्यामुळे मी काही लिहीत नाही.
फक्त एकच महत्वाचा मुद्दा म्हणजे साडेतीन टक्के लोकांकडे ब्रॉडबँड आहे.
त्यातले दोन टक्के हापीसाचे आहेत .असं ते काही म्हणाले नाहीत पण मला आपलं तसं वाटतं.
हा साडेतीन टक्क्याचा आकडा फार वाईट आहे.त्यामुळे बरेच वर्षं वाद चालत राहतात.
(तसं बघीतलं तर तीनाचे सगळेच अपूर्णांक वाद घालण्यात हुश्शार असतात बॉ. असं मी म्हणणार होतोच पण गप्प बसलो.)
आधीच मराठी माणसं कष्टानी एकत्र येतात.
आलीच तर वाद घालतात.
ज्यांना वाद घालता येत नाहीत त्यांना मग दुसर्या संस्थळावर जावंस वाटतं पण तिथेही मालक आणि वाद असतात.
मग सेलेब्रीटी ब्लॉग्ज्स आणि युनीकोड यावर आम्ही उगाचच काहीतरी बोललो.आणि चर्चा संपली.
***********************************************************
भूक लागली होती .गांगलांचे पेढे दातातल्या फटीत अडकतील येवढे छोटे होते.
तात्या मात्र हुश्शार.थिंक महाराष्ट्रची चर्चा संपल्यावर चाळीस सेकंदाच्या आत ब्रॉडबँड बूड हलवून ड्रिंक महाराष्ट्र करायला पळाला.
अतुल तुळशीबागवाले आणि संजीव लाटकर साहेब स्टेजवरून उतरल्यावर ब्रॉडबँड आवरतं घेऊन आपापल्या मराठी नॅरोबँड सोबत घरी गेले.
थोडक्यात या चर्चेची फलशृती काय ?
या निमीत्ताने मिसळपावची जनमानसात ओळख वाढली.
गांगलाच्या पुण्याईने आमची नावं पेपरात छापून आली .लोकसत्तात फोटो आला.
तसा मी प्रसिद्धीच्या झोतात यायचे टाळतोच पण आता मराठीचा मुद्दा म्हटल्यावर....
*********************************************************************
प्रतिक्रिया
9 Mar 2010 - 9:44 pm | बिपिन कार्यकर्ते
आत्ता नुसता हसतोय... =))
सविस्तर प्रतिसाद नंतर...
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
-- भाग २
नेमका त्याच दिवशी पोचलो मुंबईला. म्हणलं जाऊया... बघू तर खरं काय प्रकार आहे. खरं म्हणजे त्या नवीन संकेतस्थळाच्या उद्घाटनापेक्षा हे चर्चासत्रच जास्त होतं डोक्यात. संध्याकाळी पोचलो तेव्हा कार्यक्रम सुरू झालाच होता. आधी प्रास्ताविक वगैरे झाले, मग गांगलांनी संकेतस्थळाचा डेमो दिला. त्या मागची भूमिका वगैरे सांगितली. आभार प्रदर्शन वगैरे पण झाले. एकदाचे चर्चासत्र सुरू झाले. पण फक्त चाळिस मिनिटंच आहेत चर्चेला असं शिरवळकरांनी सांगितलं तेव्हाच अंदाज आला. आणि... पहिल्या प्रश्नालाच जेव्हा लाटकरांनी द्रविडसारखी बॅटिंग केली तेव्हा तर मी फक्त शेवटी पेढे मिळणार असं सुरूवातीलाच जाहिर केलं होतं म्हणून थांबलो. लाटकरांनी एक तर इतरांचा वेळ खाल्ला आणि अतिशय निराशाजनक सूर काढला. त्यांच्या मते हा मराठी आंतरजालाचा खेळ पुढच्या पाचदहा वर्षात आटोपेल... काय कळत नाही बॉ... मी तर आता इंग्रजीमधून लिहायला सुरूवात करावी म्हणतोय. स्वांतसुखाय लिहावे वगैरे सगळे लोकांना सांगायला ठीक आहे हो... पण उद्या वाचकच नाही उरले तर कशाला लिहायचे? तुळशीबागवाल्यांनी मात्र उत्तम, संतुलित आणि मुख्य म्हणजे थोडक्यात उत्तरे दिली. माणूस चांगला वाटला. त्यांनी तांत्रिक मुद्द्यांवर चांगले मत मांडले.
सुरूवातीच्या दोन प्रश्नातच अर्धा तास गेला. आपल्या पब्लिकला जेमतेम संधी मिळाली... तेवढ्यात तात्या आणि रामदासांनी जमेल तेवढे बॉल खेळून काढले. मग तर चर्चा संपलीच. आम्हीही थोडावेळ टीपी करून निघालो तिथून. त्या दिवशी लाभ एवढाच... घारेकाका आणि मुंडलेकाका भेटले. ओळख झाली. घारेकाकांनाही बरेचसे मुद्दे पटले नाहीतच. विशेषतः मराठी ब्लॉग्जमधे वैविध्य नाही वगैरे तर नाहीच नाही. त्यांचा स्वतःचा ब्लॉग अतिशय सुंदर आणि खूप अॅक्टिव्ह आहे. त्यामुळे ते पण जरा नाराजच होते. असो.
थिंकमहाराष्ट्र.कॉम हे संस्थळही ठीकच आहे. इतर संस्थळांसारखीच कल्पना आहे. पण आता हे संस्थळ कसे आणि किती चालते हे बघावे लागेल. सुरूवात तर छान केली आहे. माझ्यासारख्याची अपेक्षा ही आहे की या संस्थळाशी दिनकर गांगलांसारखे मोठे नाव जोडले गेले आहे. त्याचा फायदा किती होतो... मोठे आणि नामवंत साहित्यिक इथे येतील का? लिहितिल का? इतर संस्थळांपेक्षा काही वेगळे करून दाखवतील का? ... पुढे कळेलच. त्यांना मनःपुर्वक शुभेच्छा मात्र नक्कीच.
बिपिन कार्यकर्ते
10 Mar 2010 - 8:31 pm | भोचक
'उच्च'लेख आहेच. पण या निमित्ताने लाटकरांच्या भूमिकेविषयी सखेद आश्चर्य वाटले. मुळात लाटकर ब्लॉगजगतात किती वावरतात हा प्रश्न आहे. ओपन सोर्स वेबसाईटची त्यांची माहिती किती आहे हे काही कळत नाही. त्यांची स्वतःची जय महाराष्टर डॉट कॉम ही वेबसाईट इतरांच्या आरआरएस फीडवर चालते. त्यावर पितांबरी या मराठी माणसाच्या उत्पादनाची जाहिरात बघितल्याचीही आठवते.दुसर्यांच्या फीडवर स्वतःची वेबसाईट चालविण्याचे आणि त्यावर पैसे घेऊन जाहिराती घेण्याचे जे कसब लाटकरांना साधले आहे, ते अत्यंत उच्च दर्जाचे लेख प्रसिद्ध करून केवळ 'पॅशन'पोटी स्वतःच्या खिशाला खार लावून संस्थळ चालविणार्यांना साधले नाही हा इतर मराठी संस्थळ चालकांचा दोष समजावा काय? फायदा-तोट्याची गणिते धुडकावून लावत मराठीच्या प्रेमापोटी चालवलेला हा शब्द व्यवहार फुकाचा ठरतो काय?
शिवाय बाकी या माध्यमाने जे दिले त्याविषयी लाटकरच एकेकाळी संपादक असलेल्या वृत्तपत्रात येथे येथेही काही छापून आले आहे, त्यावरही नजर मारावी.
साडेतीन टक्क्यातला (भोचक)
(भोचक)
हा आहे आमचा स्वभाव
9 Mar 2010 - 9:44 pm | कपिल काळे
भारी !!
9 Mar 2010 - 9:54 pm | मेघवेडा
समर्थ! __/\__
तसं बघीतलं तर तीनाचे सगळेच अपूर्णांक वाद घालण्यात हुश्शार असतात बॉ
=)) =))
काय खरं नाय ब्वॉ!! तुमचेही '३.१४' धरतो आम्ही आता!
-- आधी ती. मग मी..
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
मेघवेड्याचे वेडे विचार!!
9 Mar 2010 - 9:55 pm | मदनबाण
म्हण्जे उद्या तात्यानी चपला घालायला सांगीतलं की आपलं लिखाण कसं सुरक्षीत वगैरे असलेलं बरं .
=)) =)) =)) =)) =))
(तसं बघीतलं तर तीनाचे सगळेच अपूर्णांक वाद घालण्यात हुश्शार असतात बॉ. असं मी म्हणणार होतोच पण गप्प बसलो.)
=)) =)) =)) =)) =))
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com
9 Mar 2010 - 10:00 pm | चतुरंग
रामदासस्वामींनी कुबडीचे दणके घालघालून चर्चासत्र पार कांडून टाकलं राव!! =)) =)) =))
(पुढच्या चर्चासत्रात टार्या रामदासांबरोबर गेलाय प्रेक्षकात सगळीकडे हास्याचे फवारे उडताहेत आणि तात्या स्टेजवरच "बाझवला, चर्चा कसल्या करताय फोकलिच्याहो चला पेटी तबला आणा रे कुणीतरी फक्कडसा यमन जमवतो!" म्हणत मांडा ठोकून बसलाय असं काय काय डोळ्यांसमोर तरळलं......)
चतुरंग
9 Mar 2010 - 10:03 pm | बिपिन कार्यकर्ते
मेलो!!!!!!!!!!!!!
आणि आयोजकांनी नकार दिला तर टार्या त्यांच्या डोक्यावर मिरे वाटेल...
=)) =)) =))
बिपिन कार्यकर्ते
9 Mar 2010 - 10:07 pm | चतुरंग
आयोजकांची नकार देण्याची टार्याला?!!?
अस्थिदंत विमा एजंसी आहे बाबा!! ;)
चतुरंग
9 Mar 2010 - 10:52 pm | टारझन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
खपलेलो आहे :)
रामदास सर __/\__ वाक्या वाक्याला __/\__
- ( __/\__ प्रेमी) ब्रॉडोबा बँडर
9 Mar 2010 - 10:01 pm | प्रकाश घाटपांडे
बर झालं नाही तर तीन तेरा वाजतात.
रिपोर्टिंग यकदम भन्नाट! पुढचा परिसंवाद मराठी ब्लॉग्ज व मराठी खाज यावर होउन जाउ द्यात!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
9 Mar 2010 - 10:05 pm | संदीप चित्रे
=D>
खूप वाक्यांना टाळ्या दिल्यात मालक.. उदा. ...
>> थिंक महाराष्ट्रची चर्चा संपल्यावर चाळीस सेकंदाच्या आत ब्रॉडबँड बूड हलवून ड्रिंक महाराष्ट्र करायला पळाला.
अतुल तुळशीबागवाले आणि संजीव लाटकर साहेब स्टेजवरून उतरल्यावर ब्रॉडबँड आवरतं घेऊन आपापल्या मराठी नॅरोबँड सोबत घरी गेले
>> मला तर ब्लॉग म्हणजे साठवणीच्या टाक्यांसारखे दिसतात.म्हण्जे उद्या तात्यानी चपला घालायला सांगीतलं की आपलं लिखाण कसं सुरक्षीत वगैरे असलेलं बरं
>> पेढे दातातल्या फटीत अडकतील येवढे छोटे होते.
9 Mar 2010 - 10:05 pm | नावातकायआहे
>>तात्या मात्र हुश्शार.थिंक महाराष्ट्रची चर्चा संपल्यावर चाळीस सेकंदाच्या आत ब्रॉडबँड बूड हलवून ड्रिंक महाराष्ट्र करायला पळाला.
=)) =))
9 Mar 2010 - 10:18 pm | श्रावण मोडक
खल्लास!
9 Mar 2010 - 10:34 pm | jaypal
प्रथमच वाचतोय. वाक्या-वाक्याला टाळ्या आणि खुळ्या सारखा हशा
चौफेर आणि परफेक्ट नेमबाजी![](http://i304.photobucket.com/albums/nn198/inutero1212/Monkey.gif)
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
9 Mar 2010 - 10:35 pm | विसोबा खेचर
हा हा हा! :)
=))
अहो खरंच आहे ते.. उगाच सांगितलंय कुणी भांचोत फुकाच्या चर्चा करायला.. :)
खरं तर चर्चासत्रातली एक स्री मला खूप आवडली होती. अपेक्षेप्रमाणे चर्चासत्रानंतर ती स्वत: मला येऊन भेटलीदेखील.. परंतु टाईम कमी असल्यामुळे तिला पटवायला जमलं नाही.. नायतर 'ड्रिंक महाराष्ट्र' करायला आवडती स्त्री म्हणून सोबत तिलाच घेऊन गेलो असतो.. ;)
मला या चर्चासत्राचा एकच फायदा झाला, तो म्हणजे बर्याच वर्षांनी विजया जोगळेकर-धुमाळे दिसल्या.. त्यांचा चाहता आहे मी. माझ्या तरूणपणात खूप आवडायच्या त्या मला.. तश्या अजूनही खूप आवडतात म्हणा! :)
असो, रामदासराव, रिपोर्ट मात्र अगदी हुच्च आणि अंमळ खुसखुशीत..:)
तात्या.
9 Mar 2010 - 10:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जब्रा रिपोर्टींग....! :)
>>>तात्या मात्र हुश्शार.थिंक महाराष्ट्रची चर्चा संपल्यावर चाळीस सेकंदाच्या आत ब्रॉडबँड बूड हलवून ड्रिंक महाराष्ट्र करायला पळाला.
=))
>>>खरं तर चर्चासत्रातली एक स्री मला खूप आवडली होती.
तात्या, काय चाल्लंय राव हे...! :)
-दिलीप बिरुटे
9 Mar 2010 - 11:16 pm | योगी९००
धमाल..
तात्या मात्र हुश्शार.थिंक महाराष्ट्रची चर्चा संपल्यावर चाळीस सेकंदाच्या आत ब्रॉडबँड बूड हलवून ड्रिंक महाराष्ट्र करायला पळाला.
हहपुवा..
माझ्या तरूणपणात खूप आवडायच्या त्या मला..
तात्या...मला तर तुम्ही तरूण आहात असे वाटत होते..
खादाडमाऊ
9 Mar 2010 - 11:58 pm | सुमीत भातखंडे
...
10 Mar 2010 - 12:23 am | धनंजय
हे पेढे मुंबईचे की पुण्याचे? नायतर पेशल समस्त म्हैशी गाभन असलेल्या रत्नांग्रीहून आणले असणार झंप्यान् !
अहवाल मजेदार.
10 Mar 2010 - 12:29 am | Pain
विडम्बन असल्यास कसले ते कळले नाही / सन्दर्भ लागला नाही :(
10 Mar 2010 - 1:23 am | रेवती
काय रेऽऽ बाबा!
मनातल्या मनात खीखी करून हसत होते.
हे रामदासस्वामी म्हणजे एक अजब व्यक्तीमत्व आहे.
आणि तात्या म्हणजे काय बोलायलाच नको!
टार्याचं महत्व आता एकदम वाढणार तर..... काय टार्या आम्हाला विसरू नकोस!;) आजकाल तुझ्यावर स्वतंत्र धागे काय निघतायत्.....खुद्द रामदास तुला त्यांच्या बरोबर नेण्याच्या गोष्टी करतात म्हणजे .......आहे बुवा!:)
रेवती
10 Mar 2010 - 1:57 am | प्रभो
>>रामदास तुला त्यांच्या बरोबर नेण्याच्या गोष्टी करतात म्हणजे
म्हणजे टार्याचा कल्याणस्वामी अथवा रामदास काकांचा टारझन Sr
*टार्याचा कल्याणस्वामीझाला तर संत एकनाथ ह्या "अवतारा" चे काय होणार..
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
10 Mar 2010 - 2:08 am | चतुरंग
"कल्याणाऽऽऽ छाटी उडाली रे!!!" ही सज्जनगडावरची गोष्ट आठवली! ;)
(कफनीधारी)चतुरंग
10 Mar 2010 - 1:59 am | टारझन
कसं श्येक्यं हे ते :) आजही आम्ही आमच्या बिळाबिळांच्या बनेल वर पुढे "रामरंग" आणि "सितावती" चा फोटू रबरप्रेस करुन घेतला आहे :)
शर्ट फाडला की असं दर्शन होतं !!
- (हनुमान) टारझन
10 Mar 2010 - 7:42 am | रेवती
जाऊ दे! मी काही बोलतच नाही आता!
टार्या तू अशक्य आहेस.
रेवती
10 Mar 2010 - 6:26 am | शुचि
>>आधीच मराठी माणसं कष्टानी एकत्र येतात.
आलीच तर वाद घालतात.
ज्यांना वाद घालता येत नाहीत त्यांना मग दुसर्या संस्थळावर जावंस वाटतं >>
=)) =)) =))
***********************************
“The war between the sexes is the only one in which both sides regularly sleep with the enemy”
10 Mar 2010 - 12:01 pm | झकासराव
=))
फटकेबाजी :)
10 Mar 2010 - 12:56 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
रामदासकाका ... (एक सोडून) प्रत्येक वाक्याला हसले ... आणि त्या एका वाक्यात तुम्हीही विकेट्स घेतल्या आहेत!
चर्चा रोचक झाली असेलच! पण माधवरावांनाही मराठी संकेतस्थळं आणि पैशांचा ताळमेळ घालायचा आहे ... नवल आहे!
(तीनाच्या अपूर्णांकातली) अदिती
10 Mar 2010 - 1:31 pm | स्वाती दिनेश
सॉल्लिड फटकेबाजी.. वृत्तांत लईच भारी लिवला आहेत..
स्वाती
10 Mar 2010 - 2:13 pm | बेसनलाडू
(प्रेक्षक)बेसनलाडू
10 Mar 2010 - 2:29 pm | समंजस
छान लिहीलंय चर्चासत्राचा व्रुत्तांत रामदासभाउ!!!
कोपरखळ्यां बद्दल तर बोलायलाच नको :D
10 Mar 2010 - 2:34 pm | सन्जोप राव
रामदासांनी सुमारदास व्हावे हे काही पटले नाही.
सन्जोप राव
कुछ और जमाना कहता है, कुछ और है जिद मेरे दिल की
मैं बात जमानी की मानूं, या बात सुनूं अपने दिलकी
10 Mar 2010 - 8:56 pm | कौंतेय
सहमत आहे! लेख वाचताना पुन्हा पुन्हा वरती स्क्रोल करुन नाव रामदासच आहे ना हे खात्री करुन पाहावे लागत होते. रामदासांकडून पहिल्यांदाच अपेक्षाभंग.
10 Mar 2010 - 2:42 pm | दिपक
=)) ह्याला म्हणतात रिपोर्टींग.
11 Mar 2010 - 10:56 am | अस्मी
मस्त लिहिलय...मज्जा आली :)
- मधुमती
11 Mar 2010 - 11:31 am | विनायक प्रभू
प्रांत निवडल्याबद्दल धन्यवाद.
अगदी अपेक्षे प्रमाणे.
आयला प्रत्येक वेळेला सगळ्यांचा अपेक्षा कशाला पुर्ण करायच्या?
14 Mar 2010 - 6:03 pm | मी-सौरभ
-----
सौरभ :)
15 Mar 2010 - 2:44 am | भडकमकर मास्तर
ल्येख आवड्ला...
चर्च्या भारी झाली ते समजले...