आपले लेखन आपल्या मित्रांना व खोलवाचकांपर्यंत पोहोचविण्याकरिता मिसळपाव हे अतिशय सुंदर जाल आहे. पण मला वाटत कि काही माणस आपल्या संपादकीय अधिकाराचा गैर फायदा घेऊ पाहत आहेत. नव्या लेखकांना काही चांगले शिकवून शहाणे करण्यापेक्षा त्यांचा बुडत्याचा पाय आणखी खोलात ढकलला जातोय. वर अरेरावी ची भाषा हि वापरली जात आहे. मी माझ्या मागील संपादित केलेल्या लेखनाचे एडीट केल्याचे कारण विचारले असता मला सरळ " हे पाहा बाबांनो, हे आहे हे असं आहे.. पटलं तर र्हावा इथं, नायतर आग्रह नाही...
तात्या."
असे बजावण्यात आले.
हि यांची भाषा !!
वाचकांना मी आधीच सांगू इच्छितो हा माझा लेख लगेच एडीट किंवा जाला वरून काढला जाऊ शकतो. नव्यांची वाट लावून जुन्या लोकांमध्ये भेद भाव करू पाहणाऱ्या अशा खेचरांना माझा कोपरापासून नमस्कार. मला क्षमा असावी पण संपादकांनी माझी माफी मागितल्या खेरीज मी या पुढे विडंबन लेख लिहिण्याशिवाय माझे एक हि साहित्य या जालावर प्रकाशित करणार नाही.
मला माहित आहे कि यांना गरज नाही पण याच निमित्ताने त्यांचा पक्षपातीपणा समोर येईल. व तो मी तुम्हा वाचकांसमोर पुन्हा प्रकाशित करेन.
बाकी वाचकहो चूक भूल माफ.
मंगेश पावसकर
प्रतिक्रिया
7 Mar 2010 - 6:42 pm | शुचि
>>अरेरावी ची भाषा >>
वरील भाषा मला तरी अरेरेवीची वाटत नाही. फॅक्ट आहे. रहायच तर या या नियमांत रहा नाही तर वाट मोकळी आहे. इट इज अ मुच्युअल डील.
यात अरेरेवी कसली??
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
7 Mar 2010 - 6:56 pm | jaypal
सर्वांना सारखे लावावेत, डावे - उजवे करु नये अशी मंगेश पावसकरांची (रास्त) मागणी दिसते आहे.
पावासकरांचा उघड आवाज आणि आमच जाहीर अनुमोदन लक्षात घेता कदाचित शासनकर्ते आमचा आय.डी. कायमचा रद्द करु शकतात या गोष्टीची स्पष्ट जाणिव असुनही, जुने -नवे असा भेदभाव नसावा या पावसकरांच्या मताशी मी सहमत आहे.
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
7 Mar 2010 - 6:57 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
असं काय करता राव. आपले लेखन आम्हाला आवडते. असा राग धरु नका.
लिहित राहा....!
-दिलीप बिरुटे
7 Mar 2010 - 7:29 pm | विसोबा खेचर
अवघ्या दोन आठवड्याच्या कालावधीत बरेच कळले की राव आपल्याला!
असो, तरीही आपल्या वरील विधानाशी असहमत आहे.. मिपाच्या संपादकांवर माझा पूर्ण विश्वास आहे..
अगदी खरे! नेहमी असेच बजावण्यात येईल..
हीच भाषा यापुढेही राहील!
मिपाचे मालक/व्यवस्थापक/संपादक कुणाचीही माफी मागणे लागत नाहीत व कुणालाही कुठलेही स्पष्टीकरण देणे लागत नाहीत/ देणार नाहीत! मिपा हे पूर्णत: खाजगी मालमत्तेचे संस्थळ आहे..
इथे काय प्रकाशित करायचे आणि काय नाही, ही पूर्णत: आपली मर्जी आहे!
मिपा व्यवस्थापन/मालक/संपादक यांच्या विषयी आपले काहीही म्हणणे असल्यास ते कृपया tatya7@gmail.com या पत्त्यावर विरोपपत्र पाठवून कळवावे. जमल्यास उत्तर दिले जाईल..!
या स्वरुपाचा कोणताही धागा यापुढे इथे लिहिल्यास तो उडवून लावला जाईल, त्याचप्रमाणे आवश्यक वाटल्यास धागाप्रवर्तकाचे सभासदत्वदेखील गोठवण्यात येईल अथवा रद्द केले जाईल याची नोंद घ्यावी..
त्याचप्रमाणे ही चर्चा आता येथेच थांबवण्यात येत आहे तेव्हा कृपया कुणीही प्रतिसाद देऊ नयेत अन्यथा ते अप्रकाशित केले जातील अथवा काढून टाकले जातील याचीही कृपया नोंद घ्यावी...
धन्यवाद,
तात्या अभ्यंकर,
मालक, मिसळपाव डॉट कॉम.
8 Mar 2010 - 8:45 pm | जिन्क्स
अरे बाबा जाऊ दे की. किती खेचनार या विशयाला. सोडुन टाक