जन्मा येण्या कारण तू, प्रितीचं अभिसारण तू
सारे जीवन फ़ुलवणारी, सुखाची पाखरण तू
वसंताचं आगमन तू, कंच हिरवा श्रावण तू
सावळ्या नभी फ़ुललेलं, शरदाचं चांदण तू
सळसळणारं यौवन तू, निळंजांभळं गगन तू
क्षितिजावरती पसरणारं, लोभस सूर्यकिरण तू
लावण्याची उधळण तू, नात्यांमधली गुंफ़ण तू
अनेक धागे बांधणारं, एक अतूट बंधन तू
दु:खाला लिंपण तू, मायेचं शिंपण तू
गंधभरल्या फ़ुलाफ़ुलांचं, सुंदर मोहक अंगण तू..
शुभशकुनांचं तोरण तू, मांगल्याचं औक्षण तू
झिजतानाही दरवळाणारं, देव्हार्यातलं चंदन तू
भाळावरचं गोंदण तू, नवरत्नांचं कोंदण तू
विसवण्या या जगताला गे, मिळालेलं आंदण तू
- प्राजु
सर्वांना महिलादिनाची हार्दिक शुभेच्छा!!
प्रतिक्रिया
8 Mar 2010 - 8:34 am | हर्षद आनंदी
महिलादिनाच्या हार्दीक शुभेच्छा !!
शुभशकुनांचं तोरण तू, मांगल्याचं औक्षण तू
झिजतानाही दरवळाणारं, देव्हार्यातलं चंदन तू
अप्रतिम... पण ह्याची उदाहरणे लोप पावत चालली आहेत, हेच दूर्दैव!!
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
8 Mar 2010 - 8:35 am | हर्षद आनंदी
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
8 Mar 2010 - 9:33 am | विसोबा खेचर
या कवितेकरता माझ्यापाशी शब्द नाहीत...!
तात्या.
8 Mar 2010 - 5:42 pm | मीनल
+१
मीनल.
8 Mar 2010 - 11:18 am | बेसनलाडू
खूप आवडली.
सर्वांना जागतिक महिलादिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
(स्त्रीदाक्षिण्यवादी)बेसनलाडू
8 Mar 2010 - 1:38 pm | उदय सप्रे
खूपच छान !(अॅज उज्वल !)
महिला दिनाच्या शुभेच्छा !
8 Mar 2010 - 2:41 pm | विमुक्त
खूपच सुंदर!!!
8 Mar 2010 - 2:53 pm | मेघवेडा
प्राजुतै,
अप्रतिम कविता! खरंच खूप सुंदर!!
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
मेघवेड्याचे वेडे विचार!!
8 Mar 2010 - 3:07 pm | ज्ञानेश...
महिलादिनानिमित्त याहून चांगली कविता होऊ शकली नसती !
खूप आवडली. एखाद्या लोभस शुभेच्छापत्रासारखी आहे कविता !
जियो प्राजुतै !
8 Mar 2010 - 6:57 pm | शुचि
+१
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
8 Mar 2010 - 3:15 pm | फ्रॅक्चर बंड्या
फार फारच छान...
binarybandya™
8 Mar 2010 - 3:41 pm | नाद्खुळा
माझ्याकडुन एक ओळ भेट
प्रत्येकीच्या ह्रुदयामधलं , स्त्री रुपी स्पन्दन तू !
8 Mar 2010 - 7:24 pm | प्राजु
सर्वांचे मनापासून आभार. :)
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
8 Mar 2010 - 7:28 pm | बिपिन कार्यकर्ते
छान कविता.
बिपिन कार्यकर्ते
8 Mar 2010 - 8:12 pm | चतुरंग
चतुरंग
8 Mar 2010 - 8:16 pm | प्रभो
मस्त
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
8 Mar 2010 - 8:19 pm | अरुंधती
सुन्दर! :-)
अरुंधती
http://iravatik.blogspot.com/
9 Mar 2010 - 6:49 am | राजेश घासकडवी
तात्यांनी मुखपृष्ठावर टाकलेल्या चित्राशी अगदी तंतोतंत जुळणारी कविता झाली आहे... तोच सोनेरी पिवळा प्रकाश, तीच अल्लडपणा आणि मोठेपणा यांच्या उंबरठ्यावरची असलेली मुलगी/स्त्री/भावी माता डोळ्यापुढे येते.
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा...
राजेश
9 Mar 2010 - 7:28 am | sur_nair
ही कविता रोज घरी ऐकवावी म्हणतो म्हणजे संसार आणखी सुखाचा होईल! गमतीचा भाग सोडा, कविता सुंदरच आहे.
9 Mar 2010 - 7:30 am | सुधीर काळे
प्राजू,
खरंच फार सुंदर कविता करतेस तू! माझ्यासारख्या कवितेच्या प्रांतात वावरायला घाबरणार्यालाही तुझ्या कविता भावतात!
आधी मला वाटलं होतं कीं 'आई'ला उद्देशून हे काव्य लिहिलं आहेस, म्हणून ते जास्तच भावलं!
खरंच सरस्वतीचा हात आहे तुझ्या डोक्यावर.
अशीच लिहीत जा. एकादी कविता नाहीं वाचली जात, पण त्याचा अर्थ मला आवडली नाहीं असा नाहीं हं!
कारण मी जाम घाबरतो कवितांना!
जय हो!
------------------------
सुधीर काळे
राष्ट्रपतींना निरोप लिहा presidentofindia@rb.nic.in या ई-मेल पत्त्यावर, प्रधानमंत्र्यांना निरोप लिहा http://pmindia.nic.in/write.htm या दुव्यावर)
9 Mar 2010 - 7:52 am | प्राजु
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार. :)
सुधिरकाका,
खरंच सरस्वतीचा हात आहे तुझ्या डोक्यावर.
सरस्वतीचा हात आहे की नाही माहिती नाही, पण आपल्यासारख्यांचे आशीर्वाद मात्र नक्कीच आहेत पाठीशी आणि ते असेच राहुदेत, अशीच प्रार्थना करते.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.com/
9 Mar 2010 - 10:46 am | बज्जु
नमस्कार प्राजक्ता (सर्वव्यापी),
सुधीर भाऊंशी सहमत,
मी डोंगर-दर्यात, कडे-कपारीत, राना-वनातून, फिरणारा माणूस, सहसा कवितेच्या वगैरे वाट्याला न जाणारा, हा माझा एक ओळीचा प्रयत्न.
"संसदेच्या गोंधळामध्ल्या, विधेयकाचे कारण तू ;)
9 Mar 2010 - 10:50 am | मंगेशपावसकर
speechless
9 Mar 2010 - 10:54 am | दत्ता काळे
सुंदर कविता.
9 Mar 2010 - 11:32 am | नाना बेरके
महिला दिनाच्या निमित्ताने टाकलेली हि कविता लई आवडली.
चांदनी आयी ID उडाने. ., सुझे ना कोई मंजील.
नाना बेरके
9 Mar 2010 - 1:23 pm | स्वाती दिनेश
सुरेख कविता!
स्वाती
9 Mar 2010 - 7:02 pm | नंदू
कविता आवडली.