सफर अपरिचीत किल्ल्यांची: अनघई आणि म्रुगगड
आमची जोडी तशी ठरलेलीच. मी आणि सुजीत साठे. एकदा ट्रेकला जायचं ठरलं कि फारसं कोणाला न विचारता बाईक काढतो आणि सुटतो. या वेळी सफर करायची होती दोन अपरिचीत किल्ल्यांची ते म्हणजे अनघई आणि म्रुगगड. सह्याद्रीच्या मुख्य रांगेपासुन थोडे वेगळे झालेले आणि नेहमीच्या हौशी ट्रेकर्सपासुन जरा दुर्लक्षिलेले असे हे किल्ले.
शनिवारी पहाटे बाईक काढ्ली. पनवेल, खालापुर मार्गे जांभुळपाड्यापासुन ५ कि.मि. असलेल्या कळंब गावात आलो. कळंब गाव तसं लहानच. ४०-५० घर असावीत जेमतेम. गावातुन समोर पहातो तर २-३ गड वजा डोंगर दिसत होते यातला नक्की अनघई कुठ्ला ? गडाची वाट दाखवायला कोणी माणुस मिळेल का अशी चौकशी केली तेव्हा बबन नावाचा एक पासष्ट वर्षाचा तरुण तयार झाला. लगेच निघालो. साधारण १५-२० मि. एका जुन्या पुलाजवळ आलो. भरपुर पाऊस झाला कि या पुलावरुन पाणी वहात असते अशी माहिती मामानी दिली.
कळंब गाव
कळंब गावातुन
जुना पुल
या पुलावरुन पुढे साधारण अर्धा तास चढुन गेलो आणि एका पठारावर आलो. वाट मधेच झाडीत आणि गवतात हरवलेली. मामाच्या मदतीने १०-१५ मि. इकडे-तिकडे शोधाशोध केल्यावर वाट मिळाली.
समोर असलेल्या दोन खिंडींपैकी डाव्या बाजुच्या खिंडीतुन जाणारी वाट अनघईला जाते. अर्धा तासाच्या खड्या चढाईनंतर खिंड चढुन आलो. या वाटेने चांगलीच वाट लावली होती. :S
एक सोपा कातळट्प्पा पार करुन साधारण दीड तासाच्या वाटचालीनंतर अनघईवर पोचलो. या किल्ल्याचा वापर मुख्यतः ऊंबरखिंडीच्या टेहळणीसाठी होत असावा त्यामुळे वरती विशेष काही बांधकाम नाही. गडाचा पसाराही लहानच आहे. अनघईदेवीचे मंदिर, २-४ पाण्याची टाकी बसं आट्पला कारभार. आम्ही वरती पोहोच्ल्यावर मामाने देवीची पुजा करुन नारळ फोड्ला. तोपर्यंत आम्ही सह्याद्रीची मुख्य रांग आणि गडावरुन दिसणार्या भोवतालच्या परिसराचे निरीक्षण करत होतो.
अनघईदेवीचे मंदिर आणि बबन मामा
पाण्याची टाकी, मागील बाजुस सह्याद्रीची मुख्य रांग
झाडाच्या पारंब्या पासुन नवीन झाड
तिथेच थोडंस खाऊन घेतलं आणि ऊतरायला सुरवात केली. तासभरात खाली आलो. मामाचा निरोप घेतला. बाईक काढ्ली आणि म्रुगगडावर जाण्यासाठी म्रुगगडाच्या पायथ्याशी असलेल्या भेलीव गावात आलो. भेलीव गावातुन म्रुगगड आणि त्या मागिल रांगेत मोराडीचा लक्षवेधी सुळका छान दिसतो. मोराडीचा सुळक्यालाच शिवलींग असेही म्हणतात.
भेलीव गावात जाणारा रस्ता
म्रुगगड
मोराडीचा सुळका किंवा शिवलींग
म्रुगगडाची वाट
चिरांट्या सारखे फळ
म्रुगगडाची गुहा
गुहेच्या बाजुलाच असणार्या पायर्या आपल्याला गडाच्या सर्वोच्य माथ्यावर घेऊन जातात. या किल्ल्याचा वापरही मुख्यतः टेहळणीसाठी होत असावा त्यामुळे वरती विशेष काही बांधकाम नाही. २-४ पाण्याची टाकी. पाणी वापरण्यायोग्य.
पुन्हा थोडसं खाऊन घेतलं. एक तासात पायथ्याच्या भेलीव गावात आलो.
भेलीव गावात परतताना
बाईकला किक मारली आणि रात्री ९.०० ला घरी आलो. दोन दिवसात येतो असं सांगुन गेलेला नवरा एकच दिवसात परत आल्यामुळे बायकोही खुष आणि एकाच दिवसात दोन गड झाल्यामुळे अस्मादिकही खुष. ;) ;)
प्रतिक्रिया
6 Mar 2010 - 1:10 am | मदनबाण
छान फोटो,अपरिचीत किल्ल्यांची ओळख करुन दिल्याबद्धल धन्यवाद... :)
मदनबाण.....
मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
6 Mar 2010 - 9:03 am | प्रचेतस
बज्जुभाऊ,
सुरेख फोटो. आत्तापर्यंत अनेकवेळा मृगगड हा सह्याद्रीच्या मुख्य धारेवरुन (लायन्स पॉईंट) पाहिला होता. पण तुमच्यामुळे तो खालूनही पाहता आला. तसेच अनघाई या अपरिचीत दुर्गाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.
असेच भटकत रहा.
---(तुमच्यासारखाच एक भटक्या) वल्ली
6 Mar 2010 - 9:29 am | विसोबा खेचर
लै भारी..!
बबनमामा आवडले! :)
तात्या.
7 Mar 2010 - 12:29 pm | नितिनकरमरकर
मि हि गेली २० वर्ष ट्रेक्स करत आहे, पण हे दोन किल्ले कधी बघितले नव्हते. धन्यवाद
7 Mar 2010 - 11:05 pm | कपिल रावल
लेख भन्नाट आहे पण मृगगड असे क्रुपया एडीट कर. :)
11 Jun 2015 - 12:52 pm | चिन्या१९६५
foto क दिसत नहित?