प्रॉन्स बालचाव

प्रभाकर पेठकर's picture
प्रभाकर पेठकर in पाककृती
5 Apr 2008 - 7:01 pm

साहित्यः

कोलंबी - १/२ किलो
कांदे - २ मध्यम
काश्मिरी मिरच्या - १२-१५ किंवा काश्मिरी मिरची पावडर २ टेबल स्पून किंवा कुठलेही भडक रंगाचे तिखट आपल्या अंदाजानुसार
जिरं - १ टी स्पून
अख्खी काळी मिरी - १ टी स्पून
हळद - १ टी स्पून
मीठ - चवीनुसार
साखर - २ टीस्पून
व्हिनेगर - १-१/२ (दिड) कप
आलं - १ इंच
लसूण - ३ कांदे
कढीपत्ता - २ काड्या
तेल - १ कप
कृती:

कोलंबी सोलून साफ करून घ्या.
कांदे बारीक चिरून घ्या.
आलं - लसूण एकदम बारीक चॉप करून घ्या.
मिरच्या (किंवा तिखट) + जिरं + काळी मिरी + हळद + मीठ + साखर + व्हिनेगर घालून वाटून त्याची लालभडक मुलायम पेस्ट बनवा. (पाणी घालू नका. व्हिनेगर मध्येच वाटा.)
तेल तापवून त्यात बारीक चिरलेला कांदा लाल होईस्तोवर परतून घ्या.
कांदा लाल झाला की त्यात कढीपत्ता, आलं, लसूण घालून चांगले परता. खमंग वास आला पाहिजे.
आता त्यावर कोलंबी टाकून परतून घ्या.
कोलंबी शिजली की तिखटाचे वाटण घाला. किंचित (जास्त नको) पाणी घालून सर्व मिसळा.
तेल सुटे पर्यंत परतून जास्तीचे पाणी आटवा आणि कोलंबी सरसरीत बनवा.
सर्व्हींग बाऊल मध्ये काढून त्यावर हिरवीगार कोथिंबीर भुरभूरून सजवा.
प्रॉन्स बालचाव तैय्यार.

हि मुळात पोर्तुगिझ पाककृती आहे. गोवेकर सदस्यांना कदाचित माहित असेल. आंबट-गोड-तिखट अशी चव आहे. गरम गरम पोळी बरोबर छान लागतेच पण गरम भातावर.... जवाब नही. (सोबत कच्चा कांदा विसरू नये.)

ह्या पाककृतीत व्हिनेगर आणि लसूणाचे प्रमाण जरा जास्त आहे पण तो पाककृतीचा आत्मा आहे.

शुभेच्छा...!

पाकक्रिया

प्रतिक्रिया

नंदन's picture

5 Apr 2008 - 7:19 pm | नंदन

पाककृती मस्त आणि फोटो तर अप्रतिम. काश्मिरी मिरच्यांमुळे आलेला लाल रंग (तुमच्याच पावभाजीच्या कृतीप्रमाणे) सुरेख दिसतो आहे.

बाकी तुम्ही म्हणालात तसे गोव्यात हा पदार्थ चाखला आहे. इथे वाचल्यावर प्रथम लोणच्याच्या चवीच्या जवळ जाणारी आंबट-गोड-व्हिनेगरी चव आठवली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

स्वाती दिनेश's picture

5 Apr 2008 - 7:26 pm | स्वाती दिनेश

काय मस्त चित्र आहे.. पाहूनच पाणी सुटले..म्हणजे मी समुद्री प्राण्यांची प्रेमी नसतानाही...
आणि पाकृ तर आहेच भन्नाट.. ह्याच्या बरोबर गरम भाताबरोबर जबाब नही म्हणता मग ह्या मकई राईस बरोबर पहा बर कसे लागेल ते...http://www.misalpav.com/node/1374
आता केलेच पाहिजे..
स्वाती

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Apr 2008 - 7:39 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काय मस्त चित्र आहे.. पाहूनच पाणी सुटले..

असेच :)
पेठकर साहेब,
नुसत्या पाकक्रिया लिहित जा !!!
चित्र नका टाकत जाऊ, लै त्रास होतो. आपल्या पाककृतीचे चित्र पाहुन खाव-खाव सुटते. अशा वेळी मुद्दामहुन आमच्याकडे पारंपारिक चकत्या-चकत्याची भेंडीची भाजी होत असते. :)

इनोबा म्हणे's picture

5 Apr 2008 - 8:12 pm | इनोबा म्हणे

ते चित्र काढा आधी.पोटात कोळंबी नाचायला लागली राव.
पुण्यात कुठं अशी कोळंबी खायला मिळंल का रे! कुणाला माहीत असेल तर सांगा लवकर....

"दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे"
-इनोबा म्हणे

अभिज्ञ's picture

6 Apr 2008 - 12:54 am | अभिज्ञ

बहुतेक चिंचवड टेल्को समोर "मालवणि मेजवानि" मध्ये मिळु शकेल.

अबब.

इनोबा म्हणे's picture

6 Apr 2008 - 12:59 am | इनोबा म्हणे

बहुतेक चिंचवड टेल्को समोर "मालवणि मेजवानि" मध्ये मिळु शकेल.
बहूतेक म्हंजी..... च्यामारी एवढ्या लांब(डेक्कनवरुन) जायचं आणि नाय मिळालं उपाशीच परत यायचं.... जरा नक्की कुठे मिळेल ते सांगा की.

|| भले सज्जनाला चारु चिकन अन रोटी | नाठाळाला ठेऊ उपाशी पोटी ||
-इनोबा म्हणे

अभिज्ञ's picture

6 Apr 2008 - 1:18 am | अभिज्ञ

बहूतेक म्हंजी..... च्यामारी एवढ्या लांब(डेक्कनवरुन) जायचं आणि नाय मिळालं उपाशीच परत यायचं.... जरा नक्की कुठे मिळेल ते सांगा की.

दादानू, मग आम्हि काय बेगलोर वरुन येउन ते चेक करुन तुम्हाला सांगु म्हणता?...))))))) ह्.घ्या.

पण एक सांगतो ,तुम्ही या ठिकाणि जाउन उपाशी काहि रहात नाहि एवढे मात्र लिहुन घ्या.
मालवणि पध्दतिचे नोन-वेज चे एक से एक पदार्थ इथे मिळतात.
मला आता नक्कि आठवत नाहि अशि कोलंबी करी इथे खाल्लि का नाहि ते.
परन्तु आमचे इथले आवडते पदार्थ म्हणजे.
१.प्रान्स कोळिवाडा
२.चिकन मालवणि.
आपणच एकदा जाउन खातरजमा करुन घेउन आम्हालाहि कळवावे हि विनंति.

पेठकर काका ,
प्रान्स कोळिवाडा ची रेसिपी इथे देउ शकाल काय?

अबब

प्रशांतकवळे's picture

6 Apr 2008 - 9:27 am | प्रशांतकवळे

पुणे स्टेशन भागात महेश लंच होम आहे... प्रॉन्सचे पदार्थ ठिकठाक मिळतात.

प्रशांत

पुण्यात सदाशिव पेठेत " सुगरण" एस पी पासुन पेरु गेट कडे सरळ जायचे नागपुर च्या थोडे पुढे त्याच लायनीमधे.
मधे मी एकदा चाखली होती कोळंबी करी.

कोलबेर's picture

5 Apr 2008 - 11:59 pm | कोलबेर

'काय जेवलात?' ह्या ऐवजी 'काय जेवणार?' असा धागा असता तर 'प्रॉन्स बालचाव' असे आवर्जुन दिले असते.:)

किलिंग रेसीपी आणि फोटो आहे. रंग तर इतका मादक आला आहे की बस रे बस्!! आणि बाऊल मध्ये देखिल काळजीपूर्वक भरुन (कडा एखाद्या पेपर टिशून पुसुन घेतल्या सारखा वाटतात ..) बारीक सारीक गोष्टींची देखिल काळजी घेतल्याने आणि अगदी मिनीमल सजावट वगैरमुळे कोळंब्या अगदी उठून दिसत आहेत. नक्की बनवणार. इथे दिल्या बद्दल धन्यवाद!!

विसोबा खेचर's picture

6 Apr 2008 - 12:06 am | विसोबा खेचर

पेठकरशेठ,

आपण तर फोटो पाहूनच खलास झालो, पुढची पाकृ वाचलीच नाही! :)

फारच देखणी पाकृ! वा वा!

अवांतर - कोलंबीभात किंवा कोलंबीपुलावाचीही पाकृ व फोटो लवकरच येऊ द्या पेठकरशेठ!

आपला,
(कोलंबीप्रेमी) तात्या.

स्वाती राजेश's picture

6 Apr 2008 - 12:40 am | स्वाती राजेश

तुम्ही नेहमीप्रमाणे फोटो टाकून फारच पंचाईत करता.:)))))
पाककृती मस्त दिसत आहे.
जरा पाडवा झाला कि करून पाहीनच.
कलर का.मि.मुळे (काश्मिरी मिरची) आला आहे ना? मस्त आहे.

प्रभाकर पेठकर's picture

6 Apr 2008 - 9:00 am | प्रभाकर पेठकर

समस्त खवय्यांचे मनःपूर्वक धन्यवाद. चवीने खाणार त्यांना देव देणार.

ही कोलंबी करी नाही. त्यामुळे मला नाही वाटत पुण्यात कुठे (हॉटेलात) मिळत असेल असे. हं! कुठे गोवन (मालवणी नाही) हॉटेल असेल तर शक्य आहे. गोवन हॉटेल असेल तर मस्तपैकी पोर्क व्हिंदालू, पोर्क सर्पोतेल वगैरेही मिळेल. असे एखादे हॉटेल पुण्यात किंवा मुंबईत असेल तर मलाही कळवा. फार फार वर्षांपुर्वी (१९७३ ते १९७९ ह्या काळात) हुतात्मा चौकात एका आतल्या गल्लीत होतं एक प्रसिद्ध गोवन हॉटेल. तिथे जाईन - जाईन म्हणेस्तोवर परदेश गमन झाले आणि ती भेट राहूनच गेली. असो.

कोलबेर's picture

6 Apr 2008 - 9:23 am | कोलबेर

आजच ताजे प्रॉन्स आणून बालचाव बनवले.. आंबट गोड चवीमू़ळे मस्त लागले!! पिनाकोलाडा आणि प्रॉन्स बालचाव मझा आ गया!! :)

विसोबा खेचर's picture

6 Apr 2008 - 9:29 am | विसोबा खेचर

वरूणदेवा,

धन्य आहे रे बाबा तुझी! :)

तात्या.

प्रभाकर पेठकर's picture

6 Apr 2008 - 9:31 am | प्रभाकर पेठकर

श्री. कोलबेर,

हार्दिक अभिनंदन. नववर्षाची गुढी उभारलीत तर. फोटो मस्त आहे. पाककृतीही भन्नाट बनली असणार.

काश्मिरी मिरची मिळाली नाही का? काही प्रमाणं बदललेली दिसताहेत. जसे लसूण?

कोलबेर's picture

6 Apr 2008 - 9:39 am | कोलबेर

अहो खूपच भन्नाट बनली पाककृती..
लसणाचं म्हणाल, तर तुम्ही २-३ कांदे असे दिले आहे.. अहो इथे लसणाचे कांदे म्हणजे खरंच आपल्या कांद्या इतके मोठे असतात.. त्यामूळे अंदाजाने त्या थोराड लसणाच्य ४-५ पाकळ्या टाकल्या. कश्मिरी मिरच्या कुठल्या मिळताहेत इथे? 'कश्मिरी लाल' म्हणून एक तिखट मिळते ते टाकले... आणि कढीपत्ता पण मिळाला नाही सध्या त्याच्या इंपोर्टवर बंदी काय टाकलीय म्हणे :(.. पण तरीही पाककॄती 'भन्नाट' बनली होती.. इतकी सोपी आणि मस्त पाककृती दिलेली असताना इथे लोकं हॉटेलं का शोधत आहेत कळले नाही ? :))

प्रभाकर पेठकर's picture

6 Apr 2008 - 10:05 am | प्रभाकर पेठकर

ह्म्म्म्म! म्हणजे तो चिनी लसूण असावा. तो १ अख्खा कांदा घालावयास हरकत नाही. चॉप केलेला लसूण घासागणिक लागला पाहिजे.
असो. पुढच्यावेळी हा बदल केलात तर अजून मजा येईल. कारण लाल तिखट, साखर, व्हिनेगर आणि भरपूर लसूण ह्याची एकत्रित चव लई ग्रेट लागते.