
साहित्यः
कोलंबी - १/२ किलो
कांदे - २ मध्यम
काश्मिरी मिरच्या - १२-१५ किंवा काश्मिरी मिरची पावडर २ टेबल स्पून किंवा कुठलेही भडक रंगाचे तिखट आपल्या अंदाजानुसार
जिरं - १ टी स्पून
अख्खी काळी मिरी - १ टी स्पून
हळद - १ टी स्पून
मीठ - चवीनुसार
साखर - २ टीस्पून
व्हिनेगर - १-१/२ (दिड) कप
आलं - १ इंच
लसूण - ३ कांदे
कढीपत्ता - २ काड्या
तेल - १ कप
कृती:
कोलंबी सोलून साफ करून घ्या.
कांदे बारीक चिरून घ्या.
आलं - लसूण एकदम बारीक चॉप करून घ्या.
मिरच्या (किंवा तिखट) + जिरं + काळी मिरी + हळद + मीठ + साखर + व्हिनेगर घालून वाटून त्याची लालभडक मुलायम पेस्ट बनवा. (पाणी घालू नका. व्हिनेगर मध्येच वाटा.)
तेल तापवून त्यात बारीक चिरलेला कांदा लाल होईस्तोवर परतून घ्या.
कांदा लाल झाला की त्यात कढीपत्ता, आलं, लसूण घालून चांगले परता. खमंग वास आला पाहिजे.
आता त्यावर कोलंबी टाकून परतून घ्या.
कोलंबी शिजली की तिखटाचे वाटण घाला. किंचित (जास्त नको) पाणी घालून सर्व मिसळा.
तेल सुटे पर्यंत परतून जास्तीचे पाणी आटवा आणि कोलंबी सरसरीत बनवा.
सर्व्हींग बाऊल मध्ये काढून त्यावर हिरवीगार कोथिंबीर भुरभूरून सजवा.
प्रॉन्स बालचाव तैय्यार.
हि मुळात पोर्तुगिझ पाककृती आहे. गोवेकर सदस्यांना कदाचित माहित असेल. आंबट-गोड-तिखट अशी चव आहे. गरम गरम पोळी बरोबर छान लागतेच पण गरम भातावर.... जवाब नही. (सोबत कच्चा कांदा विसरू नये.)
ह्या पाककृतीत व्हिनेगर आणि लसूणाचे प्रमाण जरा जास्त आहे पण तो पाककृतीचा आत्मा आहे.
शुभेच्छा...!