आता रोजच यावसं वाटतं तुझ्याकडे,
तसे तुझ्या माझ्यामधिल आस्तित्वाचा शोध मला माझ्या जन्मापसुनच लागला,
पण आता तुझ्या ओढीने मी खुपच व्याकुळ होते,
माझे अश्रु शिंपडल्याशिवाय तू तुझ्या नीद्रेतून जागा होत नाहिस
एरवी तुझे माझ्यातील आस्तित्व तू जरा देखिल जाणवु देत नाहिस
तू अमुर्त आहेस, मुखवटे चढवायला तुझ्याकडे चेहरा, शरीर आहे कुठे
तू आहेस फक्त एक भावना माझ्याच मनात पैदा झालेली.
तुझे आस्तित्वच माझ्या आस्तित्वात आहे
पण तरिही वेडं मन तूला माणसात शोधायला जाते
तुला शोधित शोधित मी मृगजळापाठी वेडयासारखी धावते
आणि धावुन धावुन थकले कि पुन्हा तुझ्याकडे येते
तू सवयीप्रमाणे पुन्हा मला तुझी शितल छाया आणि अथांग प्रेम देतोस
आणि म्हणतोस वेडे "तुझ्यातच आहे मी आणि तू मला शोधित इतकी धावलीस?"
खरंच, मी आहे मन.. अतृप्त, आसक्त, तुषार्त
आणि तू आहेस माझा आत्मा... अमुर्त, निराकार तरिही शाश्वत, सच्चा.
प्रतिक्रिया
2 Mar 2010 - 5:47 pm | शुचि
फारच सुरेख....... वर्षा.
किती वेगळ्या विषयावर लिहीले आहेत आपण.
आणि किती सुंदर.......
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
2 Mar 2010 - 7:04 pm | वर्षा म्हसकर-नायर
धन्यवाद शुची.
2 Mar 2010 - 7:26 pm | मेघवेडा
किती सुंदर!! अप्रतिम!!
>> आणि म्हणतोस वेडे "तुझ्यातच आहे मी आणि तू मला शोधित इतकी धावलीस?"
अहाहा! सुरेख!! कुणाला आपल्या प्रिय व्यक्तीची आठवण आल्याशिवाय राहील हे वाचून? मी तर हळवा झालो पुरता!
मस्तच लिहिलय वर्षातै!
-- मेघवेडा.
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!