प्रिय मिपाकर,
येत्या पाच मार्च रोजी http://thinkmaharashtra.in/ या संस्थळाचे उदघाटन आहे.
मी आणि तात्या याप्रसंगी होणार्या चर्चेत सहभागी होणार आहोत.
मला मिळालेले हे आमंत्रण मी तुमच्या समोर ठेवत आहे.
सध्या हे संस्थळ प्रायोगीक तत्वावर सुरु झाले आहे.
समस्त मिपाकर आणि मराठी अनुदिनीकारांना एक नम्र विनंती.
आपल्या आणि आपल्याला माहीती असलेल्या मराठी ब्लॉगर्सची माहीती कृपया द्यावी.(म्हणजे मला गृहपाठ करून जाता येईल.)
आमंत्रणाची प्रत देत आहे.
धन्यवाद.
************************************************************************
मा. रामदास ,स.न.
थिंक महाराष्ट्र डॉट कॉम ह्या मराठी संकेतस्थळाच्या उदघाटनाचा (लॉचिंग) कार्यक्रम
५ मार्च २०१०, शुक्रवार, रोजी सायंकाळी ६.०० वाजता
दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्र, यशवंत नाट्यगृहाचे शेजारी, माटुंगा, मुंबई येथे आयोजित केला आहे.
ह्या कार्यक्रमाचा एक महत्वाचा भाग म्हणजे मराठी ब्लॉग्ज व संकेतस्थळांशी संबंधित मान्यवरांचे एक चर्चासत्र.
विषय आहे - ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी
चर्चेत सहभागी होताहेत - संजीव लाटकर, तात्या अभ्यंकर, रामदास आणि अतुल तुळशीबागवाले
चर्चासत्राचे संचालन करतील - माधव शिरवळकर
ह्या चर्चासत्रात सहभागी होण्यास संमती दिल्याबद्दल थिंक महाराष्ट्र च्या वतीने आपले आभारी आहोत.
धन्यवाद.
आपले,
माधव शिरवळकर आदिनाथ हरवंदे
(९९८७६४२७९१) (९७५७१०४५६०)
प्रतिक्रिया
26 Feb 2010 - 9:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'थींक महाराष्ट्र ’ या मराठी संकेतस्थळाला मनःपुर्वक शुभेच्छा..!!!
ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी या विषयावर चर्चासत्रात सहभागी होणा-या सहभागी वक्त्यांना आणि आम्हाला परिचित असलेले तात्या अभ्यंकर आणि रामदास यांना विचारमंथनासाठी शुभेच्छा..!!!
चर्चासत्रातील 'निबंध' लिखित स्वरुपात असतील तर ते किंवा चर्चासत्रातील सारांश मिपावर वाचायला एक वाचक म्हणून आवडेल.
-दिलीप बिरुटे
26 Feb 2010 - 9:09 pm | रामदास
26 Feb 2010 - 9:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'थींक महाराष्ट्र ’ या मराठी संकेतस्थळाला मनःपुर्वक शुभेच्छा..!!!
ब्लॉग्ज, वेब माध्यम आणि मराठी या विषयावर चर्चासत्रात सहभागी होणा-या सहभागी वक्त्यांना आणि आम्हाला परिचित असलेले तात्या अभ्यंकर आणि रामदास यांना विचारमंथनासाठी शुभेच्छा..!!!
चर्चासत्रातील 'निबंध' लिखित स्वरुपात असतील तर ते किंवा चर्चासत्रातील सारांश मिपावर वाचायला एक वाचक म्हणून आवडेल.
-दिलीप बिरुटे
5 Mar 2010 - 11:55 am | वाहीदा
काका,
चर्चासत्र संपल्यावर विचारमंथन काय झाले यासंबधीत तुमच्या शैलीत खुमासदार लेख आल्यास मिपाकर धन्य होतील .
फक्त सारांश नको :-)
~ वाहीदा
5 Mar 2010 - 1:46 pm | प्रकाश घाटपांडे
थिंक महाराष्ट्र डॉट इन आहेच ना? आता डॉट कॉम चा उद्देश काय असावा? असो
फलज्योतिष विषयाची विधायक व मूलभुत चिकित्सा करणारा ब्लॉग अशी आमच्या फलज्योतिष चिकित्सा मंडळ ची टिमकी आम्ही वाजवत असतोच. त्यानिमित्त लोकांना थिंकायला मिळते.
काही लोकांना थुंकायला मिळते हा भाग अलहिदा
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
5 Mar 2010 - 2:39 pm | विसोबा खेचर
हा हा हा! साला हा आमचा प्रकाश पयल्यापासनंच एक नंबरचा हलकट! :)
तात्या.