प्रास्तविकः मुक्तसुनितांच्या 'बने, बने' च्या पुढील भागांची अनंत काळापर्यंत वाट पाहून त्यांच्या या उत्तम लेखमालेचा अकाली आणि अपघाती मृत्यू झाला असावा या निष्कर्षाप्रत आम्ही आलो. प्रच्छन्न प्रतिभेच्या प्रसन्न उन्मेषावर असा कालौघाचा घाव पडावा यामुळे मनचंद्रम्यावर काळिम्याचे दाट धुके दाटून आले. (मुक्तसुनितांचे नुसते नाव जरी घेतले तरी भाषेचे काय भजे होते ते पहा!) त्यामुळे त्यांच्या 'बनी' प्रमाणे आम्हाला नाईलाजाने आमच्या मानसपुत्राला - हणम्याला- कण्हतकुथत जन्म द्यावा लागला. हणम्याने एका हातात आमचे बोट धरुन (आणि दुसर्या हाताने आपली ढुंगणावरची घसरणारी चड्डी सावरत - लिखाणाच्या पहिल्या परिच्छेदात असला एखादा शब्द असला की लिखाणाला - 'सत्यकथे'च्या भाषेत सांगायचे तर - 'टोक' येते म्हणे!) आमचा हणम्या आमच्याबरोबर मिसळीच्या हॉटेलात आला त्याची ही कथा आहे. या लिखाणातला आमचा हणम्या तर काल्पनिक आहेच, पण खुद्द आम्हीदेखील फारसे अस्सल नाही. इतर पात्रे आणि संकेतस्थळावरील काही खर्याखुर्या व्यक्ती यांच्यांत काही साधर्म्य आढळल्यास तो - वेल, योगायोगच समजावा!)
"हणम्या, सांभाळून, नाहीतर पडशील गाढवा वेंधळ्यासारखा! हंगाश्शी! आलास का आत? तर हेच आपले ते जगप्रसिद्ध हॉटेल बरे! बघ कसा झगमगाट आहे, कशी गर्दी आहे ते! असा दणका उडवून द्यावा लागतो, काय समजलास! आणि ते गल्ल्यावर बसलेले मालक बघितलेस का? काय? काय म्हणालास? गबदुल?च च च ... तुला अगदीच रे कसे व्यवहारज्ञान नाही? गुटगुटीत म्हणावे हणम्या! शब्द हे शस्त्र असते. ते सांभाळून वापरावे. कर, नमस्कार कर मालकांना. कशाला? अरे इथली पद्धत आहे तशी. हा मालक बाकी राजा माणूस आहे बरं का. श्शू... नको तेथे डोके चालते तुझे! ज्या हॉटेलात जाईन तिथे मी हेच म्हणत असतो हे आत्ताच कशाला आठवायला पाहिजे तुला? गप्प बस बघू. तर मी काय सांगत होतो, माणूस अगदी लाखात एक. बुधवार - शनिवार तर दहा लाखात एक. शास्त्रीय संगीतातला अगदी तज्ज्ञ आहे बरे! काय? असे कोण म्हणते? अरे, कोण म्हणजे काय गाढवा? खुद्द मालकच म्हणतात तसे! तुला नाही का पटत? सांगू का एखादी यमनातली चीज म्हणायला? काय म्हणालास? त्यापेक्षा मी म्हणतो त्यावर विश्वास ठेवलेला बरे? हम्म. आलास म्हणायचा लायनीवर. चल , पुढे चल बघू.
हे बघ, इथे ओळीने बसले आहेत ना ते मालकांचे भालदार-चोपदार. अरे, इतक्या महत्वाच्या हॉटेलाची राखण करायची म्हणजे रखवाली नको का करायला? बरेच आहेत तसे, पण तूर्त दोघांचीच ओळख करुन देतो तुला. हे पहिले. अरे, घाबरु नको हणम्या! चष्म्याच्या वरुन बघत बोलायची सवय आहे त्यांना, त्यात भ्यायचं काय? हे इथले जुने-जाणते बरं का? नाव? नावात काय आहे? आणि मी नाव सांगितलं की तू म्हणायचास की मालकांनी आपल्या गोतावळ्यातल्या आडनावबंधूंचीच वर्णी लावली आहे म्हणून! तर नाव जाऊ दे! हा पाहिलास का त्यांच्या हातातला हातोडा. कशाला? अरे, कवितांची तोडफोड करायला उपयोगी पडतो तो! पाहिलास कसा वजनदार आहे तो. हां, आता गंज चढलाय त्यावर थोडा, पण एखादी परदेशवारी घडली की कल्हई करुन आणतील ते त्याला. काय? त्यांच्या हाताशी असलेले कागद? कविता असतील म्हणतोस त्या? वेडा रे वेडा! अरे, ते कागद आहेत राजिनाम्यचे! 'सोडतो, सोडून चाललो, संबंध संपले' असे अधूनमधून म्हणावे लागते हणम्या! त्याशिवाय आपले वजन कसे वाढणार? बघीतलंस का किती वजन वाढलं आहे ते! जग हे असे आहे बघ हणम्या! अजून बच्चा आहेस बघ तू हणम्या!
चला पुढे. हे दुसरे. काय? काय म्हणालास? यांच्या चेहर्यावरची रया अशी गेलेली का? आता काय सांगू तुला हणम्या! ही फार मोठी कथा आहे. सांगतोच तुला. एकदा काय झाले , रखुमाईला पंढरीत कोणी विचारेना बरं का. मग तिला आला राग. गेली मग ती फणफणत विठोबाकडे आणि म्हणली, 'पंढरीनाथा, झडकरी आता, पंढरी सोडून चला विनविते रखुमाई विठठला'. विठोबा आपला भोळा. तो म्हणाला, 'तु पूडे हो रकुमाई, मि एतोच..' अरे, अरे उच्चार म्हणजे काय? हा सगळा सुद्द्लेखनाचा मामला आहे. पण ते जाऊ दे. मग विठोबा आपले सगळे चंबूगबाळे आवरून एकनाथांना, नामदेवबुवांना 'अमुचा रामराम घ्यावा' वगैरे म्हणून आले. आणि आता बघतात तर काय! रुकमाबाई आपली पुन्हा 'शंकरा'च्या दरबारात रमलेली. तीही आपल्या खर्याखुर्या रुपासकट बरं का! मग काय करणार बिचारा विठोबा? कुठे जाणार तो? मग त्याच्या तोंडावरची रया जाणारच की! काय, आले का ध्यानात?
बघ, कसा भराभर हात चालतो आहे या दुसर्यांचा. काहीतरी माहितीप्रद लिहीत असतील म्हणतोस? छे रे! 'माहितीची देवाणघेवाण' म्हटली की थरकाप उडतो बिचार्यांचा. ते ना, बसल्याबसल्या नवनव्या स्वाक्षर्यांची प्रॅक्टीस करत आहेत. काय करणार बिचारे! स्वतःची अशी फक्त स्वाक्षरीच जमते त्यांना. जाऊ दे, जाऊ दे, त्या स्वाक्षरीतल्या शुद्धलेखनाच्या चुका काढत बसलास तर रात्र होईल इथेच. चल पुढे जाऊ.
हा ताटभर मिसळ समोर घेऊन बसलेला नरपुंगव पाहिलास का? हा आपल्या भीमाचा फिरंगी अवतार बरं का! काय! जेन? तीही मिळेल की त्याला एखादी. हा आपल्या हॉटेलाचा जाणकार बरं का! अगदी 'पॅसिफिक' महासागराइतके ज्ञान आहे त्याला. बघ त्याचे बाहू कसे फुरफुरताहेत, बघ त्यांच्या मांडीचे पट कसे वळताहेत, आणि गर्दन तर एखाद्या खोंडासारखी आहे, नाही का? गाणं? कुठल? गाणं आठवलं बुवा तुला? 'मासूम' मधलं कुठलं गाणं? आणि त्यात काय स्वतःचे शब्द घातलेस तू? काय? 'बहुत खूबसूरत है ये बॉडी लेकिन अगर ब्रेन भी होता तो क्या बात होती'.. श्शू... चूप अगदी. एका फटक्यासरशी होत्याचा नव्हता करुन टाकेल तो तुला. गप्प बस अगदी. चल पुढे.
हे पहा आपल्या कपाळावर चार वैचारिक आठ्या चढवून बसलेले मिसळीचे 'भक्त'. वैचारिकतेचे हे सम्राट बरं का. इतके की जगात कोण वैचारिक आहे आणि कोण सामान्य हे त्यांना म्हणे नुसत्या नजरेने समजते. त्यांच्याभोवतीची ती 'वर्तुळा'कार आभा पाहिलीस का? जपून हो हणम्या. हळूच त्यांच्या मागून त्यांना वळसा घालून आपण पुढे जाऊ. काय म्हणालास? लाथ मारतील? अरे, ते चालेल एकवेळ. त्यांच्या मागून गेलो तर लाथ मारतील, पुढून गेलो तर मात्र... जाऊ दे. असल्या गुदगुल्या तुला न कळालेल्याच बर्या.
काय म्हणालास? पाय दुखायला लागले. बरं बसूया थोडा वेळ. जरा वेळाने इतरांशीही परिचय करुन देईन हो तुझा. भूक ना? मलाही लागली आहेच. काय मागवू? मिसळ?"
प्रतिक्रिया
16 Feb 2010 - 8:02 pm | विसोबा खेचर
चालू द्या मज्जामज्जा..
आपण काय बोलत नाय.. पुढील भागांच्या प्रतिक्षेत.. :)
तात्या.
16 Feb 2010 - 9:48 pm | टारझन
ह्हा ह्हा ह्हा :)
अंमळ मौज वाटली .. हल्ली ब्रेनलेस लोकं लै फ्येमस व्हाया लागली गा काय ?
=)) अंमळ गुदगुल्या झाल्या =))
- ब्रेण्लेसराव
जोवर अंगात दम आहे तोवरंच ***त मजा आहे :)
16 Feb 2010 - 10:16 pm | चतुरंग
माझा गुडघा आणि घोटा दोन्हीही दुखतात हल्ली! :D
(ब्रेनड्रेन)चतुरंग
16 Feb 2010 - 10:46 pm | टारझन
तर काय ? एवढा प्रचंडबुद्धीवादी माणूस =)) पण तरीही संदर्भ देण्यासाठी थेट सभासदाचं ("जेन") नाव द्यावं लागलं =)) काय वेळ आली खॉ खॉ खॉ ...
बाकी ब्रेणलेस सोडून बाकीचे वर्णन अंमळ पानचट झाले आहे ;)
16 Feb 2010 - 10:48 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत आहे. फोडणी टाकायला विसरले असावेत बहुदा, सपक झाली आहे ही पाकृ!! असो.
अदिती
16 Feb 2010 - 11:03 pm | शुचि
टारझन दुसर्यावर सतत चिखलफेक करणार्याला प्रचंड बुद्धीवादी म्हणतात का रे ? :?
नाही नवीन आहे म्हणून विचारते आहे.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
17 Feb 2010 - 12:01 am | टारझन
या चाट वर समजवतो =))
17 Feb 2010 - 3:52 am | शुचि
टारझन, आपला http://www.misalpav.com/node/5147 हा लेख वाचला पुढील वाक्याने ह. ह. पु. वा. - "हल्ली जनातलं/ मनातलं मध्ये पोत्याने ओतल्यासाखे लेख येत आहेत .. असे निदर्शनात आले आहे की आम्ही मिसळपाव जॉइन केल्यापासून जेवढे लेख लिहीले नाहीत .. तेवढे लेख काही महान लेखकांनी २ दिवसात प्रसवले" =)) =)) =)) ........
धिस चॅट सेशन वॉज बेनिफिशिअल फॉर माय मिपा प्रोफाइल.... धन्यवाद!!!
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
17 Feb 2010 - 6:36 am | सन्जोप राव
चिड मत, टारु. एखादे वेळी काहीच गंभीरपणे न घेण्यातही मजा असते.
(शेणकाल्याचा सडा घालताना एखादा थेंब आपल्या अंगावर उडणारच! माणसाने त्यातच मोगर्याचा सुगंध शोधायचा असतो! - एक शुचिर्भूत वाक्य!)
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
17 Feb 2010 - 9:13 am | टारझन
लोल =)) ह्यात चिडण्यासारखं काय बॉ ? आम्ही फक्त खोट काढत होतो :)
उल्टा आमचं वर्णन सोडून बाकी गोष्टींत " तर्री कम पाणी जादा " झाले आहे , तेंव्हा स्पष्ट मताबद्दल राग णसावा :)
(संजोप्श्रीचा फ्यान) टार्या अतिभयंकर
16 Feb 2010 - 8:10 pm | गणपा
हा हा हा.
सन्जोप राव चापा ती मिसळ आणि लागा पुढच्या मेंब्रांच्या ओळख -परेडला.
हा पण त्या 'बने' सारख हणम्याला वार्यावर सोडुनका.
16 Feb 2010 - 9:43 pm | शुचि
गणपा "धटींगण राव" मिसळ चापत नसून इतरांना न्याहाळत आहेत.
खरच uncomfortable feeling येऊन राहीलय /:) ....... नजरही वाईट्ट आहे मेल्याची =))
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
17 Feb 2010 - 6:31 am | सन्जोप राव
खरंच की काय शुचिताई? बरं केलंस हो मला सांगितलंस ते! आता मी आपली घट्ट पदर आवळून बसते....
असलं काही बायकांनी वाचूच नये बै! एखादी गिरिजा कीर, विजया राजाध्यक्ष, व पु काळे ष्टाईल कथा छापा बै! म्हणजे आवळलेल्या पदराने डोळे पुसत पुसत आम्ही वाचू!
सन्जोप राव
मिसळ तिखट लागत असेल तर बालूशाही खा!
16 Feb 2010 - 8:11 pm | श्रावण मोडक
चौके-छक्के!
वाचतो आहे. पुढचा भाग कधी? मानकरी कोण-कोण आणि कोणत्या रुपात येताहेत याचं कुतूहल वाढलंय.
पहिली प्रतिक्रिया तात्यांचीच आहे; तेव्हा आता होऊन जाऊ द्या जोरदार.
मालकांना गुटगुटीत म्हणालात हे योग्यच, पण खात्या-पित्या घरचा हे व्यक्तीशः मला अधिक रुचणारं वाटलं या लेखात.
17 Feb 2010 - 4:52 am | Nile
आवड्या! आम्ही वाचतोय! पुढले दणके मात्र जोरदार येउद्यात हो! :)
16 Feb 2010 - 8:24 pm | शुचि
तात्या कोण कोण "नमुने" येतात हो या हॉटेलात :( बायांना बसायला वेगळा भाग नाही का?
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
16 Feb 2010 - 8:31 pm | गणपा
माताय इथे पण आरक्षण का ;)
16 Feb 2010 - 8:40 pm | गणपा
प्रकाटाआ
16 Feb 2010 - 8:32 pm | ब्रिटिश टिंग्या
तुर्तास इतकेच....
पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत!
16 Feb 2010 - 8:33 pm | प्रभो
हॅहॅहॅ....
वाचतोय...
--प्रभो
-----------------------------------------------------------------------
काय सांगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
प्रभोवाणी
16 Feb 2010 - 8:43 pm | विंजिनेर
हॅ हॅ हॅ, रामदास पाध्येंच्या बोलक्या बाहुल्या आठवल्या :)
(लज्जतदार लिज्ज्जतदार)विंजिनेर
16 Feb 2010 - 9:59 pm | नितिन थत्ते
चालू द्या. मालकांनीच असं म्हटलंय तेव्हा चालूच द्या.
*आमच्याखेरीज इतर माणसंसुद्धा कुजकट लिहू शकतात हे पाहून मौज वाटली. आम्हाला वाटायचं फक्त आम्ही लोकच असं लिहू शकतो.*
नितिन थत्ते
16 Feb 2010 - 10:06 pm | प्राजु
चौकार षट्कार.. जोरदार.
- प्राजक्ता
http://www.praaju.com/
16 Feb 2010 - 10:33 pm | मेघवेडा
जबरा!!!
-- मेघवेडा
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
16 Feb 2010 - 11:57 pm | मिसळभोक्ता
रावसाहेब,
मस्तच !
पहिल्या परिच्छेदातच फुटलो ! हल्ली हे अतिशारदीय कुठे कडमडले आहेत कोण जाणे.
आणखी येऊ द्या !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
17 Feb 2010 - 12:00 am | ऋषिकेश
छान लिहिलंय. पण खरं बोलायचं तर (विषय नेहमीचाच असल्याने म्हणा / लेखकाचे हॉटेलातील निरिक्षण कमी पडल्याने म्हणा) अपेक्षेइतकी मजा नाहि आली.
पुढच्या भागात मस्त दाणादाण उडवाल अशी अपेक्षा आहे. पुढील भागाच्या प्रतिक्षेत
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
17 Feb 2010 - 1:53 am | सुमीत भातखंडे
फटकेबाजी
17 Feb 2010 - 4:07 am | मुक्तसुनीत
रावसाहेब,
च्यामारी या परीक्षेच्या हंगामात तुमचा मूड भारी लागलाय ! (पोरांचं काय खरं दिसत नाही ! ) ;-)
प्रच्छन्न प्रतिभेच्या प्रसन्न उन्मेषावर असा कालौघाचा घाव पडावा यामुळे मनचंद्रम्यावर काळिम्याचे दाट धुके दाटून आले.
खि खि , जीए आणि सखाराम गटणेचा हायब्रीड केलेला दिसतोय !
बाकी सर्व टोले यथास्थित बसलेले आहेत.
मंडळी, या अशा प्रकारचे लिखाण मी कधीकाळी केलेय त्या अनुभवावरून सांगतो , सर्वांनी हलके घेणे ! येंजॉय :-)
17 Feb 2010 - 4:10 am | मिसळभोक्ता
त्यांच्याभोवतीची ती 'वर्तुळा'कार आभा पाहिलीस का? जपून हो हणम्या. हळूच त्यांच्या मागून त्यांना वळसा घालून आपण पुढे जाऊ. काय म्हणालास? लाथ मारतील? अरे, ते चालेल एकवेळ. त्यांच्या मागून गेलो तर लाथ मारतील, पुढून गेलो तर मात्र... जाऊ दे. असल्या गुदगुल्या तुला न कळालेल्याच बर्या.
च्यामारी, आता विजूभाऊ पेटेल. मग मज्जाच मज्जा...
- पिटातला प्रेक्षक
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
17 Feb 2010 - 6:39 am | सन्जोप राव
हे आवडले मिभो. सूज्ञास अधिक सांगणे नलगे...
सन्जोप राव
जगण्यात मजा आहे, तोवरच मरण्यात मजा आहे.
17 Feb 2010 - 9:14 am | II विकास II
जुन्या लोकांचे चांगले चांगले लेख यायला लागले.
चांगले आहे.
17 Feb 2010 - 9:54 am | प्रकाश घाटपांडे
लई दिसात बनी आली नाई म्हनुन तिला मारुन टाकली . हा हनम्या बी लई वाढावच दिस्तोय!
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
17 Feb 2010 - 12:22 pm | जयवी
खूप दिवसांनी दिसलात.....मज्जा येतेय...पुढचा भाग येऊ द्या लवकर :)
17 Feb 2010 - 8:07 pm | सुवर्णमयी
तरी संजोप राव इथे उगीच लिहिते झाले नाहीत...
आता एकेकाचा नंबर लागणारः)
18 Feb 2010 - 1:28 am | मिसळभोक्ता
आजकाल कोणीही कुठेही लिहिते झाले आहेत.
मराठी आंतरजालावर कोणीही कायमचे शत्रू किंवा मित्र नसतात, हे नक्की.
- (सुतकी संकेतस्थळ पुनरुज्जीवन उपक्रमात आपला सहभाग अपेक्षित आहे. आमचे आगामी आकर्षणः द्वंद्वचित्रे आणि क्षोभचित्रे - भाग २०)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
18 Feb 2010 - 10:41 am | श्रावण मोडक
जुने-जाणते जालकरी असे बोलू लागले की बरं वाटतं! ;)