(आमची प्रेरणा: आता, सांगायलाच हवी का ?)
हल्ली कधी कधी असे व्यनी येतात की ते वाचून मला जाम जालमहर्षी झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी जालमहर्षी झालेला सर्वात खडूस म्हातारा आहे असंही वाटायला लागतं.
शीर्षक आणि सुरूवातीच्या दोन ओळी तुम्हाला गोंधळवायला आणि लेखाची सुरूवात म्हणून टुकार आहेत. तेव्हा आता डायरेक्ट विवक्षित ठिकाणी हात...
गेले १० वर्षं माझा नेट संचार रखडत रखडत चालू आहे. मनोगतासकट इतरही अनेक पोर्टल्स (सदस्यत्व रद्द होईपर्यंत) आणि आता स्वतःचा ब्लॉगही (जो कोणी वाचत नाही) अश्या सर्व ठिकाणी माझा वावर असतो (हल्ली निनावी). या गेल्या १० वर्षात माझ्या आयुष्यात शिक्षण, करीअर, प्रेमप्रकरणे, भानगडी इत्यादी संदर्भात अनेक उलथापालथी घडल्या. आणि गेल्या ५ वर्षांपासून मला हा उपरीनिर्दिष्ट (म्हणजे वरती लिहिलेला..) प्रकार अनुभवास येऊ लागलाय.
त्याचं झालं असं. एका संकेतस्थळावर थोडीशी ओळख झालेला एक इसम मला खरड लिहून कामासंबंधात काही बोलायचं आहे असं तस्मात भेटूया असं म्हणू लागला. भर संध्याकाळी अति गर्दीच्या कर्वे रोडवर भरपूर गजबजलेल्या एका बारमध्ये दारू प्यायचं ठरलं. भेटल्यावर बोलणं झालं त्याचा गोषवारा असा की सदरहू इसम हा ५ वर्ष लोकांना काम्पुटर विकून नुकताच गुडगावहून परतला आहे. तो शाळेत असताना त्याने कधीतरी होस्टेलमधून पळून जाण्याचे काम केलं होतं. त्यामुळे आपण उत्तम पळपुटा असल्याची त्याची खात्री आहे. या बळावर त्याने संकेतस्थळ निर्माणक्षेत्रात पाय रोवायचं ठरवून अनेक जालोत्तमांना धक्का देण्याचे योजिले आहे. हे कार्य सिद्धिस जाण्यासाठी त्याला माझ्या मदतीची म्हणजे माझ्या ओळखींचा धागा पकडून संधी प्राप्त करून घेण्याची गरज आहे. माझ्या ओळखीचे काही त्यावेळेला इतर संकेतस्थळांवर बंड पुकारणारे सदस्य नव्हते. आणि त्याच्या जालकर्तुत्वाबद्दल, संगणकाबद्दल त्याने केलेली स्वस्तुती यापलिकडे काही माहीतीही नव्हती. मी पडलो स्पष्टवक्ता. प्रांजळपणे ते सांगितलं. आणि वर हेही सांगितलं की तुझं कर्तृत्व मला लक्षात यावं आणि तुझं संकेतस्थळ व्हावं या दृष्टीने तू मराठी संकेतस्थळांवरील कंपूबाजीत सामील हो. वाटलं तर मालकाच्या पुढे पुढे कर. भवती न भवती करत तो सामील झाला. पण इथे नुसतंच टंकायला लागतंय, आयपी पत्ते जाहीर करण्याची लुसलुशीत संधी मिळत नाहीये हे त्याच्या लक्षात आलं आणि मग त्याने मलाच अनेक विशेषणे देऊन माझ्या कंपूत येणे बंद केले. पण त्याची नाराजी मात्र खरडवहीतून तो दर्शवत राह्यला.
याच आसपास दुसर्या एका (तथाकथित) ताईंची पण श्येम टू श्येम केस झाली. एकेकाळी कालिजात किंवा तत्सम कुठेतरी वापरलेला संगणक मग दुर्बिणीवरची नोकरी मग अचानक आपल्या "लेखनशैलीचा" साक्षात्कार आणि मग मलापण संकेतस्थळ काढायचय असा व्यनी. व्यनिबाहुल्यामुळे मला लगेच उत्तर द्यायला जमले नाही तर माझ्या प्रतिसादावर 'काय हे अजून उत्तर पण दिले नाही?' असा जाहीर उपप्रतिसाद. मग कधीतरी नंतर मी त्यांना जीटाकवर बोलावणे. ताईंकडून काही टंकून घेणे. लिहिल्यावर खूप वर्षं झालीयेत आणि गंज काढायला हवा याची मला खात्री पटणे. ते मी प्रांजळपणे सांगणे आणि गंज काढायला मदत करायची तयारी दाखवणे. मग ताईंचे गायब होणे. आणि संकेतस्थळांवर अधून मधून माझ्यावर विरुद्ध कंपूकडून हेटाई करवणे इत्यादी ओघाने आलंच...
अश्या तर्हेने माझा महत्वाच्या जागी बसलेला व्हिलन होऊन गेला.
अजूनही विविध पद्धतीने संकेतस्थळ चालक बनण्याबद्दल व्यनी थडकत असतात. आणि दर वेळेला या लोकांचं कौतुक आणि आश्चर्य वाटत आलेलं आहे. संगणकाचं प्रशिक्षण घेतलंय, कधी काळी थोडसं प्रोग्रामिंग केलंय असं हे लोक म्हणतात. हे प्रशिक्षण वा अनुभव महिन्या दोन महिन्याचा मराठी संकेतस्थळावर वावर किंवा एखाद्या कंपूबहाद्दराला दिलेला "+१" प्रतिसाद इतपतच असतो. अशी कोणे एके काळी घातलेली संकेतस्थळ लेखनाची पाटी अचानक उठून संकेतस्थळ चालनाच्या धुमश्चक्रीत उतरण्यासाठी कशी काय पुरेशी वाटू शकते हा प्रश्न मला दर वेळेला पडतो. बर कुठलीतरी जेमतेम तोंडओळख पकडून असा व्यनी करायचा आणि एवढ्याश्या ओळखीवर/ माहीतीवर मी संकेतस्थळ चालनाचं मार्गदर्शन द्यावं अशी अपेक्षा बाळगायची हेही अचाट आणि अतर्क्यच. नाही का?
या लोकांचा संकेतस्थळांवरचा (अनेकांपैकी एक) आयडी मला माहीत असतो. त्यापलिकडे फारशी काही माहीती नसते. त्या व्यक्तीचे लेखन कधी बघितलेले नसते. त्या व्यक्तीचा चेहरा मला माहीत नसतो. हो इथे चेहराही महत्वाचा असतो. (येथे चेहरा म्हणण्यापेक्षा चेहरे म्हणणे संयुक्तिक ठरेल.) ठराविक प्रकारच्या संकेतस्थळाला ठराविक प्रकारचाच चेहरा उपयोगाचा ठरतो. तो मला माहीत नसतो. मग मी मार्गदर्शन द्यायचं, इतर स्थळांवरून सदस्य फोडायचे, ते तरी कुठल्या बळावर? आणि का?
बर कदाचित ह्यातले काही अजून प्रकाशात न आलेले जालमहर्षी असू शकतात पण ते मला कळण्यासाठी या सगळ्यांना मी भेटले पाहीजे आणि त्यांची कंपूबाजी-कौशल्याची परिक्षा घेतली पाहीजे आणि मग चालकत्वाच्या दिशेने त्यांना वळवले पाहिजे. पण मी हे करत बसलो तर माझा कंपू कसा सांभाळू? ही समाजसेवा करून मन नाही भरत माझं. आणि काही उत्तम कंपूबाज असू शकतात पण अनेक बाकरवड्या निघणारच हे तर आहेच मग त्यांना नकार दिल्यावर त्यांना जो राग बिग येतो त्याचं काय? आणि तसंही मार्गदर्शन करणारा मी कोण? मी कुठलीही संकेतस्थळे काढलेली नाहीत. मी आय एस पी नाही. मी कुठेही सर्वर अॅडमिनिस्ट्रेटर नाही. तेव्हा या विषयात म्हणजे संकेतस्थळ चालन या विषयात माझा उपयोग नाही.
प्रत्येक प्रकारचं बंड करण्याचा एक योग्य तो मार्ग असतो. मराठी संकेतस्थळ चालनाच्या बाबतीत तो मार्ग आधी योग्य ती कंपूबाजी आणि मग ड्रुपॅल, गमभन वगैरे पायर्यांवरून जातो.
कंपूबाजी ही कुठल्या ना कुठल्या पातळीवर गरजेचीच असते. मग ते संपादक-कंपू, संपादक-विरोधी-कंपू, म्हातारे कंपू, तरुणांचा कंपू असं काही असू शकतं किंवा याच कंपूंशी संलग्न असे ब्लॉग्ज असू शकतात किंवा नीलकांत, शशांक अश्यांच्या ड्रुपॅल शिकवणार्या संस्था असू शकतात किंवा तात्या नावाची एक संस्थेवत व्यक्ती असू शकते किंवा मग व्यक्तिचित्रण, अनुभवकथन करत करत आपला कंपू बनवणे असू शकते. काही असले तरी +१ लिहिण्याला पर्याय नाहीच. हे सहमतीचे प्रतिसाद नुसतं "शिकवलं ते गिरवलं" स्वरूपाचे असून चालत नाही. आधी भरपूर सहमती, अगदी कंटाळा येईतो "बाडीस" आणि मग आपल्या बुद्धीने +१ ते +२० अशी तिरपी तिरपी भर घालत जाणं हे महत्वाचं असतं. वर यादी केलेल्या प्रत्येक कंपूंमधे अशा सहमतीच्या प्रतिसादांचं चांगलंच प्रशिक्षण दिलं जातं. पण तरी प्रत्येक कंपूंमधून आलेल्या सदस्यांच्यात उत्तम "टार्या" असतात तसेच बाकरवड्याही असतातच की. जे काहीच घेत नाहीत, त्यांच्या आत काहीच पोचत नाही, झिरपत नाही. अर्थात असं असलं तरी कंपूबाजीचं प्रशिक्षण आणि त्यासाठी मेहनत हे गरजेचंच.
यानंतर मुद्दा येतो लेखनाचा. लेखन बघूनच तुम्हाला कंपूत बोलवायचं का नाही हा विचार केला जातो. यात अपमानास्पद वाटून घेण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही मराठी संकेतस्थळ माध्यमात काम करू बघत असता तेव्हा तुमचं लेखनंही महत्वाचं असतंच. चांगलं वाईट, सुंदर कुरूप यापेक्षा तुमचं लेखन आणि तुमचे प्रतिसाद त्या कंपूच्या सदस्यांच्या व्यक्तिरेखेला अनुरूप असणं नसणं हे महत्वाचं असतं. लेखन आणि प्रतिसाद हेच संकेतस्थळ चालकांचं साधन किंवा माध्यम असल्यामुळे ते नीट राखणं, व्यसनांनी, चुकीच्या सवयींनी विरोधी कंपूंना +१ प्रतिसाद देऊन स्वतःची वाट न लावून घेणं हे संकेतस्थळ चालकासाठी महत्वाचं असतं. आणि मग त्या काढून टाकलेल्या लेखनाचे स्क्रीनशॉट्स काढून घेणं हे पण महत्वाचंच.
अनेक नवीन संकेतस्थळ सदस्य वेगवेगळ्या ब्राउझरमधे, वेगवेगळ्या फाँट साईझमधे स्क्रीनशॉट्स काढून घेत असतात. पण तुम्ही नवीन सदस्य आहात, तुमचे लेखन फारसा माहीत नाहीये आणि तुम्ही अमुक फाँट तमुक ब्राउझर करत उत्तम संगणकावर भरपूर स्क्रीनशॉट्स काढून घेतलेत तर ते स्क्रीनशॉट्स म्हणून उत्तम होतीलच यात काही वाद नाही. पण ते तुमचं लेखन, तुमचे प्रतिसाद यांची ओळख करून द्यायला उणे पडायला नको हे महत्वाचे.
आता हे स्क्रीनशॉट्स काढून घरी ठेवून द्यायचे नाहीत. मराठी संकेतस्थळावरील कंपूबाजीच्या संधी शोधण्यासाठी त्या संकेतस्थळ चालकांना खरडी करून ते स्क्रीनशॉट्स देऊन स्वतःचे नाव खरडीत टाकायचे. ते स्क्रीनशॉट्स संकेतस्थळांच्या मुखपृष्ठांवर लागतात. विविध ठिकाणी सदस्य फोडण्याच्या वेळी हे स्क्रीनशॉट्स बघून कंपूत प्रवेशासाठी बोलावलं जातं.
कवितांमधे रस असेल तर वेगवेगळ्या कवितांची विडंबनं करत रहायचं. गझल, वृत्तबद्ध आणि मुक्तछंद अश्या पातळ्या यात येतात. पहिल्या दोन पातळ्यांवर काम करत असताना तुमच्यातल्या शब्दनिवडीची मेहनत करायच्या क्षमतेचा कस लागतो. छंदबद्ध कवितेच्या विडंबनाची संधी मिळाली तर छंदशास्त्राचाही कस लागतो. मुक्तछंदामधे वृत्ताच्या फिकिरीवर न राहूनही अर्थ सांभाळणे आणि सगळ्या परिस्थितींमधेही उत्तम विडंबन देणे याची सवय होऊन जाते.
तात्याच्या संकेतस्थळावर तात्या काही ठराविक प्रतिसाद साधे सरळ पाठ करून लिहायला सांगतात. त्यातल्या एका प्रतिसादात असतं 'आज हिंदुस्थानका हर बूढा संकेतस्थळ बनाना चाहता है. --------- संकेतस्थळ बनानेके लिये ग्लेनफिडिच चाहीये.. ----- संकेतस्थळ बनानेके लिये कंपूबाजी करनी पडती है. --- नीलकांतका होना भी बहोत जरूरी है --- गमभन, ड्रुपॅलकी भी जरूरत पडती है.... ' अश्या तर्हेचा हा पानभर प्रतिसाद घोकत तात्यांनी सांगितल्याप्रमाणे अपशब्द मोजत, तारतम्य ढळू न देता सगळे लिहीत असतात. अधून मधून तात्या "बा*वला भां*द" असे मस्त ओरडत असतात. गमभन आणि ड्रुपॅलचं त्यांच्या त्यांच्यावर सोडून देऊन प्रतिसादांचे, कंपूबाजीचे वळसे देत असतात. त्यातून तावून सुलाखून, आयडी ब्लॉक न होता बाहेर पडलेला हळूहळू या संकेतस्थळ चालनाच्या धंद्यात स्थिरावतोच.
+१ प्रतिसाद आणि कंपूबाजी विसरलेले मात्र हे असे उगाच कोणालाही व्यनी करून संधी मागत रहातात. व्यनी करायचा त्याला आधी उगाचच मोठेपण आणि मग व्हिलनपण देऊन...
प्रतिक्रिया
11 Feb 2010 - 7:32 am | शेखर
हा हा हा...
तुमच्या कडुनच ह्या मुक्तकाच्या प्रतिक्षेतच होतो ....
आता मुकत्ता बाबतः तुमचा लेखनाचा दर्जा कायमच खास असतो...
अवांतरः हा कर्वे रोड वरील सदरहु बार कधी काळी जालीय राजकारणाचा अड्डा होता असे ऐकण्यात आले होते..
11 Feb 2010 - 7:41 am | मिसळभोक्ता
आमच्या कंपूतील लोकांनी सदर लेखनाच्या जीविताविषयी चिंता केल्यामुळे, आम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवला आहे. तेव्हा काळजी नसावी.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
11 Feb 2010 - 7:41 am | अमृतांजन
समयोचित लेख.
>> संकेतस्थळ बनानेके लिये कंपूबाजी करनी पडती है. --- नीलकांतका होना भी बहोत जरूरी है --- गमभन, ड्रुपॅलकी भी जरूरत पडती है...>>
त्या यादीत आणखी एक भर घालता येईल का पहावे- "स्टाइलमे प्रतिसाद लिकना पडताय" -म्हणजे असा- "मी किनाय, ह्या सगळ्यापेक्षा वेगळाय/ळीय. त्यामुळे ना, मी प्रतिसाद देणार (माझे अस्तित्व दाखवले पाहिजेल;) शेवटी मग मी लिहिणार, "बाकी चालू द्या" म्हणजे कसं लोकांना कळतं की इथं बॉस कोण आहे ते."
11 Feb 2010 - 7:53 am | विसोबा खेचर
अरेच्चा! मिपावरील बरीचशी भुतावळ गेली म्हणून मी निवांत होतो पण मिभो हे एक मोठ्ठं भूत अजूनही मिपावर शिल्लक आहेच की! :)
विडंबन बाकी फर्मास रे मिलिंदा... :)
खरं आहे रे बाबा!
छ्या छ्या! आम्ही मुळात संस्थळ विरोधी कंपूंतल्या मंडळींचे आयडीच ब्लॉक करतो, त्यामुळे +१ चा प्रश्नच येत नाही..;)
बाझवा तिच्यायला! ;)
तात्या.
11 Feb 2010 - 11:33 pm | मिसळभोक्ता
मिभो हे एक मोठ्ठं भूत अजूनही मिपावर शिल्लक आहेच की!
काळजी नसावी.
न भूतो न भविष्यति
म्हणजेच, हे भूत भविष्यात राहणार नाही :-)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
11 Feb 2010 - 7:55 am | विंजिनेर
पॅरडीड इन चीप टेस्ट :(
12 Feb 2010 - 5:09 am | उपाशी बोका
सुंदर लेख आहे.
-- उपाशी बोका
11 Feb 2010 - 8:03 am | टुकुल
प्रणाम जालमहर्षी..
आज २ वेळा प्रणाम करावा लागत आहे, तुम्ही, तात्या अजुन काही जाणते लोक ह्यांना इतिहास बराच माहीत आहे, सलाम !!
मराठी आंतरजालावरील अडाणी,
टुकुल
11 Feb 2010 - 8:35 am | विसोबा खेचर
हा लेख कुणा संपादकांनी अप्रकाशित केल्यास मला कृपया तसे कळवावे इतकीच विनंती..
ह्या लेखात अप्रकाशित करण्यासारखे मला तरी काही वाटत नाही. अर्थात, संपादकांच्या निर्णयात माझी ढवळाढवळ नसेल हे नक्की..
असो,
तात्या.
11 Feb 2010 - 10:27 am | टारझन
मला ही माझे लेख/प्रतिसाद उडण्यासारखे वाटत नाहीत .. का उडतात ते कळत नाही ... कोण सुक्कळीचा उडवतो ते ही कळत नाही :( ह्या सर्किटासारखा आपला पण काही तात्याकडे जॅक लागला तर लै मजा येईल राव मिसळपावावर ...
पुण्हा पैल्यासारखे तर्रीबाज प्रतिसाद देऊ .. काय हाय काय नाय काय ...
बरोबर क्का हो मिभो ?
- खाविंद भांडणकर
11 Feb 2010 - 8:39 pm | रेवती
ह्या लेखात अप्रकाशित करण्यासारखे मला तरी काही वाटत नाही.
अच्छा! असं आहे का? बरं
त्याचं काय आहे ना तात्या, आपल्याला हा लेख अप्रकाशीत होऊ शकेल कदाचित असं वाटलं त्यातच सगळं आलं. अशी विडंबनं करण्याबाबत काही वाटत नाही पण
(आमची प्रेरणा: प्रकाशकाकांनी पूर्वीच फिक्स केलेली.) अश्या प्रकारांचा वीट आलेला आहे. एखाद्याला महिनोन महिने त्रास द्यायचाच असे ठरवल्याप्रमाणे उल्लेख होत असतात. हे जे घडतय ते आज माझ्याबाबत नाही पण कधीकाळी घडलं तर मालक त्याबाबत कोणताही आक्षेप घेत नाहीत असं दिसतय.
रेवती
11 Feb 2010 - 10:15 pm | चतुरंग
विडंबन चांगले आहे पण प्रेरणा ज्या प्रकारे सांगितली आहे त्याला आक्षेप आहे!
(धागा संपादित करु शकतो पण सध्यातरी शब्दानेच काम भागेल असे वाटणारा - व्हिलन)चतुरंग
11 Feb 2010 - 11:39 pm | मिसळभोक्ता
रंगा, ऐश कर रे.
(च्यायला, ह्या तात्या संपादकांच्या कार्यात ढवळाढवळ करत नाही, पण संपादकांना घरचा अहेर मिळतो, त्याचे काय ?)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
11 Feb 2010 - 11:47 pm | चतुरंग
पण संपादकांना घरचा अहेर मिळतो, त्याचे काय ?
व्यक्तिगत प्रश्न! पास!! ;)
(ऐय्याश)चतुरंग
12 Feb 2010 - 1:07 am | टारझन
हाहाहा .. पास काय म्हणता 'रंगाळ भावोजी =))
12 Feb 2010 - 12:24 am | विसोबा खेचर
रेवतीतै असं काही नाही हो..कृपया तसा कुठलाही गैरसमज करून घेऊ नका...
तात्या.
11 Feb 2010 - 8:59 am | प्रमोद देव
उत्तम लेख.
मीही एक संकेतस्थळ काढू इच्छितो. ;)
नाव आहे "बालपणीचा काळ सुखाचा."
कुठे आणि कधी भेटू? :D
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
11 Feb 2010 - 11:42 pm | मिसळभोक्ता
प्रमोदकाका,
भेटण्याच्या जागेचा लेखातच उल्लेख आहे. फी म्हणून एक चपटी (खरे तर शिग्नेचरला चपटी म्हणणे चुकीचे. अंमळ गोलसर असते) घेण्यात येईल.
- स्वामी द्राक्षासवानंद
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
12 Feb 2010 - 8:37 am | प्रमोद देव
भेटण्याच्या जागेचा लेखातच उल्लेख आहे. फी म्हणून एक चपटी (खरे तर शिग्नेचरला चपटी म्हणणे चुकीचे. अंमळ गोलसर असते) घेण्यात येईल.
आम्ही अशा ठिकाणी भेटू शकत नाही आणि त्या स्वरूपातली फी देखिल देऊ शकत नाही. आम्ही देतही नाही आणि घेतही नाही. हवे तर एखादी नवी-जुनी चाल ऐकवू. ;)
आमच्या दृष्टीने 'फुकट ते सर्व पौष्टिक' असल्याने गेला बाजार चहा-कॉफीवर भागवले जाईल. ;)
**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
11 Feb 2010 - 9:04 am | II विकास II
अतिशय सुंदर लिखाण.
आंनंद वाटला, जुणे जाणते काका पुन्हा पाहुन.
11 Feb 2010 - 9:21 am | ब्रिटिश टिंग्या
@मिभोकाका,
तुमचे कोणे एकेकाळी धा मिंटात ५०+ प्रतिसाद घेणारे धागे आठवले!
असो, गेले ते दिन गेले! (की घालवले ते दिन घालवले) :)
11 Feb 2010 - 10:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
टिंग्याशी सहमत (काय बेक्कार दिवस आहे आजचा, या टिंग्याशी सहमती दाखवावी लागत आहे!)
मिभोकाका, एक संस्थळ काढायचं आहे, विरजण.कॉम ... मला ड्रूपॉल वापरायला शिकवाल का? ;-)
अदिती
11 Feb 2010 - 11:46 pm | मिसळभोक्ता
विरजण.कॉमः
ह्या पानापाशी पोहोचण्याची आपणास मुभा नाही.
आणखी काय ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
11 Feb 2010 - 10:06 am | कवटी
खतरनाक !
कवटी
11 Feb 2010 - 10:24 am | समंजस
=D>
11 Feb 2010 - 10:27 am | ऋषिकेश
:)
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
11 Feb 2010 - 10:33 am | आनंदयात्री
हा हा हा =))
हहपुवा.
11 Feb 2010 - 11:09 am | मदनबाण
हा.हा.हा... ;)
इतिहासाची खिचडी अंमळ गरम झालेली दिसतेय... ;)
लेखन मनापासुन झाल्याने आवडले. ;)
(पी.सी.बी)
मदनबाण.....
At the touch of love everyone becomes a poet.
Plato
11 Feb 2010 - 12:09 pm | शुचि
मस्त!!! पहील्यंदा वाटला हा सध्याच्या पठडीतला "डोकेदुखी" धागा उसवलाय पण वाचल्यनंतर फरच मजा आली. तरी "टू बी ऑन सेफर साइड" इतरांचे प्रतिसाद वाचेपर्यंत थांबले.
मजा आली. एकेक थोर डोकी आहेत खरी मिपावर.
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)
11 Feb 2010 - 1:24 pm | परिकथेतील राजकुमार
झकास !!
=)) =))
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
11 Feb 2010 - 2:11 pm | विनायक प्रभू
सवय सुटायची नाही.
का नंतर नी बोल्ड.
11 Feb 2010 - 11:48 pm | मिसळभोक्ता
मास्तर,
तुम्ही के बी डब्लू झालात, आणि आम्ही बोल्ड ?
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
11 Feb 2010 - 3:12 pm | मेघवेडा
काका, साष्टांग दंडवत तुम्हाला! ग्रेट आहात तुम्ही! मजा आली!
--
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
11 Feb 2010 - 4:54 pm | विशाल कुलकर्णी
दंडवत काकानु....
माझ्यापण डोक्शात किडा वळवळाय लागलाय..
वडा.कॉम नाव कसं वाटेल? पुढच्या शिकवणीसाठी तुमची फ़ी काय असेल?
(खिशावर हात ठेवुन संस्थळ काढायचे स्वप्न बघणारा)
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
11 Feb 2010 - 5:28 pm | प्रियाली
आपण म्हातारे झाले आहात हे खरेच कारण तसे नसते तर संकेतस्थळाचे मालक बनण्याची मनिषा बाळगणे या इतिहासाची सुरुवात आपल्यापासूनच सुरु होते हे विसरला नसता. :)
ते संकेतस्थळ विकत घेण्याचे इरादे, मनसुबे होते हे आठवले.
बाकी, विडंबन फर्मास.
आमचे पहिले प्रेम - अमिताभ
गरीबांचा अमिताभ - मिथुन
गरीबांचा मिथुन - गोविंदा
अशी मराठी संकेतस्थळांची वाटचालही हल्ली दिसते. ;)
11 Feb 2010 - 8:37 pm | लवंगी
लेखही मस्त.. इतिहास कळला आज...
आमचे पहिले प्रेम - अमिताभ
गरीबांचा अमिताभ - मिथुन
गरीबांचा मिथुन - गोविंदा
हे खरय पण तीघेही आपपले चाहते बाळगून आहेत..
11 Feb 2010 - 11:52 pm | मिसळभोक्ता
अशी मराठी संकेतस्थळांची वाटचालही हल्ली दिसते.
गरीबांची विकी, असा एका विशिष्ट संकेतस्थळाचा उल्लेख, जून २००८ मध्ये झाल्याचे आठवते.
बाकी, पूर्वजांवरचा लेख "धक्का"दायक !
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
11 Feb 2010 - 8:16 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
विडंबन एकदम जबरा. हहपुवा झाली. :)
-दिलीप बिरुटे
11 Feb 2010 - 11:20 pm | सर्कीट
ब-याच दिवसांनि चांगला खुसखुशीत लेख वाचतोय.
साहेब परत फॉर्म मध्ये आलेले दिसतात.
चालु देत.
सर्कीट
12 Feb 2010 - 2:18 pm | सर्किट
सर्कीटशी सहमत
सर्किट
12 Feb 2010 - 12:09 am | अक्षय पुर्णपात्रे
श्री मिसळभोक्ता, मराठी आंतरजालाच्या इतिहासाशी परिचित नसल्याने काही उल्लेख समजले नाहीत पण वर्तमानातील भुगोल माहीत असल्याने वाचण्यास मजा आली. मराठी आंतरजालावरील आयडींच्या आंतरजालबाह्य संबंधांतून त्यांच्या जालीय प्रतिमांना वेगवेगळी व्यासपीठे मिळते आहे, असे काहीसे लक्षात येत आहे.
12 Feb 2010 - 4:10 am | पाषाणभेद
आंतर'बाह्य संबंधांतून' शब्द वाचून डोळे पाणावले.

------------------------
डायबेटीस विरुद्ध लढा
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या-(इंजन मेक्यॅनीक)
(वरची माझी स्वाक्षरी आहे, पदवी किंवा शिक्षण नाही.)
12 Feb 2010 - 12:42 am | उपास
अगदी अगदी शाल जोड्या..
माझा ब्लॉग - उपास मार आणि उपासमार
12 Feb 2010 - 9:45 am | चित्रा
जाम जालमहर्षी झाल्यासारखं वाटतं. आणि नंतर त्यावर मी देणार असेन ते उत्तर आठवून मग मी जालमहर्षी झालेला सर्वात खडूस म्हातारा आहे असंही वाटायला लागतं.
म्हणजे? अजून काही शंका आहे की काय? :)
12 Feb 2010 - 10:54 am | प्रकाश घाटपांडे
स्वामी विरजणानंद! आपल्या प्रतिमेचे धगधगीत नीखारे पसरल्यावर अंनिसच्या चमत्कार फेम कार्यकर्त्यांना सुद्धा त्यावरुन चालता येणार नाही. यावर एकच उपाय म्हणजे द्राक्षासवाचा अंमल असे पर्यंतच चालून घ्यावे.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.
12 Feb 2010 - 7:18 pm | सुधीर काळे
मला इथला इतिहास माहीत नसल्यामुळे बरेच टोमणे-खास करून कंपूबाजीबद्दलचे-डोक्यावरून गेले, पण लेख कमालीचा खुसखुशीत व वाचनीय झाला आहे. वाचायला मजा आली.
हळू-हळू सांगोवांगीतून इतिहास कळेल व मग लेखही नीट कळेल अशी आशा आहे.
तोपर्यंत "जय हो"!
------------------------
सुधीर काळे (कृपया वाचा: http://tinyurl.com/ybwvk7j)
12 Feb 2010 - 9:49 pm | अभिज्ञ
लैच हुच्च.
आइच्यान लै दिवसानी एवढा खमंग लेख वाचला.
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.