माझी अगतीकता

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
31 Jan 2010 - 9:42 pm

माझी अगतीकता

अगदी सकाळी मी उठलो,
उठलो म्हणजे काय, सध्या जागाच असतो. पण आत्ता मी जागेवरून उठलो.
तर काय सांगत होतो मी... की मी सकाळी उठलो,
निघालो रस्त्यातून.

रस्त्यात बघतो तर बहूतेक माणसे फिरायला निघालेली.
कोणी जॉगींगच्या सुटात तर कोणी पळायच्या बुटात,
बायामाणसे पंजाबीत तर कोणी घरगूती साडीत.
म्हातार्‍यांनी हातात घेतली होती काठी,
कुत्रा हातात घेवून फिरत होती तरणीताठी.
कुणी जोडीने गप्पा मारत फिरत होते
तर कुणी कानात हेडफोन लावून गाणे ऐकत होते.

मला गंमत वाटत होती.
वाटत होत खेचावी कुणाची तरी मफलर
करावी कुणाची कुणाशीतरी टक्कर.

आताशा वाहनांचीही वर्दळ सुरू झालेली होती.
एकदोन पेपरवाले सायकलीवर दिसले
अन एकदोन पिवळ्या रंगाच्या स्कुलबस दिसल्या.

रस्त्यात एक आंधळी बाई काठी टेकीत टेकीत चालली होती.
तिला सिग्नलवर रस्त्या ओलांडायचा होता म्हणून थांबली होती.
मी तिच्या जवळ गेलो.
मी पुढे झालो नाही अन तिला मदतही केली नाही.

निघालो पुढे तसाच.

पुढच्याच चौकात माझ्या मागून एक पाण्याचा फुटका टँकर पाणी गाळत पुढे गेला.
त्याने पुर्ण रस्ता ओला केला.
लगेच त्याच्या मागून एक मोटरसायकलवाला जोरात आला.
अन तो उजवीकडच्या रस्त्याला जाण्यासाठी वळला.
ओल्या रस्त्याने त्याची गाडी फरफटत गेली.
तो खाली पडला.

बरे झाले त्याच्या मागून कोणतेच वाहन येत नव्हते.
तो एकटाच पडून होता. विव्हळला.

मी जवळच होतो. पण मी मदतीला गेलो नाही.
हं.....मी नुसताच बघत होतो.
निघालो पुढे तसाच.

आता हमरस्ता लागला होता.
तेवढ्यात कर्रर्रर्रsss असा आवाज आला
अन लागोपाठ अऑ...ईईईईई असा आवाज आला.
मी मागे वळून पाहीले तर एका कारच्या खाली एक शाळकरी मुलगा आलेला होता.
रक्ताच्या चिळकांड्या उडालेल्या होत्या.
कार थांबलेली होती.
त्यातील टेपवरच्या गाण्याची धकधक येथपर्यंत ऐकू येत होती.

मी जवळ जावू लागलो.
तेवढ्यात त्या कारमधल्या युवकाने जोरात कार पुढे काढली अन तो पळून गेला.
त्या कारचा रंग, मॉडेल अन नंबर सगळे मी नीट पाहून घेतले.

ईकडे तो मुलगा विव्हळत होता. ग्लानीने आचके देत होता.
रस्त्यात तो मुलगा अन मीच होतो.
मी त्याला बाजूला केले नाही की मदतही केली नाही.
मी नुसताच बघत होतो.

तेव्हढ्यात तेथे शाळेची एक बस आली.
ड्रायव्हरने त्या मुलाला ओ़ळखले असावे.
त्याच्याच बसमधला मुलगा असावा तो.
ड्रायव्हरने त्या मुलाला धिर दिला.
त्याने व गाडीच्या क्लिनरने त्या लहानग्याला उचलले
अन त्यांच्या गाडीत टाकले अन गाडी हॉस्पिटलकडे वेगाने नेली.

मी तेथेच उभा राहीलो.

तुम्ही म्हणाल की मी असा का वागतो कुणाला मदत का करत नाही.

मला मनात खुप वाटते की मदत करावी. चांगले काम करावे.
माझी अगतीकता तुम्हाला कधीच कळनार नाही.
मी कधीच कुणाला मदत करू शकत नाही.

कारण...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण,
मला सांगा, तुम्ही कधी भुतांना मदत करतांना पाह्यलय का?

कवितामुक्तक

प्रतिक्रिया

शुचि's picture

1 Feb 2010 - 4:15 am | शुचि

काटा आला अंगावर वाचून. शेवटपर्यंत खिळवून ठेवलय. शेवट मस्तच.
मल कवित आवडली कारण ती प्रयोगशील आहे. अशा किती कविता सापडतील ज्यांनी ठरावीक चाकोरी मोडली आहे?

अवांतर - भुता ऐवजी पिशाच्च शब्द वापरला असता तर काटाच नाही मला घेरी आली असती . @)
***************
आम्ही काय कुणाचे खातो
तो राम अम्हाला देतो

मीनल's picture

31 Jan 2010 - 10:03 pm | मीनल

काहीतरीच शेवट.
`कारण...`असे लिहून अनुत्तरीत ठेवल असत तर अधिक परिणाम कारक झाले असते असे वाटते.

मीनल.

प्राजु's picture

31 Jan 2010 - 10:12 pm | प्राजु

शेवट फारच अपेक्षित !
- प्राजक्ता
http://www.praaju.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Jan 2010 - 10:13 pm | बिपिन कार्यकर्ते

:)

बिपिन कार्यकर्ते